2 उत्तरे
2
answers
गणपती मंदिराबाहेर शमीचे झाड का असते?
3
Answer link
शमी या झाडाची पाने श्रीगणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे. गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते.
************************************************************************
शमी मंदार
गणपतीला जशा दूर्वा प्रिय तशीच शमी-मंदारही प्रिय असल्याचे सर्वांना माहित आहेच. शमीचे झाड हे उंच वाढते. त्याच्या सर्वांगाला काटे असतात. हे काटे म्हणजे अर्जुनाचे बाण असेही मानले जाते. कारण पांडवांनी अज्ञातवासात जातांना आपली शस्त्रे शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. त्यातील अर्जुनाच्या बाणांचे प्रतीक म्हणजे हे काटे असावेत.
शमीची पाने ही दुष्कृत्ये आणि दु:स्वप्ननाशक मानली जातात, तशीच ती मंगलदायकही समजतात. म्हणूनच दसर्याला शमीवृक्षाची पूजा करुन सीमोल्लंघन केले जाते. अशी ही शमी आणि तिच्या जोडीला मंदार या दोन्ही वृक्षांची पाने गणपतीला प्रिय का वाटू लागली ?त्याचीही एक कथा आहे.
ही कथा नारदऋषींनी इंद्राला सांगितली होती. वीतिहोत्र नगरीत औरव नावाचा महाविद्वान ब्राम्हण आपल्या परमधार्मिक वृत्तीच्या सुमेधा नामक पत्नीसह सुखाने संसार करीत होता. शमीका ही त्यांची मुलगी अतिशय सुंदर, गुणी होती. तिच्यावर त्या दोघांचे निरतिशय प्रेम होते. ती लहान असतानाच धौम्यऋषींच्या बुद्धिमान आणि श्रद्धाळू अशा मंदार नावाच्या मुलाबरोबर तिचा विवाह झाला. त्या दोघांचा संसारही अतिशय सुखासमाधानात चालला होता. एकदा काही कामानिमित्त जात असताना भ्रुशुंडीऋषी वाटेतच असणार्या मंदारच्या आश्रमात आले. भ्रुशुंडींना दोन भुवयांमध्ये सोंड तर होतीच, पण ते अंगाने चांगलेच स्थूलदेखील होते. त्यांचे ते रुप आणि तो स्थूल देह पाहून न राहावून मंदार आणि शमी हसू लागली. हे दाम्पत्य आपल्याला हसताना पाहून भ्रुंशुंडी रागावले. त्यांनी त्या रागाच्या भरात शमी-मंदारला तुम्ही दोघे वृक्ष व्हाल, तुम्हाला भरपूर काटे असतील. त्यामुळे एकही पक्षी तुमच्या आश्रयाला कधी येणार नाही, असा शाप दिला. त्क्षणी शमी-मंदार झाडे बनली. असा एक महिना गेला. आपल्या प्रिय शिष्याचे काहीच कुशल वर्तमान न समजल्याने मंदारचे गुरु शौनकऋषी हे औरवाच्या घरी आले. पण त्यांनाही त्या दोघांबद्दल काही ठाऊक नव्हते. तेव्हा शौनक ध्यानस्थ बसले. त्यांनी अंतर्ज्ञानाने भ्रुशंडीच्या शापाने त्या दोघांचे वृक्ष झाल्याचे जाणले. त्या दोघांची शापातून मुक्तता व्हावी म्हणून शौनक आणि औरव या दोघांनी बारा वर्षे गणेशाची आराधना केली. त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले. मात्र भ्रुशुंडी या आपल्या परमभक्ताचा शाप खोटा ठरु शकणार नाही, असे सांगून त्यामधून एक मार्ग दाखविला. तो म्हणजे त्या दिवसापासून आपण स्वत: मंदार वृक्षाच्या मुळाखाली वास्तव्य करु, तसेच शमीपत्रे आपल्याला प्रिय होतील. त्यामुळे जो कोणी आपल्या मूर्तीची स्थापना मंदार वृक्षाखाली करुन त्यावर शमीपत्रे आणि दूर्वा वाहून आपली पूजा करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील. इतकेच नव्हे तर मंदार वृक्ष, शमीपत्र आणि दूर्वा या तिघांचे मिलन हा एक महायोग समजला जाईल, असे सांगितले. त्या दिवसापासून गणेशपूजनात शमी-मंदार-दूर्वा यांना अनन्य स्थान प्राप्त झाले.
शमीवर गजाननाचे असलेले प्रेम दुसर्या एका कथेतून प्रत्यक्ष भगवान महादेवांनी पार्वतीला सांगितले आहे. अतिशय कीर्तिवान आणि महाप्रतापी अशी प्रियव्रत राजाची एक पत्नी कीर्ती ही पतीची नावडती होती. तिला जेव्हा छळ असह्य झाला, तेव्हा ती प्राणत्याग करण्यास सिद्ध झाली. त्या वेळी तिच्या देवल नावाच्या पुरोहिताने तिला त्यापासून परावृत्त करुन गणेशोपासना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने मंदार वृक्षाच्या वाळलेल्या लाकडापासून गणपतीची मूर्ती करवून घेऊन गणपतीच्या पूजेला प्रारंभ केला. एक दिवस बरेच शोधूनही दूर्वा न मिळाल्याने तिने हाती लागलेल्या शमीपत्रांनीच गणपतीची पूजा केली. त्याने प्रसन्न होऊन गणपतीने तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर तिचे दुदैवाचे दिवस संपले. ती राजाची प्रिय पत्नी बनली. तिला झालेला क्षिप्रप्रसादन हा मुलगा पुढे गणपतीचा परमभक्त म्हणून प्रसिद्ध झाला.
'
0
Answer link
गणपती मंदिराबाहेर शमीचे झाड असण्याची काही कारणे:
- पौराणिक महत्त्व: शमीच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, विजयादशमीच्या दिवशी पांडवांनी त्यांचे शस्त्र या झाडाखाली लपवले होते आणि याच दिवशी त्यांनी कौरवांवर विजय मिळवला होता. त्यामुळे शमीचे झाड विजय आणि शुभता यांचे प्रतीक मानले जाते.
- गणपती आणि शमी: गणपतीला शमीचे फूल अर्पण करणे शुभ मानले जाते. 'शमी पत्रम्' या नावाने ते ओळखले जाते. गणपती अथर्वशीर्षामध्ये देखील याचा उल्लेख आहे.
- वास्तुशास्त्र: वास्तुशास्त्रानुसार, शमीचे झाड मंदिराच्या परिसरात असणे सकारात्मक ऊर्जा निर्माण करते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करते.
- औषधी गुणधर्म: शमीच्या झाडामध्ये औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे ते आरोग्यदायी मानले जाते.
- पर्यावरण: शमीचे झाड पर्यावरणासाठी उपयुक्त आहे. ते हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते.
या विविध कारणांमुळे गणपती मंदिराबाहेर शमीचे झाड लावले जाते.
अधिक माहितीसाठी: