2 उत्तरे
2
answers
बेलाच्या झाडाचे महत्व काय आहे?
2
Answer link

बेलाच्या झाडाचे महत्व काय आहे
शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व
भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्यानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना 'आशुतोष' असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते.
बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्त्व आणि सुगंध पसरला जातो.
शिवपूजनात बेलाच्या पानांचे महत्व : भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्वाचे आहे. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, तुमच्याकडे पूजेसाठी कोणतिही सामग्री नसली, तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात. महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया..
अशी कथा आहे की, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शीव यांनी विष प्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घश्यात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसर्या आख्यायिकेनुसार, बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच शिवचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते.
शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व
भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्यानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना 'आशुतोष' असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच, बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे. पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे. शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे. देव स्वत: त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात. असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेऊन भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो. त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही.
शिवपुराण व्यतिरिक्त या पुराणातसुद्धा उल्लेख
बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार, एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मूळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फाद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायणी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते. शिव-पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे.
0
Answer link
बेलाच्या झाडाचे महत्व खालीलप्रमाणे आहे:
-
धार्मिक महत्व:
बेलाचे झाड हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. भगवान शंकरांना बेलाची पाने अर्पण केली जातात. असे मानले जाते की यामुळे ते प्रसन्न होतात आणि भक्तांना आशीर्वाद देतात.
-
औषधी महत्व:
बेलाच्या झाडाच्या पानांमध्ये आणि फळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. ते पोटाच्या विकारांवर, त्वचेच्या समस्यांवर आणि इतर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात.
-
पर्यावरणाचे महत्व:
बेलाचे झाड पर्यावरणासाठी खूप महत्वाचे आहे. ते हवा शुद्ध ठेवते आणि जमिनीची धूप होण्यापासून संरक्षण करते.
-
आर्थिक महत्व:
बेलाच्या फळांचा उपयोग अनेक उत्पादने बनवण्यासाठी केला जातो, ज्यामुळे लोकांना रोजगार मिळतो.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: