अध्यात्म झाडे वनस्पती आध्यात्मिक

उंबराच्या झाडाची माहिती हवी आहे? काय उंबराचे झाड चमत्कारी आहे? उंबराच्या झाडावर दैवी फुले आहेत का?

2 उत्तरे
2 answers

उंबराच्या झाडाची माहिती हवी आहे? काय उंबराचे झाड चमत्कारी आहे? उंबराच्या झाडावर दैवी फुले आहेत का?

17
उंबर हे अंजीर वर्गातले सदाहरित झाड आहे. त्या वर्गात वड, पिंपळ, उंबर, रबर प्लँट. अंजीर इ. नेहमी दिसणारी झाडे येतात. ते द्विलिंगी असून त्याला वर्षातून दोनदा फुले येतात आणि पुनरुत्पादन होते. त्याचा फुलोरा बहुधा अनेक लहान फुले एकत्र येणारा असा असतो. तो फुलोरा म्हणजेच ते उंबराचे फळ. शास्त्रीय दृष्टया उंबराचे झाड हे दैवीय आहे अशी समज असली तरीही वैज्ञानिक दृष्टया उंबराच्या मूळ-खोड़ापासून ते फळांपर्यन्त होणारा मानवास जो फायदा मिळतो ते पाहता, त्यास नैसर्गिक चमत्कार अशी व्याख्या मिळाली असेल...
नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया…
१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा . त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे . दिवसातून तीनदा घ्यावे.
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा.
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी , रक्तप्रदर , श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो.
६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचाचिक बत्ताशासोबत देतात.
७. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही नकाही खात असते . पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते . या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात.
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.
९.काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.
१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.
११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला. तो कशानेच थांबेना. मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला.

उंबराची साल, पानें व कच्चें फळ ह्यांच्या अंगीं स्तंभक धर्म असल्यामुळें त्यांचा आमांशादि रोगांत पोटांत देण्याच्या कामीं व बाह्योपचाराच्या कामींहि उपयोग करितात. तोंडांत अथवा जिभेस गरे पडले असतां फळें पोटांत देतात. उंबर दुधांत शिजवून दिले असतां पोटांतील इंद्रियांच्या मार्गांत कांहीं अडथळा असल्यास तो दूर होतो. उंबराच्या फळांचा मधुमेहांत चांगला उपयोग होतो. पाण्यांत फळें व पानें शिजवून त्या पाण्यानें स्नान करीत राहिल्यास महारोग दूर होतो असें म्हणतात. सालीच्या अंगीं रेतस्तंभक धर्म असून तिळाच्या तेलांत तिची वस्त्रगाळ पूड मिसळून दुष्ट व्रणावर लावितात. मधुमेहांत सालीचा काढा घ्यावा. कोवळ्या पानांची पूड करून मधाच्या अनुपानांत पित्तविकारावर देतात. उंबराच्या मुळीस फांसण्या टाकून त्यांतून निघणारा पातळ पदार्थ अथवा उंबराचें पाणी पौष्टिक म्हणून पोटांत देतात.

अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लीक करा...
http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92b933947/90990292c930
http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92b933947/90990292c930
उत्तर लिहिले · 4/11/2017
कर्म · 458560
0

उंबराच्या झाडाबद्दल माहिती:

  • वैज्ञानिक नाव: Ficus racemosa
  • कुळ: मोरेसी (Moraceae)
  • उपलब्धता: भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि आशियाच्या उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळते.
  • स्वरूप: मध्यम ते मोठ्या आकाराचे पानझडी वृक्ष.
  • फळे: लहान, गोलसर, लालसर रंगाची फळे येतात, जी खाण्यासाठी योग्य असतात.
  • उपयोग:
    • औषधी: उंबर अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरला जातो.
    • लाकूड: बांधकाम आणि फर्निचरसाठी वापरले जाते.
    • धार्मिक: हिंदू धर्मात याला पवित्र मानले जाते.

उंबराचे झाड चमत्कारी आहे का?

उंबराच्या झाडात चमत्कारिक गुणधर्म आहेत की नाही, हे पूर्णपणे श्रद्धेवर अवलंबून आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की या झाडात दैवी शक्ती आहे आणि ते घरात सकारात्मक ऊर्जा आणते.

उंबराच्या झाडावर दैवी फुले आहेत का?

  • उंबराच्या झाडाला दिसणारी फुले नसतात.
  • उंबराची फळे हीच त्याची फुले असतात, जी आतून बहरतात. त्यामुळे ती सहजासहजी दिसत नाहीत.
  • या झाडाला 'गुप्त फुले' येतात, असेही म्हटले जाते, कारण ती फळांच्या आत असतात आणि उघडपणे दिसत नाहीत.

उंबराच्या झाडाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ह्या झाडामध्ये दैवी शक्ती वास करते असे मानले जाते. त्यामुळे अनेक लोक या झाडाची पूजा करतात.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 1040

Related Questions

"बांडगुळ" म्हणजे काय? त्याच्या किती जाती असतात?
जंगलात सापडणारी नरभक्षक झुडपे?
माकडाची झाडे माडाची झाडे?
सूर्यफूल हे फूल आहे का?
नेचे, शेवाळ, मनीप्लांट या वनस्पतींना फुले असतात काय?
नेचे, शेवाळ, मनिप्लांट या वनस्पतींना फुले येतात का?
जलीय वनस्पतींमधील अनुकूलन?