Topic icon

आध्यात्मिक

2




बेलाच्या झाडाचे महत्व काय आहे
शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व

भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्यानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना 'आशुतोष' असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते.

बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्त्व आणि सुगंध पसरला जातो.


शिवपूजनात बेलाच्या पानांचे महत्व   : भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्वाचे आहे. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, तुमच्याकडे पूजेसाठी कोणतिही सामग्री नसली, तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात. महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया..
 

अशी कथा आहे की, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शीव यांनी विष प्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घश्यात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसर्‍या आख्यायिकेनुसार, बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच शिवचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते.

शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व
भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्यानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना 'आशुतोष' असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच, बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे. पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे. शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे. देव स्वत: त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात. असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेऊन भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो. त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही.


शिवपुराण व्यतिरिक्त या पुराणातसुद्धा उल्लेख
बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार, एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मूळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फाद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायणी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते. शिव-पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2024
कर्म · 53710
2
उंबर म्हणजे औदुंबर हे झाड जमिनीवर कुठे हि उगवतो.औदुंबर हे झाड घराच्या ठिकाणी कुठे हि उगवतो..औदुंबर झाड घरात न ठेवता घराबाहेर असावं औदुंबर झाड लक्ष्मी वास करते हे झाड सउखप्रआप्तई देत.औदुंबर झाड घराच्या इथे असणे चांगले आहे.
औदुंबर झाड घरी असावं का घरी का नसावं.तर हे जमिनीवर घराबाहेर वाढ चांगली होते आणि शुद्ध हवा हि मिळते




औदुंबर 
उंबराचे झाड म्हणजेच औदुंबर. उंबराच्या झाडाला पार बांधला तर, त्या झाडाला औदुंबर म्हणतात. २१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांना साधना करण्याचा मोह आवरलेला नाही. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती औरच आहे. म्हणून घराजवळ औदुंबर वृक्ष येणे म्हणजे पारंपरिक, पिढय़ानपिढय़ा दत्त अधिष्ठान असणे. पूर्वी कुणी केलेल्या भक्तीत, नंतरच्या पिढीत पडलेला खंड हा इशारा समजावा. भक्तीचे कर्ज झाले की, असा संकेत मिळतो. गुरूचे अधिष्ठान आहे ते!

>> सर्व कर्जे माफ. भक्तीचे कर्ज कधी चढवू नये. ते तिथल्या तिथे फेडत राहावे. प्रत्येक जन्मात. आज उपटून टाकाल ठीक आहे. पण, याचे परिणाम भावी काळात अनुभवास येत राहतील.
>> औदुंबराचे झाड जमिनीतील पाण्याच्या साठय़ाबाबत संकेत देते. या झाडाच्या सुकलेल्या काडय़ा होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही.
>> आयुर्वेदात औदुंबर झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावतात. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. याची फळे व सालीचा रस अंगाला चोळून आंघोळ केल्यास कुष्ठरोग बरा होतो.
>> उंबराची फळे खाण्यासाठी वापरतात. याची पाने शेळी, बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. विषावर उतारा म्हणूनही झाडाच्या चिकाचा उपयोग करतात.
>> औदुंबर वृक्षाचा पाला, फळे, साली गायीला खायला घातल्याने गाय सुदृढ होते, असा समज आहे.
>> या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन केल्याने सिद्ध फळ मिळते. उंबराच्या झाडावर एक दैवी फुल असते जे मुख्यत: कोणालाही दिसत नाही. ज्याला ते फुल दिसते त्याच्या भक्तीला दत्त माऊलीनी प्रतिसाद दिला समजावे.
>>एके काळी वास्तुशास्त्रात उंबराच्या लाकडाचा दाराच्या चौकटीत उंबरा (उंबरठा) बनविण्यासाठी वापर होत असे. सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव व्हायचा अशी ख्याती आहे.
>> अशा ह्या परंपरेतील दैवी वृक्षांची जोपासना अवघड आहे. पण अडचणीच्या स्थितीत योग्य त्या विधी करूनच आपण छाटणी केली तर योग्य ठरेल. ह्या विधी ब्राम्हणांकडून करवून घेणे उत्तम कारण दत्त, विष्णू ह्यांच्यासाठी सोवळे करणे क्रमप्राप्त आहे. आपण आपल्या श्रद्धेने विनंती करावी बाकी सदगुरु दत्त कृपा होइलच. दत्त माऊलीचे अधिष्ठान म्हणून औदुंबरास माझे शतश: नमन. (अनेकानेक वर्षे दत्तसेवेमुळे औदुंबर वृक्षास आजही प्रदक्षिणा करतो. का ते मलाही माहिती नाही.) जसे त्रिमूर्ती एकरुपच आहेत. तसेच वृक्षांच्या त्रिमूर्तीत एक साम्य आहे म्हणजे वड, पिंपळ, उंबर या फळांची रचना ही ‘फळात फुले’ अशी आहे. ही वृक्षे वषार्नुवर्षे अबाधित आहेत. आपण ह्यांचे महत्व जाणले तर अबाधित राहतीलही.
उत्तर लिहिले · 1/3/2023
कर्म · 53710
0

देव्हारा स्वतः घ्यावा की कुणाकडून घ्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये काही नियम नाहीत. खाली काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत करतील:

  • स्वतः घेणे: जर तुम्हाला तुमच्या आवडीचा देव्हारा निवडायचा असेल, तुमच्या घराच्या आकारानुसार आणि गरजेनुसार देव्हारा हवा असेल, तर तुम्ही स्वतःच देव्हारा घ्यावा.
  • कुणाकडून घेणे: कुणाकडून म्हणजे भेट म्हणून घेणे. जर तुम्हाला कुणी देव्हारा भेट म्हणून देत असेल आणि तो तुम्हाला आवडत असेल, तर तुम्ही तो स्वीकारू शकता.

शेवटी, देव्हारा घेण्याचा निर्णय तुमचा आहे. तुमच्या श्रद्धा आणि सोयीनुसार तुम्ही तो घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 1040
0

गळ्यात कवड्यांची माळ घालण्याचे शास्त्रीय कारण खालीलप्रमाणे दिले आहे:

  1. कवडी: कवडी ही समुद्रात आढळणारी नैसर्गिकरित्या तयार झालेली वस्तू आहे.
  2. वैज्ञानिक दृष्टिकोन:
    • कवड्यांमध्ये काही प्रमाणात कॅल्शियम कार्बोनेट (calcium carbonate) असते.
    • कॅल्शियम कार्बोनेट शरीरासाठी उपयुक्त मानले जाते.
    • त्वचेच्या संपर्कात आल्याने ते शरीराला काही प्रमाणात कॅल्शियम पुरवते, असा समज आहे.
  3. आरोग्य फायदे ( Health benefits):
    • कवड्या धारण केल्याने हाडे मजबूत होतात.
    • रोगप्रतिकारशक्ती सुधारते.
    • त्वचेच्या समस्या कमी होतात.

टीप: ही माहिती केवळ समजावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1040
17
नमस्कार. जी कोणती गणपती बाप्पाची मूर्ती वा फोटो आपणास आवडेल तो तुम्ही आनंदाने व मनापासून देव्हारात ठेवा. श्रद्धा महत्त्वाची आहे. अगदी नाणे-सुपारी यांच्या स्वरूपातही गणपती आपण ठेवू शकता/प्रतिष्ठापना करू शकता. रोज त्याला मनापासून नमस्कार, प्रार्थना करावी. तसेच सकारात्मक विचार, भावना असाव्यात. माझ्याकडे पण गणेशमूर्ती आहेत, पण मी रोज प्रार्थना करत नाही. तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने त्याची जाणीव झाली. धन्यवाद. "गणपती बाप्पा मोरया!"
उत्तर लिहिले · 10/7/2018
कर्म · 3595
0
समाधीजवळ झाड लावण्यासाठी काही उपयुक्त पर्याय आणि त्या कोणत्या बाजूला लावाव्यात याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

झाडांचे पर्याय:

  • पिंपळ: पिंपळ हे पवित्र झाड मानले जाते. हे झाड दीर्घायुषी असते आणि भरपूर सावली देते.
  • वड: वटवृक्ष हे देखील पवित्र मानले जाते. हे झाड मोठे झाल्यावर खूप पसरते, त्यामुळे त्याला मोठी जागा लागते.
  • लिंब: लिंबाचे झाड औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असते आणि ते वातावरण शुद्ध ठेवते.
  • बेल: बेलाचे झाड भगवान शंकरांना प्रिय आहे आणि ते शुभ मानले जाते.
  • चाफा: चाफ्याचे झाड सुगंधी फुले देते, ज्यामुळे वातावरण प्रसन्न राहते.

झाड कोणत्या दिशेला लावावे:

  • पिंपळ: पिंपळाचे झाड शक्यतो समाधीच्या पूर्वेला किंवा उत्तरेला लावावे.
  • वड: वडाचे झाड पश्चिमेला लावावे, ज्यामुळे ते जास्त सावली देऊ शकेल.
  • लिंब: लिंबाचे झाड दक्षिणेला लावावे, ज्यामुळे ते उष्ण हवामानापासून बचाव करेल.
  • बेल: बेलाचे झाड उत्तरेला किंवा पूर्वेला लावावे.
  • चाफा: चाफ्याचे झाड पूर्वेला किंवा दक्षिणेला लावावे.

टीप: झाड लावताना ते समाधीच्या संरचनेला बाधा आणणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच, झाडाची नियमित निगा राखणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 18/3/2025
कर्म · 1040
17
उंबर हे अंजीर वर्गातले सदाहरित झाड आहे. त्या वर्गात वड, पिंपळ, उंबर, रबर प्लँट. अंजीर इ. नेहमी दिसणारी झाडे येतात. ते द्विलिंगी असून त्याला वर्षातून दोनदा फुले येतात आणि पुनरुत्पादन होते. त्याचा फुलोरा बहुधा अनेक लहान फुले एकत्र येणारा असा असतो. तो फुलोरा म्हणजेच ते उंबराचे फळ. शास्त्रीय दृष्टया उंबराचे झाड हे दैवीय आहे अशी समज असली तरीही वैज्ञानिक दृष्टया उंबराच्या मूळ-खोड़ापासून ते फळांपर्यन्त होणारा मानवास जो फायदा मिळतो ते पाहता, त्यास नैसर्गिक चमत्कार अशी व्याख्या मिळाली असेल...
नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे. भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो. उंबराच्या झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो. या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया…
१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा . त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते. त्यात हे सरबत उत्तम आहे . दिवसातून तीनदा घ्यावे.
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा.
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते.
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो.
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी , रक्तप्रदर , श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो.
६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात. सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे.
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचाचिक बत्ताशासोबत देतात.
७. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही नकाही खात असते . पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते . या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात.
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा.
९.काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात.
१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे.
११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला. तो कशानेच थांबेना. मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला.

उंबराची साल, पानें व कच्चें फळ ह्यांच्या अंगीं स्तंभक धर्म असल्यामुळें त्यांचा आमांशादि रोगांत पोटांत देण्याच्या कामीं व बाह्योपचाराच्या कामींहि उपयोग करितात. तोंडांत अथवा जिभेस गरे पडले असतां फळें पोटांत देतात. उंबर दुधांत शिजवून दिले असतां पोटांतील इंद्रियांच्या मार्गांत कांहीं अडथळा असल्यास तो दूर होतो. उंबराच्या फळांचा मधुमेहांत चांगला उपयोग होतो. पाण्यांत फळें व पानें शिजवून त्या पाण्यानें स्नान करीत राहिल्यास महारोग दूर होतो असें म्हणतात. सालीच्या अंगीं रेतस्तंभक धर्म असून तिळाच्या तेलांत तिची वस्त्रगाळ पूड मिसळून दुष्ट व्रणावर लावितात. मधुमेहांत सालीचा काढा घ्यावा. कोवळ्या पानांची पूड करून मधाच्या अनुपानांत पित्तविकारावर देतात. उंबराच्या मुळीस फांसण्या टाकून त्यांतून निघणारा पातळ पदार्थ अथवा उंबराचें पाणी पौष्टिक म्हणून पोटांत देतात.

अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंकवर क्लीक करा...
http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92b933947/90990292c930
http://mr.vikaspedia.in/agriculture/crop-production/92b933947/90990292c930
उत्तर लिहिले · 4/11/2017
कर्म · 458560