2 उत्तरे
2
answers
औदुंबराचे झाड घरी असावे का नसावे?
2
Answer link
उंबर म्हणजे औदुंबर हे झाड जमिनीवर कुठे हि उगवतो.औदुंबर हे झाड घराच्या ठिकाणी कुठे हि उगवतो..औदुंबर झाड घरात न ठेवता घराबाहेर असावं औदुंबर झाड लक्ष्मी वास करते हे झाड सउखप्रआप्तई देत.औदुंबर झाड घराच्या इथे असणे चांगले आहे.

औदुंबर झाड घरी असावं का घरी का नसावं.तर हे जमिनीवर घराबाहेर वाढ चांगली होते आणि शुद्ध हवा हि मिळते

औदुंबर
उंबराचे झाड म्हणजेच औदुंबर. उंबराच्या झाडाला पार बांधला तर, त्या झाडाला औदुंबर म्हणतात. २१ गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांना साधना करण्याचा मोह आवरलेला नाही. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती औरच आहे. म्हणून घराजवळ औदुंबर वृक्ष येणे म्हणजे पारंपरिक, पिढय़ानपिढय़ा दत्त अधिष्ठान असणे. पूर्वी कुणी केलेल्या भक्तीत, नंतरच्या पिढीत पडलेला खंड हा इशारा समजावा. भक्तीचे कर्ज झाले की, असा संकेत मिळतो. गुरूचे अधिष्ठान आहे ते!
>> सर्व कर्जे माफ. भक्तीचे कर्ज कधी चढवू नये. ते तिथल्या तिथे फेडत राहावे. प्रत्येक जन्मात. आज उपटून टाकाल ठीक आहे. पण, याचे परिणाम भावी काळात अनुभवास येत राहतील.
>> औदुंबराचे झाड जमिनीतील पाण्याच्या साठय़ाबाबत संकेत देते. या झाडाच्या सुकलेल्या काडय़ा होमहवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही.
>> आयुर्वेदात औदुंबर झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावतात. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. याची फळे व सालीचा रस अंगाला चोळून आंघोळ केल्यास कुष्ठरोग बरा होतो.
>> उंबराची फळे खाण्यासाठी वापरतात. याची पाने शेळी, बकरी आवडीने खातात. पक्षी या झाडाची फळे खातात. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. विषावर उतारा म्हणूनही झाडाच्या चिकाचा उपयोग करतात.
>> औदुंबर वृक्षाचा पाला, फळे, साली गायीला खायला घातल्याने गाय सुदृढ होते, असा समज आहे.
>> या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन केल्याने सिद्ध फळ मिळते. उंबराच्या झाडावर एक दैवी फुल असते जे मुख्यत: कोणालाही दिसत नाही. ज्याला ते फुल दिसते त्याच्या भक्तीला दत्त माऊलीनी प्रतिसाद दिला समजावे.
>>एके काळी वास्तुशास्त्रात उंबराच्या लाकडाचा दाराच्या चौकटीत उंबरा (उंबरठा) बनविण्यासाठी वापर होत असे. सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव व्हायचा अशी ख्याती आहे.
>> अशा ह्या परंपरेतील दैवी वृक्षांची जोपासना अवघड आहे. पण अडचणीच्या स्थितीत योग्य त्या विधी करूनच आपण छाटणी केली तर योग्य ठरेल. ह्या विधी ब्राम्हणांकडून करवून घेणे उत्तम कारण दत्त, विष्णू ह्यांच्यासाठी सोवळे करणे क्रमप्राप्त आहे. आपण आपल्या श्रद्धेने विनंती करावी बाकी सदगुरु दत्त कृपा होइलच. दत्त माऊलीचे अधिष्ठान म्हणून औदुंबरास माझे शतश: नमन. (अनेकानेक वर्षे दत्तसेवेमुळे औदुंबर वृक्षास आजही प्रदक्षिणा करतो. का ते मलाही माहिती नाही.) जसे त्रिमूर्ती एकरुपच आहेत. तसेच वृक्षांच्या त्रिमूर्तीत एक साम्य आहे म्हणजे वड, पिंपळ, उंबर या फळांची रचना ही ‘फळात फुले’ अशी आहे. ही वृक्षे वषार्नुवर्षे अबाधित आहेत. आपण ह्यांचे महत्व जाणले तर अबाधित राहतीलही.
0
Answer link
औदुंबराचे झाड (Ficus racemosa) घरी असावे की नसावे, याबद्दल काही गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे:
औदुंबराच्या झाडाचे फायदे:
- धार्मिक महत्त्व: औदुंबराच्या झाडाला हिंदू धर्मात पवित्र मानले जाते. असे मानले जाते की या झाडात भगवान दत्तात्रेयांचा वास असतो. त्यामुळे, धार्मिक दृष्ट्या हे झाड शुभ मानले जाते.
- औषधी गुणधर्म: औदुंबराच्या झाडामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. याच्या पानांचा, फळांचा आणि सालीचा उपयोग विविध आयुर्वेदिक उपचारांमध्ये केला जातो. उदा. त्वचेच्या समस्यांसाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी आणि पोटाच्या विकारांवर ते गुणकारी आहे.
- वातावरणासाठी उपयुक्त: औदुंबराचे झाड हवा शुद्ध करते आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी करते.
औदुंबराच्या झाडाचे तोटे:
- मोठे आकारमान: औदुंबराचे झाड खूप मोठे होते आणि त्याची मुळे जमिनीत दूरवर पसरतात. त्यामुळे, लहान जागेत ते लावणे योग्य नाही.
- स्थापत्य विषयक समस्या: झाडाची मुळे इमारतीच्या पायाला नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे, घराच्या जवळ हे झाड लावणे टाळावे.
- स्वच्छता: या झाडाची पाने सतत गळतात, ज्यामुळे घराच्या आसपास पसारा निर्माण होतो.
निष्कर्ष:
जर तुमच्याकडे पुरेशी जागा असेल आणि धार्मिक दृष्ट्या तुम्हाला औदुंबराचे झाड लावायचे असेल, तर तुम्ही ते लावू शकता. मात्र, त्याचे मोठे आकारमान आणि स्थापत्य विषयक संभाव्य धोके लक्षात घेणे आवश्यक आहे. जर जागा लहान असेल, तर तुम्ही कुंडीमध्ये लहान औदुंबराचे रोप लावू शकता किंवा त्याऐवजी तुळशीसारखे दुसरे शुभ झाड लावू शकता.
टीप: कोणतीही वनस्पती लावण्यापूर्वी, स्थानिक वातावरणाचा आणि मातीचा विचार करणे आवश्यक आहे.