Topic icon

धार्मिक महत्त्व

2




बेलाच्या झाडाचे महत्व काय आहे
शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व

भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्यानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना 'आशुतोष' असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते.

बेल किंवा बिल्ववृक्षाला फार महत्त्व आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रसंगी पूजनात बिल्व पत्रांचा उपयोग केला जातो. वैज्ञानिक दृष्टीकोन लक्षात घेऊनच ही परंपरा सुरू करण्यात आली. बिल्वपत्र शिवलिंगावर वाहतांना बोटांच्या आणि तळहाताच्या पृष्टभागावर, विषाणूंना मारक तत्त्व आणि सुगंध पसरला जातो.


शिवपूजनात बेलाच्या पानांचे महत्व   : भगवान शंकराच्या पूजेस अनन्य साधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात पूजेत बेलाचे पान असणे फार महत्वाचे आहे. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की, तुमच्याकडे पूजेसाठी कोणतिही सामग्री नसली, तरी तुम्ही फक्त महादेवांना बेलाचे पान वाहिले तरी ते प्रसन्न होतात. महादेवाच्या पूजेमध्ये बेलाचे पान इतके महत्त्वाचे का आहे ते जाणून घेऊया..
 

अशी कथा आहे की, समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शीव यांनी विष प्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घश्यात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसर्‍या आख्यायिकेनुसार, बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच शिवचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते.

शिवपुराणातही नमूद केले आहे महत्व
भोलेनाथांच्या पूजेत बेलाच्या पानाचे महत्त्व आहे कारण बेलाचे पान अर्पण केल्यानेसुद्धा महादेव प्रसन्न होतात म्हणून त्यांना 'आशुतोष' असेही म्हणतात. बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत. हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते. तसेच, बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे. पण त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे. शिवपुराणात म्हटले आहे की बेलाचे पान हे भगवान शंकराचे प्रतीक आहे. देव स्वत: त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात. असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेऊन भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो. त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही.


शिवपुराण व्यतिरिक्त या पुराणातसुद्धा उल्लेख
बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात आढळून येते. एका पौराणिक कथेनुसार, एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली. बेलवृक्षाच्या मूळाशी गिरिजा देवी, खोडात महेश्वर देवी, फाद्यांमध्ये दक्षयायनी देवी, पानांमध्ये पार्वती देवी, फुलांमध्ये गौरी देवी आणि फळांमध्ये कात्यायणी देवीचा वास असतो, अशी मान्यता आहे. तसेच यामध्ये महालक्ष्मी देवीचा वास असतो, असेही सांगितले जाते. शिव-पार्वती पूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभाशिर्वाद लाभतात, अशी मान्यता आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2024
कर्म · 53710
1
गुढीवरील तांब्याच्या कलशाचे महत्त्व !
गुढीवर तांब्याचा कलश उपडा घालतात. हल्ली काही जण स्टीलचे किंवा तांब्याचे पेले किंवा मडक्याच्या आकाराचे तत्सम काही भांडी गुढीवर ठेवत असल्याचे पहायला मिळते. ‘तांब्याचा कलश गुढीवर उपडा ठेवावा’ असे धर्मशास्त्र का सांगते, हे लक्षात येण्यासाठी त्यामागचे अध्यात्मशास्त्रीय विवेचन येथे देत आहोत. यावरून आपल्या संस्कृतीचे अनन्यसाधारण महत्त्व आणि प्रत्येक कृती धर्मशास्त्रानुसार का करावी, हे ही लक्षात येईल !

 

१. गुढीवरील तांब्या उपडा का ठेवतात ?
तांब्याचे तोंड जमिनीकडे असल्याने तांब्याच्या कलशाच्या पोकळीतून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे तांब्यात असलेली कडुलिंबाची पाने आणि रेशमी वसन (गुढीवरील रेशमी वस्त्र) हे सात्त्विक लहरींनी भारीत बनते. भूमीच्या आकर्षणशक्तीमुळे हा रूपांतरित सगुण ऊर्जाप्रवाह जमिनीच्या दिशेने संक्रमित होण्यास आणि त्याचे जमिनीवर सूक्ष्म-आच्छादन बनण्यास साहाय्य होते. तांब्याची दिशा सुलट ठेवली, तर संपूर्णतः ऊर्ध्व दिशेने लहरींचे प्रक्षेपण झाल्याने जमिनीलगतच्या कनिष्ठ आणि मध्यम स्तराचे शुद्धीकरण न झाल्याने वायूमंडलातील फक्त ठराविक अशा ऊर्ध्व पट्ट्याचेच शुद्धीकरण होण्यास साहाय्य होते. याउलट तांब्याच्या कलशाच्या तोंडाची दिशा भूमीकडे ठेवल्याने त्यातून प्रक्षेपित होणार्या लहरींचा फायदा जमिनीच्या लगतच्या आणि मध्यम पट्ट्यातील वायूमंडलाला, याबरोबरच उर्ध्वमंडलाला मिळण्यास साहाय्य होते. – एक विद्वान (१७.३.२००५, सायं. ६.३३)

 

२. तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील सात्त्विक लहरी
ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असणे !
गुढीवर असलेल्या तांब्याच्या कलशाची ब्रह्मांडातील उच्च तत्त्वाशी संबंधित सात्त्विक लहरी ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने या कलशातून प्रक्षेपित होणार्या सात्त्विक लहरींमुळे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानातील रंगकण कार्यरत होण्यास साहाय्य होते. या पानांच्या रंगकणांच्या माध्यमातून रजोगुणी शिव आणि शक्ती लहरींचे वायूमंडलात प्रभावी प्रक्षेपण चालू होते.

 

३. तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या
निर्गुण लहरींचे कडुनिंब आणि रेशमी वस्त्र
यांच्याकडून प्रभावी ग्रहण आणि प्रक्षेपण होणे
तांब्याच्या कलशातून संक्रमित झालेल्या निर्गुण कार्यरत लहरींचे कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांच्या स्तराला सगुण लहरींमध्ये रूपांतर होते. त्यानंतर या लहरी रेशमी वसनाच्या (गुढीवरील रेशमी वस्त्राच्या) माध्यमातून प्रभावीपणे ग्रहण केल्या जाऊन त्या आवश्यकतेप्रमाणे अधोदिशेकडे प्रक्षेपित केल्या जातात.

 

४. कडुलिंब, कलश आणि वस्त्र या तिघांमधून
निर्माण होणार्या लहरींनी वायूमंडल शुद्ध होणे
कडुनिंबाच्या (कडुलिंबाच्या) पानांतून प्रक्षेपित होणार्या शिव-शक्तीशी संबंधित कार्यरत रजोगुणी लहरींमुळे अष्टदिशांचे वायूमंडल, तसेच तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल आणि रेशमी वसनातून प्रक्षेपित होणार्या लहरींमुळे अधोदिशेचे वायूमंडल शुद्ध आणि चैतन्यमय बनण्यास साहाय्य होते.

 

५. तांब्याचे तोंड जमिनीच्या दिशेला
असूनही उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होणे
गुढीतील घटकांना देवत्व प्राप्त झाल्यामुळे तांब्याच्या कलशाच्या पोकळीत घनीभूत झालेल्या नादलहरी कार्यरत होतात. या नादलहरींमध्ये वायू आणि आकाश ही उच्च तत्त्वे सामावलेली असल्याने तांब्याच्या कलशातून प्रक्षेपित होणार्या लहरींची गती ही उसळणार्या कारंजाप्रमाणे आणि ऊर्ध्वगामी असल्याने या लहरींच्या प्रक्षेपणामुळे उर्ध्व दिशेचे वायूमंडल शुद्ध होते. – सूक्ष्म जगतातील एक विद्वान

 

६. तांब्यावर स्वस्तिक का काढावे ?
तांब्यावर स्वस्तिक काढणे
तांब्यावर स्वस्तिक काढणे
स्वस्तिक हे शुभचिन्ह आहे. स्वस्तिकातून सात्त्विक स्पंदने बाहेर पडतात आणि त्यातील चैतन्यामुळे वातावरणातील काळे आवरण दूर होण्यास साहाय्य होते. त्यामुळे तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे.

 

कलशाला कुंकू लावतांना
आणि लावल्यावर होणारी सूक्ष्मातील प्रक्रिया
खालील चित्रे मोठी करून पहाण्यासाठी चित्रांवर क्लिक करा !




उत्तर लिहिले · 20/3/2022
कर्म · 121765
4
-उजव्या हाताने पूजा आणि भोजन करणे का मानले जाते शुभ 



पूजेसाठी उजव्या हाताचा उपयोग : अनेकदा -आपण आपल्या वडीलधाऱ्यांकडून किंवा आई वडिलांकडून असं ऐकलं आहे की अन्न सरळ हाताने खावं. हिंदू धर्मात विरुद्ध हाताने अन्न खाणे किंवा पूजा करणे अशुभ मानले जाते. हिंदू धर्मात -असे मानले जाते की उजव्या हातात सकारात्मक ऊर्जा असते. त्यामुळे भोजन आणि इतर शुभ कार्य उजव्या हातानेच करावेत. दुसरी मान्यता अशी - आहे की सूर्य नाडी उजव्या हातात दर्शविली जाते. त्यामुळे उजव्या हाताने अन्न घेतल्याने अन्न लवकर पचते आणि शरीराला पर्ण पोषण व ऊर्जा मिळते.उजव्या हातानच करावत. दुसरा मान्यता अशा आहे की सूर्य नाडी उजव्या हातात दर्शविली जाते. त्यामुळे उजव्या हाताने अन्न घेतल्याने अन्न लवकर पचते आणि शरीराला पूर्ण पोषण व ऊर्जा मिळते. दुसरीकडे, डाव्या हाताने खाल्लेले अन्न शरीराला पूर्ण पोषण देत नाही, म्हणून हिंदू धर्मात उजव्या हाताने अन्न खाणे शुभ मानले जाते.

वैज्ञानिक दृष्टीकोन वैज्ञानिक संशोधनातून असे दिसून आले आहे की संपूर्ण जगात फक्त 10 टक्के लोक डाव्या हाताचा वापर करतात. प्रत्येक 10 साठी, फक्त एक व्यक्ती डावा हात वापरतो. वैज्ञानिक संशोधनात असे दिसून आले आहे की आपले संपूर्ण शरीर आपोआप संतुलन साधण्याचा एक विशेष मार्ग वापरतो. जसे आपण फोन डाव्या हाताने उचलतो आणि उजव्या कानाला लावून ऐकतो. हे दर्शविते की आपले मन आपल्यासाठी सोयीस्कर पद्धतीने शरीराच्या अवयवांचे संतुलन करते.

• उजव्या हाताने अन्न खाल्ल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. हिंदू धर्मात उजव्या हाताने खाणे किंवा पूजा करण्यावर जोर देण्यात आला आहे कारण असे म्हटले जाते की जेव्हा आपण कोणतेही शुभ कार्य करतो तेव्हा उजव्या हाताच्या वापराने आपल्याला सकारात्मकव्या हाताच्या पापरान आपल्याला सकारात्मक परिणाम दिसून येतो.

सामाजिक मिथकांवर विज्ञान आपल्या समाजात एक समज प्रचलित आहे की उजव्या हाताचे कामगार डाव्या हाताच्या कामगारांपेक्षा जास्त आयुष्य जगतात. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनात असे म्हटले आहे की, जर असे झाले असते तर एखाद्या व्यक्तीचे वय ठरवण्याचे हे सर्वात मोठे माप ठरले असते. शास्त्रज्ञांनी सांगितले की मागील अभ्यासात काही मृत लोकांची यादी करण्यात आली होती, ज्यामध्ये डाव्या हाताचे सरासरी वय 9 वर्षे कमी होते.



याच आधारावर हा समज सुरू आहे. संशोधन असे सूचित करते की जे लोक डाव्या हाताचा वापर करतात ते उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांपेक्षा अधिक हुशार आणि सर्जनशील असतात आणि त्यांची विचार करण्याची आणि जीवन जगण्याची पद्धत देखील इतरांपेक्षा वेगळी असते. इथे पुन्हा प्रश्न पडतो की असे असेल तर डाव्या हाताने काम करणाऱ्यांची संख्या इतकी का? हे आजही एक कोडेच आहे 
उत्तर लिहिले · 2/2/2022
कर्म · 121765
3
शमी या झाडाची पाने श्रीगणेशाला दुर्वाप्रमाणेच प्रिय आहेत. मान्यतेनुसार या झाडामध्ये महादेवाचा वास आहे. गणेश उत्सव काळात गणपतीला शमीचे पाने अर्पण केल्याने बुद्धी तल्लख होते आणि सर्व दुःख दूर होतात. मानसिक शांती प्राप्त होऊन दुर्भाग्य दूर होते.

************************************************************************

शमी मंदार

गणपतीला जशा दूर्वा प्रिय तशीच शमी-मंदारही प्रिय असल्याचे सर्वांना माहित आहेच. शमीचे झाड हे उंच वाढते. त्याच्या सर्वांगाला काटे असतात. हे काटे म्हणजे अर्जुनाचे बाण असेही मानले जाते. कारण पांडवांनी अज्ञातवासात जातांना आपली शस्त्रे शमीवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवली होती, अशी कथा महाभारतात आहे. त्यातील अर्जुनाच्या बाणांचे प्रतीक म्हणजे हे काटे असावेत.

शमीची पाने ही दुष्कृत्ये आणि दु:स्वप्ननाशक मानली जातात, तशीच ती मंगलदायकही समजतात. म्हणूनच दसर्‍याला शमीवृक्षाची पूजा करुन सीमोल्लंघन केले जाते. अशी ही शमी आणि तिच्या जोडीला मंदार या दोन्ही वृक्षांची पाने गणपतीला प्रिय का वाटू लागली ?त्याचीही एक कथा आहे.

ही कथा नारदऋषींनी इंद्राला सांगितली होती. वीतिहोत्र नगरीत औरव नावाचा महाविद्वान ब्राम्हण आपल्या परमधार्मिक वृत्तीच्या सुमेधा नामक पत्नीसह सुखाने संसार करीत होता. शमीका ही त्यांची मुलगी अतिशय सुंदर, गुणी होती. तिच्यावर त्या दोघांचे निरतिशय प्रेम होते. ती लहान असतानाच धौम्यऋषींच्या बुद्धिमान आणि श्रद्धाळू अशा मंदार नावाच्या मुलाबरोबर तिचा विवाह झाला. त्या दोघांचा संसारही अतिशय सुखासमाधानात चालला होता. एकदा काही कामानिमित्त जात असताना भ्रुशुंडीऋषी वाटेतच असणार्‍या मंदारच्या आश्रमात आले. भ्रुशुंडींना दोन भुवयांमध्ये सोंड तर होतीच, पण ते अंगाने चांगलेच स्थूलदेखील होते. त्यांचे ते रुप आणि तो स्थूल देह पाहून न राहावून मंदार आणि शमी हसू लागली. हे दाम्पत्य आपल्याला हसताना पाहून भ्रुंशुंडी रागावले. त्यांनी त्या रागाच्या भरात शमी-मंदारला तुम्ही दोघे वृक्ष व्हाल, तुम्हाला भरपूर काटे असतील. त्यामुळे एकही पक्षी तुमच्या आश्रयाला कधी येणार नाही, असा शाप दिला. त्क्षणी शमी-मंदार झाडे बनली. असा एक महिना गेला. आपल्या प्रिय शिष्याचे काहीच कुशल वर्तमान न समजल्याने मंदारचे गुरु शौनकऋषी हे औरवाच्या घरी आले. पण त्यांनाही त्या दोघांबद्दल काही ठाऊक नव्हते. तेव्हा शौनक ध्यानस्थ बसले. त्यांनी अंतर्ज्ञानाने भ्रुशंडीच्या शापाने त्या दोघांचे वृक्ष झाल्याचे जाणले. त्या दोघांची शापातून मुक्तता व्हावी म्हणून शौनक आणि औरव या दोघांनी बारा वर्षे गणेशाची आराधना केली. त्यांच्या आराधनेने प्रसन्न होऊन गणपतीने त्यांना दर्शन दिले. मात्र भ्रुशुंडी या आपल्या परमभक्ताचा शाप खोटा ठरु शकणार नाही, असे सांगून त्यामधून एक मार्ग दाखविला. तो म्हणजे त्या दिवसापासून आपण स्वत: मंदार वृक्षाच्या मुळाखाली वास्तव्य करु, तसेच शमीपत्रे आपल्याला प्रिय होतील. त्यामुळे जो कोणी आपल्या मूर्तीची स्थापना मंदार वृक्षाखाली करुन त्यावर शमीपत्रे आणि दूर्वा वाहून आपली पूजा करील त्याचे मनोरथ पूर्ण होतील. इतकेच नव्हे तर मंदार वृक्ष, शमीपत्र आणि दूर्वा या तिघांचे मिलन हा एक महायोग समजला जाईल, असे सांगितले. त्या दिवसापासून गणेशपूजनात शमी-मंदार-दूर्वा यांना अनन्य स्थान प्राप्त झाले.

शमीवर गजाननाचे असलेले प्रेम दुसर्‍या एका कथेतून प्रत्यक्ष भगवान महादेवांनी पार्वतीला सांगितले आहे. अतिशय कीर्तिवान आणि महाप्रतापी अशी प्रियव्रत राजाची एक पत्नी कीर्ती ही पतीची नावडती होती. तिला जेव्हा छळ असह्य झाला, तेव्हा ती प्राणत्याग करण्यास सिद्ध झाली. त्या वेळी तिच्या देवल नावाच्या पुरोहिताने तिला त्यापासून परावृत्त करुन गणेशोपासना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने मंदार वृक्षाच्या वाळलेल्या लाकडापासून गणपतीची मूर्ती करवून घेऊन गणपतीच्या पूजेला प्रारंभ केला. एक दिवस बरेच शोधूनही दूर्वा न मिळाल्याने तिने हाती लागलेल्या शमीपत्रांनीच गणपतीची पूजा केली. त्याने प्रसन्न होऊन गणपतीने तिला आशीर्वाद दिला. त्यानंतर तिचे दुदैवाचे दिवस संपले. ती राजाची प्रिय पत्नी बनली. तिला झालेला क्षिप्रप्रसादन हा मुलगा पुढे गणपतीचा परमभक्त म्हणून प्रसिद्ध झाला.



'
उत्तर लिहिले · 30/1/2022
कर्म · 121765
1
उदोउदो करणे हा मूळचा शब्द असावा. त्याचा अर्थ वाखाणणी करणे, गुणगान करणे असा होतो. त्याचा संबंध उद घालून धूपारती करणे व त्यामुळे आईची जागृती, उदय पावणे याच्याशीही असावा. एकूण म्हणजे आईला जागे करण्यासाठी तिच्या नावाचा पुकारा करत, तिच्या गुणांचा गजर करत, तिचा जागर करणे म्हणजे उदे उदे!!
उत्तर लिहिले · 20/12/2021
कर्म · 121765
2
श्री विठ्ठलाला तुळसी आणि मंजिरीचा हार वाहण्‍यामागचे वैशिष्‍ट्ये
तुळशीमध्‍ये श्रीविष्‍णूची स्‍पंदने आकर्षित करण्‍याची शक्‍ती आधिक असते. श्री विठ्‍ठल हे श्रीविष्‍णूचे रुप आहे. विठ्‍ठलाच्‍या मूर्तीला तुळस वाहिल्‍याने ती जागृत व्‍हायला मदत होते. त्‍यामुळे मूर्तीतील चैतन्‍याचा लाभ उपासाकाला होतो. मंजिरी आपल्‍या स्‍पर्शातून विष्‍णतत्‍त्‍वाला जागृत करणारी आहे.
 
तुळशीची मंजिरी
तुळशीत श्रीकृष्‍णतत्‍त्‍व असल्‍याने तिच्‍या मंजिरीतून उधळल्‍या जाणार्‍या चैतन्‍यामुळे विठ्‍ठलाच्‍या मूर्तीतील चैतन्‍य जागृत होते आणि त्‍याचे रुपांतर विष्‍णूतत्‍त्‍वात होते, त्‍यातून भक्‍ताला निर्गुणस्‍वरुप चैतन्‍याची अनुभूती येते. 
 
श्री विठ्‍ठलाच्‍या छातीवर रुळणारा तुळीशीच्‍या मंजिरीचा हार हा मूर्तीच्‍या मध्‍यभागातील स्‍थितीविषयक श्रीविष्‍णूरुपी क्रिया शक्‍तीला चालना देणारा असल्‍याने भाविकांच्‍या सर्व प्रकाराच्‍या मनोकामना पूर्ण होतात. 


 
श्री विठ्ठलाला तुळस वाहण्याची वेगळी वैशिष्ट्ये
तुळस श्रीलक्ष्मीचे प्रतीक आहे व श्रीलक्ष्मी ही श्रीविष्णूची पत्नी असल्यामुळे (श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचे रूप आहे.) ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरी चरणी राहते.

उत्तर लिहिले · 26/7/2021
कर्म · 121765
5
फक्त आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात आपल्या ऋषीमुनींबद्दल आकर्षण आहे. अतीव आदर आहे. अशा या श्रेष्ठ, जेष्ठ, ज्ञानी ऋषींबद्दल आपणास वाटणारा आदर, निष्ठा, भक्ती व्यक्त करणे हेच ऋषीपंचमीचे प्रयोजन आहे.

गणपतीचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध पंचमीला ऋषीपंचमीचे व्रत करतात. या दिवशी स्त्रिया रजस्वला अवस्थेत असताना अजगातेपणी केलेल्या स्पर्शाचा दोष दूर करण्याकरीता अरुंधती, कश्यपादि ऋषींना प्रसन्न करण्यासाठी सप्तर्शीचे पूजन करतात. पूजा केल्यानंतर बैलांच्या श्रमाचे कोणतेही पदार्थ खात नाहीत. कंदमुळे खातात. ऋषीमुनी अरण्यात राहतात. अरण्यात उगवणारी कंदमुळे खाऊन ते आपले पोट भरतात. त्याची आठवण म्हणून आपण एक दिवस तरी नैसर्गिकरित्या तयार झालेले अन्न खावे व हा दिन साजरा करावा असा प्रघात आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत कश्यप, अत्रि, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी व वशिष्ठ ह्या ऋषीसप्तकाने म्हणजेच सप्तश्रींनी आपल्यासाठी ज्ञानाचे घडे भरून ठेवले आहेत. अशा या थोर विभूतींनी दाखविलेल्या मार्गावरून आचरण करण्याची कृतज्ञतापूर्वक प्रतिज्ञा करणे हाच ऋषीपंचमीचा उद्देश व संदेश आहे.

तिथी
ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात.

ऋषि
कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत.

उद्देश
अ. ‘ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे, त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते.’

आ. मासिक पाळी, अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने, तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. (पुरुषांवर होणारा परिणाम क्षौरादी प्रायश्चित्त कर्माने आणि वास्तूवर होणारा परिणाम उदकशांतीने कमी होतो.)

व्रत करण्याची पद्धत

अ. या दिवशी स्त्रियांनी सकाळी आघाड्याच्या काडीने दात घासावेत.

आ. आंघोळ झाल्यावर पूजेपूर्वी ‘मासिक पाळीच्या वेळी कळत-नकळत केलेल्या स्पर्शांमुळे जे दोष लागतात, त्यांच्या निराकरणासाठी अरुंधतीसह सप्तर्षींना प्रसन्न करण्यासाठी मी हे व्रत करीत आहे’, असा संकल्प करावा.

इ. पाटावर तांदुळाच्या आठ पुंज्या घालून त्यांवर आठ सुपार्‍या ठेवून कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन करावे.

ई. या दिवशी कंदमुळांचा आहार घ्यावा आणि बैलांच्या श्रमाचे काहीही खाऊ नये, असे सांगितले आहे.

उ. दुसर्‍या दिवशी कश्यपादी सात ऋषि आणि अरुंधती यांचे विसर्जन करावे.

बारा वर्षांनी किंवा वयाच्या पन्नाशीनंतर या व्रताचे उद्यापन करायला हरकत नाही. उद्यापनानंतरही हे व्रत चालू ठेवता येते.
उत्तर लिहिले · 23/8/2019
कर्म · 0