भारताचा इतिहास
राजकारण
भारत
भारतीय सेना
भारतीय दंड संहिता
भारतीय स्वातंत्र्य दिन
पंतप्रधान
राज्यशास्त्र
राजकीय नेते
भारताच्या पंतप्रधानांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?
3 उत्तरे
3
answers
भारताच्या पंतप्रधानांचा कार्यकाल किती वर्षांचा असतो?
0
Answer link
नियुक्ती भारतामध्ये साधारणपणे दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुका घेतल्या जातात. ह्या निवडणुकांमध्ये लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या राजकीय पक्षाला भारताचे विद्यमान राष्ट्रपती सरकार स्थापनेचे आमंत्रण देतात. ह्या राजकीय पक्षामधील प्रमुख नेत्याची पक्षातर्फे पंतप्रधान म्हणून निवड केली जाते.
स्वतंत्र भारताची पहिली सार्वत्रिक लोकसभा निवडणूक १९५२ साली झाली. त्यानंतर यंदा म्हणजेच २०१९ साली सतरावी लोकसभा निवडणुक पार पडली आहे. आतापर्यंत देशाच्या इतिहासात १७ पंतप्रधान झाले. यात सर्वाधिक काळ हे १७ वर्ष हे पंडीत जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते, त्यानंतर इंदिरा गांधी या १५ वर्ष पंतप्रधान होत्या. त्यानंतर मनमोहन सिंग हे १० वर्ष पंतप्रधान म्हणून विराजमान होते.
गेल्या निवडणुकीत मोदी लाट आल्याने पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची नियुक्ती करण्यात आली. यंदाच्या निवडणुकीतही भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याने पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी विराजमान होणार आहेत.
भारताचे आतापर्यंतचे पंतप्रधान, पक्ष आणि कार्यकाळ
1 पंडित जवाहरलाल नेहरु: (काँग्रेस) कार्यकाळ - १५ ऑगस्ट १९४७ ते १५ एप्रिल १९५२, १९५२ ते १९६४
2 गुलझारीलाल नंदा: (काँग्रेस) कार्यकाळ - २७ मे १९६४ ते ९ जून १९६४
3 लाल बहादूर शास्त्री: (काँग्रेस) कार्यकाळ - ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६
4 गुलझारीलाल नंदा: (काँग्रेस) कार्यकाळ - ११ जानेवारी १९६६ ते २४ जानेवारी १९६६
5 इंदिरा गांधी: (काँग्रेस) कार्यकाळ - २४ जानेवारी २९६६ ते २४ मार्च १९७७
6 मोरारजी देसाई: (जनता पार्टी) कार्यकाळ - २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९
7 चरणसिंग चौधरी: (जनता पार्टी - धर्मनिरपेक्ष) कार्यकाळ - २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८०
8 इंदिरा गांधी: (काँग्रेस) कार्यकाळ - १४ जानेवारी १९८० ते ३१ ऑक्टोबर १९८४
9 राजीव गांधी: (काँग्रेस) कार्यकाळ - ३१ ऑक्टोबर १९८४ ते २ डिसेंबर १९८९
10 विश्वनाथ प्रताप सिंग: (जनता दल) कार्यकाळ - २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९०
11 चंद्रशेखर: (समाजवादी जनता पार्टी) कार्यकाळ - १० नोव्हेंबर १९९० ते २१ जून १९९१
12 पी. व्ही. नरसिंह राव: (काँग्रेस) कार्यकाळ - २१ जून १९९१ ते १६ मे १९९६
13 अटलबिहारी वाजपेयी: (भाजपप्रणित आघाडी) कार्यकाळ - १६ मे १९९६ ते १ जून १९९६
14 एच. डी. देवेगौडा: (जनता दल - धर्मनिरपेक्ष) कार्यकाळ - १ जून १९९६ ते २१ एप्रिल १९९७
15 इंदरकुमार गुजराल: (जनता दल) कार्यकाळ - २१ एप्रिल १९९७ ते १९ मार्च १९९८
16 अटलबिहारी वाजपेयी: (भाजपप्रणित आघाडी) कार्यकाळ - १९ मार्च १९९८ ते १० ऑक्टोबर १९९९, १० ऑक्टोबर १९९९ ते २२ मे २००४
17 डॉ. मनमोहन सिंग: (काँग्रेसप्रणित आघाडी) कार्यकाळ - २२ मे २००४ ते २२ मे २००९, २२ मे २००९ ते २६ मे २०१४
18 नरेंद्र मोदी: (भाजपप्रणित आघाडी) कार्यकाळ - २६ मे २०१४ ते २०१९
19 नरेंद्र मोदी : (भाजपप्रणित आघाडी) कार्यकाळ - २०१९ ते २०२४
0
Answer link
भारताच्या पंतप्रधानांचा कार्यकाल 5 वर्षांचा असतो.
भारतामध्ये, पंतप्रधान हे सरकारचे प्रमुख असतात आणि त्यांची निवड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बहुमत मिळवलेल्या पक्षाद्वारे केली जाते. एकदा निवड झाल्यानंतर, ते ५ वर्षांपर्यंत त्या पदावर राहू शकतात.