नीट परीक्षा दाढ दंत आरोग्य आरोग्य

मला अक्कलदाढ येत आहे, खूप त्रास होत आहे, नीट जेवण करता येत नाही, हिरड्या सुजतात, ही दाढ का येते?

2 उत्तरे
2 answers

मला अक्कलदाढ येत आहे, खूप त्रास होत आहे, नीट जेवण करता येत नाही, हिरड्या सुजतात, ही दाढ का येते?

1


अक्कलदाढ येताना त्याचा परिणाम इतर दातांना देखील होतो. 



 : अक्कलदाढ येत असताना अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात. साधारणत: १७ ते २५ या वयात अक्कलदाढ येते; मात्र अनेकांना वयाच्या पंचवीशीनंतर अक्‍कलदाढ येते. अक्कलदाढ येताना त्याचा परिणाम इतर दातांना देखील होतो. आपल्या तोंडातील हे सर्वांत शेवटचे आणि मजबूत दात असतात. हे दात सर्वात शेवटी येत असल्यामुळे तोंडामध्ये या दाढेला तोंडात पूर्ण जागा मिळत नाही. त्यामुळे हे दात येताना इतरही दातांना ढकलतात. त्यामुळे हिरड्यांवर दाब येतो. त्यामुळे दातांमध्ये वेदना, हिरड्या सुजणे आणि अस्वस्थता आदी त्रास होतात.     

अक्कलदाढ येताना फार वेदना होतात. पण त्यासह तोंडाला दुर्गंध, जेवताना त्रास होणे आणि डोकेदुखीचाही त्रास होतो. या वेदना थांबवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो.   

१) दातदुखीमुळे जर तुमच्या हिरड्यांमध्ये सुज आली असेल तर ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. मीठात दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखीचा त्रास कमी होतो. 

२) खूपच तीव्र वेदना होत असतील तर दाताजवळ बर्फाचा तुकडा धरा. बर्फामुळे सुज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.  

३) चिमूटभर हिंगामध्ये मोसंबीच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट कापसाच्या बोळ्याने अक्कलदाढेजवळ लावा. यामुळे दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.  

४) दातदुखीवर हमखास फायदेशीर ठरणारा एक घरगुती उपाय म्हणजे लवंग. लवंगामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील किटाणुंचा नाश करण्यास फायदेशीर ठरतात. 
लवंगाचे तेलही दातदुखीचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. 

 


­
उत्तर लिहिले · 7/1/2022
कर्म · 121765
0
अक्कलदाढ येणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. ह्या दाढा साधारणपणे 17 ते 25 वर्षांच्या दरम्यान येतात, काही लोकांमध्ये ह्या दाढा उशिरा येतात तर काहींना अजिबात येत नाहीत. अक्कलदाढ येताना काही लोकांना त्रास होतो कारण:
  • जबड्यात जागा कमी असणे: जबड्यामध्ये पुरेशी जागा नसल्यामुळे दाढ पूर्णपणे येऊ शकत नाही.
  • तिरकी वाढ: जागेच्या कमतरतेमुळे दाढ तिरकी वाढू लागते आणि त्यामुळे हिरड्यांवर दाब येतो.
  • हिरड्यांमध्ये अडकणे: कधीकधी दाढ हिरड्यांमध्ये पूर्णपणे झाकलेली राहते आणि त्यामुळे तिथे जंतुसंसर्ग (Infection) होण्याची शक्यता असते.

अक्कलदाढ येण्याची कारणे:

अक्कलदाढ येण्याचे नेमके कारण अजूनपर्यंत समजू शकलेले नाही, पण काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

  1. उत्क्रांती: पूर्वीच्या काळात मानवाच्या आहारात जाडसर आणि कडक पदार्थांचा समावेश होता, त्यामुळे ह्या दाढा चघळण्यासाठी आवश्यक होत्या. आता आहारात बदल झाल्यामुळे त्यांची गरज कमी झाली आहे.
  2. आनुवंशिकता: काहीवेळा आनुवंशिकतेमुळे जबड्याचा आकार लहान राहतो आणि त्यामुळे अक्कलदाढेला जागा मिळत नाही.

उपाय:

जर तुम्हाला खूप त्रास होत असेल, तर दंतवैद्यांकडे (Dentist) जाऊन तपासणी करणे आवश्यक आहे. ते तुम्हाला योग्य उपचार सांगू शकतील.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

दातदुखीच्या कथा व्यथा तुमच्या शब्दांत लिहा?
यापुढे दंत सप्ताह नाही या विधानाची कारणमीमांसा तुमच्या शब्दांत लिहा?
कवळी निसटले तर परत बसवता येते का?
मला जेवायला नीट येत नाही, एक साईडचा जबडा दुखतो तर मी काय करू शकतो?
नवीन दाढ बसवतांना व बसवल्यावर त्रास होतो का, आणि किती दिवस?
दाढ खूप दुखत आहे त्यावर उपाय कोणता करावा?
दाढ दुःखीवर कोणता उपाय करावा?