Topic icon

नीट परीक्षा

1
हो, PCB ग्रुप पाहिजे.
उत्तर लिहिले · 10/10/2022
कर्म · 145
1


अक्कलदाढ येताना त्याचा परिणाम इतर दातांना देखील होतो. 



 : अक्कलदाढ येत असताना अनेक प्रकारचे त्रास उद्भवतात. साधारणत: १७ ते २५ या वयात अक्कलदाढ येते; मात्र अनेकांना वयाच्या पंचवीशीनंतर अक्‍कलदाढ येते. अक्कलदाढ येताना त्याचा परिणाम इतर दातांना देखील होतो. आपल्या तोंडातील हे सर्वांत शेवटचे आणि मजबूत दात असतात. हे दात सर्वात शेवटी येत असल्यामुळे तोंडामध्ये या दाढेला तोंडात पूर्ण जागा मिळत नाही. त्यामुळे हे दात येताना इतरही दातांना ढकलतात. त्यामुळे हिरड्यांवर दाब येतो. त्यामुळे दातांमध्ये वेदना, हिरड्या सुजणे आणि अस्वस्थता आदी त्रास होतात.     

अक्कलदाढ येताना फार वेदना होतात. पण त्यासह तोंडाला दुर्गंध, जेवताना त्रास होणे आणि डोकेदुखीचाही त्रास होतो. या वेदना थांबवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय करू शकतो.   

१) दातदुखीमुळे जर तुमच्या हिरड्यांमध्ये सुज आली असेल तर ग्लासभर कोमट पाण्यामध्ये मीठ टाका. या पाण्याने गुळण्या करा. मीठात दाहशामक आणि अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने दातदुखीचा त्रास कमी होतो. 

२) खूपच तीव्र वेदना होत असतील तर दाताजवळ बर्फाचा तुकडा धरा. बर्फामुळे सुज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.  

३) चिमूटभर हिंगामध्ये मोसंबीच्या रसाचे काही थेंब मिसळा. ही पेस्ट कापसाच्या बोळ्याने अक्कलदाढेजवळ लावा. यामुळे दातदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते.  

४) दातदुखीवर हमखास फायदेशीर ठरणारा एक घरगुती उपाय म्हणजे लवंग. लवंगामध्ये अ‍ॅन्टीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने तोंडातील किटाणुंचा नाश करण्यास फायदेशीर ठरतात. 
लवंगाचे तेलही दातदुखीचा त्रास कमी करण्यास फायदेशीर ठरते. 

 


­
उत्तर लिहिले · 7/1/2022
कर्म · 121765
0
नीट (NEET) मध्ये 174 गुण मिळाल्यास, UR (Unreserved) कोट्यातून MBBS ला ऍडमिशन मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
गुण आणि रँक:

MBBS मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी Cut-off खूप जास्त असतो. 174 गुणानुसार रँक खूप मागे असण्याची शक्यता आहे.

UR कोट्यातील Cut-off:

UR कोट्यातील विद्यार्थ्यांसाठी Cut-off स्कोअर खूप जास्त असतो. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी, सामान्यतः 600+ गुण आवश्यक असतात, तर खाजगी मेडिकल कॉलेजसाठी 450+ गुण लागतात.

पर्याय:

174 गुणांवर तुम्हाला खालील पर्याय उपलब्ध होऊ शकतात:

  • BDS (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी)
  • BAMS (बॅचलर ऑफ आयुर्वेद, मेडिसिन अँड सर्जरी)
  • BHMS (बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी)
  • Private Medical College (खाजगी मेडिकल कॉलेज)
  • स्टेट कोट्यातून किंवा इतर कोट्यातून प्रयत्न करणे.
निष्कर्ष:

174 गुणांवर UR कोट्यातून MBBS मिळणे कठीण आहे, परंतु तुम्ही इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांचा किंवा खाजगी कॉलेजांचा विचार करू शकता.

टीप: Cut-off प्रत्येक वर्षी बदलतो, त्यामुळे NEET च्या Counselling मध्ये भाग घेणे महत्त्वाचे आहे.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980
0

नीट (NEET) परीक्षेचा निकाल टक्केवारीत काढण्यासाठी खालील सूत्र वापरले जाते:

टक्केवारी = (तुम्ही मिळवलेले गुण / एकूण गुण) * 100

उदाहरणार्थ, जर तुम्हाला 720 पैकी 600 गुण मिळाले, तर तुमची टक्केवारी खालीलप्रमाणे काढली जाईल:

टक्केवारी = (600 / 720) * 100 = 83.33%

म्हणजे तुमचे एकूण गुण 83.33% आहेत.

टीप: नीट परीक्षेचा निकाल टक्केवारीत नव्हे, तर गुणांमध्ये आणि अखिल भारतीय रँक (All India Rank) मध्ये दर्शविला जातो.

अधिक माहितीसाठी, तुम्ही Careers360 किंवा इतर शैक्षणिक वेबसाइट्सला भेट देऊ शकता.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980
3
तुम्ही १२वी ची परीक्षा पास झाले पाहिजे. व PCB म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र या विषयांच्या समूहांना मिळून खालीलप्रमाणे गुण मिळाले पाहिजेत:
खुला वर्ग - ५०% पेक्षा जास्त
SC/ST/OBC(अपंगांसहित) - ४०% पेक्षा जास्त
खुला वर्ग, व अपंग - ४५% पेक्षा जास्त

उत्तर लिहिले · 20/1/2019
कर्म · 61495
6
NEET परिक्षा देण्यासाठी आपण कमीतकमी १२ वी पास झालेले असायला हवे किंवा कमीतकमी १२ वी ची परिक्षा दिलेली पाहीजे.

म्हणजेच परिक्षा दिली आहे परंतु अजुन निकाल यायचा आहे असे असतांना सुद्धा आपण NEET देऊ शकतात.

आपले १२ वी चे विषय PCB गृपला असावेत. PCB म्हणजे Physics, Chemistry आणि Biology/Biotechnology आणि PCB सोबत इंग्रजी विषय पण असायला हवा. PCB त परीक्षा दिली आहे परंतु इंग्रजी हा विषय नाही तर मग आपण पात्र नाहीत.

आपलं वय कमीतकमी १७ वर्ष असायला हवं आणि जास्तीतजास्त २५ वर्ष असायला हवं. आरक्षित विद्यार्थी ३० वर्षापर्यत देऊ शकतो.

आपण वरिल पात्रता पुर्ण असतांना किती ही वेळा परिक्षा देऊ शकतात अटेंप्ट करु शकतात.

सध्यातरी NEET परिक्षा अॉनलाईन नाही होत, पेन पेपर नेच होते. आणि त्यात MCQ प्रकारचे प्रश्न असतात.

टिप :

१. मी इंजिनियरींग केलेली आहे. मला NEET किंवा इतर तत्सम मेडिकल परिक्षेबद्दल काहीच माहित नाही. तरी वरिल पात्रता आपण स्वताः एकदा कंन्फर्म करावी.

२. मी फक्त नेट वर उपलब्ध असलेली माहिती सांगितली. परत मला जुने पेपर मिळतील का ? मी एका विषयात नापास आहे, मी देऊ शकतो का ? NEET बरी का दुसरं काही करु? मी SC आहे, कटअॉफ किती असेल? परिक्षा रजिस्टेशन कसं करु ? फॉर्म निघाले का ? अभ्यासक्रम काय आहे? Free PDF मिळेल का? असं विचारू नका. मला ह्या बद्दल अचुक सांगता येणार नाही. मी ह्याबाबतीत तेवढा जाणकार नाही.
उत्तर लिहिले · 9/1/2019
कर्म · 75305
3
https://ntanet.nic.in/ntanetcms/public/home.aspx

सगळ्यांत अगोदर आपण वर दिलेल्या ऑफिशिअल संकेतस्थळावर जाऊन INFORMATION बुलेटिन म्ह्णून एक पर्याय आहे त्यावर जाऊन नेट परीक्षेची जाहिरात मिळवा.

ही जाहिरात आपणास कोण परीक्षा देऊ शकते, वयाची अट, कधी आहे, पात्रता कशी असली पाहिजे, कुठे देऊ शकतात आणि आपल्याला येणारे असंख्य प्रश्नांची उत्तरे देईल.

आपण जर M.कॉम च्या शेवटच्या वर्षाला आहेत म्हणजे आपण नेट देऊ शकतात तसेच आपल्याला नेट एकाच विषयासाठी देता येते. जसे आपण कॉमर्स करताय म्हणून तुमचा नेट परीक्षेचा विषय नक्कीच कॉमर्स राहील.

फॉर्म कसा भरावा हे एकदम सविस्तर त्या INFORMATION बुलेटिन मध्ये दिले आहे. जर आपणास इंग्रजी समजायला अवघड असेल तर INFORMATION बुलेटिनची PDF कोणा इंग्रज़ी समजणाऱ्या व्यक्तीला द्या आणि परीक्षेचे स्वरूप त्यांच्याकडून समजून घ्या.

विषय एकच असतो म्हणून आपण निवडू नाही शकत.

ASSISTANT प्रोफेसर आणि JRF 

Assistant Professor म्हणजे आपण प्रोफेसर बनू शकतात आणि त्यासाठी NET/SET चे प्रमाणपत्र हवे. ही परीक्षा पास झाल्यावर आपल्याला ते मिळेल आणि आपण प्रोफेसर साठी कॉलेजेस विद्यापीठात अप्लाय करू शकतात.

JRF ही जुनिअर रिसर्च FELOWSHIP असते म्हणजे जर आपण पुढे M.कॉम नंतर काही रिसर्च करू इच्छिता किंवा PhD करू इच्छिता तर आपल्याला JRF मिळवण्या नंतर पुढेच ३ वर्ष मानधन स्कॉलरशिप मिळेल १२००० - २०००० रुपये प्रतिमाह.


JRF साठी वेगळे काही करावे लागत नाही. जर ASSISTANT Professor साठी कट ऑफ ५० गुण असेल तर JRF ६५ गुण असेल ते बदलत राहते.

जर आपले गुण ६५ पेक्षा जास्त आले तर आपण JRF आणि प्रोफेसर दोन्ही साठी पात्र ठरणार. हे फक्त उदाहरण झाले, नक्की कट ऑफ बदलत राहतो.

मी आपल्याला असं सजेस्ट करू ईच्छितो की आपण INFORMATION बुलेटिन पूर्णपने ३-४ वेळा वाचावा. काही समजत नसल्यास त्या शब्दांना गूगल करावे. आपण स्वतःहून आता सुरुवात केली तर नक्कीच आपण JRF मिळवू शकतात.

माफ करावे पण मी आपणास माझा मोबाईल नंबर देऊ नाही शकत. मी माझा संपूर्ण वेळ एकांतात असल्यामुळे मी बोलू नाही शकत.

माफी असावी..
ALL THE BEST :-) 
उत्तर लिहिले · 9/9/2018
कर्म · 75305