शिक्षण परीक्षा नीट परीक्षा

नेट परीक्षेचा फॉर्म कसा भरावा? मी एम.कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे, विषय कसे निवडावे याबद्दल माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

नेट परीक्षेचा फॉर्म कसा भरावा? मी एम.कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे, विषय कसे निवडावे याबद्दल माहिती द्या?

3
https://ntanet.nic.in/ntanetcms/public/home.aspx

सगळ्यांत अगोदर आपण वर दिलेल्या ऑफिशिअल संकेतस्थळावर जाऊन INFORMATION बुलेटिन म्ह्णून एक पर्याय आहे त्यावर जाऊन नेट परीक्षेची जाहिरात मिळवा.

ही जाहिरात आपणास कोण परीक्षा देऊ शकते, वयाची अट, कधी आहे, पात्रता कशी असली पाहिजे, कुठे देऊ शकतात आणि आपल्याला येणारे असंख्य प्रश्नांची उत्तरे देईल.

आपण जर M.कॉम च्या शेवटच्या वर्षाला आहेत म्हणजे आपण नेट देऊ शकतात तसेच आपल्याला नेट एकाच विषयासाठी देता येते. जसे आपण कॉमर्स करताय म्हणून तुमचा नेट परीक्षेचा विषय नक्कीच कॉमर्स राहील.

फॉर्म कसा भरावा हे एकदम सविस्तर त्या INFORMATION बुलेटिन मध्ये दिले आहे. जर आपणास इंग्रजी समजायला अवघड असेल तर INFORMATION बुलेटिनची PDF कोणा इंग्रज़ी समजणाऱ्या व्यक्तीला द्या आणि परीक्षेचे स्वरूप त्यांच्याकडून समजून घ्या.

विषय एकच असतो म्हणून आपण निवडू नाही शकत.

ASSISTANT प्रोफेसर आणि JRF 

Assistant Professor म्हणजे आपण प्रोफेसर बनू शकतात आणि त्यासाठी NET/SET चे प्रमाणपत्र हवे. ही परीक्षा पास झाल्यावर आपल्याला ते मिळेल आणि आपण प्रोफेसर साठी कॉलेजेस विद्यापीठात अप्लाय करू शकतात.

JRF ही जुनिअर रिसर्च FELOWSHIP असते म्हणजे जर आपण पुढे M.कॉम नंतर काही रिसर्च करू इच्छिता किंवा PhD करू इच्छिता तर आपल्याला JRF मिळवण्या नंतर पुढेच ३ वर्ष मानधन स्कॉलरशिप मिळेल १२००० - २०००० रुपये प्रतिमाह.


JRF साठी वेगळे काही करावे लागत नाही. जर ASSISTANT Professor साठी कट ऑफ ५० गुण असेल तर JRF ६५ गुण असेल ते बदलत राहते.

जर आपले गुण ६५ पेक्षा जास्त आले तर आपण JRF आणि प्रोफेसर दोन्ही साठी पात्र ठरणार. हे फक्त उदाहरण झाले, नक्की कट ऑफ बदलत राहतो.

मी आपल्याला असं सजेस्ट करू ईच्छितो की आपण INFORMATION बुलेटिन पूर्णपने ३-४ वेळा वाचावा. काही समजत नसल्यास त्या शब्दांना गूगल करावे. आपण स्वतःहून आता सुरुवात केली तर नक्कीच आपण JRF मिळवू शकतात.

माफ करावे पण मी आपणास माझा मोबाईल नंबर देऊ नाही शकत. मी माझा संपूर्ण वेळ एकांतात असल्यामुळे मी बोलू नाही शकत.

माफी असावी..
ALL THE BEST :-) 
उत्तर लिहिले · 9/9/2018
कर्म · 75305
0
नेट (NET) परीक्षेचा फॉर्म कसा भरावा आणि विषय निवडताना काय लक्षात घ्यावे, याची माहिती खालीलप्रमाणे आहे:

नेट परीक्षेचा फॉर्म भरण्याची प्रक्रिया:

  1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या:

    NTA UGC NET ची अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.

  2. नोंदणी करा:

    "Registration for UGC NET" या लिंकवर क्लिक करा. नवीन वापरकर्ता म्हणून नोंदणी करा आणि आवश्यक माहिती भरा.

  3. अर्ज भरा:

    नोंदणी झाल्यावर, अर्ज भरण्यासाठी लॉगिन करा. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि संपर्क तपशील व्यवस्थित भरा.

  4. कागदपत्रे अपलोड करा:

    नवीनतम पासपोर्ट साइज फोटो आणि सही (signature) अपलोड करा. दिलेल्या आकारानुसार (format) आणि आकारमानात (size) असावी.

  5. परीक्षा शुल्क भरा:

    ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरा. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करा.

  6. अर्ज सबमिट करा:

    भरलेला अर्ज तपासा आणि सबमिट करा. अर्जाची प्रिंटआउट घ्या.

एम.कॉमच्या विद्यार्थ्यांसाठी विषय निवडण्याची माहिती:

  1. तुमच्या एम.कॉमspecializationनुसार विषय निवडा:

    तुमच्या एम.कॉममध्ये specializationनुसार जसे की अकाउंटिंग, फायनान्स, मार्केटिंग किंवा एचआर (HR), त्यानुसारच नेट परीक्षेसाठी विषय निवडा.

  2. विषयाची आवड:

    ज्या विषयात तुम्हाला जास्त आवड आहे आणि ज्यात तुम्ही चांगले गुण मिळवू शकता, तो विषय निवडा.

  3. माजी प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा:

    मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा आणि कोणत्या विषयातून जास्त प्रश्न विचारले जातात, हे तपासा.

  4. अभ्यासक्रम तपासा:

    UGC NET च्या वेबसाइटवर तुमच्या विषयाचा अभ्यासक्रम (syllabus) तपासा. त्यानुसार तयारी करा.

  5. मार्गदर्शन:

    आपल्या प्राध्यापकांकडून किंवा तज्ञांकडून मार्गदर्शन घ्या.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 980

Related Questions

मूळ मराठी शिकत असताना शिकण्याची प्रक्रिया अधिक उन्नत कशी करता येईल?
गणेश काय अभ्यास करतो ते सांगा?
12वीला ४८.९३ टक्के आहेत, इंग्रजी थोडे कच्चे आहे, गणित चांगले आहे, पुढे काय करावे सुचत नाही?
औपचारिक शिक्षण म्हणजे काय?
केवळ प्रात्यक्षिकाचा प्रयोग?
माझी मुलगी ११वी सायन्स शाखेत शिक्षण घेत आहे आणि तिला गुण कमी मिळाले आहेत. आता ती १२वी कला शाखेत प्रवेश घेऊ इच्छिते, तर तिला १२वी कला शाखेत प्रवेश मिळेल का? जर मिळत असेल, तर प्रक्रिया काय असेल? कृपया लवकर उत्तर अपेक्षित आहे.
समावेशक शिक्षणात शालेय प्रशिक्षणाची भूमिका काय आहे?