शिक्षण परीक्षा नीट परीक्षा पात्रता निकष

नीट परीक्षा देण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

2 उत्तरे
2 answers

नीट परीक्षा देण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?

6
NEET परिक्षा देण्यासाठी आपण कमीतकमी १२ वी पास झालेले असायला हवे किंवा कमीतकमी १२ वी ची परिक्षा दिलेली पाहीजे.

म्हणजेच परिक्षा दिली आहे परंतु अजुन निकाल यायचा आहे असे असतांना सुद्धा आपण NEET देऊ शकतात.

आपले १२ वी चे विषय PCB गृपला असावेत. PCB म्हणजे Physics, Chemistry आणि Biology/Biotechnology आणि PCB सोबत इंग्रजी विषय पण असायला हवा. PCB त परीक्षा दिली आहे परंतु इंग्रजी हा विषय नाही तर मग आपण पात्र नाहीत.

आपलं वय कमीतकमी १७ वर्ष असायला हवं आणि जास्तीतजास्त २५ वर्ष असायला हवं. आरक्षित विद्यार्थी ३० वर्षापर्यत देऊ शकतो.

आपण वरिल पात्रता पुर्ण असतांना किती ही वेळा परिक्षा देऊ शकतात अटेंप्ट करु शकतात.

सध्यातरी NEET परिक्षा अॉनलाईन नाही होत, पेन पेपर नेच होते. आणि त्यात MCQ प्रकारचे प्रश्न असतात.

टिप :

१. मी इंजिनियरींग केलेली आहे. मला NEET किंवा इतर तत्सम मेडिकल परिक्षेबद्दल काहीच माहित नाही. तरी वरिल पात्रता आपण स्वताः एकदा कंन्फर्म करावी.

२. मी फक्त नेट वर उपलब्ध असलेली माहिती सांगितली. परत मला जुने पेपर मिळतील का ? मी एका विषयात नापास आहे, मी देऊ शकतो का ? NEET बरी का दुसरं काही करु? मी SC आहे, कटअॉफ किती असेल? परिक्षा रजिस्टेशन कसं करु ? फॉर्म निघाले का ? अभ्यासक्रम काय आहे? Free PDF मिळेल का? असं विचारू नका. मला ह्या बद्दल अचुक सांगता येणार नाही. मी ह्याबाबतीत तेवढा जाणकार नाही.
उत्तर लिहिले · 9/1/2019
कर्म · 75305
0

नीट (NEET) परीक्षा देण्यासाठी आवश्यक पात्रता खालीलप्रमाणे आहे:

राष्ट्रीयत्व:
  • भारतीय नागरिक असावा.
  • अनिवासी भारतीय (NRI), भारतीय वंशाचे नागरिक (OCI), आणि परदेशी नागरिक देखील अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता:
  • उमेदवार भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), जीवशास्त्र/बायोटेक्नोलॉजी (Biology/Biotechnology) आणि इंग्रजी (English) विषयासह 12वी उत्तीर्ण असावा.
  • 12वी मध्ये किमान गुण आवश्यक आहेत:
    • General/सर्वसाधारण: 50%
    • OBC/SC/ST: 40%
    • PWD: 45%
  • जे विद्यार्थी 12वीची परीक्षा देत आहेत, ते देखील अर्ज करू शकतात, परंतु त्यांनी प्रवेशाच्या वेळी पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
  • अर्जदाराचे वय किमान 17 वर्षे असावे.
  • उच्च वयोमर्यादा National Testing Agency (NTA) च्या नियमांनुसार बदलू शकते.
प्रयत्नांची संख्या:
  • NEET परीक्षेला बसण्यासाठी प्रयत्नांची संख्या मर्यादित नाही. उमेदवार कितीही वेळा परीक्षा देऊ शकतो.
इतर पात्रता:
  • उमेदवाराने NEET च्या माहितीपत्रकात (Information Bulletin) दिलेले सर्व नियम आणि अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 980

Related Questions

NEET साठी अभियांत्रिकी 1st, 2nd, 3rd वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता कोड काय असावा?
CTET परीक्षेसाठी काय पात्रता आहे व परीक्षा कधी होते?
सिनियर कॉलेजला (बी.एस्सी.) प्राध्यापक म्हणून लागण्यासाठी काय पात्रता लागते? मी एम.एस्सी. पूर्ण केली आहे. जर मी फक्त पीएच.डी. केली, तर मी सिनियर कॉलेजमध्ये लागू शकतो का? की मला अजून कोणती परीक्षा (नेट-सेट इत्यादी) द्यावी लागेल?
बी.एड. ला प्रवेश मिळवण्यासाठी सीईटी मध्ये किती पासिंग मार्क्स पाहिजे?
NEET आणि JEE ची परीक्षा केव्हा देता येते आणि qualification किती लागते?
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बीएससी करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे?
तलाठी आणि ग्रामसेवक पदासाठी शिक्षण मर्यादा व वय किती असायला हवे?