2 उत्तरे
2
answers
तोंड आल्यावर घरगुती उपाय कोणता आहे?
4
Answer link
तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ;
0इलायचीच्या दाण्याची बारीक पूड करुन त्यात मध मिसळावं व ती पेस्ट जीभेवरील फोडांवर लावावी. त्याने तोंड येण्यापासून बचाव होतो. तोंड आल्यावर हळद फारच उपयुक्त ठरते. हळद पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.
– शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे अनेकांचे तोंड येते. म्हणजे तोंडामध्ये फोड येतात. यामुळे आपल्याला काही खाता येत नाही आणि पिताही येत नाही. तुमचे तोंड आले असेल तर खालील उपाय करून तुम्ही तुमचे तोंड बरे करू शकता.
१) तोंडातील छाले बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून तिचा रस काढून लावा. धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. याने
गुळण्या केल्याने छाले बरे होतात.
२) वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावा आणि लाळ गळू द्या. तसेच जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात.
३) पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि छाले बरे होतात.
४) हळद पाण्यात घोळून ठेवावी. या पाण्याला गाळून याने गुळण्या कराव्या.
५) मधाला पाण्यात मिसळून गुळण्या कराव्यात.
६) एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.
५) तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.
६) खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा. हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात. तसेच लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.
७) सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खा.
0
Answer link
तोंड आल्यावर काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:
तोंड आल्यावर घरगुती उपाय:
तोंड येणे एक सामान्य समस्या आहे. तोंडात फोड येणे, लालसरपणा येणे किंवा काही खाताना आणि बोलताना त्रास होणे हे तोंडाच्या अल्सरची लक्षणे आहेत. ह्या समस्येवर काही घरगुती उपाय:
- मध (Honey): मधात बॅक्टेरियाविरोधी आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात. मध तोंडातील अल्सरला शांत करतो आणि लवकर बरा करतो.
- हळद (Turmeric): हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्व असते, ज्यात दाहक-विरोधी आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. हळदीचा लेप लावल्याने आराम मिळतो.
- तुळस (Basil): तुळशीच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. तुळशीची पाने चघळल्याने तोंडाच्या अल्सरमध्ये आराम मिळतो.
- नारळ तेल (Coconut Oil): नारळ तेलात लॉरिक ऍसिड असते, जे अल्सर बरे करण्यास मदत करते.
- मीठाचे पाणी (Salt Water): मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि अल्सर लवकर बरा होतो.
टीप: गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हे उपाय तात्पुरते आराम देण्यासाठी आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.