Topic icon

घरगुती उपचार

0
पित्तावर काही घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:
  • आले: आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. ते पित्त कमी करण्यास मदत करतात.

    कसे वापरावे: आल्याचा तुकडा चावून खा किंवा आल्याचा चहा प्या.

  • पुदिना: पुदिना पाचक आहे आणि पित्तशामक म्हणून काम करतो.

    कसे वापरावे: पुदिन्याची पाने चावून खा किंवा पुदिन्याचा चहा प्या.

  • बडीशेप: बडीशेपमध्ये पाचक गुणधर्म असतात आणि ते पित्त कमी करण्यास मदत करतात.

    कसे वापरावे: जेवणानंतर बडीशेप चावून खा.

  • जिरे: जिरे पचन सुधारण्यास मदत करतात आणि पित्त कमी करतात.

    कसे वापरावे: जिरे भाजून त्याची पावडर बनवून जेवणानंतर पाण्यातून घ्या.

  • आवळा: आवळा व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे आणि तो पित्त कमी करण्यास मदत करतो.

    कसे वापरावे: आवळ्याचा रस प्या किंवा कच्चा आवळा खा.

  • दही: दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे पचन सुधारण्यास मदत करतात आणि पित्त कमी करतात.

    कसे वापरावे: जेवणानंतर दही खा.

  • थंड दूध: थंड दूध प्यायल्याने पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते.

    कसे वापरावे: जेव्हा जळजळ होईल तेव्हा थंड दूध प्या.

टीप: जर पित्ताचा त्रास वारंवार होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हे काही सामान्य उपाय आहेत आणि ते प्रत्येकासाठी प्रभावी असतीलच असे नाही.

Disclaimer: या उपायांनी आराम न मिळाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
उत्तर लिहिले · 14/4/2025
कर्म · 980
2





जीभ
 जीभ भाजली? सोपे उपाय करा लगेच आराम मिळेल

 गरमागरम पदार्थ खाणे खूप आनंददायक आहे, परंतु कधीकधी गरम खाण्याच्या किंवा पिण्याच्या नादात जीभ भाजते. असे झाल्यास केवळ अस्वस्थच वाटत नाही, तर इतर कोणत्याही पदार्थाची चवही येत नाही. जरी ही एक गंभीर समस्या नाही तरी हे बरं होण्यासाठी एक-दोन दिवस लागतात, पण जर तुम्हाला त्याचा त्रास जास्त होत असेल तर येथे दिलेल्या घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही बऱ्याच अंशी आराम मिळवू शकता.

 
दही - जीभ जळत असल्यास दही खाणे फायदेशीर आहे. याच्या थंडावाने आराम मिळतो, म्हणून जेव्हा जेव्हा भाजते तेव्हा फक्त एक चमचा दही घ्या आणि काही वेळ तोंडात ठेवा.
 
बेकिंग सोडा- चिमूटभर बेकिंग सोडा अनेक समस्यांवर इलाज आहे. त्याच्या एल्काइन नेचरमुळे जीभेच्या जळजळीपासून खूप आराम मिळतो. यासाठी बेकिंग सोडा पाण्यात विरघळवून घ्या आणि त्या पाण्याने गुळण्या करा.

 
साखर- जीभेच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी चिमूटभर साखर देखील खूप प्रभावी आहे. तोंडात साखर घाला आणि ती स्वतःच विरघळू द्या. पाणी पिण्याची गरज नाही. असे केल्याने जळजळ आणि वेदनांपासून खूप आराम मिळेल.
 
मध- जीभ भाजल्यावर मध चाटल्याने आराम होतो.
 
एलोवेरा जेल- कोरफडीच्या वापरामुळे जीभेच्या जळजळीपासून त्वरित आराम मिळतो. त्याचे जेल कूलिंग इफेक्ट प्रदान करते. एलोवेरा जेलचे बर्फाचे क्यूब्ज तयार करुन वापरा. हे अनेक समस्यांवर प्रभावी आहे. 
 
सात्विक आहार घ्या- जीभ भाजली असल्यास शक्य तितके साधे अन्न खा. खूप मसालेदार अन्न टाळा. साधे अन्न पोट थंड ठेवते त्यामुळे जीभ लवकर बरी होते.
 
आइस क्यूब - जळलेल्या जिभेला आराम देण्यासाठी बर्फाचे तुकडे देखील एक प्रभावी उपाय आहे. जास्त काही नाही, फक्त बर्फाचा तुकडा चोख. लक्षात ठेवा की प्रथम सामान्य पाण्याने बर्फ हलके ओले करा. हे बर्फ जिभेवर चिकटण्यापासून रोखेल.

उत्तर लिहिले · 6/1/2024
कर्म · 53715
0


 ऍसिडिटी वर घरगुती उपाय

 जेव्हा पोटातील गॅस्ट्रिक ग्रंथी ऍसिडचे उत्पादन वाढवू लागते, तेव्हा या स्थितीला ऍसिडिटी म्हणतात. साधारणपणे आपले पोट हायड्रोक्लोरिक ऍसिड स्रावित करते जे अन्न पचवण्याचे आणि तोडण्याचे काम करते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अॅसिडिटीचा त्रास होतो तेव्हा त्याच्या शरीरात अपचन, जठरासंबंधी जळजळ, छातीत जळजळ, अन्ननलिकेमध्ये वेदना, पोटात अल्सर आणि पोटात जळजळ यांसारखी लक्षणे दिसतात.

 
आजकाल प्रत्येकजण अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त आहे. पोटात थेट काहीही गेले नाही की गॅस, अपचन, आंबट ढेकर यांचा त्रास दिवसभर सतावत राहील. या समस्यांमुळे पोटात वेदना, जडपणा, जळजळ होते. त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी लोक अनेकदा गॅस काढून टाकणारी औषधे घेण्यास सुरुवात करतात. अॅसिडची समस्या तुम्हाला अनेकदा त्रास देते, त्यामुळे तुम्हाला गॅस्ट्रिकची समस्या असू शकते. या दुखण्यामुळे छातीत जळजळही सुरू होते.
 
अशात जास्त तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळणे चांगले. आपली जीवनशैली, खाण्याच्या सवयी बदला. काही घरगुती उपाय करून तुम्ही अॅसिडिटीच्या समस्येवरही मात करू शकता. यासाठी काळे मीठ आणि ओवा एकत्र सेवन केल्यास खूप आराम मिळेल. या दोन्ही गोष्टींमध्ये असे काही घटक असतात, जे अॅसिडिटीची समस्या दूर करतात.

 
अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी अजवाइनचे फायदे
पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी अजवाइन एक उत्तम औषधी वनस्पती किंवा मसाला आहे. यामध्ये कॅल्शियम, फायबर, आयर्न, फॅट, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, रिबोफ्लेविन, फॉस्फरस इत्यादी असतात, जे पोटासोबतच शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. या पोषक तत्वांमुळे पोटात अॅसिड रिफ्लक्सची समस्या टाळता येते. गॅसपासून आराम मिळण्यासाठी कॅरमच्या बिया चावून घ्या आणि नंतर कोमट पाणी प्या. तसेच पचनशक्ती मजबूत होते.
 
अॅसिडिटी दूर करण्यासाठी काळ्या मीठाचे फायदे
पांढऱ्या मिठापेक्षा काळ्या मिठाचे सेवन जास्त फायदेशीर आहे. त्यात असलेल्या पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाले तर ते खनिजे, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम यांचा खजिना आहे. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी काळे मीठ खावे. गॅस, अपचन, आंबट ढेकर, बद्धकोष्ठता इत्यादीपासून आराम मिळतो. यासोबतच पोट फुगणे, पोटाची सूजही कमी होते.
 
अॅसिडिटी दूर करण्यासाठी ओवा आणि काळे मीठ अशा प्रकारे वापरा
जर तुम्हाला वारंवार गॅस, अपचन, पोट फुगण्याची समस्या होत असेल तर तुम्ही ओवा आणि काळे मीठ याचे एकत्र सेवन करा. प्रत्येकी 1-1 चमचे ओवा आणि काळे मीठ घ्या. हे दोन्ही कढईत घालून चांगले भाजून घ्या. आता ते थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पावडर कोमट पाण्यासोबत सेवन करा. तुम्ही ते मधासोबतही घेऊ शकता. तीन ते चार दिवस सतत सेवन करा. पोटाच्या समस्या मुळापासून दूर होतील.
.
उत्तर लिहिले · 21/8/2023
कर्म · 53715
1



छातीत जळजळ होत असेल तर हे सोपे घरगुती उपाय 



अन्न खाल्ल्यानंतर अनेकदा छातीत जळजळ सुरू होते. ही एक सामान्य समस्या आहे जी बऱ्याच लोकांना त्रास देते. वास्तविक, अन्न पचनाच्या प्रक्रियेत, आपले पोट असे ऍसिड तयार करते जे अन्न पचण्यास मदत करते. पण कधी कधी हे अॅसिड जास्त प्रमाणात तयार होते त्यामुळे छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. यासाठी लोक सहसा औषधे घेतात. पण काही घरगुती उपायांनीही आपण छातीत जळजळ होण्याची समस्या दूर करू शकता. अॅसिडिटी किंवा छातीत जळजळ दूर करण्यासाठी काही प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत .चला तर मग जाणून घेऊ या. 

 
1 आलं - पोटाच्या जळजळीत आल्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. जेवल्यानंतर छातीत जळजळ होण्याची तक्रार असल्यास, जेवणानंतर आल्याचा छोटा तुकडा चघळा किंवा आल्याचा चहा बनवून प्या. यामुळे छातीत जळजळ होण्यापासून लवकर आराम मिळेल. 
 
2 ओवा - अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ झाल्यास आपण ओव्याच्या पाण्याचे सेवन करू शकता. यासाठी एक चमचा ओवा एक कप पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर गॅसवरून काढून थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यावर त्यात काळे मीठ टाकून प्या. असे केल्याने अॅसिडिटीच्या समस्येपासून लवकरच सुटका होईल.

 
 3 ऍपल सायडर व्हिनेगर - ऍपल सायडर व्हिनेगर हा देखील छातीत जळजळ दूर करण्यासाठी एक प्रभावी घरगुती उपाय आहे. याच्या सेवनाने पोटातील ऍसिडची पातळी कमी होण्यास मदत होते. यासाठी एक चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर एक ग्लास पाण्यात मिसळून प्या. 
 
4 गूळ - जेवणानंतर गोड म्हणून गूळ दिला जातो . गूळ आपल्या पोटासाठी खूप फायदेशीर मानला जातो. हे पचन प्रक्रियेला गती देते आणि पोटात ऍसिड तयार होण्यास प्रतिबंध करते. जर आपण अॅसिडिटीच्या समस्येने हैराण असाल तर जेवणानंतर थोडा गूळ खाऊन एक ग्लास पाणी प्या.
 
5 कोरफड - कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी किती फायदेशीर आहे हे माहिती असेलच. पोटाशी संबंधित समस्यांमध्ये कोरफडीच्या रसाचे सेवन फायदेशीर ठरते. छातीत जळजळ होत असेल तर जेवणाच्या अर्धा तास आधी एक चतुर्थांश कोरफडीचा रस प्या.
 
6 ज्येष्ठमध - आयुर्वेदात ज्येष्ठमध हे अत्यंत फायदेशीर औषध मानले जाते. छातीत जळजळ होण्याच्या समस्येवर ज्येष्ठमधचे सेवन केल्याने लगेच फायदा होतो. यात अनेक आयुर्वेदिक घटक असतात जे छातीत जळजळ दूर करण्यास मदत करतात. ज्येष्ठमध बारीक करून बारीक भुकटी बनवा आणि त्याचे नियमित सेवन करा. असे केल्याने छातीत जळजळ होण्याची समस्या दूर होईल. 
 
7 तुळस - तुळशी नैसर्गिक गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. तुळशीला अनेक रोगांवर रामबाण औषध मानले जाते. छातीत जळजळ होत असेल तर सकाळी उठून तुळशीची काही पाने चावा. यामुळे पोट दिवसभर थंड राहते आणि गॅस किंवा जळजळ होण्याची कोणतीही तक्रार होणार नाही.
 
8 लिंबू - लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. छातीत जळजळ होत असल्यास लिंबू आणि काळे मीठ पाण्यात मिसळून प्या. यामुळे पित्ताचा रस तयार होतो, जो अन्न पचवण्याचे काम करतो. असे केल्याने छातीत जळजळ होणार नाही.
 
 
 
 

उत्तर लिहिले · 21/8/2023
कर्म · 53715
0
एका मोठ्या चमच्यामध्ये नारळाचे तेल घ्या. यात लसूणाच्या सोललेल्या ५ ते ६ पाकळ्या टाकून भाजून घ्या. जेव्हा तेल थंड होईल तेव्हा या तेलाने कंबरेसोबत पूर्ण शरीराची मालिश करून घ्यावी आणि मग अंघोळ करावी. लसून हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. यामुळे तुम्हाला वेदनेपासून लवकर आराम मिळेल. एक गोष्ट लक्षात ठेवा की मालीश करण्याआधी किमान ३० मिनिटांनीच अंघोळ करावी. जेणेकरून या वेळेत तुमचे शरीर हे मिश्रण शोषून घेईल.




कपड्याने द्या शेक



जेव्हा कंबर खूप दुखत असेल आणि कोणी मसाज करणारा सुद्धा नसेल तेव्हा गरम पाण्यात मीठ मिसळा आणि त्यात एक स्वच्छ कपडा टाकून भिजवा आणि मग तो कपडा पिळून त्यातून निघणाऱ्या वाफेने कंबरेला शेक द्या. एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या अंगावर प्युअर कॉटनचे कपडे असतील. सोबत या गोष्टीची सुद्धा काळजी घ्या की शेक कधीच थेट त्वचेवर देत नाही तुमच्या त्वचेवर कॉटन कपड्याचा एक थर असावा.



जर तुम्ही तासनतास एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कामातून तुम्ही दर तासाने एक ब्रेक घ्या आणि ५-१० मिनिटे फेरी मारा. तुमच्या शरीराची हालचाल ठराविक काही काळाने व्हायला हवी. असे केल्यास कंबरेवर दाब पडत नाही आणि कंबरेला आराम मिळत राहतो. तुम्ही घरी असाल की ऑफिसला ही गोष्ट करायला अजिबात विसरू नका. ही गोष्ट तुम्ही करत नसाल तर कंबरदुखीचा त्रास तुम्हाला विळखा नक्कीच घालणार. त्यापासुन स्वत:चा बचाव करायचा असेल तर आवर्जून कामातून ब्रेक घेत राहा.






स्त्रियांच्या शरीरात वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर आणि पुरुषांच्या शरीरात वयाची ४५ वर्षे ओलांडल्यानंतर कॅल्शियमची कमतरता भासू लागते. म्हणून गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या शरीरात शक्य तितका कॅल्शियमचा वापर करावा. कॅल्शियम तुमची कंबरदुखी दूर ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, पण हेच कॅल्शियम जर कमी झाले तर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास सुद्धा सहन करावा लागेल. म्हणून शक्य तितका कॅल्शियम युक्त आहार घ्यावा. ते शक्य नसेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियम सप्लीमेंट्स घ्यावीत. तर असे काही उपाय करून तुम्ही सहज आपल्या कंबरदुखीवर नियंत्रण मिळवू शकता. 

*************************************
हे मी स्वतः ही करते . माझं काम एका जागेवर बसून असल्यामुळे मला ही कंबरेला त्रास होतो  मला आधी काही वाटत नव्हते काम करताना जसं वयाच्या चाळिशी नंतर मला आता कंबरदुखीचा  खुप त्रास होतो आहे तर मी हे तेल बनवून ठेवते आणि स्वतः च माझ्या हातानेच मालीश करते आणि नंतर गरम पाणी करून त्यात मीठ टाकून शेक घेते किंवा आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून घेते. त्याने मला भरपूर प्रमाणात आराम मिळतो बरं वाटतं  माझं ही कॅल्शियम कमी आहे  माझं हिमोग्लोबिन कमी झाले आहे त्यामुळे मला बसुन काम करण्याचा त्रास होतो
म्हणून मी हे रोज करते.


    

उत्तर लिहिले · 12/8/2022
कर्म · 53715
1

: डासांच्या त्रासाने हैराण आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून दूर करा मच्छरांची समस्या
 असे काही घरगुती उपाय  ज्यामुळे तुम्हाला होणारी डासांची समस्या दूर होण्यास मदत होईल.



डास घालवण्याचे काही घरगुती उपाय 
सध्या असे वातावरण आहे की आपण जिकडे पाहावे तिकडे डास दिसतात आणि वेळोवेळी ते आपल्याला चावत असतात. अशावेळी आपण डास मारण्यासाठी कितीही उपकरणे, उत्पादने वापरली तरीही त्याचा काही फायदा होत नाही. उन्हाळ्यात गरमीमुळे आपण जितके त्रासलेले नसतो तितका त्रास आपल्याला डास चावण्याचा होत असतो. आपण डास घालवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात लपून बसलेले असतात.

आज आपण असे काही घरगुती उपाय  ज्यामुळे तुम्हाला होणारी डासांची समस्या दूर होण्यास मदत होईल.



लसुणचा रस :
डासांना दूर करण्यासाठी तुम्ही लसुणचा रस वापरू शकता. लसुणच्या उग्र वासामुळे डास जवळ येत नाहीत. यासाठी लसूणच्या पाकळ्या ठेचून पाण्यात उकळवा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून संपूर्ण खोलीत शिंपडा. असे केल्याने खोलीतील डास दूर होतील.



कॉफी :
कॉफीचा वापर करूनही तुम्ही डासांना दूर पळवू शकता. जर तुम्हाला कधी वाटत असेल की एखाद्या ठिकाणी डास अंडी घालू शकतात, तर तिथे कॉफी पावडर टाका. असे केल्याने सर्व डास आणि त्यांची अंडी नष्ट होतील.


पुदिना :
तिसरा मार्ग म्हणजे पुदीना. पुदिन्याच्या सुगंधाने डासांना त्रास होतो. घरभर पेपरमिंट ऑइल शिंपडल्यास डास पळून जातील.

कडुनिंबाचे तेल :
कडुलिंबाचे तेल देखील डासांना घालवण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमच्याकडे डासांची समस्या असेल तर पाण्यात किंवा लोशनमध्ये कडुलिंबाचे तेल मिसळा आणि ते शरीरावर लावा. हे डासांना तुमच्या आजूबाजूला फिरण्यापासून रोखेल.


सोयाबीनचे तेल :
सोयाबीनचे तेलही डासांना घालवण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी रात्री हे तेल अंगावर लावून झोपा जेणेकरून तुम्हाला डास चावणार नाहीत.


उत्तर लिहिले · 7/4/2022
कर्म · 121765
4
तोंड आल्यावर करा ‘हे’ घरगुती उपाय ;

0इलायचीच्या दाण्याची बारीक पूड करुन त्यात मध मिसळावं व ती पेस्ट जीभेवरील फोडांवर लावावी. त्याने तोंड येण्यापासून बचाव होतो. तोंड आल्यावर हळद फारच उपयुक्त ठरते. हळद पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो.

– शरीरातील उष्णता वाढल्यामुळे किंवा गोड पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे अनेकांचे तोंड येते. म्हणजे तोंडामध्ये फोड येतात. यामुळे आपल्याला काही खाता येत नाही आणि पिताही येत नाही. तुमचे तोंड आले असेल तर खालील उपाय करून तुम्ही तुमचे तोंड बरे करू शकता.

१) तोंडातील छाले बरे करण्यासाठी कोथिंबीर वाटून तिचा रस काढून लावा. धणे पाण्यात उकळून त्या पाण्याला गाळून गार करा. याने

गुळण्या केल्याने छाले बरे होतात.

२) वेलचीचे चूर्ण मधात मिसळून लावा आणि लाळ गळू द्या. तसेच जाईच्या झाडाची पाने चावल्याने छाले बरे होतात.

३) पेरूच्या झाडाची पाने उकळून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घसा आणि जीभ स्वच्छ होते आणि छाले बरे होतात.

४) हळद पाण्यात घोळून ठेवावी. या पाण्याला गाळून याने गुळण्या कराव्या.

५) मधाला पाण्यात मिसळून गुळण्या कराव्यात.

६) एक ग्लास कोमट पाणी करून त्यात अर्धा चमचा मीठ घाला. हे पाणी थोडा वेळ तोंडात ठेवून नंतर गुळण्या करा. हा उपाय दिवसातून तीन वेळा केल्याने तोंड लवकर बरे होते.

५) तुळसीच्या दोन ते तीन पाने चावून त्याचा रस प्या. खाण्याच्या पानाचा रस काढून त्यात साजूक तूप टाकून हे मिश्रण तोंड आलेल्या ठिकाणी लावा.

६) खाण्याच्या पानाचे चूर्ण तयार करुन त्यात थोडा मध मिसळा. हे चाटण लावल्याने फोड लवकर बरे होतात. तसेच लिंबाच्या रसात मध मिसळून त्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो.

७) सुक्या खोबऱ्याचे तुकडे चावून खा.
उत्तर लिहिले · 5/1/2022
कर्म · 121765