2 उत्तरे
2
answers
डासांच्या त्रासाने हैराण आहे, घरगुती उपाय कोणता करावा?
1
Answer link
: डासांच्या त्रासाने हैराण आहात? ‘हे’ घरगुती उपाय करून दूर करा मच्छरांची समस्या
असे काही घरगुती उपाय ज्यामुळे तुम्हाला होणारी डासांची समस्या दूर होण्यास मदत होईल.
डास घालवण्याचे काही घरगुती उपाय
सध्या असे वातावरण आहे की आपण जिकडे पाहावे तिकडे डास दिसतात आणि वेळोवेळी ते आपल्याला चावत असतात. अशावेळी आपण डास मारण्यासाठी कितीही उपकरणे, उत्पादने वापरली तरीही त्याचा काही फायदा होत नाही. उन्हाळ्यात गरमीमुळे आपण जितके त्रासलेले नसतो तितका त्रास आपल्याला डास चावण्याचा होत असतो. आपण डास घालवण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही ते कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात लपून बसलेले असतात.
आज आपण असे काही घरगुती उपाय ज्यामुळे तुम्हाला होणारी डासांची समस्या दूर होण्यास मदत होईल.
लसुणचा रस :
डासांना दूर करण्यासाठी तुम्ही लसुणचा रस वापरू शकता. लसुणच्या उग्र वासामुळे डास जवळ येत नाहीत. यासाठी लसूणच्या पाकळ्या ठेचून पाण्यात उकळवा. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरून संपूर्ण खोलीत शिंपडा. असे केल्याने खोलीतील डास दूर होतील.
कॉफी :
कॉफीचा वापर करूनही तुम्ही डासांना दूर पळवू शकता. जर तुम्हाला कधी वाटत असेल की एखाद्या ठिकाणी डास अंडी घालू शकतात, तर तिथे कॉफी पावडर टाका. असे केल्याने सर्व डास आणि त्यांची अंडी नष्ट होतील.
पुदिना :
तिसरा मार्ग म्हणजे पुदीना. पुदिन्याच्या सुगंधाने डासांना त्रास होतो. घरभर पेपरमिंट ऑइल शिंपडल्यास डास पळून जातील.
कडुनिंबाचे तेल :
कडुलिंबाचे तेल देखील डासांना घालवण्यासाठी उपयुक्त आहे. जर तुमच्याकडे डासांची समस्या असेल तर पाण्यात किंवा लोशनमध्ये कडुलिंबाचे तेल मिसळा आणि ते शरीरावर लावा. हे डासांना तुमच्या आजूबाजूला फिरण्यापासून रोखेल.
सोयाबीनचे तेल :
सोयाबीनचे तेलही डासांना घालवण्यासाठी उपयुक्त आहे. यासाठी रात्री हे तेल अंगावर लावून झोपा जेणेकरून तुम्हाला डास चावणार नाहीत.
0
Answer link
डासांच्या त्रासाने हैराण असाल, तर काही सोपे घरगुती उपाय खालीलप्रमाणे आहेत:
- कपूर: कपूर जाळून खोली बंद करा. 15-20 मिनिटांनंतर खिडकी उघडा. डास पळून जातील.
- लिंबू आणि लवंग: लिंबाचे दोन तुकडे करा आणि प्रत्येक तुकड्यामध्ये 5-6 लवंगा लावा. ते खोलीत ठेवा. यामुळे डास दूर राहतील.
- कडुलिंबाचे तेल: कडुलिंबाच्या तेलात समान प्रमाणात खोबरेल तेल मिसळून त्वचेवर लावा. डास चावणार नाहीत.
- तुळस: घरात तुळशीचे रोप लावा. तुळशीच्या वासामुळे डास घरात येत नाहीत.
- लसूण: लसणाच्या पाकळ्या ठेचून पाण्यात उकळा. हे पाणी घरात फवारा. लसणाच्या वासामुळे डास दूर राहतात.
- पुदिना: पुदिन्याची पाने बारीक करून पाण्यात उकळा आणि ते पाणी घरात शिंपडा. डास पळून जातील.
हे काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही डासांपासून आराम मिळवू शकता.