मुळव्याध आरोग्य आहार

मुळव्याधीवर कोणता आहार घ्यावा?

2 उत्तरे
2 answers

मुळव्याधीवर कोणता आहार घ्यावा?

1
मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्या खाव्यात त्यात भरपूर प्रमाणात अनेक अँटी ऑक्सिडंट आणि पोषक तत्व असतात. पालेभाज्या खाल्ल्याने पचन चांगले होते. या लोकांनी पालक, सुरण, कोबी, फूलकोबी, काकडी, गाजर, कांदा खायला हवा.


मुळव्याध आहार काय घ्यावा – मूळव्याधीचं दुखणं म्हणजे अवघड जागेचं दुखणं. मूळव्याध शस्त्रक्रियेशिवाय बरा होऊ शकतो, त्यासाठी मराठी हेल्थ ब्लॉग वरील मूळव्याधीवरील घरगुती उपाय वाचा. पण औषधं घेत असाल तर मूळव्याध मुळापासून बरी करण्यासाठी त्यासोबतच आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही काहीही खाऊन चालणार नाही.

मूळव्याध हा एक गंभीर रोग आहे, जो गुदाशय आणि गुदद्वारात सूज आल्याने होतो. ह्या वेळी आतड्यांची हालचाल खूप वेदनादायक होते. कधीकधी मलासह रक्त देखील पडतं. साधारणपणे मूळव्याध किंवा दोन प्रकारचे असतात –

अंतर्गत मूळव्याध
बाह्य मूळव्याध
अंतर्गत मूळव्याध झाला असेल तरआतड्यांच्या हालचालींसह रक्त बाहेर पडतं तर बाह्य मूळव्याधात, गुदद्वाराभोवतीचा भाग सुजतो, ज्यामुळे तिथे दुखतं आणि खाज येते.

मुळव्याध आहार काय घ्यावा ?
मुळव्याध आहार काय घ्यावा
कित्येकदा प्रश्न पडतो मूळव्याध असेल तर नेमका कोणता आहार घ्यावा? मूळव्याधीवर उपचार म्हणून, बऱ्याचदा विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाण्याचा आणि काही टाळण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर बऱ्याचदा मुळव्याध असलेल्या लोकांना फायबरयुक्त पदार्थ खाण्यास सांगतात. फायबर मलाला मऊ बनवतं ज्यामुळे मल टोचत नाही. जर तुम्हाला मूळव्याधाने त्रास होत असेल तर तुम्ही पाणी आणि फळांच्या रसांच्या स्वरूपात भरपूर पातळ पदार्थ पिऊ शकता.

मुळव्याध आहार काय घ्यावा ? मूळव्याध असेल हा आहार घ्या.
भरपूर फळं खा. 
मुळव्याध आहार काय घ्यावा
अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेली फळं आतड्यांची हालचाल सुधारतात. मूळव्याधाने ग्रस्त लोकांसाठी सफरचंद, द्राक्षे, जांभळं ह्यासारखी फळं खाणं खूप फायदेशीर आहे. ही सर्व फळे फायबर, जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.

पूर्ण धान्य खा
मुळव्याध आहार काय घ्यावा
मूळव्याधाच्या बाबतीत, आपल्या आहारात तपकिरी तांदूळ, ओट्स, गहू सारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करा. संपूर्ण धान्यामध्ये फायबरची खूप चांगली मात्रा आढळते. फायबरने मल मऊ होतो आणि आतड्यांच्या हालचाली दरम्यान वेदना कमी होते.

एखादं केळं रोज खा
मुळव्याध आहार काय घ्यावा
मूळव्याध असलेल्या व्यक्तीने केळं खाल्लं तर त्याला खूप आराम मिळतो. केळी गुदद्वाराची जळजळ कमी करून आतड्यांची हालचाल सुलभ करतात. बॅक्टेरियाच्या वाढीला रोखण्याच्या दृष्टीने मूळव्याधीच्या घरगुती उपचारांसाठी केळी एक उत्तम अन्न आहे.

भरपूर पाणी प्या
मूळव्याधासाठी आपल्या आहारात भरपूर पाणी असावं. ह्याने मल मऊ होऊन मूळव्याध लवकर बरा व्हायला मदत होते. त्यामुळे मूळव्याध असलेल्या व्यक्तीने दररोज किमान 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे.

हिरव्या पालेभाज्या खा

मूळव्याध असेल तर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने पचन चांगलं होतं.ब्रोकोली, कोबी, गाजर, फुलकोबी आणि टोमॅटो मुळव्याधच्या रुग्णांना खायला सांगितलं जातं. ह्या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने मूळव्याधीचा त्रास वाढत नाही. जर तुम्ही मूळव्याधीचे रुग्ण असाल तर मुळ्याला तुमचा साथीदार बनवा. जर मुळा खाल तर हा रोग मुळापासून नाहीसा होईल.

फळांचा रस प्या

हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर विविध प्रकारचे ज्यूस प्या. हे ज्यूस शरीरातील विष काढून टाकतात आणि तर त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स सूज आणि वेदना कमी करतात. ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी आणि चेरी सारखी फळं गुदाशय आणि गुदद्वारात असलेल्या शिरा बळकट करतात. म्हणून ह्या फळांचा रस नक्की प्या.

मूळव्याध असेल तर काय खाऊ नये
पांढरा ब्रेड खाऊ नका

मैद्याचे पांढरे ब्रेड पचायला खूप अवघड असतो. यामुळे बद्धकोष्ठतेची शक्यता वाढते. म्हणून, मूळव्याध असलेल्या रुग्णांना ब्रेड खायला डॉक्टर्स मनाई करतात.

तळलेले पदार्थ खाऊ नका

जर तुम्हाला मूळव्याध असेल तर फ्रेंच फ्राईज, पुऱ्या, वडे आणि जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा. खरं तर, तेलकट आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर चरबी असते, जे आपल्या पचन तंत्रावर दबाव टाकून पचन व्यवस्था कमकुवत करतात. .

कॉफी जास्त नकोच

मूळव्याधीच्या रुग्णासाठी कॉफी हानिकारक आहे. त्यात असलेलं कॅफीन डिहायड्रेशनचे कारण आहे. ज्यामुळे मल कडक होतो आणि गुदद्वाराच्या नसावर दबाव येतो. ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये त्रास होऊ शकतो.

मूळव्याध होऊ नये ह्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात हे बदल करा

आपल्या आहारात फळे आणि भाज्या असं फायबरने समृध्द असलेलं अन्न खा.
दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्या.
दररोज व्यायाम करा.
जास्त वेळ संडासला कुंथत बसू नका.
उशीर न करता लवकर संडासला जा.
जर तुम्हाला आतड्यांच्या हालचाली दरम्यान वेदना होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
मल पास करताना गुद्द्वारांच्या स्नायूंवर दबाव टाकू नका. यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, प्रत्येक आहारासह दही खाणं गरजेचं आहे.
मूळव्याध असेल तर वर सांगितलेला आहार घ्या.
तर ही पथ्ये आणि अपथ्ये पाळून मूळव्याध नक्की बरा होईल. निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी मन हे मूळव्याध बरे करण्याचे उत्तम मार्ग आहेत.



उत्तर लिहिले · 4/1/2022
कर्म · 121765
0

मुळव्याधीवर (Piles) कोणता आहार घ्यावा ह्याची माहिती खालीलप्रमाणे:

आहारात घ्यावयाचे पदार्थ:
  • फायबरयुक्त (Fiber) आहार: आहारात जास्तीत जास्त फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. यामुळे शौचास त्रास होत नाही.

    उदाहरण: फळे, भाज्या, कडधान्ये, आणि तृणधान्ये.

  • पाणी: भरपूर पाणी प्यावे. दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे.
  • हिरव्या पालेभाज्या: पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात.
  • फळे: केळी, सफरचंद, पपई, आणि डाळिंब यांसारखी फळे खावीत.
  • दही: दह्यामध्ये प्रोबायोटिक्स (Probiotics) असतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
टाळायचे पदार्थ:
  • जंक फूड (Junk food): जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळावेत.
  • मैदा: मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे.
  • मसालेदार पदार्थ: मसालेदार आणि तेलकट पदार्थ टाळावेत.
  • चहा आणि कॉफी: चहा आणि कॉफीचे जास्त सेवन करू नये.

टीप: हा केवळ सामान्य माहिती आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

ॲक्युरसी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

इलायचीचे फायदे काय?
इलायचीचे फायदे काय आहेत?
शिर्डीमध्ये मोफत उपचार केले जातात का, काही माहिती मिळणार का?
कुत्रा चावल्यावर काय खावे?
शरीरातील साखर वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?