Topic icon

मुळव्याध

0
मूळव्याधीच्या त्रासावर औषध 
गुदद्वाराला खाज किंवा वेदना, सतत शौचास जाण्याची इच्छा होणे, गुदद्वाराभोवती गाठ येणे किंवा गुदद्वाराभोवती वेदना होणे इत्यादी लक्षणांचा समावेश असतो. रक्तस्त्राव मूळव्याधासाठी औषधे उपलब्ध आहेत,

तुम्ही सिट्झ बाथ घेऊन गुदद्वाराच्या भागात होणा-या वेदना आणि सूज कमी करू शकता. सिट्झ बाथसाठी एक टब भरून गरम पाणी घ्या आणि झाकणामध्ये बीटाडीन लिक्विड घाला आणि त्या पाण्यात थोडा वेळ बसून राहा. तुम्ही पाण्यात थोडं एप्सम सॉल्ट देखील घालू शकता
तुम्ही खोबरेल तेल हि लावू शकता.,कैलास जीवन मलम हे ही वापरू शकता याने भरपूर चांगला आराम मिळतो.






 : हल्लीच्या फास्ट आणि व्यस्त जीवनशैली तसेच आहाराच्या चुकीच्या सवयी यांमुळे मूळव्याधीची समस्या वाढताना दिसत आहे. मात्र या आजारावर फारसे मोकळेपणाने बोलले जात नाही. वेळेवर उपचार केल्यास मूळव्याध बरा होऊ शकतो.


हे आहेत मूळव्याधीवर घरगुती उपचार


जिरे - मूळव्याधीवर उत्तम म्हणजे जिरे. भाजलेल्या जिऱ्याची पूड एक ग्लास पाण्यात टाकून हे पाणी प्यायल्यास मूळव्याधीच्या त्रासापासून आराम मिळतो.


गुलाब - मूळव्याधीचा त्रास असल्यास त्यावर गुलाब गुणकारी आहे. १०-१२ गावठी गुलाबाच्या पाकळ्या ५० मिली पाण्यात टाकून ठेवाव्या. सकाळी रिकाम्यापोटी हे पाणी प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो. 


दूर्वा - पुजेमध्ये विशेष स्थान असलेल्या दूर्वाही मूळव्याधीचा त्रास कमी करण्यास उपयुक्त ठरतात. २ चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून हे मिश्रण गाळून घेतल्यास फायदा होतो.


डाळिंब - मूळव्याधीवर उपचार म्हणून डाळिंबाच्या सालींचाही वापर होतो. डाळिंबाच्या सुकवलेल्या साली अर्धातास पाण्यात भिजत ठेवा. त्या पाण्यात एक चमचा जिरे, पाऊण कप ताक आणि मीठ घाला. हे मिश्रण प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास दूर होतो. 


मुळा - मुळ्याच्या रसात मीठ घालून प्यायल्यास मूळव्याधीचा त्रास बरा होतो. 


सुरण रोजच्या रोज खाल्ल्यास मूळव्याधी बरी होण्यास मदत होते.
सुरण भाजी कशी हि बनवून खा  सुरण भाजी हे तुमचं औषध आहे म्हटल तरी चालेल .

उत्तर लिहिले · 19/8/2023
कर्म · 53715
0

1 (एक) ही संख्या संयुक्त (composite) पण नाही आणि मूळ (prime) पण नाही.

स्पष्टीकरण:

  • मूळ संख्या: मूळ संख्या म्हणजे ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात - 1 आणि ती स्वतः.
  • संयुक्त संख्या: संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येला दोन पेक्षा जास्त विभाजक असतात.
  • 1 ला फक्त एकच विभाजक आहे (तो स्वतः 1 आहे). त्यामुळे ती संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
1
मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींनी हिरव्या पालेभाज्या खाव्यात त्यात भरपूर प्रमाणात अनेक अँटी ऑक्सिडंट आणि पोषक तत्व असतात. पालेभाज्या खाल्ल्याने पचन चांगले होते. या लोकांनी पालक, सुरण, कोबी, फूलकोबी, काकडी, गाजर, कांदा खायला हवा.


मुळव्याध आहार काय घ्यावा – मूळव्याधीचं दुखणं म्हणजे अवघड जागेचं दुखणं. मूळव्याध शस्त्रक्रियेशिवाय बरा होऊ शकतो, त्यासाठी मराठी हेल्थ ब्लॉग वरील मूळव्याधीवरील घरगुती उपाय वाचा. पण औषधं घेत असाल तर मूळव्याध मुळापासून बरी करण्यासाठी त्यासोबतच आहाराकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्ही काहीही खाऊन चालणार नाही.

मूळव्याध हा एक गंभीर रोग आहे, जो गुदाशय आणि गुदद्वारात सूज आल्याने होतो. ह्या वेळी आतड्यांची हालचाल खूप वेदनादायक होते. कधीकधी मलासह रक्त देखील पडतं. साधारणपणे मूळव्याध किंवा दोन प्रकारचे असतात –

अंतर्गत मूळव्याध
बाह्य मूळव्याध
अंतर्गत मूळव्याध झाला असेल तरआतड्यांच्या हालचालींसह रक्त बाहेर पडतं तर बाह्य मूळव्याधात, गुदद्वाराभोवतीचा भाग सुजतो, ज्यामुळे तिथे दुखतं आणि खाज येते.

मुळव्याध आहार काय घ्यावा ?
मुळव्याध आहार काय घ्यावा
कित्येकदा प्रश्न पडतो मूळव्याध असेल तर नेमका कोणता आहार घ्यावा? मूळव्याधीवर उपचार म्हणून, बऱ्याचदा विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाण्याचा आणि काही टाळण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टर बऱ्याचदा मुळव्याध असलेल्या लोकांना फायबरयुक्त पदार्थ खाण्यास सांगतात. फायबर मलाला मऊ बनवतं ज्यामुळे मल टोचत नाही. जर तुम्हाला मूळव्याधाने त्रास होत असेल तर तुम्ही पाणी आणि फळांच्या रसांच्या स्वरूपात भरपूर पातळ पदार्थ पिऊ शकता.

मुळव्याध आहार काय घ्यावा ? मूळव्याध असेल हा आहार घ्या.
भरपूर फळं खा. 
मुळव्याध आहार काय घ्यावा
अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असलेली फळं आतड्यांची हालचाल सुधारतात. मूळव्याधाने ग्रस्त लोकांसाठी सफरचंद, द्राक्षे, जांभळं ह्यासारखी फळं खाणं खूप फायदेशीर आहे. ही सर्व फळे फायबर, जीवनसत्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.

पूर्ण धान्य खा
मुळव्याध आहार काय घ्यावा
मूळव्याधाच्या बाबतीत, आपल्या आहारात तपकिरी तांदूळ, ओट्स, गहू सारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करा. संपूर्ण धान्यामध्ये फायबरची खूप चांगली मात्रा आढळते. फायबरने मल मऊ होतो आणि आतड्यांच्या हालचाली दरम्यान वेदना कमी होते.

एखादं केळं रोज खा
मुळव्याध आहार काय घ्यावा
मूळव्याध असलेल्या व्यक्तीने केळं खाल्लं तर त्याला खूप आराम मिळतो. केळी गुदद्वाराची जळजळ कमी करून आतड्यांची हालचाल सुलभ करतात. बॅक्टेरियाच्या वाढीला रोखण्याच्या दृष्टीने मूळव्याधीच्या घरगुती उपचारांसाठी केळी एक उत्तम अन्न आहे.

भरपूर पाणी प्या
मूळव्याधासाठी आपल्या आहारात भरपूर पाणी असावं. ह्याने मल मऊ होऊन मूळव्याध लवकर बरा व्हायला मदत होते. त्यामुळे मूळव्याध असलेल्या व्यक्तीने दररोज किमान 3 लिटर पाणी पिणं आवश्यक आहे.

हिरव्या पालेभाज्या खा

मूळव्याध असेल तर हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने पचन चांगलं होतं.ब्रोकोली, कोबी, गाजर, फुलकोबी आणि टोमॅटो मुळव्याधच्या रुग्णांना खायला सांगितलं जातं. ह्या भाज्यांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असल्याने मूळव्याधीचा त्रास वाढत नाही. जर तुम्ही मूळव्याधीचे रुग्ण असाल तर मुळ्याला तुमचा साथीदार बनवा. जर मुळा खाल तर हा रोग मुळापासून नाहीसा होईल.

फळांचा रस प्या

हायड्रेटेड राहण्यासाठी दिवसभर विविध प्रकारचे ज्यूस प्या. हे ज्यूस शरीरातील विष काढून टाकतात आणि तर त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स सूज आणि वेदना कमी करतात. ब्ल्यूबेरी, ब्लॅकबेरी आणि चेरी सारखी फळं गुदाशय आणि गुदद्वारात असलेल्या शिरा बळकट करतात. म्हणून ह्या फळांचा रस नक्की प्या.

मूळव्याध असेल तर काय खाऊ नये
पांढरा ब्रेड खाऊ नका

मैद्याचे पांढरे ब्रेड पचायला खूप अवघड असतो. यामुळे बद्धकोष्ठतेची शक्यता वाढते. म्हणून, मूळव्याध असलेल्या रुग्णांना ब्रेड खायला डॉक्टर्स मनाई करतात.

तळलेले पदार्थ खाऊ नका

जर तुम्हाला मूळव्याध असेल तर फ्रेंच फ्राईज, पुऱ्या, वडे आणि जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळा. खरं तर, तेलकट आणि तळलेल्या खाद्यपदार्थांमध्ये भरपूर चरबी असते, जे आपल्या पचन तंत्रावर दबाव टाकून पचन व्यवस्था कमकुवत करतात. .

कॉफी जास्त नकोच

मूळव्याधीच्या रुग्णासाठी कॉफी हानिकारक आहे. त्यात असलेलं कॅफीन डिहायड्रेशनचे कारण आहे. ज्यामुळे मल कडक होतो आणि गुदद्वाराच्या नसावर दबाव येतो. ज्यामुळे आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये त्रास होऊ शकतो.

मूळव्याध होऊ नये ह्यासाठी आपल्या रोजच्या जगण्यात हे बदल करा

आपल्या आहारात फळे आणि भाज्या असं फायबरने समृध्द असलेलं अन्न खा.
दिवसभरात किमान 8-10 ग्लास पाणी प्या.
दररोज व्यायाम करा.
जास्त वेळ संडासला कुंथत बसू नका.
उशीर न करता लवकर संडासला जा.
जर तुम्हाला आतड्यांच्या हालचाली दरम्यान वेदना होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
मल पास करताना गुद्द्वारांच्या स्नायूंवर दबाव टाकू नका. यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढतो.
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी, प्रत्येक आहारासह दही खाणं गरजेचं आहे.
मूळव्याध असेल तर वर सांगितलेला आहार घ्या.
तर ही पथ्ये आणि अपथ्ये पाळून मूळव्याध नक्की बरा होईल. निरोगी आहार, नियमित व्यायाम आणि निरोगी मन हे मूळव्याध बरे करण्याचे उत्तम मार्ग आहेत.



उत्तर लिहिले · 4/1/2022
कर्म · 121765
2
अभ्यासण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. उदा.,
मुंबई पोर्ट ट्रस्ट या विभागाकडे मुंबई बंदराचे मूळ
आराखडे आहेत. हे बंदर पुढे विकसित करताना
वास्तुविशारद आणि अभियंत्यांनी केलेल्या
आराखड्यांवरून आपणांस मुंबईच्या नागरी विकासाची
माहिती मिळू शकते.
उत्तर लिहिले · 9/12/2021
कर्म · 121765
0

भारतीय संविधानाच्या मूळ घटनेत 1 प्रस्ताविका, 8 अनुसूची, 22 भाग आणि 395 कलमे होती.

सध्या भारतीय संविधानात 1 प्रस्ताविका, 12 अनुसूची, 25 भाग आणि 448 कलमे आहेत.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
4
मूळव्याध आणि आहार -
आजकाल अनेकजण मूळव्याधीच्या त्रासाने त्रस्त आहेत. मुळव्याधचा त्रास कमी करण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक असते. यासाठी मुळव्याधमध्ये काय खावे,

लाल मिरचीचे सेवन करू नका
मुळव्याध असलेल्या लोकांना लाल मिरचीचे सेवन आहारातून वगळायला हवे. कारण त्यामुळे जळजळ जास्त प्रमाणात होऊ शकते. म्हणून जास्त तिखट पदार्थ खाऊ नका.

बाहेरचं खाऊ नका
मुळव्याध झाल्यानंतर बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा कारण त्या पदार्थांध्ये  मीठ, मसाल्यांचे प्रमाण अधिक असते. स्वच्छतेकडे लक्ष दिलं जात नाही. 

फायबर्सचा आहारात समावेश करा

गरम पाणी, ताक, ज्वारीची किंवा तांदळाच्या पिठाची भाकरी, मूग, मुगाची डाळ, जुना तांदूळ, सातू. उकडलेल्या पालेभाज्या, पपई, गोड द्राक्षं, सफरचंद, ताडफळ, काळ्या मनुका यांचा आहारात समावेश करा. जेणेकरून पोट साफ होण्यासाठी त्रास होणार नाही आणि खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होईल.

पथ्याच्या गोष्टी
तांदूळ, गहू, यव, ज्वारी, दुधी, पडवळ, तोंडली, सुरण, परवर, आंबट चुका, घोसाळी, मूग, तूर, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, मनुका, आवळा.

अपथ्याच्या गोष्टी
नाचणी, मका, उडीद, वाल, पावटा, चवळी, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, शेंगदाणे, लोणची, पापड वगैरेंचा अतिरिक्‍त वापर.


उत्तर लिहिले · 19/5/2020
कर्म · 55350
4
मुळव्याध उपाय 


http://bit.ly/31lVAK7



मूळव्याध गुदभागी होत असली तरी तिचे मूळ अपचनात असते. विशेषतः अग्नी मंद झाला, नियम न सांभाळता कधीही कसाही आहार घेतला, की मूळव्याधीची सुरवात होते. म्हणजेच मूळव्याधीला दूर ठेवायचे असेल, तर आधी आपल्या आहाराकडे व नियमितपणाकडे लक्ष पुरवायला हवे.
शरीराच्या गुदभागी आग होत असली, दुखत असले, मोड जाणवत असला, शौचावाटे रक्त पडत असले, कंड सुटत असली की आपल्याला मूळव्याध झाली आहे असे रुग्णाला वाटत राहते; पण प्रत्यक्षात मात्र ही लक्षणे परिकर्तिका (गुदभागी भेगा पडणे), मूळव्याध, भगंदर, रेक्टल प्रोलॅप्स (गुदाचा भाग बाहेर येणे) यांपैकी कोणत्या रोगाची आहेत हे निश्चित करणे आवश्यक असते. यासाठी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी करून घेणेही आवश्यक ठरू शकते.
रुग्णाच्या मुळावर उठणारा रोग म्हणजे मूळव्याध. आयुर्वेदात मूळव्याधीला "अर्श‘ म्हटले जाते.

अरिवत् प्राणान् शृणाति हिनस्ति अति अर्शांसि ।
              

*व्याधीची कारणे*
•पचायला जड, जळजळ करणाऱ्या पदार्थांचे सेवन.
•अर्धवट शिजलेल्या अन्नाचे सेवन.
•गाय, डुक्कर, बकरी वगैरे प्राण्यांचे मांससेवन.
•मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे अति सेवन.
•अति मद्यपान, जड पाण्याचे सेवन.
•वेळच्या वेळी शरीरशुद्धी न करणे.
•अनुचित व्यायाम व मैथुनकर्म.
•दिवसा झोपणे.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट
•कडक वा विषम आसनावर अधिक काळ बसणे.
•अति वेगवान गाडीत बसून वारंवार प्रवास करणे.
•प्रवर्तन होताना कुंथावे लागणे.
•बाळंतपणाच्या वेळेस फार जोर लावावा लागणे.
•गर्भारपणाच्या शेवटी शेवटी गुदप्रदेशावर दाब पडणे.
  तूप किंवा एरंडेल लावा
परिकर्तिकेवर गुदभागी तूप किंवा एरंडेल तेलासारखे स्निग्ध द्रव्य लावण्याचा उपयोग होतो. सॅन हील मलमसारखे जखम भरून आणण्यास मदत करणारे मलम लावण्याचाही उपयोग होतो. आहारात लोणी, तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे, आतड्यांतील कोरडेपणा कमी करणारे सॅनकूलसारखे औषध घेणे, फार तिखट तसेच कोरडे पदार्थ न खाणे, हेही उत्तम ठरते.
भगंदर हा अतिशय चिवट रोग असे म्हणायला हरकत नाही. जखम भरून येईल, त्या ठिकाणचा जंतुसंसर्ग बरा होईल अशा पद्धतीची औषधे, उपचार यात घ्यावे लागतात. औषधे सेवन करण्याबरोबरच यात धूपन उपचाराचाही उपयोग होतो.
रेक्टल प्रोलॅप्सचा त्रास असणाऱ्यांना मलावष्टंभ होणार नाही म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. धायटीच्या किंवा डाळिंबाच्या सालीच्या काढ्यात कटिस्नान घेण्यानेही गुदाचा बाहेर आलेला भाग पुन्हा आत जायला मदत मिळते. फारच त्रास असला तर हाताला तूप-तेल लावून गुदाचा भाग आत ढकलून लंगोट बांधून ठेवण्याचीही कधी कधी गरज भासू शकते.
*सर्वसाधारण उपचार*
•रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यावे.
•मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यावे.
•सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.
•रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.
•मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दूर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी.
•मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी.
•कफज मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.
•मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा.
•तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते.
•व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्यक असते; अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो.
*पथ्याच्या गोष्टी*
तांदूळ, गहू, यव, ज्वारी, दुधी, पडवळ, तोंडली, सुरण, परवर, आंबट चुका, घोसाळी, मूग, तूर, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, मनुका, आवळा.
*अपथ्याच्या गोष्टी*
नाचणी, मका, उडीद, वाल, पावटा, चवळी, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, शेंगदाणे, लोणची, पापड वगैरेंचा अतिरिक्त वापर.