औषधे आणि आरोग्य मुळव्याध उपचार आरोग्य

मूळव्याधवर खात्रीशीर उपाय सांगा?

2 उत्तरे
2 answers

मूळव्याधवर खात्रीशीर उपाय सांगा?

4
मुळव्याध उपाय 


http://bit.ly/31lVAK7



मूळव्याध गुदभागी होत असली तरी तिचे मूळ अपचनात असते. विशेषतः अग्नी मंद झाला, नियम न सांभाळता कधीही कसाही आहार घेतला, की मूळव्याधीची सुरवात होते. म्हणजेच मूळव्याधीला दूर ठेवायचे असेल, तर आधी आपल्या आहाराकडे व नियमितपणाकडे लक्ष पुरवायला हवे.
शरीराच्या गुदभागी आग होत असली, दुखत असले, मोड जाणवत असला, शौचावाटे रक्त पडत असले, कंड सुटत असली की आपल्याला मूळव्याध झाली आहे असे रुग्णाला वाटत राहते; पण प्रत्यक्षात मात्र ही लक्षणे परिकर्तिका (गुदभागी भेगा पडणे), मूळव्याध, भगंदर, रेक्टल प्रोलॅप्स (गुदाचा भाग बाहेर येणे) यांपैकी कोणत्या रोगाची आहेत हे निश्चित करणे आवश्यक असते. यासाठी तज्ज्ञांकडून प्रत्यक्ष तपासणी करून घेणेही आवश्यक ठरू शकते.
रुग्णाच्या मुळावर उठणारा रोग म्हणजे मूळव्याध. आयुर्वेदात मूळव्याधीला "अर्श‘ म्हटले जाते.

अरिवत् प्राणान् शृणाति हिनस्ति अति अर्शांसि ।
              

*व्याधीची कारणे*
•पचायला जड, जळजळ करणाऱ्या पदार्थांचे सेवन.
•अर्धवट शिजलेल्या अन्नाचे सेवन.
•गाय, डुक्कर, बकरी वगैरे प्राण्यांचे मांससेवन.
•मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे अति सेवन.
•अति मद्यपान, जड पाण्याचे सेवन.
•वेळच्या वेळी शरीरशुद्धी न करणे.
•अनुचित व्यायाम व मैथुनकर्म.
•दिवसा झोपणे.
आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट
•कडक वा विषम आसनावर अधिक काळ बसणे.
•अति वेगवान गाडीत बसून वारंवार प्रवास करणे.
•प्रवर्तन होताना कुंथावे लागणे.
•बाळंतपणाच्या वेळेस फार जोर लावावा लागणे.
•गर्भारपणाच्या शेवटी शेवटी गुदप्रदेशावर दाब पडणे.
  तूप किंवा एरंडेल लावा
परिकर्तिकेवर गुदभागी तूप किंवा एरंडेल तेलासारखे स्निग्ध द्रव्य लावण्याचा उपयोग होतो. सॅन हील मलमसारखे जखम भरून आणण्यास मदत करणारे मलम लावण्याचाही उपयोग होतो. आहारात लोणी, तुपाचा पुरेशा प्रमाणात समावेश करणे, आतड्यांतील कोरडेपणा कमी करणारे सॅनकूलसारखे औषध घेणे, फार तिखट तसेच कोरडे पदार्थ न खाणे, हेही उत्तम ठरते.
भगंदर हा अतिशय चिवट रोग असे म्हणायला हरकत नाही. जखम भरून येईल, त्या ठिकाणचा जंतुसंसर्ग बरा होईल अशा पद्धतीची औषधे, उपचार यात घ्यावे लागतात. औषधे सेवन करण्याबरोबरच यात धूपन उपचाराचाही उपयोग होतो.
रेक्टल प्रोलॅप्सचा त्रास असणाऱ्यांना मलावष्टंभ होणार नाही म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. धायटीच्या किंवा डाळिंबाच्या सालीच्या काढ्यात कटिस्नान घेण्यानेही गुदाचा बाहेर आलेला भाग पुन्हा आत जायला मदत मिळते. फारच त्रास असला तर हाताला तूप-तेल लावून गुदाचा भाग आत ढकलून लंगोट बांधून ठेवण्याचीही कधी कधी गरज भासू शकते.
*सर्वसाधारण उपचार*
•रात्री झोपताना कपभर गरम पाण्यात दोन-तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यावे.
•मोडाच्या ठिकाणी वेदना असल्यास बेलफळाचा गर व पाठाचूर्ण मिसळून घ्यावे किंवा सुंठ व पाठाचूर्ण एकत्र करून घ्यावे.
•सुरण ही भाजी मूळव्याधीत औषधच होय. सुरण वाफवून केलेली भाजी, फुलका, तूप व ताक असा आहार काही दिवस घेतल्यास उत्तम फायदा होतो.
•रक्त पडत असल्यास घरचे ताजे लोणी व नागकेशर हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे.
•मोडाच्या ठिकाणी आग होत असल्यास दूर्वांच्या रसात भिजवलेली कापसाची घडी मोडाच्या ठिकाणी ठेवावी.
•मोड सुजला असून दुखत असल्यास गोवरीच्या विस्तवावर तूप टाकून त्याची धुरी घ्यावी किंवा खजुराच्या बीचे चूर्ण करून त्याची धुरी घ्यावी.
•कफज मूळव्याध असून मोडाला खाज येत असल्यास जेवणापूर्वी तसेच जेवणानंतर सुंठ व ओव्याची पूड टाकून ताक प्यावे.
•मोडाच्या ठिकाणी वेदना व आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा गर ठेवावा.
•तीळ वाटून गरम करून शेकल्यास मोडाच्या ठिकाणची वेदना कमी व्हायला मदत होते.
•व्याधीवर शस्त्रकर्म किंवा क्षारकर्म केले तरी मुळातल्या मंद अग्नीवर योग्य उपचार करून मूळव्याधीवर खरे उपचार करणे व पथ्य पाळणे आवश्यक असते; अन्यथा पुन्हा त्रास उद्भवू शकतो.
*पथ्याच्या गोष्टी*
तांदूळ, गहू, यव, ज्वारी, दुधी, पडवळ, तोंडली, सुरण, परवर, आंबट चुका, घोसाळी, मूग, तूर, लोणी, तूप, ताक, आले, सुंठ, मनुका, आवळा.
*अपथ्याच्या गोष्टी*
नाचणी, मका, उडीद, वाल, पावटा, चवळी, शेंगदाणे, रताळे, तळलेले तिखट पदार्थ, शेंगदाणे, लोणची, पापड वगैरेंचा अतिरिक्त वापर.

0
मला माफ करा, मी वैद्यकीय सल्ला देण्यासाठी योग्य नाही. मूळव्याध (Piles) साठी काही सामान्य उपाय खालीलप्रमाणे आहेत, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे:

1. आहार:

  • फायबरयुक्त (Fiber) आहार घ्या: फळे, भाज्या, आणि धान्ये आहारात भरपूर असावीत.
  • भरपूर पाणी प्या: दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्यावे.

2. जीवनशैलीतील बदल:

  • नियमित व्यायाम: दररोज शारीरिक हालचाल करणे आवश्यक आहे.
  • जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळा: कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या.

3. औषधोपचार:

  • डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मलham (Ointment) वापरा: यामुळे आराम मिळतो.
  • वेदनाशामक औषधे: दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. घरगुती उपाय:

  • गरम पाण्याची Sit bath: दिवसातून दोन-तीन वेळा गरम पाण्यात बसा.
  • कोरफड (Aloe vera) जेल: मूळव्याधाच्या ठिकाणी लावल्यास आराम मिळतो.

5. शस्त्रक्रिया (Surgery): गंभीर स्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शस्त्रक्रिया करणे हा एक पर्याय असू शकतो.

टीप: कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

कुत्रा चावल्याने कोणती इंजेक्शन्स दिली जातात?
बाळासुरपणासाठी उपचार काय आहेत?
फायब्राईडवर आयुर्वेदिक हमखास उपचार आहेत काय? असल्यास पत्ता पाठवा.
Knee transplant la dusra paryay aahe ka? Gudghedukhi var aushadh konte aahe?
गाऊट व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणाऱ्या सेवा स्पष्ट करा?
गुडघेदुखीवर शेवग्याच्या शेंगेची किंवा बाभळीच्या शेंगेची पावडर यापैकी कोणती पावडर खायची असते? कशी व कशाबरोबर आणि किती दिवस खायची असते?
आजार बरा व्हावा म्हणून शिवरायांनी काय काय केले?