भाषा भाषाविज्ञान साहित्य

साहित्य भाषा आणि व्यवहार भाषा वेगळी कशी?

2 उत्तरे
2 answers

साहित्य भाषा आणि व्यवहार भाषा वेगळी कशी?

3
व्यवहारभाषा, शास्त्रीय साहित्याची भाषा आणि ललित साहित्याची भाषा

व्यवहारभाषा शास्त्रीय भाषा आणि ललित साहित्याची भाषा या संदर्भात अभ्यासकांनी आपली भूमिका विशद केली आहे. त्यांच्या मतांचा परामर्श घेऊया.

वेलेक आणि वॉरेन यांच्या मते, शास्त्रीय साहित्याची भाषा ही शुद्ध अभिधात्मक असते निर्दिष्ट वस्तू आणि तद्दर्शक चिन्ह यात एकास एक संबंध राखला जावा हा तिचा हेतू असतो. साहित्याची भाषा ही व्यंजनप्रवर असते. अभिव्यंजकता हा तिचा खास असा अंगभूत पैलू आहे. व्यवहार भाषा ही एकरूप संकल्पना नव्हे त्यात बोलीभाषा, व्यापारीभाषा, सरकारी भाषा, धार्मिकभाषा यांचा समावेश असतो.

वा. ल. कुलकर्णी यांच्या मते, ललितसाहित्याच्या भाषेचे उद्दिष्ट अनुभव साक्षात करणे हे आहे. शास्त्रीय भाषा तत्त्वांची भाषा आहे. व्यवहार भाषा ही साधनात्मक असून ती जीवनव्यवहारापयोगी असते. सार्वजनिकता हा व्यवहारभाषेचा महत्त्वाचा गुण असून तिचे स्वरूप निवेदनात्मक स्पष्टीकरणात्मक, विवेचनात्मक आणि निर्देशात्मक असते.

शरच्चंद्र मुक्तिबोध यांच्या मते, शास्त्रीय भाषा ही प्रतिकात्मक असते. शास्त्रीय भाषेत अर्थ सुनिश्चित व काटेकोर असतात. शास्त्रीय भाषा ही वस्तुनिष्ठ ज्ञानाची भाषा आहे. व्यवहार भाषेत सुगवलीच्या अर्थव्यंजकतेला अधिक महत्व आहे. वाक्यार्थ केवळ शब्दार्थानी न ठरता तो सगवलीने ठरत असतो. व्यवहारभाषेत उच्चारानुसार परस्परविरोधी असे अर्थ निर्माण होत असतात ललित साहित्याची भाषा हो सरावली आणि शब्दार्थ यांच्याद्वारे प्रतिभानुभव निर्माण करणारी भाषा असते. प्रतिभानुभव हे ललित साहित्याचे भाषेचे खास क्षेत्र होय.

भालचंद्र नेमाडे यांच्या मते, व्यवहारभाषा ही जीवनाच्या नानाविध क्षेत्रात उपयोगात आणली जाणारी भाषा आहे. तिचे संदेशवहनाचे कार्य विशाल आहे. व्यावहाभाषा ही साधनरूप असते. शास्त्रीय भाषा ही धार्मिक, मानव्य रसायन, जीव अशा अनेकविध शास्त्रक्षेत्रनिर्दिष्ट पदानी भरलेली असते. विवेकनिष्ठ अर्थव्यक्तीला शास्त्रीय भाषेत महत्त्व असल्याने सस्पष्टता है तिचे प्रमुख लक्षण बनते. शास्त्रीय भाषेत अनेकार्थास भाव मिळत नाही. गणिती अचूकपणा हा तिचा खास विशेष होय. साहित्यभाषा ही व्याकरणापलीकडचे अर्थाधिक्य व्यक्त करते. साहित्याच्या भाषेत अर्थव्यक्तीची समृद्धी असते. अनेकार्थत्व हा या भाषेचा खास विशेष असतो. सौंदर्यानुभव देणे हे ललित साहित्याच्या भाषेचे विशेष होय.

शब्दार्थाचा वक्रव्यापार

साहित्याच्या अभ्यासकांनी शब्दांच्या तीन शक्ती मानल्या आहेत. त्या म्हणजे अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या होत. शब्द एकच असतो. त्याचा मूळ अर्थ एकच असतो पण भिन्न भिन्न परिस्थितीमध्ये त्याला भिन्न भिन्न अर्थ प्राप्त होतो. जशी एकच व्यक्ती, पण ती घरामध्ये वेगळी वागते, नोकरीच्या ठिकाणी वेगळी वागते, सार्वजनिक सभासंमेलनात वेगळी वागते आणि मित्रमैत्रिणींच्या संगतीत वेगळी वागते आणि असा वेगळेपणा असूनही ती व्यक्ती वेगवेगळी नसते तर एकच असते. तसे शब्द एकच असतो पण त्याचा परिसर, सभोवतालचा संदर्भ बदलला की तो वेगळा अर्थ सांगू लागतो. जर एखाद्या गाढवाला उद्देशून

1
1व्युत्पत्ती किंवा मूळ शब्द या शब्दातील प्रकृती आणि प्रत्यय याच्या एकत्र अर्थानि शब्दाचा अर्थ निष्पन्न होतो. यांना यौगिक शब्द ही संज्ञा आहे.

२. रूढी-शब्दच ही शक्तों ने प्रस्थापित झालेली असतेथे शब्दाचे काय पाहून म्हणजे व्युत्पत्तीने अर्थ सिद्ध करता येत नाही या शब्दातील समूहाला अर्थ प्राप्त झालेला असतो जिथे शब्दार्थ हे रुबीने किंवा संकेताने प्रस्थापित झालेले असतात ते रूद्र शब्द होत उदा. झाड, बेल, बाप, सिंह, अश्व, मंडप इत्यादी.

३. योगरूढ काही शब्दांत अवयव असतात. परंतु त्यांचा अर्थ व्युत्पत्ती प्रमाणे न होता रूढोंने निश्चित केलेला असतो. मटकावयवाच्या स्वतंत्र अर्थाप्रमाणे त्यांचा अर्थ लक्षात घेता येत नाही. योग शनातध्ये योग आणि रूढ या दोन्हींचे मिश्रण येते म्हणजे त्यात व्युत्पनीही लक्षात घेतली जाते आणि सार्कतिकताही लक्षात घेतली जाते. उदा. पंकज हा शब्द पंकज म्हणजे चिखलात जन्मलेले डा यौगिक अर्थ लक्ष घेतल्यास चिखलात जन्मणारा कोणताही विशेष लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे वेली, बेका किंवा इतर जीवाणू यांनाही पंकज म्हणावे लागेल पण पंकज' म्हणजे 'कमळ' असा अर्थ ने निश्चित केला आहे आणि कमळही चिखलात जन्मत असते तेव्हा पंकज म्हणजे 'कमळ' यात योग आणि या कार्यरत आहेत. खग' हा आणखी असाच योगदख म्हणजे आकाशात गमन करणारा असा यौगिक अर्थ पण विमान चंद्र, सूर्य असा त्याचा अर्थ न घेता पक्षी' हा एकच अर्थ रूढीने निश्चित केला आहे आणि तोच सर्वाकडून स्वीकारला गेला अशा शब्दांना यश आहे.

लक्षणा

शब्दाची दूसरी शक्ती म्हणजे लक्षणा होय एखाद्या वाक्याचा बोध होण्यासाठी कित्येकवेळा मुख्याचा किंवा वाच्यार्थाचा बोध होत नाही. अशा वेळी मुख्यार्थ सोडून जो अर्थ आपण स्वीकारती त्यास यार्थ असे म्हणतात. घरावती गेला या वाक्यात परावरून शब्दाचा मुख्या घेतल्यास अर्थ लागत नाही मुख्याथला येथे बाध येतो म्हणूनच लक्ष्याथांकडे जावे लागते 'परावरून म्हणजे 'घरासमोरून' हा लक्ष्यार्थ होय. मुख्यार्थ सोडून आपण वेगळ्या अर्थाकडे जातो खरे. पण हा वेगळा अर्थ कोणत्यातरी परीने मुख्याशी संबंधित असला पाहिजे. 'मी शेक्सपीयर वाचला' या वाक्यातील शेक्सपीयर म्हणजे त्याची नाटके या दोन अर्थाचा संबंध आहे. तू शुद्ध राक्षस आहेस या वाक्यातील राक्षस हा शब्द प्रत्यक्ष राक्षस नसलेल्या माणसासंबंधी योजिला आहे. याचे कारण दोघांची कृती सारखी आहे. समीपता साहचर्य, सादृश्य, कृती इ. संबंधामुळेच मुख्यार्थाबद्दल लक्ष्यात येऊ शकतो त्यात मुख्यार्थ कामी पडत नाही. हत्ती घरासमोरून गेला असे न सांगता घरावरून असे म्हणण्याने समिपता दाखवणे हा हेतू होता.

लक्षणेचे प्रकार :

संस्कृत साहित्य अभ्यासकांनी लक्षणेचे मुख्य दोन प्रकार कल्पिले १. गौणी लक्षणा (सादृश्यमूलक) आणि २. शुद्धा लक्षणा (सादृश्येतर) गौणी लक्षणा हे गुणसादृश्यामुळे होते तर शुद्धा लक्षणा हो सादृश्येतर संबंधावर अवलंबून असते.

गौणी लक्षणेचे दोन प्रकार पडतात. १. सारोपा २. साध्यवसाना

'सारोपा' लक्षणेमध्ये दोन वस्तूपैकी एकीचा दूसरीवर आरोप केलेला असतो, उदा तिचे मुख म्हणजे चंद्रवदन" या मध्ये मुखावर चंद्रवियाचा आरोप केला आहे. या वाक्यातील उपमेय काढून टाकून केवळ उपमानाचीच योजना केल्यास साध्यवसाना लक्षणा होते. उदा. रमणीमुख पाहून एखायाने हा चंद्रन

3आपण 'तो गाढव आहे' असे म्हटले तर तो वाच्यार्थ झाला. पण जर एखाद्या माणसाला उद्देशून आपण हेव वाक्य म्हटले तर त्याचा अर्थ बदलला लगेच 'गाढव' या शब्दाचा अर्थ मुर्ख मनुष्य' असा होती. हा दुसरा अर्थ म्हणजे लक्ष्यार्थ होय हा एकच शब्द आणखी अर्थ व्यक्त करू शकतो. जर एखाद्या आईने हवेत हातपाय उडवित खेळणाऱ्या आपल्या लहानग्याला उद्देशून हे वाक्य म्हटले तर त्याचा आणखी एक वेगळाच भावार्थ आपल्या लक्षात येतो. तिच्या मनातील वात्सल्यभाव त्या शब्दामधून व्यक्त होतो. या उदाहरणात याला बायार्थ अपेक्षित नाही, मुर्ख मनुष्य यासारखा लक्ष्यार्थही अपेक्षित नाही. तर मुलाबद्दलची कौतुकाची भावना प्रकट करणे एवढाच त्याचा अर्थ घ्यावा लागतो. हा तिसरा अर्थ म्हणजे व्यग्यार्थ होय.

शब्द माणजे पदार्थाचे प्रतीक 'वृक्ष' हा शब्द वृक्ष' या पदार्थाचे प्रतीक आहे. हा शब्द उच्चारताच विशिष्ट आकृतीची वस्तू आपल्या डोळयासमोर येते. शब्दाच्या ठिकाणी ही जी शक्ती आहे तिला अभिया असे म्हणतात आणि या शक्तीमुळे जो अर्थ प्रतीत होतो त्यास वाच्यार्थ असे म्हटले जाते. परंतु कित्येकवेळा वाक्याचा अर्थ समजून घेण्याकरिता बान्याचे अपुरा पडतो किंवा कित्येकवेळा वाच्यार्थ उपयोगाचा ठरत नाही अशावेळी अर्थ प्राप्त करून घेण्यासाठी शब्दाच्या वेगळ्या शक्तींचा आश्रय घ्यावा लागतो उदा तू शुद्ध राक्षस आहेस असे एखाद्याला उद्देशून म्हटल्यास इथे वाच्यार्थी उपयोगी ठरत नाही 'राक्षस' या शब्दाचा अर्थ क्रूर कर्म करणाग' किंवा 'क्रूर वृत्तीने वागणारा असा अर्थ प्यावा लागतो वा हाथ अर्थ इथे अभिप्रेत असतो शब्दामधून असा अर्थ सूचविण्याची जो शब्दशक्ती आहे. तिला लक्षणा असे म्हणतात आणि या शक्तीने सुचविलेला अर्थ म्हणजे लक्ष्यार्थ होय पण कित्येकवेळा एकानेही भागत नाही. उदा. फामगार आहे मी, तळपती तलवार आहे या ओळीत शब्दाचा उच्चार करताच व्याच्यार्थ तर निर्माण होतोच पण त्याहीपेक्षा भिन्न अशा व्यापक अर्थाची सूचना मिळत असते. या सुचित अर्थाला काव्यात फार महत्त्व असते. शब्दाची ही जी शक्ती आहे तिला व्यंजना असे म्हटले जाते आणि तिच्याद्वारे सूचित होणारा जो अर्थ असतो त्या व्यर्थ असे म्हटले जाते.

अभिधा

शब्दाची पहिली व मुख्य शक्ती म्हणजे अभिधा होय. एखादा शब्द उच्चारताच आपल्याला तत्काळ एक विशिष्ट अर्थ कळतो. उदा. वृक्ष, वायु, सूर्य, चंद्र, संध्याकाळ इत्यादी शब्द उच्चारल्याबरोबर त्याचा अर्थ आपणास कळतो या अर्थाला मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ असे म्हणतात. यालाच संकेतार्थ असेही म्हणतात दूध हा शब्द उच्चारताच विशिष्ट वस्तू आपल्या मनासमोर उभी राहते आणि तो शब्द उच्चारणान्याचा आशय आपणाला कळतो. 'सिंह' म्हटल्याबरोबर विशिष्ट आकाराचा हिंस्र पशू जाणवतो. असे आणखी असंख्य शब्द लक्षात घेतल्यास विशिष्ट संकेत डोळ्यासमोर निर्माण होतात व आपल्याला अर्थप्रतीती होते. अर्थप्रतीती होण्याची जी पहिली शक्ती आहे तिला अभिषा असे म्हणतात. तिच्यामुळे प्राप्त होतो तो 'वाच्यार्थ' होय.

अभिषेवे प्रकार :

संकेताने शब्दांना प्राप्त होणारी ही अभिधाशक्ती तीन प्रकारची आहे. १. योग २.३. योगरूढ

१. योग योग म्हणजे व्युत्पत्ती व्युत्पत्तीने जेव्हा शब्दाचा अर्थ सिद्ध होतो तेव्हा त्या शब्दशक्तीला योगशक्ती असे म्हणतात आणि त्या शब्दाना यौगिक म्हणतात. हे शब्द पटकावयवापासून बनलेले अरु त्पत्तीने हे पटकावयव वेगळे काढल्यास त्याच्या एकत्र अचनिच शब्दाचा अर्थ तयार होत असल्याचे दिसून येते. उदा. गांगेय (गंगा हा मूळ शब्द गणेचे अपत्य तो गाय) भारतीय (भरत भारत ही

2
उत्तर लिहिले · 1/1/2022
कर्म · 121765
0

साहित्यिक भाषा आणि व्यवहार भाषा यांच्यातील फरक खालीलप्रमाणे आहेत:

1. स्वरूप (Nature):

  • साहित्यिक भाषा: साहित्यिक भाषा ही अधिक अलंकृत,symbolic आणि सौंदर्यपूर्ण असते. यात प्रतिमा, रूपके आणि भावनात्मक अभिव्यक्तीचा वापर केला जातो.
  • व्यवहार भाषा: व्यवहार भाषा ही सरळ, स्पष्ट आणि व्यावहारिक असते. तिचा उद्देश माहिती देणे, विचार व्यक्त करणे किंवा विशिष्ट कार्य करणे हा असतो.

2. उद्देश (Purpose):

  • साहित्यिक भाषा: साहित्यिक भाषेचा उद्देश सौंदर्य निर्माण करणे, भावना व्यक्त करणे आणि वाचकाला विचार करण्यास प्रवृत्त करणे हा असतो.
  • व्यवहार भाषा: व्यवहार भाषेचा उद्देश संवाद (communication) साधणे, माहिती देणे आणि दैनंदिन कामे करणे हा असतो.

3. वापर (Use):

  • साहित्यिक भाषा: साहित्यिक भाषा कविता, कथा, नाटक, निबंध यांसारख्या साहित्य प्रकारात वापरली जाते.
  • व्यवहार भाषा: व्यवहार भाषा संभाषण, लेखन, व्यवसाय, शिक्षण अशा दैनंदिन जीवनातील व्यवहारांमध्ये वापरली जाते.

4. व्याकरण आणि शब्दसंग्रह (Grammar and Vocabulary):

  • साहित्यिक भाषा: साहित्यिक भाषेत व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे नियम काहीवेळा लवचिक (flexible) असू शकतात. कवी किंवा लेखक आपल्या गरजेनुसार त्यात बदल करू शकतात.
  • व्यवहार भाषा: व्यवहार भाषेत व्याकरण आणि शब्दसंग्रहाचे नियम काटेकोरपणे पाळले जातात.

5. उदाहरण (Example):

  • साहित्यिक भाषा: "अंधार दाटला चोहीकडे, जसा काही काळा सागर" - हे वाक्य अधिक कल्पनात्मक आणि भावनात्मक आहे.
  • व्यवहार भाषा: "रात्रीचे नऊ वाजले आहेत." - हे वाक्य सरळ आणि माहिती देणारे आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5160

Related Questions

प्रमाणभाषा व बोलीभाषा यातील संबंध उलगडून दाखवा?
व्यवहार भाषा व साहित्य भाषा स्पष्ट करा?
व्यवहाराची भाषा आणि साहित्यिक भाषा यांचे स्वरूप विशद करा?
व्यवहाराची भाषा व साहित्याची भाषा या संकल्पना विशद करा?
ध्यानव्याकरणात्मक भाषा आणि तिचा विकास यांची मांडणी वैज्ञानिक पद्धतीने कोणी कोणत्या ग्रंथात केली आहे?
ऐतिहासिक भाषा विज्ञान आणि समाजविज्ञान प्रश्न आणि उत्तरे?
व्यवहारभाषा आणि साहित्याची भाषा यातील वेगळेपणा स्पष्ट करा?