2 उत्तरे
2
answers
जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचे काय फायदे आहेत?
6
Answer link

बडीशेपला सर्व मसाल्यांचा राजा म्हटलं जात. आपल्या कडे बहुतांश लोक जेवण झाल्यानंतर बडीशेप खान पसंद करतात. अनेक जणांना तर बडीशेप शिवाय जेवण झाल्यासारखेच वाटत नाही. बडीशेपमूळे तुमच्या तोंडाला येणारी दुर्गंधी देखील कमी होते. त्यामुळे रोज जेवल्यानंतर एक चमचा बडीशेप नक्की खा!
बडीशेप खाण्याचे काही लाभदायी फायदे –
– बडीशेप मध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आयर्न आणि पोटॅशिअम यासारखे म्हत्वाचे घडक आहेत. जे कि तुमच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात. त्यामुळे दररोज जेवणानंतर एक चमचा बडीशेपचे सेवन नक्की करायला हवे.
– बडीशेप खाण्याचा सर्वात मोठा फायदा आहे कि, तो म्हणजे तुमच्या त्वचेच्या तक्रारी दूर होतात. बडीशेप खाल्यास आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल्स, मुरुम येत असतील तर हे मुरुम देखील दूर होऊ शकतात.
– बडीशेप मुळे रक्ताचे शुद्धीकरण होण्यास मदत होते. बडीशेप मध्ये विशिष्ट प्रकारचे तैलीय घटक असतात. त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी बडीशेप मदत करते.
– सर्वात महत्वाचा फायदा हा हृदयाशी निगडित आहे. बडीशेपमध्ये पोटॅशिअम नावाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. आणि या पोटॅशिअममुळेच आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालतो, कदाचित हे तुम्हाला माहित नसेल.
– बडीशेप मुळे तुमचे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. जर सुंदर डोळे हवे असतील, तर आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन A, अमिनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडेंट हे घटक असायला हवेत. हे घटक तुम्हाला बडीशेप मध्ये मिळतात.
0
Answer link
जेवल्यानंतर बडीशेप खाण्याचे अनेक फायदे आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
- पचन सुधारते: बडीशेपमध्येdigestive enzymes असतात, ज्यामुळे अन्न पचनास मदत होते. यामुळे अपचन, गॅस आणि bloating सारख्या समस्या कमी होतात.
- तोंडाची दुर्गंधी कमी होते: बडीशेपमध्ये असलेले गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया मारण्यास मदत करतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी कमी होते.
- पोषक तत्वांचे शोषण: बडीशेप खाल्ल्याने शरीराला अन्नातील पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत होते.
- ॲसिडिटी कमी होते: बडीशेपमध्ये alkaline गुणधर्म असतात, ज्यामुळे ॲसिडिटी कमी होते.
- बद्धकोष्ठता कमी होते: बडीशेपमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते.
टीप: बडीशेपचे जास्त सेवन करणे टाळावे, कारण त्यामुळे काही लोकांना allergy होऊ शकते.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: