2 उत्तरे
2
answers
पित्त म्हणजे नक्की काय? पित्त कशामुळे होते आणि ते होऊ नये यासाठी उपाय सांगा.
1
Answer link
पित्ताची निर्मिती जल आणि अग्नी या तत्त्वांपासून होते असे मानले जाते. पित्त शरीरातील उष्णता, चयापचय, मन आणि शरीर यांचे रूपांतरण, अन्नपचन, संवेदना, सदसदविवेकबुद्धी इत्यादी गोष्टींवर नियंत्रण ठेवते. संतुलित पित्ताने नेतृत्त्व गुण ) विकसित होतात.
अती पित्तामुळे राग, आलोचना, व्रण, पुरळ इत्यादी त्रास होतात.
आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ असे त्रिदोष आहेत. जे प्राकृत अवस्थेत उपयोगी व शरीराचे धारण करणारे आहेत तर विकृत झाले की हेच शरीरातील इतर घटकांना बिघडवून आजार निर्माण करतात. पैकी पित्त हे अन्नपचन प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा घटक त्यामुळे त्याचे प्राकृत असणे फारच महत्त्वाचे. हे ज्याप्रमाणे पित्ताशयातून येत असते त्याचप्रमाणे घेतलेल्या आहारातूनही तयार होत असते. त्यामुळे पित्ताशय जरी काढून टाकला तरी त्याचे काम आपल्या आमशयामध्ये चालू असते. ज्याप्रमाणे आपण तुपाचा दिवा लावल्यानंतर तूप जळून त्यातून अग्नी तयार होतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरातसुद्धा घेतलेला आहार जळतो आणि त्यातून अग्नी म्हणजेच जठराग्नी तयार होतो. म्हणून तर आपण जेवणामध्ये तिखट, तेलकट पदार्थ खाल्ले की आपली भूक उलट वाढते, अजून अन्न खावेसे वाटते व पर्यायाने पित्तही वाढते. मात्र आपण गोड पदार्थ खाल्ले की आपली लगेच भूक शमते व आपले पित्तही कमी होते. पण आपण जास्त व अधिक मात्रेत गोड पदार्थ खाल्ले की भूकच मंदावते व अग्निमांद्य होते. म्हणजे आपण जे खातो त्याचे अगोदर पित्तात व पर्यायाने अग्नीत रूपांतर होते. म्हणून पित्त वाढू द्यायचे नसेल तर आपण काय खातो हे पाहणे जास्त महत्त्वाचे असते. आपण पित्तवर्धक आहार करत असू आणि वरून अॅण्टासिडच्या गोळ्या खात असू तर पित्त वाढलेले असतेच, आपण फक्त गोळीने त्याचे तात्पुरते शमन करतो. त्यामुळे ते घट्ट होते आणि हळूहळू त्याचे खडे बनू लागतात. या पित्ताचा प्रत्येकाला होणारा त्रास वेगवेगळा असतो. जसे की- काहींना घशात, छातीत जळजळ-मळमळ होते, काहींना जेवणानंतर करपट ढेकरा येतात, पोटात जळजळ होते, तर काहींना अपचन, मूळव्याध मागे लागते. काहींचे पित्त वाढले की डोके दुखू लागते. काहींना त्वचाविकार मागे लागतात तर काहींच्या अंगाला फक्त खाज सुटते. अंग नेहमी गरम वाटते, डोळ्यातून आग आग होते तर काहींना केस गळणे-पिकणे, मासिकपाळीच्या तक्रारी, चेहऱ्यावर तरुण्यापीटिका किंवा अंगावर बारीक बारीक फोड येऊ लागतात. हे सर्व वेगवेगळी लक्षणे दिसत असली तरी हे होण्यामागचे कारण मात्र वाढलेले पित्तच असते. आणि हे तात्पुरते शमविण्यासाठी आपण जेवढे अॅण्टासिडच्या गोळ्या घेणार तेवढा हा त्रास भविष्यात वाढणार अथवा पुढे जाऊन पित्ताशयात पित्ताचे खडे होणार. म्हणून सततच्या अशा गोळ्या खाणे योग्य नाही. हे वाढलेले पित्त उलटी किंवा जुलाब म्हणजेच वमन किंवा विरेचनाने काढून टाकणे हाच त्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे अजूनही गावाकडे काही लोकांचा रोज सकाळी मोठा आवाज करत पित्त काढण्याचा उपक्रम चालू असतो. पण हेसुद्धा रोज रोज करणे योग्य नव्हे.
वसंत ऋतूमध्ये म्हणजे साधारण मार्च-एप्रिलमध्ये एकदा शास्त्रोक्त वमन घेतल्यास व शरद ऋतूमध्ये म्हणजे साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विरेचन घेतल्यास या पित्ताच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळते. मात्र या पित्ताचा त्रास तात्पुरता कमी करायचा असेल तर प्रथमत: पित्तकारक पदार्थ खाणे टाळा. तसेच घरच्या घरी एक चमचा धणे व एक चमचा जिरे कुटून बारीक करून एक ग्लास कोमट पाण्यात १० मिनिटे भिजत ठेवा व नंतर गाळून प्या. आहारात गाईच्या तुपाचे प्रमाण वाढवा. गुलकंद, मनुके, खडीसाखर असे पदार्थ पित्त वाढल्यास तात्पुरत्या शमनासाठी उपयोगी ठरू शकतात.
लक्षात ठेवा पित्त वाढले की चिडचिड वाढणार, चिडचिड वाढली की काम बिघडणार की मग परत चिडचिड वाढून पित्त वाढणार.
– अॅसिडीटी आणि पित्तावर घरगुती उपाय
नेहमी अॅसिडीटीचा त्रास होण्यार्या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या. रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते. नियमित तुळशीचे सेवन अॅसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.
पित्त-अॅसिडीटीवर घरगुती साधा-सोपा उपाय
पित्ताची किंवा अॅसिडीटीचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच असतो, यावर काही घरगुती आणि सोप उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून अॅसिडीटीवर मात करू शकतो.
मुंबई : पित्ताची किंवा अॅसिडीटीचा त्रास जवळ-जवळ सर्वांनाच असतो, यावर काही घरगुती आणि सोप उपाय आहेत. घरच्या घरीच अगदी सोपे सहज उपाय करून अॅसिडीटीवर मात करू शकतो.
पित्त आणि अॅसिडीटीची मागे अनेक कारण असतात. मात्र पित्त उसळले की पोटातील जळजळ, छातीतील जळजळ, क्वचित कधी उलटी यांनी माणूस हैराण होऊन जातो.
रात्रीची जागरणे, खूप काळ उपाशी राहणे, फास्ट फूडचे सेवन, वेळी अवेळी खाणे, अनियमित दिनचर्या आणि वेदनाशामक गोळ्यांचे सेवन ही पित्त वाढण्याची मुख्य कारणे सांगितली जातात.
अॅसिडीटी आणि पित्तावर घरगुती उपाय
अॅसिडीटी झाली असेल तर काहीही खाल्यानंतर थोडासा गूळ खा.
सकाळी दोन ग्लास कोमट पाणी पिण्याने अॅसिडीटी कमी होते.
खाण्यानंतर लवंग चघळण्यानेही अॅसिडीटीतून आराम मिळतो.
नेहमी अॅसिडीटीचा त्रास होण्यार्या लोकांनी सकाळी उपाशी पोटी साळीच्या लाह्या म्हणजे भाताच्या लाह्या खा आणि त्यावर थोडे पाणी प्या.
रिकाम्या पोटी सकाळी तुळशीची पाने स्वच्छ धवून चघळली तरी पित्त कमी होते.
नियमित तुळशीचे सेवन अॅसिडीटी मूळापासून संपविण्यासाठीही उपयुक्त आहे.
जेवल्यानंतर अर्धा चमचा बडीशोप खाल्यानेही पित्त कमी होते.
तसेच मुळ्यावर लिंबू आणि काळेमीठ घालून खाल्यानेही अॅसिडीटी कमी होते.
मनुका दुधात उकळून ते दूध गार करून पिण्याने चांगला फायदा होतो.
पित्ताच्या उलट्या होत असतील तर, फ्रिजमध्ये साखर घातलेले दूध थंड करा, त्यात बर्फ घालून प्या, उलटया त्वरीत थांबतात.
'पित्ता'वर विजय मिळवा १० घरगुती उपचारांनी !
पित्ताची समस्या दूर करा . घरगुती उपायांनी !
अपुरी झोप, तणावग्रस्त जीवनशैली , अरबट-चरबट फास्ट फूड खाणे अशा एक ना अनेक कारणांनी शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात . तीव्र डोकेदुखी , छातीत जळजळ ,उलट्या होणे ,अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात . मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील 'एन्टासिड्स'(आम्लता नष्ट करणारा अल्कलाइन पदार्थ) ही निष्फळ ठरतात , तेव्हा आजीच्या बटव्यातील हे काही घरगुती उपचार नक्की आजमावून पहा .
केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्ल ( निर्मितीची प्रक्रिया मंदावते . तसेच 'फायबर' शरीराची पचनक्रिया सुलभ करते. फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे अम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. - इतरांसोबत या '10' गोष्टी शेअर करू नका
- पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्याने आराम मिळतो. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो. - शाडूच्या माती व्यतिरिक्त या '5' हटके स्टाईल्सचे इको फ्रेंडली गणपती
फायदेशीर तुळस :
तुळशीमधील एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते.
- तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर ४-५ तुळशीची पाने चावून खा .
अमृतरुपी दुध :
दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरक्त आम्ल दुध खेचून त्याचे अस्तित्व संपवते . थंड दुध प्याल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते.
- दुध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर वा इतर पदार्थ न मिसळता प्यावे . मात्र त्यात चमचा भर साजूक तूप घातल्यास ते हितावह होते.
बहुगुणी बडीशेप:
बडीशेपमधील एन्टी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते . बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते.
- बडीशेपाचे काही दाणे केवळ चघळल्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते. तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास , बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवलेले पाणी प्यायल्याने आराम मिळतो.
पाचक जिरं :
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते , ज्यामुळे पचन सुधारते , मेटाबॉलीझम सुधारते आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात .
- जिऱ्याचे काही दाणे केवळ चघळल्यानेदेखील आराम मिळतो . किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या.
स्वादिष्ट आणि गुणकारी लवंग :
लवंग चवीला तिखट असली तरीही लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते , पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते . लवंगामुळे पोटफुगी व गॅसचे विकार दूर होतात.
- जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून ठेवा , त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या . यारसामुळेच पित्ताची तीव्रता कमी होते. लवंगेमुळे घश्यातील खवखवही कमी होते.
औषधी वेलची:
आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम करते . स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते. पित्ताचा त्रास कमी होतो.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट / सालीशिवाय ) ती पाण्यात टाकून उकळा , हे पाणी थंड झाल्यावर प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळेल .
वातहारक पुदिना :
पुदिना पोटातील आम्लाची तीव्रता कमी करतो . पुदिन्यातील वायूहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते. पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते .
- पित्ताचा त्रास होतअसल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा . थंड झाल्यावर हे पाणी प्या. अपचनावरदेखील पुदिना गुणकारक आहे. पुदिन्यातील 'मेन्थॉल' पचण्यास जड पदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास , डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो.
आलं :
आलं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो . आल्याच्या सेवनाने पचन सुधारते . तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो . आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते.
- पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. तुम्हाला जर आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या . किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावरथोडा गुळ टाकून चुपत रहा.
पित्तशामक आवळा :
तुरट , आंबट चवीचा आवाळा कफ आणि पित्तनाशक असून त्यातील 'व्हिटामिन सी' , अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते .
-रोज चमचाभर आवळ्याची पावडर / चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही .
- कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस (षड्रस) मिळतात.
0
Answer link
पित्त म्हणजे काय?
पित्त (Bile) हे यकृताद्वारे (Liver) तयार होणारे एक पाचक द्रव आहे. हे पित्ताशयात (Gallbladder) साठवले जाते आणि जेव्हा आपण अन्न खातो, तेव्हा ते लहान आतड्यांमध्ये सोडले जाते. पित्तामध्ये पित्त Salts, Cholesterol आणि Bilirubin सारखे पदार्थ असतात, जे चरबी पचनासाठी (Fat Digestion) आवश्यक असतात.
पित्त होण्याची कारणे:
- आहार: तेलकट, मसालेदार आणि जंक फूड जास्त खाणे.
- जीवनशैली: अनियमित जेवण, वेळेवर न झोपणे आणि ताण घेणे.
- पानी कमी पिणे: पुरेसे पानी न पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणे कठीण होते.
- व्यायामाचा अभाव: शारीरिक हालचाल कमी असणे.
- काही वैद्यकीय परिस्थिती: यकृत आणि पित्ताशयाच्या समस्या.
पित्त होऊ नये म्हणून उपाय:
- आहार:
- तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा.
- ताजी फळे, भाज्या आणि धान्ये यांचा आहारात समावेश करा.
- जेवण नियमित वेळेवर करा.
- जीवनशैली:
- पुरेशी झोप घ्या.
- तणाव कमी करण्यासाठी योगा आणि ध्यान करा.
- पानी:
- दिवसभर पुरेसे पानी प्या.
- व्यायाम:
- नियमित व्यायाम करा.
- इतर उपाय:
- धूम्रपान आणि मद्यपान टाळा.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा.
टीप: हा सल्ला केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.