2 उत्तरे
2
answers
गर्भवती स्त्रीचा आहार कसा असावा?
7
Answer link
आई होणार हे कळलं की स्त्रीचा आनंद गगनात मावेनासा होतो. आपण नव्या जीवाला जन्म देणार या भावनेनेच ती सुखावते, पण त्याच आनंदाबरोबर तिने स्वत:च्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज असते. गर्भावस्था हा स्त्रीच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात स्त्रीच्या आरोग्यामध्ये बरेच चढ -उतार होत असतात. पोटात एक नवा जीव वाढत असल्याने गर्भवती स्त्रीने आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते.
गर्भावस्थेदरम्यान स्त्रीने नेमका कशा प्रकारचा आहार घ्यायला हवा, याबाबत बरेच समज आहेत. एखादा पदार्थ खाल्ला तर बाळावर अमूक परिणाम होईल, असे मानले जाते. बर्याच प्रकारच्या भाज्या आणि फळे गर्भवती स्त्रीसाठी वर्ज्य मानली जातात. बाळ जन्माला आल्यानंतर त्याला सर्दी, खोकला होण्याची शक्यता असल्याने गर्भवती स्त्रीला ठरावीक पदार्थ खायला दिले जात नाहीत. बाळाच्या शरीरावर पांढरे डाग निर्माण होण्याच्या शंकेने गर्भवती स्त्रीला मासे खाण्याचीही परवानगी नसते. मात्र, या सर्वांपलीकडे जाऊन स्त्रीचे आणि पोटातील बाळाचे आरोग्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने तिला सकस आणि पौष्टिक आहार देणे गरजेचे असते.
ND
गर्भवती स्त्रीच्या आहारामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असला पाहिजे. गर्भावस्थेच्या शेवटच्या तीन महिन्यांमध्ये लोह आणि फॉलिक अॅसिडची एक गोळी गर्भवती स्त्रीला दररोज देणे आवश्यक असते. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रीच्या आहारात वरण, भात, हिरव्या भाज्या, पोळी आणि फळांचा समावेश असायला हवा. सकाळ-संध्याकाळ स्त्रीने दूध पिण्याची आवश्यकता असते. गर्भस्थ बाळाची वाढ होत असताना गर्भवती स्त्रीने पिरपूर्ण आहार घेण्याची गरज असते. गर्भवती महिलेचे वजन तिच्या नेहमीच्या वजनापेक्षा पुरेसे जास्त असायला हवे, असा सल्ला डॉक्टर देतात. बाळंतपणानंतर नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेऊन महिलेचे वजन पूर्वपदावर येऊ शकते.
0
Answer link
गर्भवती स्त्रीचा आहार संतुलित आणि पौष्टिक असावा. गर्भावस्थेमध्ये स्त्रीला स्वतःसाठी आणि तिच्या गर्भातील बाळासाठी आवश्यक पोषक तत्वे मिळणे आवश्यक आहे. खालील गोष्टी गर्भवती स्त्रीच्या आहारात असाव्यात:
1. प्रथिने (Proteins):
- प्रथिने गर्भाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत.
- डाळ, कडधान्ये, पनीर, अंडी, चिकन आणि मासे यांचा आहारात समावेश असावा.
2. फोलिक ऍसिड (Folic Acid):
- फोलिक ऍसिड बाळाच्या मज्जासंस्थेच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.
- हिरव्या पालेभाज्या, शेंगा आणि फोर्टिफाइड अन्नपदार्थ खावेत.
3. लोह (Iron):
- गर्भावस्थेमध्ये लोहाची गरज वाढते.
- पालक, खजूर, आणि लोहयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
4. कॅल्शियम (Calcium):
- कॅल्शियम हाडे आणि दातांच्या विकासासाठी आवश्यक आहे.
- दूध, दही, पनीर, आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करावे.
5. जीवनसत्त्वे आणि खनिजे (Vitamins and Minerals):
- फळे आणि भाज्यांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
- संत्री, मोसंबी, टोमॅटो, गाजर, आणि इतर रंगीत भाज्यांचा आहारात समावेश असावा.
6. पाणी (Water):
- पुरेसे पाणी पिणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
- दिवसभर पुरेसे पाणी प्यावे.
आहार टाळा:
- मद्यपान आणि धूम्रपान टाळावे.
- कच्चे मांस आणि सी-फूड (Seafood) खाणे टाळावे.
- जास्त साखर आणि तेलकट पदार्थ टाळावेत.
टीप: गर्भवती स्त्रीने डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या आहाराचे नियोजन करावे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या: