अध्यात्म संत इतिहास

संत तुकाराम यांचा जन्म कुठे झाला?

2 उत्तरे
2 answers

संत तुकाराम यांचा जन्म कुठे झाला?

2
संत तुकाराम हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत - कवी होते. त्यांंचा जन्म जन्म देेेहु या गावात झाला. वसंत पंचमीला-माघ शुद्ध पंचमीला झाला. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे तुकारामांचे आराध्यदैवत होते. तुकारामांना वारकरी 'जगद्‌गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.जगद्गुरु तुकाराम लोककवी होते. जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा! देव तेथेची जाणावा! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. वारकरी संप्रदायाची एक अखंड परंपरा त्यांनी निर्माण केली. सतराव्या शतकामध्ये सामाजिक प्रबोधनाचे मुहूर्तमेढ रोवणारे सुधारक संत म्हणून तुकाराम महाराजांचा उल्लेख करावा लागेल. तुकाराम महाराज वास्तववादी निर्भीड आणि वेळप्रसंगी समाजातील दांभिकपणावर रोखठोक शब्दांमध्ये प्रहार करणारे संत होते. महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या काळात अनागोंदी निर्माण झालेली होती. अशा काळामध्ये संत तुकारामांनी समाजाला अचूक मार्गदर्शन करण्याचे काम आपल्या साहित्यातून व कीर्तनांतून केले.
उत्तर लिहिले · 31/3/2021
कर्म · 640
0

संत तुकाराम महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील देहू या गावी झाला.

ते मध्ये जन्मले.

त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा आणि आईचे नाव कनकाई होते.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5160

Related Questions

सर्व संतांच्या प्रार्थनांमधून करुणा तुमच्या शब्दात लिहा?
अंतिम संस्कार पुढील जीवन आणि परिस्थिती कशी निर्धारित करते?
कर्माचा नियम काय?
जीव, जगत, ईश्वर आणि ब्रह्म?
सतत नामस्मरण करावे का?
योगवासिष्ठानुसार मन संकल्पना?
विविध ग्रंथांतील योगाच्या व्याख्या आणि अर्थ स्पष्ट करा.