2 उत्तरे
2 answers

वाचन कसे करावे?

8
वाचन कसे करावे?
मी याच्या उलट प्रश्न विचारतो .( पुस्तके का व कशी वाचावीत)

पुढील जे मी मुद्दे मांडतोय त्याच खरच आपण आत्मपरीक्षण करा.. मी जे मुद्दे मांडले आहेत ते मी खरच स्वानुभवातून सांगतोय मला खात्री आहे तुम्ही याचा लाभ घ्याल नक्की वाचा..प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे..

१) सर्वप्रथम तुम्हाला वाचनाची आवड आहे, हे तुम्हाला मिळालेले एक वरदान आहे असे समजा. कुठलेही पुस्तक वाचण्यास घेताना ते पुस्तक मनपूर्वक वाचून काढा .

२) सुरुवातीला वाचन केवळ आनंद मिळवण्यासाठी करा.

३) येथे कोणाशीही तुलना करत बसू नका. मी एवढी पुस्तके वाचली. माझ्याकडे एवढी पुस्तके आहेत म्हणणारे केवळ लोकांना आपण कोणीतरी विशेष आहोत हे दाखवण्याच प्रयत्न करणारी मंडळी असतात.

४) केवळ हजारो पुस्तके वाचणे हा आपला उद्देश नसावा.

५) मानवी आयुष्य इतके मर्यादित आहे की तुम्ही २४ तास पुस्तके वाचत बसलात तर डोकेच खराब होऊन बसेल.

६) तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला भाराभर वाचन करावयाचे नसून प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारी ज्ञान, माहिती, आनंद, काव्य, आणि मार्गदर्शन देणारी निवडक पुस्तके परिपूर्ण पद्धतीने वाचून स्वतःचे जीवन घडवायचे आहे हे स्वतःशी स्पष्ट करा.

७) पुस्तक हे साधन आहे, साध्य नव्हे. माणूस केवळ एका-मागोमाग पुस्तके आणत जातो व आपला ग्रंथसंग्रह वाढवत नेल्याने त्याच्याच मोहात अडकतो.

८) तुम्ही महिन्यातून १ पुस्तक वाचले तरी चालेल. घड्याळ लावून पुस्तके वाचायला ही कुठली शर्यत थोडीच आहे.. पुस्तकाच्या विषयावरून आपल्याला एका पानासाठी किती वेळ लागतो हे ठरत असते.आपल्या वाचनाचा वेग हा आपल्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो. आपली मनःस्थिती देखील त्यावेळी Matter करते. त्यामुळे पुस्तक वाचण्या अगोदर, "आपण ते शांत चित्ताने वाचू" अशी खात्री असल्याशिवाय वाचनास घेऊ नये. कारण अशा वाचनातून आपल्याला कोणताही लाभ होत नाही.

९) सर्व पुस्तके मजेत व आनंद घेत वाचा पण त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करा. उदा, एका प्रसिद्ध लेखकाचा कथासंग्रह वाचला तर त्यातील कथांचे विषय लेखकाला कसे सुचले असतील, यासाठी लेखकाने काय निरीक्षण केले असेल, यात शब्द- अलंकार- यांचा वापर कसा केला आहे, या कथा आपल्याला का आवडल्या, हा लेखक इतका लोकप्रिय का, पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या अशी पुस्तकाची झाडाझडती घ्या. याला पुस्तकाचा सर्वांगाने अनुभव घेणे म्हणतात. पुस्तकांची केवळ संख्या वाढवण्याच्या शर्यतीत असणाऱ्यांना याचा गंधही नसतो.

१०) ज्या विषयात तुम्हाला गोडी आहे, तुम्ही वाचताना देहभान हरपून जाता, तीच पुस्तके तुम्ही वाचत राहा. फक्त एक करा की पुस्तक वाचून झाल्यावर त्यातील तुम्हाला आवडलेले १० मुद्दे एका वहीत टिपून ठेवा.

११) मध्ये-मध्ये थांबून मी जे वाचन करतोय त्याने माझ्या जीवनाचा दर्जा, विचार करण्याची पातळी, प्रत्यक्ष यात काही बदल होत आहेत का याचा शांत बसून विचार करा.

१२) वाचन ही विकासाची केवळ पहिली पायरी आहे. मनन, चिंतन, विश्लेषण, अनुभावन, या पायऱ्या पुढेच आहेत.

१३) बहुतांशी लोक वाचनाच्या पहिल्याच पायरीवर अडकून बसतात व आयुष्यभर ग्रंथसंग्रह व शब्दसंग्रह करत राहतात. हे शाब्दिक ज्ञान एवढे वाढत जाते की आपण खरोखरच ज्ञानी असल्याचा अहंकार वाढत जातो पण प्रत्यक्ष आचरणशून्य जीवन जगत राहतात.

१४) मी वाचन का करतो आहे याविषयी सावध राहा. एकाने एखादे पुस्तक वाचले तर मी ते वाचलेच पाहिजे असे काही नाही. तुम्हाला तो विषय आतून पटला तरच वाचा.

मी आशा करतो जे मुद्दे मी मांडले आहेत ते आपल्याला पटतील.

धन्यवाद…
उत्तर लिहिले · 28/12/2020
कर्म · 34255
0

वाचन (Reading) एक कला आहे आणि ती सुधारण्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे:

  1. नियमित वाचन: नियमितपणे वाचा. दिवसातून थोडा वेळ ठरवून वाचन करा.
  2. विषयांची निवड: तुम्हाला आवडणाऱ्या विषयांची पुस्तके निवडा. आवडत्या विषयात वाचन केल्यानेMinवाचावयास अधिक आनंद येतो.
  3. लक्ष केंद्रित करा: वाचताना पूर्ण लक्ष केंद्रित करा. distractions टाळा.
  4. समजून वाचा: फक्त वाचू नका, तर ते समजून घ्या. महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा.
  5. शब्दसंग्रह वाढवा: नवीन शब्द शिका आणि त्यांचा अर्थ समजून घ्या. शब्दसंग्रह वाढवण्यासाठी शब्दकोश वापरा.
  6. नोट्स घ्या: वाचताना महत्त्वाचे मुद्दे आणि विचार नोट करून घ्या.
  7. प्रश्न विचारा: वाचताना मनात प्रश्न निर्माण होऊ द्या आणि त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा.
  8. उद्देश ठेवा: वाचनाचा एक विशिष्ट उद्देश असावा, जसे की ज्ञान मिळवणे किंवा मनोरंजन करणे.
  9. विविध प्रकारचे वाचन: कथा, लेख, कविता, आणि वर्तमानपत्रे अशा विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन करा.
  10. पुनरावलोकन करा: वाचलेल्या भागाचे वेळोवेळी पुनरावलोकन करा.

या उपायांमुळे तुम्हाला वाचनाची सवय लागेल आणि तुमची वाचन कौशल्ये सुधारतील.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1660

Related Questions

वाचन कौशल्य म्हणजे काय, स्पष्ट करा?
एका चौथीच्या वर्गात पंचवीस पैकी पंधरा विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण वाचन करता येत नाही. अशा परिस्थितीत काय करावे?
वाचनासंबंधी कोणती कौशल्ये असतात ते स्पष्ट करा?
रीडिंग कशी करावी, वाचन कसे करावे?
मराठी वाचनातील अडचणी कोणत्या?
वाचन कौशल्य म्हणजे काय?
मराठी वाचन कसे शिकवावे?