2 उत्तरे
2
answers
रीडिंग कशी करावी, वाचन कसे करावे?
1
Answer link
डोळ्यांनी दिसतं आहे तो पर्यत वाचत राहायचं,जे वाक्य समजलं नाही ते परत वाचायचं,
वाचलेलं अक्षरशः जगायचं,पुस्तकातील पात्राला स्वतःशीच रिलेट करायचं, जणू तो पात्र आपणच आहोत,पुस्तकातील सुखा दुःखाच्या प्रसंगात आपण सुद्धा सहभागी व्हायचं.पुस्तक वाचणे म्हणजे एका भन्नाट अफलातून प्रवासाला जाणे होय त्यामुळे आपण ज्याप्रकारे एखाद्या प्रवासात इतर ठिकाणाचा अनुभव घेतो तसंच अनुभव पुस्तकात घेत राहायचं.ज्याकाळातील आपण पुस्तक वाचतोय मनाने त्या काळात जाऊन यायचं जणू आपण त्याकाळात वावरतोय अशी भावना मनात आणायची.आपल्या कल्पनेने पुस्तकातील तो विश्व आपल्या आजूबाजूला निर्माण करायचं,पुस्तक वाचत असताना पूर्णपणे त्यामध्ये हरवून जायचं,आजूबाजूचं भान विसरून वाचत राहायचं.वाचताना कोणताही पूर्वग्रह मनात ठेवायचं नाही त्या पुस्तकातून जास्तीत जास्त चांगलं काय घेता येईल हे बघायचं.
वाचन झाल्यानंतर त्यावर विचार करायचं, आपण वाचलेलं इतरांना सांगायचं,समाजाशी रिलेट करायचं आणि वाचलेलं,समजलेलं ते ते समाजात शोधायचं प्रयत्न करायचं..

हँगओव्हर पुस्तक:
नवीन पुस्तक सुरू करण्यात अक्षमता कारण तुम्ही अजूनही शेवटच्या पुस्तकाच्या जगात राहत आहात.
याप्रकारे वाचन मी करत असते तुम्ही सुद्धा एकदा करून बघा वाचनाचा जबरदस्त आनंद येईल...
0
Answer link
रीडिंग (Reading) म्हणजेच वाचन करणे एक कला आहे.Effective वाचन करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी:
- योग्य जागा निवडा: वाचनासाठी शांत आणि आरामदायक जागा निवडा.
- लक्ष केंद्रित करा: वाचताना इतर विचारांमध्ये लक्ष भटकू देऊ नका.
- समजून वाचा: फक्त शब्द वाचू नका, तर त्या शब्दांचा अर्थ समजून घ्या.
- नोंद घ्या: महत्वाचे मुद्दे किंवा विचार Notebook मध्ये नोंदवा.
- प्रश्न विचारा: वाचताना मनात प्रश्न निर्माण झाले तर त्यांची उत्तरे शोधा.
- उद्देश ठरवा: वाचनाचा उद्देश काय आहे ते निश्चित करा, जसे की माहिती मिळवणे, मनोरंजन करणे किंवा अभ्यास करणे.
- वेळेचे नियोजन: वाचनासाठी नियमित वेळ बाजूला काढा.
- सराव: नियमित वाचन केल्याने वाचनाची गती आणि आकलन सुधारते.
ॲप्स आणि वेबसाईट: *Pratilipi(प्रतिलिपि):* भारतीय भाषांमधील पुस्तके आणि लेख वाचण्यासाठी हे ॲप खूप उपयुक्त आहे. Pratilipi ॲप डाउनलोड करा.
*StoryMirror:* विविध विषयांवरील कथा, कविता आणि लेख वाचण्यासाठी हे एक चांगले व्यासपीठ आहे. StoryMirror वेबसाईटला भेट द्या.
पुस्तके: *''वाचू आनंदे'' (Vachu Anande)* - Narhar Kurundkar (नरहर कुरुंदकर)