Topic icon

वाचन कौशल्ये

0

वाचन कौशल्य:

वाचन कौशल्य म्हणजे एखाद्या व्यक्तीला कोणताही मजकूर वाचून तो समजून घेण्याची क्षमता असणे. ह्यामध्ये केवळ शब्द वाचणे नव्हे, तर त्या शब्दांचा अर्थ लावणे, त्यातील विचार आणि कल्पना समजून घेणे, आणि त्या माहितीचा उपयोग करणे अपेक्षित आहे.

वाचन कौशल्याचे घटक:

  • अक्षरज्ञान: अक्षरे आणि शब्द ओळखण्याची क्षमता.
  • आकलन: वाचलेल्या मजकुराचा अर्थ समजून घेणे.
  • अर्थबोध: वाक्यांमधील संबंध आणि कल्पना समजून घेणे.
  • विश्लेषण: माहितीचे विश्लेषण करण्याची क्षमता.
  • मूल्यांकन: वाचलेल्या माहितीचे मूल्यमापन करण्याची क्षमता.

वाचन कौशल्ये विकसित करण्याचे फायदे:

  • ज्ञान आणि माहितीमध्ये वाढ.
  • समस्या निराकरण करण्याची क्षमता वाढते.
  • सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती वाढते.
  • चांगले संवाद कौशल्य विकसित होते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1660
2
एका चौथीच्या वर्गात पंचवीसपैकी पंधरा विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण वाचन करता येत नाही, तर काय करावे?
उत्तर लिहिले · 21/7/2022
कर्म · 40
0

वाचनासंबंधी कौशल्ये:

वाचन ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे ज्यामध्ये अनेक कौशल्ये एकत्रितपणे काम करतात. येथे काही प्रमुख वाचन कौशल्ये स्पष्ट केली आहेत:

  1. अक्षरज्ञान (Phonological Awareness):

    अक्षरांचे आवाज आणि शब्दांचे भाग ओळखण्याची क्षमता.

  2. शब्द ओळख (Decoding):

    अक्षरांच्या आवाजावरून शब्द वाचण्याची क्षमता.

  3. ओघ (Fluency):

    अचूक, जलद आणि योग्य हावभावांसह वाचण्याची क्षमता.

  4. शब्दसंग्रह (Vocabulary):

    शब्दांचा अर्थ समजून घेण्याची क्षमता.

  5. आकलन (Comprehension):

    वाचलेल्या मजकुराचा अर्थ लावण्याची आणि समजून घेण्याची क्षमता.

  6. विश्लेषणात्मक वाचन (Analytical Reading):

    मजकुराचे विश्लेषण करून त्यातील मुख्य कल्पना, युक्तिवाद आणि निष्कर्ष समजून घेण्याची क्षमता.

  7. तुलनात्मक वाचन (Comparative Reading):

    दोन किंवा अधिक मजकुरांची तुलना करून त्यातील समानता आणि फरक ओळखण्याची क्षमता.

  8. संदर्भानुसार अर्थ लावणे:

    वाक्यातील संदर्भानुसार शब्दांचा अर्थ लावण्याची क्षमता.

  9. सारांश (Summarization):

    मजकुराचा संक्षिप्त आणि अर्थपूर्ण सारांश देण्याची क्षमता.

ही कौशल्ये एकमेकांशी जोडलेली आहेत आणि एक चांगले वाचक बनण्यासाठी आवश्यक आहेत.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1660
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
1
 डोळ्यांनी दिसतं आहे तो पर्यत वाचत राहायचं,जे वाक्य समजलं नाही ते परत वाचायचं,

वाचलेलं अक्षरशः जगायचं,पुस्तकातील पात्राला स्वतःशीच रिलेट करायचं, जणू तो पात्र आपणच आहोत,पुस्तकातील सुखा दुःखाच्या प्रसंगात आपण सुद्धा सहभागी व्हायचं.पुस्तक वाचणे म्हणजे एका भन्नाट अफलातून प्रवासाला जाणे होय त्यामुळे आपण ज्याप्रकारे एखाद्या प्रवासात इतर ठिकाणाचा अनुभव घेतो तसंच अनुभव पुस्तकात घेत राहायचं.ज्याकाळातील आपण पुस्तक वाचतोय मनाने त्या काळात जाऊन यायचं जणू आपण त्याकाळात वावरतोय अशी भावना मनात आणायची.आपल्या कल्पनेने पुस्तकातील तो विश्व आपल्या आजूबाजूला निर्माण करायचं,पुस्तक वाचत असताना पूर्णपणे त्यामध्ये हरवून जायचं,आजूबाजूचं भान विसरून वाचत राहायचं.वाचताना कोणताही पूर्वग्रह मनात ठेवायचं नाही त्या पुस्तकातून जास्तीत जास्त चांगलं काय घेता येईल हे बघायचं.

वाचन झाल्यानंतर त्यावर विचार करायचं, आपण वाचलेलं इतरांना सांगायचं,समाजाशी रिलेट करायचं आणि वाचलेलं,समजलेलं ते ते समाजात शोधायचं प्रयत्न करायचं..
हँगओव्हर पुस्तक:

नवीन पुस्तक सुरू करण्यात अक्षमता कारण तुम्ही अजूनही शेवटच्या पुस्तकाच्या जगात राहत आहात.

याप्रकारे वाचन मी करत असते  तुम्ही सुद्धा एकदा करून बघा वाचनाचा जबरदस्त आनंद येईल...
उत्तर लिहिले · 20/12/2021
कर्म · 121765
8
वाचन कसे करावे?
मी याच्या उलट प्रश्न विचारतो .( पुस्तके का व कशी वाचावीत)

पुढील जे मी मुद्दे मांडतोय त्याच खरच आपण आत्मपरीक्षण करा.. मी जे मुद्दे मांडले आहेत ते मी खरच स्वानुभवातून सांगतोय मला खात्री आहे तुम्ही याचा लाभ घ्याल नक्की वाचा..प्रश्नाचे उत्तर पुढील प्रमाणे..

१) सर्वप्रथम तुम्हाला वाचनाची आवड आहे, हे तुम्हाला मिळालेले एक वरदान आहे असे समजा. कुठलेही पुस्तक वाचण्यास घेताना ते पुस्तक मनपूर्वक वाचून काढा .

२) सुरुवातीला वाचन केवळ आनंद मिळवण्यासाठी करा.

३) येथे कोणाशीही तुलना करत बसू नका. मी एवढी पुस्तके वाचली. माझ्याकडे एवढी पुस्तके आहेत म्हणणारे केवळ लोकांना आपण कोणीतरी विशेष आहोत हे दाखवण्याच प्रयत्न करणारी मंडळी असतात.

४) केवळ हजारो पुस्तके वाचणे हा आपला उद्देश नसावा.

५) मानवी आयुष्य इतके मर्यादित आहे की तुम्ही २४ तास पुस्तके वाचत बसलात तर डोकेच खराब होऊन बसेल.

६) तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला भाराभर वाचन करावयाचे नसून प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारी ज्ञान, माहिती, आनंद, काव्य, आणि मार्गदर्शन देणारी निवडक पुस्तके परिपूर्ण पद्धतीने वाचून स्वतःचे जीवन घडवायचे आहे हे स्वतःशी स्पष्ट करा.

७) पुस्तक हे साधन आहे, साध्य नव्हे. माणूस केवळ एका-मागोमाग पुस्तके आणत जातो व आपला ग्रंथसंग्रह वाढवत नेल्याने त्याच्याच मोहात अडकतो.

८) तुम्ही महिन्यातून १ पुस्तक वाचले तरी चालेल. घड्याळ लावून पुस्तके वाचायला ही कुठली शर्यत थोडीच आहे.. पुस्तकाच्या विषयावरून आपल्याला एका पानासाठी किती वेळ लागतो हे ठरत असते.आपल्या वाचनाचा वेग हा आपल्या सभोवतालच्या वातावरणावर अवलंबून असतो. आपली मनःस्थिती देखील त्यावेळी Matter करते. त्यामुळे पुस्तक वाचण्या अगोदर, "आपण ते शांत चित्ताने वाचू" अशी खात्री असल्याशिवाय वाचनास घेऊ नये. कारण अशा वाचनातून आपल्याला कोणताही लाभ होत नाही.

९) सर्व पुस्तके मजेत व आनंद घेत वाचा पण त्याचा सर्व बाजूंनी अभ्यास करा. उदा, एका प्रसिद्ध लेखकाचा कथासंग्रह वाचला तर त्यातील कथांचे विषय लेखकाला कसे सुचले असतील, यासाठी लेखकाने काय निरीक्षण केले असेल, यात शब्द- अलंकार- यांचा वापर कसा केला आहे, या कथा आपल्याला का आवडल्या, हा लेखक इतका लोकप्रिय का, पुस्तकाच्या किती आवृत्त्या निघाल्या अशी पुस्तकाची झाडाझडती घ्या. याला पुस्तकाचा सर्वांगाने अनुभव घेणे म्हणतात. पुस्तकांची केवळ संख्या वाढवण्याच्या शर्यतीत असणाऱ्यांना याचा गंधही नसतो.

१०) ज्या विषयात तुम्हाला गोडी आहे, तुम्ही वाचताना देहभान हरपून जाता, तीच पुस्तके तुम्ही वाचत राहा. फक्त एक करा की पुस्तक वाचून झाल्यावर त्यातील तुम्हाला आवडलेले १० मुद्दे एका वहीत टिपून ठेवा.

११) मध्ये-मध्ये थांबून मी जे वाचन करतोय त्याने माझ्या जीवनाचा दर्जा, विचार करण्याची पातळी, प्रत्यक्ष यात काही बदल होत आहेत का याचा शांत बसून विचार करा.

१२) वाचन ही विकासाची केवळ पहिली पायरी आहे. मनन, चिंतन, विश्लेषण, अनुभावन, या पायऱ्या पुढेच आहेत.

१३) बहुतांशी लोक वाचनाच्या पहिल्याच पायरीवर अडकून बसतात व आयुष्यभर ग्रंथसंग्रह व शब्दसंग्रह करत राहतात. हे शाब्दिक ज्ञान एवढे वाढत जाते की आपण खरोखरच ज्ञानी असल्याचा अहंकार वाढत जातो पण प्रत्यक्ष आचरणशून्य जीवन जगत राहतात.

१४) मी वाचन का करतो आहे याविषयी सावध राहा. एकाने एखादे पुस्तक वाचले तर मी ते वाचलेच पाहिजे असे काही नाही. तुम्हाला तो विषय आतून पटला तरच वाचा.

मी आशा करतो जे मुद्दे मी मांडले आहेत ते आपल्याला पटतील.

धन्यवाद…
उत्तर लिहिले · 28/12/2020
कर्म · 34255
1
जोडाक्षरी शब्द, अनुस्वार-विसर्ग, ऱ्हस्व-दीर्घ, यांचा स्पष्ट आणि खणखणीत उच्चार, हे सर्व बघत बघत वाचनाची लय जपावी लागते. इंग्रजी प्रमाणे सरळधोपटपणा मराठीत चालत नाही. 'ळ' चा 'ल' असा उच्चार करून चालत नाही.
उत्तर लिहिले · 16/9/2019
कर्म · 10370