4 उत्तरे
4
answers
मराठी वाचन कसे शिकवावे?
17
Answer link
ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते-
1. वाचन पुर्वतयारी
2. अक्षर ओळख
3. स्वरचिन्हे ओळख
4. जोडशब्द ओळख
5. वाक्यवाचन
6. परिच्छेद वाचन
7. आकलन
अक्षर ओळख
या टप्प्यात खालील प्रकारे अक्षर परिचय व त्याचे दृढीकरण करुन द्यावे.
1.चित्राआधारे शब्दाचे अंदाजे वाचन करणे.
2. चित्राशिवाय शब्दाचे सरावाने वाचन करणे.
[कमीत कमी ८ दिवस सराव आवश्यक, विविध पध्दतींचा अवलंब]
3. परिचीत शब्दाचे सावकाशपणे वाचन करणे.
[४ दिवसात सरावाने वाचन]
4. त्या शब्दातील प्रत्येक अक्षर सुटे करुन वाचणे.
[पुढील ५-६ दिवस]
5. अक्षराच्या आकारातील साम्यभेद ओळखून मुळ अक्षराचे अंदाजाने वाचन करणे.
[किमान ८ दिवस सराव आवश्यक]
यासाठी खालील उपक्रम राबविता येतील.
वर्गातील प्रत्येक मुलाला स्वतःचे नाव खुप आवडते व ते ७-८ दिवसात त्याच्या नाम पट्यावरील प्रत्येक अक्षर वेगवेगळे करुन वाचते. ते त्याला हाताळण्यास व वाचण्यास प्रोत्साहन द्या. नंतर त्याच्या जिवलग मित्रांच्या नामपट्यातील अक्षरे सुटे वाचण्याचा सराव व नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या वाचनाचा सराव घेणे. अवघड वाटणारे नाव टाळावे.
यानंतर वर्गातील वस्तूंच्या नाम पट्ट्यांचा सराव घ्या. वस्तूंना अडकावलेल्या शब्दातील सोप्या अक्षराचे वाचन करण्यास प्रोत्साहीत करा.
यानंतर परिचीत व आवडणारे शब्दपट्या हाताळण्यास देऊन त्यातील अक्षराचे वाचन घ्यावे.
आता प्रत्येक मुळाक्षराची अक्षरकार्डांची २-३ संच बनवावीत.व ती हाताळण्यास आणि वाचनास द्यावीत. एकाच मुळाक्षरांच्या दोन अक्षर कार्डे शोधणे. त्यांचे वाचन करणे.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वातील सहज सोपे भासणारेच शब्द घ्यावेत.या टप्प्यात आपणास फक्त मुळाअक्षरओळख शिकवायची असल्याने त्याला अवघड वाटणारा शब्द नको. शब्दातील अक्षर वाचन करताना त्याच्या स्वरचिन्ह वाचनाकडे लक्ष देऊ नये. फक्त मुळाक्षर वाचनच घ्यावे.
उदा- “शाळा” शब्द वाचताना पहिल्या अक्षरसास ‘श’ म्हटले की ‘शा’ हे पाहू नका. या टप्यात हे दोन्ही बरोबरच.
6. अक्षराचे दृढीकरण.
वरील प्रत्येक टप्यात आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात.
उदा- [खालील उदाहरणे याप्रमाणे अनेक उपक्रम घेता येतात.]
अक्षर कार्डांच्या मदतीने अक्षर कार्ड व शब्दाशी जुळवणे.
उदा- “शाळा” या शब्दकार्डाशी जुळविण्यासाठी ‘श’ व ‘ळ’ अक्षरकार्डे शोधून ती त्याखाली मांडणे व वाचन करणे. या ठिकाणी प्रथम तो ‘श’ ‘ळ’ अक्षरकार्डास ‘शाळा’ असेच वाचण्याची शक्यता असते. त्यास येथे थांबवू नका. चूक सांगू नका. काही दिवसाच्या सरावानंतर इतरांचे अनुकरण करत तो आपोआप त्यास ‘श’ व ‘ळ’ म्हणू लागेल. असे नाही घडल्यास त्यास नंतर ‘श’ व ‘ळ’ असे वाचण्यास प्रोत्साहित करा.
चित्रकार्डाशी अक्षरकार्डाच्या जोड्या लावणे.
यात एक अक्षरकार्ड देऊन त्याचे वाचन करणे.
-अक्षरापासून सुरु होणारे चित्रकार्डे शोधणे.
-अक्षराने शेवट होणारे चित्रकार्डे शोधून काढणे.
-अक्षर मध्ये असणारे चित्रकार्डे शोधणे.
अक्षराचे मोठे आकार वर्गात काढा. व त्यावर विविध वस्तू [चिंचोके, दगड, फुले,इ.] ठेऊन आकार पुर्ण करणे.
शिक्षकाने हवेत अक्षराचे आकार काढणे व विद्यार्थ्यांनी ओळखणे, नंतर स्वतः अक्षर सांगणे व विद्यार्थ्यांना त्याचे हवेतील आकार काढण्यास सांगणे. दोन विद्यार्थी किंवा गटामध्येही असा सराव घेता येतो.
पाटीवर/जमीनीवर माती/वाळू पसरणे व त्यावरील अक्षराचा आकार ओळखणे. नंतर तसे आकार बोटाने काढण्याचा सराव घेणे.
अक्षरकार्डे जोडून शब्द [फक्त स्वरचिन्ह विरहीत शब्द] बनविणे व त्याचे वाचन. यात विद्यार्थी प्रथम अर्थहीन शब्द बनवतील व वाचतील, हळूहळू अर्थपुर्ण शब्द बनविण्यास प्रोत्साहन देणे.
असे अनेक चित्र-शब्द खेळ/उपक्रम घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही.
वरील टप्यांचा उपयोग करताना घाई करु नये. एखाद्या टप्यात घाई झाल्यास विद्यार्थी त्यापुढील टप्यात गोंधळतात. याठिकाणी एकही अपरिचित शब्द नको.
पुरेसा सराव व विविध पध्दतीचा अवलंब जेणेकरुन मुले कंटाळणार नाहीत व उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील.
7. हळूहळू शब्दवाचनासोबत वाक्यवाचन सुरु करावे.
उदा- ‘मगर’ ही शब्दपट्टी आहे. शब्दाचे वाचन करुन नंतर त्या शब्दापासून वाक्य बनविण्याचा सराव घेणे.
-ही मगर आहे.
-मगर मोठी आहे. इ.
8. प्रत्यक्ष शब्दवाचनाचा सराव सुरु झाल्यानंतर सुरुवातीस परिचीत व नंतर अपरिचित शब्दवाचनाकडे जावे. [मुर्ताकडून अमुर्ताकडे]
9. ‘अक्षरओळख’ या टप्प्यात किमान २५-३० अक्षरांचे वाचन मुले करु लागली की शिल्लक अक्षरांचा सराव घ्यावा.परंतु त्याच अक्षरांच्या ओळखीमध्येच न अडकता आपला पुढील टप्पा “स्वरचिन्ह ओळख” सुरु करावा. हळूहळू स्वरचिन्हासह वाचनात मुले इतर अक्षरे वाचन करण्यास शिकतात.
1. वाचन पुर्वतयारी
2. अक्षर ओळख
3. स्वरचिन्हे ओळख
4. जोडशब्द ओळख
5. वाक्यवाचन
6. परिच्छेद वाचन
7. आकलन
अक्षर ओळख
या टप्प्यात खालील प्रकारे अक्षर परिचय व त्याचे दृढीकरण करुन द्यावे.
1.चित्राआधारे शब्दाचे अंदाजे वाचन करणे.
2. चित्राशिवाय शब्दाचे सरावाने वाचन करणे.
[कमीत कमी ८ दिवस सराव आवश्यक, विविध पध्दतींचा अवलंब]
3. परिचीत शब्दाचे सावकाशपणे वाचन करणे.
[४ दिवसात सरावाने वाचन]
4. त्या शब्दातील प्रत्येक अक्षर सुटे करुन वाचणे.
[पुढील ५-६ दिवस]
5. अक्षराच्या आकारातील साम्यभेद ओळखून मुळ अक्षराचे अंदाजाने वाचन करणे.
[किमान ८ दिवस सराव आवश्यक]
यासाठी खालील उपक्रम राबविता येतील.
वर्गातील प्रत्येक मुलाला स्वतःचे नाव खुप आवडते व ते ७-८ दिवसात त्याच्या नाम पट्यावरील प्रत्येक अक्षर वेगवेगळे करुन वाचते. ते त्याला हाताळण्यास व वाचण्यास प्रोत्साहन द्या. नंतर त्याच्या जिवलग मित्रांच्या नामपट्यातील अक्षरे सुटे वाचण्याचा सराव व नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या वाचनाचा सराव घेणे. अवघड वाटणारे नाव टाळावे.
यानंतर वर्गातील वस्तूंच्या नाम पट्ट्यांचा सराव घ्या. वस्तूंना अडकावलेल्या शब्दातील सोप्या अक्षराचे वाचन करण्यास प्रोत्साहीत करा.
यानंतर परिचीत व आवडणारे शब्दपट्या हाताळण्यास देऊन त्यातील अक्षराचे वाचन घ्यावे.
आता प्रत्येक मुळाक्षराची अक्षरकार्डांची २-३ संच बनवावीत.व ती हाताळण्यास आणि वाचनास द्यावीत. एकाच मुळाक्षरांच्या दोन अक्षर कार्डे शोधणे. त्यांचे वाचन करणे.
विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वातील सहज सोपे भासणारेच शब्द घ्यावेत.या टप्प्यात आपणास फक्त मुळाअक्षरओळख शिकवायची असल्याने त्याला अवघड वाटणारा शब्द नको. शब्दातील अक्षर वाचन करताना त्याच्या स्वरचिन्ह वाचनाकडे लक्ष देऊ नये. फक्त मुळाक्षर वाचनच घ्यावे.
उदा- “शाळा” शब्द वाचताना पहिल्या अक्षरसास ‘श’ म्हटले की ‘शा’ हे पाहू नका. या टप्यात हे दोन्ही बरोबरच.
6. अक्षराचे दृढीकरण.
वरील प्रत्येक टप्यात आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात.
उदा- [खालील उदाहरणे याप्रमाणे अनेक उपक्रम घेता येतात.]
अक्षर कार्डांच्या मदतीने अक्षर कार्ड व शब्दाशी जुळवणे.
उदा- “शाळा” या शब्दकार्डाशी जुळविण्यासाठी ‘श’ व ‘ळ’ अक्षरकार्डे शोधून ती त्याखाली मांडणे व वाचन करणे. या ठिकाणी प्रथम तो ‘श’ ‘ळ’ अक्षरकार्डास ‘शाळा’ असेच वाचण्याची शक्यता असते. त्यास येथे थांबवू नका. चूक सांगू नका. काही दिवसाच्या सरावानंतर इतरांचे अनुकरण करत तो आपोआप त्यास ‘श’ व ‘ळ’ म्हणू लागेल. असे नाही घडल्यास त्यास नंतर ‘श’ व ‘ळ’ असे वाचण्यास प्रोत्साहित करा.
चित्रकार्डाशी अक्षरकार्डाच्या जोड्या लावणे.
यात एक अक्षरकार्ड देऊन त्याचे वाचन करणे.
-अक्षरापासून सुरु होणारे चित्रकार्डे शोधणे.
-अक्षराने शेवट होणारे चित्रकार्डे शोधून काढणे.
-अक्षर मध्ये असणारे चित्रकार्डे शोधणे.
अक्षराचे मोठे आकार वर्गात काढा. व त्यावर विविध वस्तू [चिंचोके, दगड, फुले,इ.] ठेऊन आकार पुर्ण करणे.
शिक्षकाने हवेत अक्षराचे आकार काढणे व विद्यार्थ्यांनी ओळखणे, नंतर स्वतः अक्षर सांगणे व विद्यार्थ्यांना त्याचे हवेतील आकार काढण्यास सांगणे. दोन विद्यार्थी किंवा गटामध्येही असा सराव घेता येतो.
पाटीवर/जमीनीवर माती/वाळू पसरणे व त्यावरील अक्षराचा आकार ओळखणे. नंतर तसे आकार बोटाने काढण्याचा सराव घेणे.
अक्षरकार्डे जोडून शब्द [फक्त स्वरचिन्ह विरहीत शब्द] बनविणे व त्याचे वाचन. यात विद्यार्थी प्रथम अर्थहीन शब्द बनवतील व वाचतील, हळूहळू अर्थपुर्ण शब्द बनविण्यास प्रोत्साहन देणे.
असे अनेक चित्र-शब्द खेळ/उपक्रम घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही.
वरील टप्यांचा उपयोग करताना घाई करु नये. एखाद्या टप्यात घाई झाल्यास विद्यार्थी त्यापुढील टप्यात गोंधळतात. याठिकाणी एकही अपरिचित शब्द नको.
पुरेसा सराव व विविध पध्दतीचा अवलंब जेणेकरुन मुले कंटाळणार नाहीत व उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील.
7. हळूहळू शब्दवाचनासोबत वाक्यवाचन सुरु करावे.
उदा- ‘मगर’ ही शब्दपट्टी आहे. शब्दाचे वाचन करुन नंतर त्या शब्दापासून वाक्य बनविण्याचा सराव घेणे.
-ही मगर आहे.
-मगर मोठी आहे. इ.
8. प्रत्यक्ष शब्दवाचनाचा सराव सुरु झाल्यानंतर सुरुवातीस परिचीत व नंतर अपरिचित शब्दवाचनाकडे जावे. [मुर्ताकडून अमुर्ताकडे]
9. ‘अक्षरओळख’ या टप्प्यात किमान २५-३० अक्षरांचे वाचन मुले करु लागली की शिल्लक अक्षरांचा सराव घ्यावा.परंतु त्याच अक्षरांच्या ओळखीमध्येच न अडकता आपला पुढील टप्पा “स्वरचिन्ह ओळख” सुरु करावा. हळूहळू स्वरचिन्हासह वाचनात मुले इतर अक्षरे वाचन करण्यास शिकतात.
2
Answer link
अनेक वाचकांना हा प्रश्न हास्यास्पद वाटेल. ते म्हणतील, ‘‘आम्ही नाही का शिकलो? ना आम्हाला कधी हा प्रश्न पडला ना आमच्या घरातल्या इतरांना.’’ अगदी खरं आहे. नाहीतरी न्यूटनपूर्वी अनेकजणांना ‘झाडावरचे फळ खाली का पडते?’ असा प्रश्न कधी पडलाच नव्हता! ज्यांना तो पडला होता, त्यांनी त्याचा न्यूटनसारखा पाठपुरावा केला नव्हता. म्हणून फक्त न्यूटनलाच गुरुत्वाकर्षणाचे नियम शोधून काढता आले.
‘वाचनाची सुरुवात कशी करावी?’, ‘निरर्थक अक्षरे मुलांनी कशी लक्षात ठेवावीत?’, ‘कमी वेळात मुलांना अधिक वेगाने का व कसे वाचायला शिकवावे?’, ‘वाचनाची प्रक्रिया नेमकी आहे तरी काय?’, ‘शाळा महाविद्यालयातून बाहेर पडल्यावर बहुसंख्य मुले, तरुण, प्रौढ, वाचन करायचा कंटाळा का करतात?’ हे आणि यासारखे प्रश्नदेखील फक्त काहीजणांनाच पडले होते, आणि त्यांनीदेखील शास्त्रज्ञांच्या ‘भावनिक अस्वस्थते’ने, अदम्य चिकाटीने आणि चिकित्सक बुद्धीने वर्षानुवर्षे शोध घेऊन त्या प्रश्नांची उत्तरे शोधून काढली आहेत. मराठी भाषेच्या संदर्भात आचार्य अत्रे, गुंजीकर, अत्तरदे इत्यादींची नावे घेता येतील.
१९व्या शतकापासून अमेरिकेत आणि २०व्या शतकाच्या पूर्वार्धापासून आपल्या देशात वाचनाच्या क्षेत्रात झालेल्या या संशोधनांचा परिचय आपण आजच्या युगात करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आजचे युग हे ‘ज्ञानयुग’ आहे. जो ज्ञानी असेल तोच या युगात जगायला पात्र ठरेल. कारण रोजचा व्यवहार असो, शेती उत्पादन असो, राजकारण असो, संरक्षणाचे क्षेत्र असो अथवा आंतरराष्ट्रीय संबंध असोत, त्या त्या क्षेत्रांतील ज्ञान हे अतिशय वेगाने वाढते आहे. इ.स. १९८० ते २००० या काळात असे म्हणत असत की दर पाच वर्षांनी जगातील ज्ञान दुप्पट होतेय. हा वेग आजच्या काळात आणखी वाढला आहे. हे ज्ञान कमीतकमी वेळात आत्मसात करण्याची नवनवीन कौशल्ये प्राप्त केली नाहीत तर आज मनुष्य ‘मागासलेला’ ठरून व्यवस्थेबाहेर फेकला जातोय. मग तो शेतकरी असो, छोटा व्यावसायिक असो, कार्यालयीन कारकून असो, नाहीतर संरक्षणदलातील अधिकारी असो ! आपली अवस्था अशी होऊ नये यासाठी शहाणी माणसे स्वतःचे ज्ञान वाढविण्याचा सतत प्रयत्न करताना दिसतात.
आता ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या पद्धतीतही सुधारणा झाल्या आहेत. नवनवीन दृक्श्राव्यसाधने आल्येत, दूरस्थ शिक्षणाच्या सोयी झाल्यात. या साधनासुविधांच्या आधारे झालेले शिक्षण टिकवायचे असेल, वाढवायचे असेल तरीही वाचनाच्याद्वारे होणार्या स्वयंशिक्षणाला पर्याय नाही. मग अगदी संगणकांचा अथवा दृक्चित्रफितींचा वापर करणारे ‘प्रगत नागरिक’ असले तरी त्यांनाही ‘पडद्यावर’चे का होईना वाचन करावे लागणार आहेच. प्रचंड वेगाने आणि प्रचंड प्रमाणात समोर येऊन पडणारे साहित्य तितक्याच वेगाने ‘चाळून’, ‘निवडून’, वाचावे लागणार आहे, त्यावर सारासार विचार करून त्यातील ‘सत्त्व’ स्वीकारावे लागणार आहे आणि त्यासाठी ‘अधिक वेगाने अधिक चांगले वाचन’ करण्याच्या पद्धती शिकून घ्याव्या लागणार आहेत.
ही सगळी ‘प्रगत वाचन कौशल्ये’ तेव्हाच सहजसाध्य होतील, जेव्हा ‘सुरुवातीचे वाचन’ योग्य पद्धतीने झालेले असेल. जिव्होर्दानो ब्रुनो यांनी म्हटले आहे की सुरुवातीचे वाचन हे बुशकोटाच्या पहिल्या बटणासारखे आहे. ते लावायला चुकले तर सगळा बुशकोटच वेडावाकडा दिसू लागतो. वाचनाचे देखील तसेच आहे. सुरुवातीला चुकीच्या सवयी लागल्या तर पुढचे सगळे वाचन आणि ज्ञानार्जन वेडेवाकडे होते. जर आपल्या मुलांच्या बाबतीत तसे व्हायला नको असेल तर त्यासाठी आपल्याला मुलांच्या ‘सुरुवातीच्या वाचना’कडे अधिक सजगपणे लक्ष द्यायला हवे.
‘वाचना’चे विविध अर्थ
‘वाचन करण्या’ची जी प्रक्रिया आहे तिच्यासंबंधात सर्वसामान्यांमध्ये तसेच तज्ज्ञांमध्येही मतभेद असल्याचे दिसून येते. ते मतभेद पुढील व्याख्यांतून व्यक्त झालेले दिसतात...
वाचन करणे म्हणजे
समोर आलेले मुळाक्षर ओळखणे आणि त्याचा उच्चार करणे.
समोर आलेला शब्द, वाक्य ओळखणे, त्याचा अर्थ समजणे व आवश्यक तर उच्चार करणे.
समोर आलेले वाक्य ओळखणे, त्याचा अर्थ समजणे व आवश्यक तर उच्चार करणे.
समोर आलेले शब्द, अर्थ, शब्दांद्वारे लेखकाने अथवा कवीने व्यक्त केलेले विचार, कल्पना आणि भावना समजणे. त्यावर प्रकट वा मनातल्या मनात प्रतिक्रिया व्यक्त करणे आणि जे पटले असेल त्याचा आपल्या वर्तनात समावेश करणे.
वरील व्याख्यांकडे सजगपणे लक्ष दिले तर आपण यापैकी कोणती तरी व्याख्या कळत वा नकळत स्वीकारली होती हे आपल्या सहज लक्षात येईल. आपल्यापैकी बहुतेकांनी ती नकळतच स्वीकारलेली असते, कारण आपल्याला ज्या पद्धतीने सुरुवातीचे वाचन शिकविले गेले असते, ती पद्धती ज्या व्याख्येवर आधारलेली असते ती व्याख्या आपण स्वीकारलेली असते. तीच एकमेव आणि योग्य पद्धती आहे अशी आपली ठाम समजूत होते. त्या पद्धतीशी सुसंगत अशा वाचन सवयी आपल्याला लागलेल्या असतात. सुरुवातीला लागलेल्या वाचनसवयी प्रयत्नपूर्वक बदलल्या नाहीत तर त्या आयुष्यभर आपली संगत करतात आणि त्याचे परिणाम आपल्या वर्तनात पाहायला मिळतात. आपण वाचन यांत्रिकपद्धतीने करतो, अर्थ समजून करतो की लेखकाशी वाद संवाद करीत, उच्च मानसिक प्रक्रियांचा उपयोग करतो? आपण सावकाश वाचतो की ‘गतीने आणि समजून’ वाचतो, ते बहुधा सुरुवातीच्या वाचन शिकविण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. काही जणांना नंतरच्या आयुष्यात त्यात इष्ट ते बदल करण्याची संधी मिळते. त्या बदललेल्या सवयींचे फायदेही झालेले दिसतात. परंतु बहुतेकांच्या जीवनात मात्र ‘सुरुवातीचे वाचन शिकविणार्या पद्धती’चा परिणाम कायम राहिलेला दिसतो. अशा या पद्धती कोणत्या आहेत ते आता समजावून घेऊ या.
वाचन शिकविण्याच्या पद्धती
इ.स. १९५३ साली युनेस्कोतर्फे प्रसिद्ध वाचनतज्ज्ञ विल्यम ग्रे यांनी ‘सुरुवातीचे वाचन व लेखन शिकविण्याच्या पद्धतीं’चे जागतिक सर्वेक्षण केले. तेव्हा त्यांना असे आढळून आले, की सुरुवातीचे वाचन शिकविण्याच्या प्रमुख चार पद्धती असून त्यापैकी एक अथवा तिचे बदल केलेले रूप जगभराच्या विविध भाषांत उपयोगात आणले जाते. त्यांचा खालीलप्रमाणे थोडक्यात परिचय करून देता येईल...
१) मुळाक्षर पद्धती
या पद्धतीनुसार मराठी भाषिक मुलांना सुरुवातीला ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंत एकेक अक्षर वाचायला... खरे म्हणजे लिहायलासुद्धा... शिकविले जाते. मुलांना मुळाक्षरे वाचता येऊ लागली की बाराखडीची चिन्हे लावून ती अक्षरे वाचायला... लिहायलादेखील... शिकविले जाते. नंतर या अक्षरांपासून बनलेले शब्द वाचायला शिकविले जातात आणि शेवटी शब्दांपासून वाक्ये आणि वाक्यांच्या साहाय्याने धडे वाचायला शिकविले जातात.
वाचन-लेखन एकदमच शिकविले जात असल्याने आणि लेखनाचे महत्त्व अधिक वाटल्याने ‘अ ते ज्ञ’ ही उच्चाराच्या दृष्टिकोनातून चालत आलेली पारंपरिक व्यवस्था सोडून लेखनाच्या दृष्टीने साम्य असलेली ‘ग म भ न’ यासारखी मुळाक्षरे सुरुवातीच्या वाचन लेखनासाठी निवडली जातात. पुढची वाटचाल वरील पद्धतीनेच चालू राहते.
मुळाक्षर पद्धतीचे फायदे
मुळाक्षर पद्धतीमुळे मुले वाचन करताना कोणताही अपरिचित मजकूर वाचू शकतात. कारण त्यांना प्रत्येक अक्षराचा आकार आणि ध्वनी परिचित असतो शिवाय बाराखडीचा परिचय झालेला असल्याने ३६ X १२ = ४३२ इतकी अक्षरे त्यांना ओळखता येत असतात. त्यामुळे सुविधा आणि आत्मविश्वासाच्या बळावर ते ‘स्व-तंत्र वाचक’ बनतात.
मुळाक्षर पद्धतीचे तोटे
वर नोंदविलेले फायदे त्याचवेळेला मिळू शकतात, ज्यावेळी मुलाला मुळाक्षरे ओळखता येतात. मुळात अडचण येते ती अक्षरांची ओळख होतानाच ! ज्या अक्षरांना अर्थ नाही, जी अक्षरे काही वेळा एक सारखी असतात तर बहुधा एकमेकांपेक्षा खूपच वेगळी असतात अशी ४० अक्षरे लक्षात ठेवता ठेवता सगळा गोंधळ उडून जातो. ‘‘एवढी साधी गोष्ट लक्षात राहत नाही मग पुढे काय शिकणार !’’ अशी शिक्षकांकडून कडक टीका होते तर वर्गातील मुलांकडून उपहास होतो, आणि नको ते शिक्षण असे वाटू लागते.
यातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक अक्षराला एकेका वस्तूचे साहचर्य दिले जाते. जसे, ‘अ’ अननसाचा’ ‘आ’ ‘आगगाडीचा’ ते ‘क्ष’ ‘क्षत्रियातला’ आणि ‘य’ ‘यज्ञातला’ इ. अनेक वेळा साहचर्यासाठी वापरलेल्या व्यक्ती, वस्तू, प्राणी मुलांना परिचित नसतात. त्याचबरोबर एकाच उदाहरणाच्या अति साहचर्याचा विपरीत परिणामही पाहावयास मिळतो. खेडेगावातील शाळांतून फिरत असताना काही मुले ‘गवत’ शब्द वाचताना ‘‘ग गडूतला, व वजनातला, त तलवारीचा ग...व...त...’’ असे वाचताना आढळली. अशी खडखडत जाणारी गाडी मुक्कामाला पोहोचते तेव्हा वाचलेल्या वाक्याचा अर्थ निसटून गेलेला असतो.
ज्यांनी या अडथळ्यांवर मात केलेली असते त्यांनी केवळ मूळ अक्षर वाचण्यात यश मिळविलेले असते. त्यांच्यातही एक मोठा दोष आलेला असतो, तो म्हणजे त्यांना वेगाने वाचता येत नाही. सावकाश वाचन करणार्यांना वाचनाचा लवकर कंटाळा येतो. शिवाय विचाराची गती ही वाचनाच्या गतीवर अवलंबून असल्याने त्यांना विचारही सावकाश करायची सवय जडते. या दोनही सवयी नव्या वेगाने ज्ञानयुगाशी जुळवून घेण्यात अडचणी निर्माण करणार आहेत.
वाचनसाहित्य तयार करणार्यांवरही या पद्धतीमुळे बंधने येतात. पहिलीची पूर्वीची अथवा प्रचलितही पाठ्यपुस्तके पाहताना सुरुवातीच्या पाठांत केवळ मुळाक्षरयुक्त वा ‘आकारान्त’ ‘इकारान्त’ ‘उकारान्त’ इ. शब्दांचे पाठ तयार करावे लागल्याने आलेली कृत्रिमता आणि तिच्यामुळे निर्माण झालेली नीरसता मुलांच्यात वाचनाची नावड उत्पन्न करायला कशी कारणीभूत होत असेल ते आपल्या सहज लक्षात येते.
२) शब्दपद्धती
मुळाक्षरपद्धतीचे तोटे लक्षात आल्यावर काही तज्ज्ञांनी वाचनाला शब्दापासूनच सुरुवात करावी असे सुचविले. इ.स. १८८५ मध्ये कॅटेल यांनी प्रयोग करून असे दाखवून दिले की दिलेल्या मर्यादित वेळेत परस्परांशी संबंध नसलेली चार-पाच अक्षरे ओळखली गेली, पण तेवढ्याच वेळेत दोन शब्द ओळखले गेले आणि दोहोत मिळून १२ अक्षरे होती. येथे ‘समष्टीवादी’ मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेला ‘‘जे जे अर्थपूर्ण त्याचा अवबोध लवकर होतो.’’ हा सिद्धांतही काम करताना दिसत होता. त्याचाच आधार घेऊन शब्द पद्धतीत वाचनासाठीचे सुरुवातीचे एकक म्हणून शब्दाची निवड केली जाते आणि मुलांना एकदम शब्दच वाचायला शिकविले जातात.
अक्षर ओळख झालेली नसतानाही मुले शब्द वाचू शकतात, हे मुळाक्षरे पद्धतीने शिकलेल्यांना पटतच नाही. पण त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की अक्षरे काय अथवा शब्द काय या केवळ खुणा आहेत. त्या कशाचे तरी सूचन करीत असतात. लाल दिवा ही जशी धोका असल्याची खूण आहे, हिरवा दिवा ही जशी धोका नसल्याची खूण आहे, तशीच आंब्याचे चित्र ही ‘आंबा’ या फळाची खूण आहे. ‘आंबा’ हा लिखित शब्द हीसुद्धा एक त्याच फळाची खूण आहे. हा शब्द चित्रासह दाखवून शिक्षक जेव्हा त्याचा उच्चार करतात अथवा मुलांकडून वारंवार उच्चार करवून घेतात तेव्हा आंब्याचे फळ आणि ‘आंबा’ हा शब्द यांचे साहचर्य मुलांच्या मनात निर्माण होते आणि पुढे केव्हाही तो नुसता शब्द पाहिला तरी मुले तो अर्थासह ओळखू शकतात.
अशाप्रकारे व्यक्ती, प्राणी अथवा वस्तू यांची चित्रे आणि नावे पाहून मुले ते शब्द ओळखू शकतात. चित्रांप्रमाणे कृतींचे साहचर्य देऊन ते शब्दही मुलांना लक्षात ठेवायला शिकविता येतात. अशा ५०-६० नावांची अथवा कृतींची ‘दृक् शब्द संपत्ती’ तयार झाल्यावर त्यापासून काही वाक्ये बनवून ती मुलांकडून वाचून घेतली जातात. या प्रक्रियेत आणखी ३०-४० ‘दृक् शब्दां’ची भर पडते. नंतर त्यांचे पृथक्करण करवून अक्षरे शिकविली जातात.
शब्दपद्धतीचे फायदे
शब्द हे भाषेतले सर्वात छोटे अर्थपूर्ण एकक असल्याने मुलांना ते लक्षात ठेवणे सोपे जाते. त्यातही शब्द निवडताना ते मुलांच्याच शब्दसंग्रहातले निवडले जातात. त्यामुळे त्यांचा उच्चार आणि अर्थ मुलांना सुपरिचित असतो. त्यांच्यावर जबाबदारी असते ती फक्त त्या शब्दाचा आकार लक्षात ठेवण्याची. म्हणजे वाचन प्रक्रियेतील फक्त एक तृतीयांश कामच त्यांना करायचे असते. हे काम ते आवडीने करतात कारण ते सोपे असल्याने लवकर जमते. ‘‘अहो मला वाचता येतेय !’’ हा अनुभव आत्मविश्वास निर्माण करतो. शिवाय मोठ्यांची शाबासकी मिळते ती वेगळीच. या सार्यामुळे अधिक वाचावे, शिकत राहावे असे मुलांना वाटते.
शब्दपद्धतीचे तोटे
एकसारखे केवळ शब्दच ओळखायला लागले तर त्याही कृतीचा मुलांना कंटाळा येतो. बरे परिचित शब्दांचाच उपयोग करायचा म्हटला तर पुढे पृथक्करणाच्या वेळी असे लक्षात येते की अनेक अक्षरे त्या शब्दांत समाविष्ट झालेली नाहीत. त्यामुळे ती अक्षरे कशी शिकवायची हा प्रश्न शिल्लक राहतोच. शिवाय या पद्धतीत शब्दांचे पृथक्करण करून अक्षरे शिकवायची असल्यामुळे प्रत्यक्षात त्या पद्धतीचा विसर पडल्यासारखे वर्तन भल्याभल्यांकडून झालेले दिसते. पाठ्यपुस्तकातील पहिल्या पाठातील शब्दांपासूनच पृथक्करणाच्या कृतीला सुरुवात होते. लगेच त्या अक्षरांपासून नवे शब्द बनविण्याचे स्वाध्याय दिले जातात. म्हणजे शब्दपद्धती राहते बाजूला आणि नकळत अक्षरपद्धतीने खुशाल अध्यापन सुरू होते. त्यामुळे वर नोंदविलेले अक्षरपद्धतीचे सर्व तोटे मुलांच्या वाट्याला येतात.
३) वाक्यपद्धती
भाषेच्या दृष्टिकोनातून वाचनाचा विचार करणारे शब्दपद्धतीवर असा आक्षेप घेतात की शब्दाला स्वतंत्र अर्थ नसतो. त्याला अर्थ प्राप्त होतो तो वाक्याच्या संदर्भात. ‘‘तो शहाणा आहे.’’ या वाक्यातील ‘शहाणा’ शब्दाचा अर्थ ते वाक्य कोण म्हणतेय, कुणाबद्दल म्हणतेय, कशाच्या संदर्भात म्हणतेय यावर ठरत असतो. त्यामुळे वाचायला शिकविताना शब्दाऐवजी वाक्यच वाचनाचे सुरुवातीचे एकक म्हणून निवडणे त्यांना योग्य वाटते. ज्याप्रमाणे अक्षरपद्धतीत ठरावीक अक्षर अथवा शब्दपद्धतीत ठरावीक शब्द पुनःपुन्हा दाखवून, म्हणवून घेतला जातो त्याचप्रमाणे ठरावीक वाक्य पुनःपुन्हा दाखवून, म्हणवून घेतले जाते. वारंवार केलेल्या आवृत्तीमुळे ते मुलांच्या लक्षात राहते आणि पुनः ते वाक्य पाहताच मुले ते सहज ओळखू अथवा ‘वाचू’ शकतात.
शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात वर्गात झालेल्या संभाषणाच्या वेळी ही वाक्ये निवडली जातात व फळ्यावर लिहिली जातात आणि मुलांकडून वारंवार आवृत्त करून घेतली जातात. अशा १०-१५ ‘दृक् वाक्यां’च्या संग्रहानंतर वाक्यांचे शब्दांत आणि शब्दांचे अक्षरांत पृथक्करण करवून घेतले जाते.
वाक्यपद्धतीचे फायदे
आपण जे बोलतो ते लिहिले जाते, ते आपल्याला वाचता येते याचा मुलांना खूप आनंद होतो. त्यामुळे मुले सुरुवातीला मोठ्या आनंदाने त्यात सहभागी होतात.
वाक्यपद्धतीचे तोटे
आपण वाचू शकतो याचा आनंद फार दिवस टिकत नाही. कारण अनेक सुटी सुटी वाक्ये लक्षात ठेवणे अवघड जाते. आत्मविश्वास डळमळू लागतो. संभाषणाच्या संदर्भातील वाक्ये असल्याने त्यातील शब्दांमध्ये सर्वच अक्षरे येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे शिक्षक मध्येच परंपरागत पद्धतीकडे वळण्याची शक्यता निर्माण होते.
४) कथापद्धती
ज्याप्रमाणे काही जणांना सुट्या शब्दांपेक्षा वाक्यात आलेले शब्द शिकविणे अधिक योग्य वाटते. त्याचप्रमाणे अन्य काहीजणांना परस्परांशी संबंध नसलेली वाक्ये सुरुवातीचे ‘वाचन एकक’ म्हणून घेणे अयोग्य वाटते. म्हणूनच ते कथा हाच पहिला वाचन एकक म्हणून पसंत करतात. कारण कथेत येणारी वाक्ये परस्परांशी संबंधित असतात. त्यामुळे ती परस्परांच्या साहचर्याने सहज लक्षात राहतात. अर्थात मोठमोठ्या कथा इथे अभिप्रेत नाहीत. पाच सहा वाक्यातही एखादी कथा, प्रसंग अथवा घटना सांगता येते. अशी कथा सांगून झाली की ती फलकावर अथवा तक्त्यावर लिहिली जाते, मोठ्याने वाचून दाखविली जाते, आपल्या मागून म्हणवून घेतली जाते आणि शेवटी वैयक्तिकरित्या ‘वाचून’ घेतली जाते. हे वाचन चालू असताना त्या त्या वाक्यावर पट्टी अथवा दर्शक ठेवला जातो. त्यामुळे त्या त्या वाक्याचे वाचन होते. अशी वाक्ये वाचता येऊ लागली की त्या वाक्यांचे पृथक्करण करवून सुटे शब्द वाचायला शिकविले जातात. शेवटी शब्दांचे पृथक्करण करून अक्षरे वाचायला शिकविली जातात.
कथापद्धतीचे फायदे
कथा ऐकणे आणि सांगणे सगळ्यांनाच आवडते. विशेषतः मुलांना तर ते फारच आवडते ! त्यामुळे या पद्धतीत मुलांचे लक्ष वेधून घेण्याची शक्ती सर्वात जास्त आहे. शिवाय लेखकाचे विचार, त्याने व्यक्त केलेल्या भावना वाचकांपर्यंत पोहचतात. अगदी छोट्या मुलांच्या बाबतीतही हे शक्य होते.
कथापद्धतीचे तोटे
जे आवडते ते पाठ होते. यादृष्टीने पाहता ऐकलेली कथा पाठ करण्याची इच्छा मुलांमध्ये निर्माण होते. सुशिक्षित घरात वारंवार वाचून दाखविलेली कविता अथवा कथा तीन चार वर्षाची मुले ‘वाचून’ दाखविताना आपण नक्कीच पाहिली असतील. मग पुस्तक उलटे धरलेले असेना का ! खेडेगावातील शाळांत पाठ्यपुस्तकातील धडे अशाच तर्हेने वाचणारी मुलेही काहीजणांनी पाहिली असतील. कथापद्धतीने शिकविले जाणार्या वर्गात वाचता न येणारी मुले असेच पाठांतर करताना ‘वाचल्याचा’ आनंद घेताना आढळतात. पण पुढे वाक्ये आणि शब्द यांचे पृथक्करण करायच्या वेळी मात्र त्यांची फारच चाईत होते. त्यावेळचा अपेक्षाभंग फारच निरुत्साह निर्माण करणारा आणि परिणामी हानिकारक ठरतो.
समारोप
जगातील सर्व भाषांत सुरुवातीचे वाचन शिकविताना वापरल्या जाणार्या प्रमुख पद्धतींचा परिचय करून घेताना काही गोष्टी आपल्या लक्षात आल्या असतील. एक म्हणजे वाचनाचे सुरुवातीचे एकक कोणतेही असो ते वारंवार दाखवून, म्हणवून घेतले जाते. त्यामुळे अगदी सुरुवातीचे वाचन म्हणजे ते एकक ‘ओळखणे’ या स्वरूपाचेच असते. दुसरे म्हणजे अक्षर पद्धतीत अक्षरांकडून वाक्यांकडे वाटचाल होते तर पुढच्या सर्व पद्धतीत ‘पूर्णाकडून भागांकडे’... कथा ... वाक्य ... शब्द ... अक्षर अशी वाटचाल होते. तिसरे म्हणजे अक्षरपद्धतीत यांत्रिकता आहे, तर पुढील सर्व पद्धतीत अर्थाकडे अधिकाधिक लक्ष दिलेले आहे. चौथे आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे कोणतीही एक पद्धत परिपूर्ण नाही. प्रत्येकीत जसे गुण आहेत तसेच दोषही आहेत. म्हणूनच आर्थर गेटस् या शिक्षणतज्ज्ञाने ‘समावेशक वाचन पद्धती’चा पुरस्कार केला होता. मी स्वतः आपल्या भाषेची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन १९६९ साली एक ‘समावेशक वाचनपद्धती’ विकसित केली होती. गेली ३९ वर्षे वेळोवेळी ग्रामीण, शहरी एवढेच नव्हे तर परदेशातील इंग्लिश शाळेत शिकणार्या मुलांना या पद्धतीने वाचन करायला शिकविले आहे आणि त्याचे चांगले
0
Answer link
मराठी वाचन शिकवण्यासाठी काही उपाय:
1. अक्षरांची ओळख:
- सुरुवातीला मुलांना स्वर आणि व्यंजन अक्षरांची ओळख करून द्या.
- अक्षरांचे आवाज आणि त्यांची चित्रे दाखवा.
- उदाहरणार्थ, 'अ'For more information, you can consult online resources like Marathi Unlimited (मराठी अनलिमिटेड) learn marathi alphabets अजगर, 'आ' -For more information, you can consult online resources like Marathi Unlimited (मराठी अनलिमिटेड) learn marathi alphabets आई अशा प्रकारे अक्षरांची चित्रे दाखवा.
2. शब्द आणि वाक्य वाचन:
- अक्षरांची ओळख झाल्यानंतर, लहान शब्द वाचायला शिकवा.
- दोन अक्षरी, तीन अक्षरी शब्द वाचायला द्या.
- उदाहरणार्थ: घर, बस, जग, फळ.
- नंतर लहान वाक्ये वाचायला द्या.
- उदाहरणार्थ: 'हे घर आहे.', 'ती बस आहे.'
3. खेळ आणि कृती:
- अक्षरे आणि शब्दांचे खेळ घ्या.
- उदा. शब्द शोधणे, अक्षर जुळवणे.
- शब्द कार्ड्स वापरा.
- मुलांना वाचायला आवडेल अशा गोष्टी द्या.
4. नियमित सराव:
- रोज थोडा वेळ वाचनाचा सराव ठेवा.
- सुरुवातीला मोठ्या आवाजात वाचा आणि नंतर मनातल्या मनात वाचा.
5. पुस्तके आणि गोष्टी:
- मुलांना आवडतील अशी पुस्तके द्या.
- सुरुवातीला चित्रमय पुस्तके द्या.
- गोष्टी वाचून दाखवा आणि त्यांना पुन्हा वाचायला सांगा.
6. तंत्रज्ञानाचा वापर:
- आजकाल वाचन शिकवण्यासाठी अनेक ॲप्स (Apps) उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करा.
- YouTube वर शैक्षणिक व्हिडिओ (educational videos) उपलब्ध आहेत, ते दाखवा.
7. प्रोत्साहन:
- मुलांना वाचनासाठी नेहमी प्रोत्साहन द्या.
- त्यांनी चांगले वाचल्यास त्यांची प्रशंसा करा.