2 उत्तरे
2
answers
छपाई यंत्राचा कोणता परिणाम झाला?
2
Answer link
मध्ययुगीन काळात असे अनेक शोध लागले ज्याने मानवाच्या आयुष्यात क्रांती घडली. छपाईचा शोध ही अशीच एक क्रांती होती ज्याने पुस्तके मोठ्या प्रमाणात सहज छापून मिळाल्यामुळे शिक्षणाचा आणि ज्ञानाचा प्रसार झटकन होण्यास खूप मोठी मदत मिळाली.
योहानेस गुटेनबर्गने प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. सर्वात पहिले छापलेले पुस्तक म्हणून गटेनबर्ग बायबलचे नाव घेतले जाते.
हे ४२ ओळींचे बायबल किंवा मझरीन बायबल हे योहान्स गुटेनबर्गने मुव्हेबल मेटल पद्धतीने छापलेले पहिले पुस्तक आहे असे म्हणतात. खरे तर ह्या आधी सुद्धा गुटेनबर्गने अनेक पुस्तके छापली होती पण गटेनबर्ग बायबलमुळे गटेनबर्ग क्रांती किंवा अक्षरक्रांती झाली असे म्हटले जाते.
इसवी सन १४५५ साली गटेनबर्ग बायबल पहिल्यांदा मुद्रित करण्यात आले असे म्हणतात.
जर्मनीच्या योहान्स गुटेनबर्गच्या ह्या शोधामुळे पुस्तके मोठ्या प्रमाणात मुद्रित करण्याची सुरुवात झाली. ह्या आधी पुस्तके हाताने लिहून काढावी लागत असत किंवा जुन्या पद्धतीने वुडब्लॉक प्रिंटींग केले जात असे.
आशिया खंडात तर फार पूर्वीपासून कापडावर किंवा जनावरांच्या कातडीवर स्टेन्सिल्स किंवा वुडब्लॉक वापरून प्रिंटिंग करीत असत.
त्यामुळे काहीही छापायचे असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत असे. तसेच हे वेळखाऊ काम होते त्यामुळे ह्यासाठी पैसाही जास्त लागत असे. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांना पुस्तके विकत घेणे सहसा परवडत नसे.
त्यांच्या मर्यादित प्रति निघत असत. पण छपाईच्या शोधामुळे पुस्तकांच्या अनेक प्रति एकाच वेळी तयार होऊ लागल्या आणि तिथूनच अक्षरक्रांतीला सुरुवात झाली.
माहितीचा, ज्ञानाचा जगभर प्रसार होऊ लागला. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये छपाईचा शोध हे अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे.

0
Answer link
छपाई यंत्राचा (Printing press) समाजावर आणि संस्कृतीवर मोठा प्रभाव पडला. काही महत्त्वाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
- ज्ञानाचा प्रसार: छपाई यंत्रामुळे पुस्तके आणि इतर साहित्य मोठ्या प्रमाणात छापले जाऊ लागले, त्यामुळे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणे सोपे झाले.
- शिक्षणाला प्रोत्साहन: पुस्तके स्वस्त झाल्यामुळे लोकांना शिक्षण घेणे शक्य झाले, ज्यामुळे साक्षरता वाढली.
- वैज्ञानिक क्रांती: वैज्ञानिकांनी आपले शोधनिबंध आणि विचार छापून लोकांपर्यंत पोहोचवले, ज्यामुळे विज्ञानाचा विकास झाला.
- सुधारणा चळवळ: मार्टिन ल्यूथर या धर्मसुधारकाने आपले विचार छपाईद्वारे लोकांपर्यंत पोहोचवले, ज्यामुळे धार्मिक सुधारणा चळवळीला बळ मिळाले.
- भाषिक विकास: प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तके छापली जाऊ लागल्याने त्या भाषांचा विकास झाला आणि लोकांना आपल्या भाषेत ज्ञान उपलब्ध झाले.
- राजकीय आणि सामाजिक बदल: छपाईमुळे लोकांना माहिती मिळणे सोपे झाले आणि त्यांनी राजकीय आणि सामाजिक प्रश्नांवर विचार करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे समाजात बदल घडून आले.
थोडक्यात, छपाई यंत्राने ज्ञान, शिक्षण आणि सामाजिक बदलांना चालना दिली.