गडदुर्ग भूगोल डोंगर इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

डेरमाळ किल्ला असलेल्या डोंगररांगेची माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

डेरमाळ किल्ला असलेल्या डोंगररांगेची माहिती मिळेल का?

0
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला म्हणजे कसमादे ( कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा ) परिसरात काही अफलातून किल्ले आहेत. मात्र शिअवछत्रपतींच्या साम्राज्याचा इकडे विशेष विस्तार न झाल्याने, तसेच मुख्य मार्गापासून काहीसे आडबाजुला असल्याने हे गडकोट फारचे कोणाला माहिती नाहीत. अगदी क्वचितच दुर्गप्रेमी इथे भेट देतात. यापैकी एक म्हणजे, “डेरमाळ”. नुकतीच आपण गाळणा किल्ल्याची ओळख करुन घेतली. या परिसरातील गाळणा हा महत्वाचा किल्ला असल्याने या सर्व डोंगराना गाळणा टेकड्या म्हणतात. मालेगावच्या इशान्येला, नामपुर-ताहराबाद रस्त्याजवळ या गाळणा टेकड्यात एक दुर्गरत्न विसावलेले आहे, “डेरमाळ”. काहीसे मुख्य मार्गापासून फटकून आणि बहुतेक कोणतेच गाव याच्या जवळपास नाही, तरीही खडतर वाटचाल करुन या किल्ल्यावर असलेली पाण्यची टाकी आणि डेरमाळला लाभलेला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला रौद्रभिषण भैरवकडा हे आवर्जून पहाण्यासाठी इथे भेट द्यायलाच हवी. याच रांगेवर पिसोळ हा आणखी एक दुर्लक्षित आणि देखणा किल्ला आहे. नीट नियोजन केल्यास खाजगी वहानाने डेरमाळ किल्ल्याला आणि पिसोळ किल्ल्याला एका दिवसात भेट देता येत.
पावसाळ्यात वेळ काढून मालेगाव गाठले. यावेळचे लक्ष्य होते, कोणी फारचे न बघितलेले आणि फारचे माहिती नसलेले काही गडकोट पालथे घालण्याचे. त्यापैकी एक म्हणजे “डेरमाळ” या डेरमाळला जायचे तर तीन मार्गाने जाण्याचा पर्याय होता. माझ्याकडे जी माहिती होती ती अशी होती.
१) टिंघरी गावातून :-
नाशिक – सटाणा – नामपूर हे अंतर ११० किलोमीटर आहे. नामापूर मार्गे टिंघरी हे १२ किलोमीटरचे अंतर आहे. टिंघरी मधून डेरमाळ किल्ला दिसत नाही. टिंघरी गावासमोर एक डोंगर आहे. या डोंगराच्या डाव्या बाजूला असलेल्या खिंडीत जावे लागते. प्रथम टिंघरी गावासमोर असलेला डोंगर चढत डाव्या बाजूची खिंड गाठावी लागते. हे अंतर पार करण्यास पाऊण तास लागतो. हि खिंड पार केल्यावर आपण पठारावर पोहोचतो. याठिकाणाहून आपल्याला डेरमाळ किल्ल्याचे पहिल दर्शन होते. हे पठार पार केल्यावर थोडेसे खाली उतरुन आपण दुसर्‍या पठारावर पोहोचतो. हे पठार थेट डेरमाळ किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेले आहे. या पठारा वरुन चालत किल्ल्याच्या जवळ आल्यावर झाडीत एक विरगळ आहे. एका ३ फ़ुट उंच दगडावर गोड्यावर बसलेला योध्दा कोरलेला आहे. गावापासून या वीरगळी पर्यंत पोहोचण्यास दिड तास लागतो. या विरगळीच्या मागे एक सुकलेला तलाव आहे. या विरगळीच्या इथुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट ही किल्ल्याची मुख्यवाट आहे. हि वाट आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात घेऊन जाते. तर उजव्या बाजूने (तलावाच्या बाजूने) जाणारी वाट फ़ारशी मळलेली नाही पण ही वाट आपल्याला थेट उत्तर दरवाजात घेऊन जाते. वीरगळ ते किल्ल्याचा दरवाजा हे अंतर कापण्यास अर्धा तास लागतो. टिंघरी गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास २ ते २.३० तास लागतात. किल्ला बघायला २ तास आणि परतीच्या प्रवासाला १.३० लागतो. हे सर्व ध्यानात घेतल्यास रात्री किंवा पहाटे टिंघरीला पोहोचुन सकाळी लवकर डेरमाळ पाहून दुपारी जेवणाच्या वेळी टिंघरी गावात पोहोचता येते.
२) बिलपूरी मार्गे :-
नाशिक – सटाणा – नामपूर मार्गे बिलपूरी गावात पोहचता येते नामपूर पासून बिलपूर हे गाव साधारणपणे १५ किमी वर आहे. गावात सटाण्याहून नामपूर मार्गे मुक्कामाची एसटी सुध्दा येते. जर एसटी नाही मिळाली तर नामपूर- साक्री मार्गावर ‘चिराई’ नावाचे गाव आहे, तिथून ८ किमी वर चालत बिलपूरीला जाता येते किंवा नामपूर तळवडे अशा सहा आसनी गाड्या चालू असतात. तळवडे ते बिलपूरी अंतर ३ किमी पायी गाठता येते. बिलपूरी गावातून डेरमाळ दिसतो, पण तिथपर्यंत जाण्यासाठी सरळ वाट नाही. वाट जरा वाकडी करुनच जावे लागते.
डेरमाळच्या समोर असणार्‍या डोंगराची सोंड बिलपूरी मध्ये उतरलेली आहे. गावातून पुढे जाताच दूरवर डावीकडे डेरमाळ आणि अगदी समोर एक डोंगररांग दिसू लागते. पण किल्ल्याची वाट थोडी फिरून फिरून गडावर जाते.. समोर दिसणाऱ्या डोंगराला उजवीकडे वळसा घालून आपण पुढे येतो तेंव्हा आणखी मुरुमाचा डोंगर समोर येतो.. इथे समोर दिसणाऱ्या डोंगराच्या नाकाडावर टिच्चून वर आलो की पुन्हा उजविकडे वळसा घालायचा. की आपण एक रुक्ष आणि रखरखीत पठारावर येवून पोहोचतो. आपण पठारावर पोहोचलो की डावीकडे डेरमाळ किल्ल्याचा डोंगर आणि लगतच्या डोंगराला जोडणारी खिंड दिसते. पठारावरून डावीकडे (डेरमाळ किल्ल्याकडे) पाहिल्यास खिंडीच्या वर डोंगरावर एक डावीकडे काळी आडवी पट्टी दिसते, हिच डेरमाळ किल्ल्याची तटबंदी
किल्ला आणि आपण चालत असणारे पठार यात एक दरी असते. पठारावरुन अर्धा तास चालत गेल्यावर आपण दरी जिथे संपते त्या ठिकाणी इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घ्यायचे आणि समोरच्या पठारावरच्या जंगलात शिरावे. आता डेरमाळचा डोंगर आणि समोरचा डोंगर यांना जोडणारी खिंड आपल्या मागे रहाते. आता डेरमाळची तटबंदी आपल्या डोक्यावर उजवीकडच्या कड्यावर असते. आता वाट चढणीला लागते, वाटेत किल्ल्याच्या तीन पडझड झालेल्या दरवाज्यांचे अवशेष दिसतात. शेवटच्या दरवाज्या जवळून वाट पून्हा ‘यू’ आकाराचे वळण घेऊन डेरमाळच्या माचीवर जाते.
उत्तर लिहिले · 14/7/2020
कर्म · 20065
0

डेरमाळ किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात आहे. हा किल्ला ज्या डोंगररांगेत आहे ती 'कळसुबाई डोंगररांग' म्हणून ओळखली जाते. या डोंगररांगेची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:

  • कळसुबाई शिखर: याच डोंगररांगेत महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, कळसुबाई (Kalsubai) आहे.
  • इगतपुरी तालुका: ही डोंगररांग इगतपुरी तालुक्याच्या परिसरात पसरलेली आहे.
  • सह्याद्री पर्वतरांग: कळसुबाई डोंगररांग ही सह्याद्री पर्वतरांगेचाच एक भाग आहे.
  • दुर्गम भाग: या डोंगररांगेतील काही भाग दुर्गम आहे, त्यामुळे येथे ट्रेकिंगसाठी (trekking) येणारे अनेक पर्यटक बघायला मिळतात.

डेरमाळ किल्ला आणि कळसुबाई डोंगररांग हे दोन्ही नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळे आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1820

Related Questions

सल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
डेरमाळ किल्ला असलेल्या डोंगररांगेचे नाव काय?
महादेवगड बद्दल माहिती द्या?
आजोबा पर्वत कोठे आहे, माहिती सांगा?
महाराष्ट्रामध्ये डोंगररांगा कोणकोणत्या व कुठे आहेत?
साल्हेर शिखर कोणत्या तालुक्यात आहे?
महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणते?