Topic icon

डोंगर

0
सल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे.
उत्तर लिहिले · 11/11/2022
कर्म · 61495
0
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला म्हणजे कसमादे ( कळवण-सटाणा-मालेगाव-देवळा ) परिसरात काही अफलातून किल्ले आहेत. मात्र शिअवछत्रपतींच्या साम्राज्याचा इकडे विशेष विस्तार न झाल्याने, तसेच मुख्य मार्गापासून काहीसे आडबाजुला असल्याने हे गडकोट फारचे कोणाला माहिती नाहीत. अगदी क्वचितच दुर्गप्रेमी इथे भेट देतात. यापैकी एक म्हणजे, “डेरमाळ”. नुकतीच आपण गाळणा किल्ल्याची ओळख करुन घेतली. या परिसरातील गाळणा हा महत्वाचा किल्ला असल्याने या सर्व डोंगराना गाळणा टेकड्या म्हणतात. मालेगावच्या इशान्येला, नामपुर-ताहराबाद रस्त्याजवळ या गाळणा टेकड्यात एक दुर्गरत्न विसावलेले आहे, “डेरमाळ”. काहीसे मुख्य मार्गापासून फटकून आणि बहुतेक कोणतेच गाव याच्या जवळपास नाही, तरीही खडतर वाटचाल करुन या किल्ल्यावर असलेली पाण्यची टाकी आणि डेरमाळला लाभलेला हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यासारखा अर्धगोलाकार आकार असलेला रौद्रभिषण भैरवकडा हे आवर्जून पहाण्यासाठी इथे भेट द्यायलाच हवी. याच रांगेवर पिसोळ हा आणखी एक दुर्लक्षित आणि देखणा किल्ला आहे. नीट नियोजन केल्यास खाजगी वहानाने डेरमाळ किल्ल्याला आणि पिसोळ किल्ल्याला एका दिवसात भेट देता येत.
पावसाळ्यात वेळ काढून मालेगाव गाठले. यावेळचे लक्ष्य होते, कोणी फारचे न बघितलेले आणि फारचे माहिती नसलेले काही गडकोट पालथे घालण्याचे. त्यापैकी एक म्हणजे “डेरमाळ” या डेरमाळला जायचे तर तीन मार्गाने जाण्याचा पर्याय होता. माझ्याकडे जी माहिती होती ती अशी होती.
१) टिंघरी गावातून :-
नाशिक – सटाणा – नामपूर हे अंतर ११० किलोमीटर आहे. नामापूर मार्गे टिंघरी हे १२ किलोमीटरचे अंतर आहे. टिंघरी मधून डेरमाळ किल्ला दिसत नाही. टिंघरी गावासमोर एक डोंगर आहे. या डोंगराच्या डाव्या बाजूला असलेल्या खिंडीत जावे लागते. प्रथम टिंघरी गावासमोर असलेला डोंगर चढत डाव्या बाजूची खिंड गाठावी लागते. हे अंतर पार करण्यास पाऊण तास लागतो. हि खिंड पार केल्यावर आपण पठारावर पोहोचतो. याठिकाणाहून आपल्याला डेरमाळ किल्ल्याचे पहिल दर्शन होते. हे पठार पार केल्यावर थोडेसे खाली उतरुन आपण दुसर्‍या पठारावर पोहोचतो. हे पठार थेट डेरमाळ किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत पोहोचलेले आहे. या पठारा वरुन चालत किल्ल्याच्या जवळ आल्यावर झाडीत एक विरगळ आहे. एका ३ फ़ुट उंच दगडावर गोड्यावर बसलेला योध्दा कोरलेला आहे. गावापासून या वीरगळी पर्यंत पोहोचण्यास दिड तास लागतो. या विरगळीच्या मागे एक सुकलेला तलाव आहे. या विरगळीच्या इथुन किल्ल्यावर जाण्यासाठी दोन वाटा फ़ुटतात. सरळ जाणारी वाट ही किल्ल्याची मुख्यवाट आहे. हि वाट आपल्याला किल्ल्याच्या दक्षिण दरवाजात घेऊन जाते. तर उजव्या बाजूने (तलावाच्या बाजूने) जाणारी वाट फ़ारशी मळलेली नाही पण ही वाट आपल्याला थेट उत्तर दरवाजात घेऊन जाते. वीरगळ ते किल्ल्याचा दरवाजा हे अंतर कापण्यास अर्धा तास लागतो. टिंघरी गावातून किल्ल्यावर पोहोचण्यास २ ते २.३० तास लागतात. किल्ला बघायला २ तास आणि परतीच्या प्रवासाला १.३० लागतो. हे सर्व ध्यानात घेतल्यास रात्री किंवा पहाटे टिंघरीला पोहोचुन सकाळी लवकर डेरमाळ पाहून दुपारी जेवणाच्या वेळी टिंघरी गावात पोहोचता येते.
२) बिलपूरी मार्गे :-
नाशिक – सटाणा – नामपूर मार्गे बिलपूरी गावात पोहचता येते नामपूर पासून बिलपूर हे गाव साधारणपणे १५ किमी वर आहे. गावात सटाण्याहून नामपूर मार्गे मुक्कामाची एसटी सुध्दा येते. जर एसटी नाही मिळाली तर नामपूर- साक्री मार्गावर ‘चिराई’ नावाचे गाव आहे, तिथून ८ किमी वर चालत बिलपूरीला जाता येते किंवा नामपूर तळवडे अशा सहा आसनी गाड्या चालू असतात. तळवडे ते बिलपूरी अंतर ३ किमी पायी गाठता येते. बिलपूरी गावातून डेरमाळ दिसतो, पण तिथपर्यंत जाण्यासाठी सरळ वाट नाही. वाट जरा वाकडी करुनच जावे लागते.
डेरमाळच्या समोर असणार्‍या डोंगराची सोंड बिलपूरी मध्ये उतरलेली आहे. गावातून पुढे जाताच दूरवर डावीकडे डेरमाळ आणि अगदी समोर एक डोंगररांग दिसू लागते. पण किल्ल्याची वाट थोडी फिरून फिरून गडावर जाते.. समोर दिसणाऱ्या डोंगराला उजवीकडे वळसा घालून आपण पुढे येतो तेंव्हा आणखी मुरुमाचा डोंगर समोर येतो.. इथे समोर दिसणाऱ्या डोंगराच्या नाकाडावर टिच्चून वर आलो की पुन्हा उजविकडे वळसा घालायचा. की आपण एक रुक्ष आणि रखरखीत पठारावर येवून पोहोचतो. आपण पठारावर पोहोचलो की डावीकडे डेरमाळ किल्ल्याचा डोंगर आणि लगतच्या डोंगराला जोडणारी खिंड दिसते. पठारावरून डावीकडे (डेरमाळ किल्ल्याकडे) पाहिल्यास खिंडीच्या वर डोंगरावर एक डावीकडे काळी आडवी पट्टी दिसते, हिच डेरमाळ किल्ल्याची तटबंदी
किल्ला आणि आपण चालत असणारे पठार यात एक दरी असते. पठारावरुन अर्धा तास चालत गेल्यावर आपण दरी जिथे संपते त्या ठिकाणी इंग्रजी ‘यू’ आकाराचे वळण घ्यायचे आणि समोरच्या पठारावरच्या जंगलात शिरावे. आता डेरमाळचा डोंगर आणि समोरचा डोंगर यांना जोडणारी खिंड आपल्या मागे रहाते. आता डेरमाळची तटबंदी आपल्या डोक्यावर उजवीकडच्या कड्यावर असते. आता वाट चढणीला लागते, वाटेत किल्ल्याच्या तीन पडझड झालेल्या दरवाज्यांचे अवशेष दिसतात. शेवटच्या दरवाज्या जवळून वाट पून्हा ‘यू’ आकाराचे वळण घेऊन डेरमाळच्या माचीवर जाते.
उत्तर लिहिले · 14/7/2020
कर्म · 20065
1
किल्ले डेरमाळ हा महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला गाळणा डोंगर रांगेत समाविष्ट आहे. या किल्ल्याने एकूण ३१ किलोमीटरवरचे क्षेत्रफळ व्यापले आहे.
उत्तर लिहिले · 14/7/2020
कर्म · 7815
0
 किल्ले महादेवगड



   http://bit.ly/3nTKXbP
__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव __________________________     

आंबोली कोणाला माहित नाही.? प्रत्येक पर्यटक प्रेमीला पावसाळ्यात आंबोली खुणावत असते.तर इतिहास प्रेमीना किल्लयासाठी खुणावत असते, निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्‍या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून या ठिकाणाला ओळखतात. आंबोलीत किल्ला आहे हे येथे येणारया बरयाच पर्यटकांना माहिती नाही. या आंबोलीत अनेक पहाण्याची ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे "महादेवगड" पॉंईंट. आंबोली गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्या पर्यंत डांबरी रस्ता आहे. किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी पारपोली घाटवर लक्ष ठेवण्यासाठी महादेवगड हा किल्ला बांधण्यात आला.
http://bit.ly/3nTKXbP

*किल्लयाचा इतिहास*
महादेवगड सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड(दुसरे) सावंतांनी बांधला.1730च्या सुमारास कोल्हापुरकरांनी सावंतवाडीवर दुसरा हल्ला केला. यात कोल्हापुरच्यावतीने सरदार उदाजीराव मोहिते हे नेतृत्व करत होते; मात्र सावंतवाडीकरांच्या चोख प्रतित्युत्तरामुळे त्यांना परतावे लागले. हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांना पोर्तुगिजांशीही दोन हात करावे लागले. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,त्यांच्या कारकिर्दीत सावंतवाडी संस्थानात काही नवे किल्ले बांधण्यात आले. यात फुकेरी येथील हनुमंतगड, गेळे येथील नारायणगड, आंबोली येथील महादेवगड, सोनवडे येथील नरसिंहगड किंवा सोनगड, मसुरे येथील भरतगड, ओवळीये तर्फे मालंड येथील सिदगड, आवाडे येथील आवर किल्ला आणि हळर्ण (गोवा) येथील कोट याची उभारणी केली. शिवाय कुडाळ, बांदा, डिचोली, साखळी, वेंगुर्ले येथील जुन्या कोटांची डागडूजी केली. महादेवगड किल्याला एकेकाळी किल्ल्याला तटबंदी, बुरुज होते. तटबंदी भोवती खंदक होता, पण आज यापैकी काहीही अस्तित्वात नाही.किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत.फोंड सावंत दुसरे यांनी आंबोलीत नारायणगड आणि महादेवगड असे दोन वनदुर्ग बांधले. महादेवगड पारपोली घाटीच्या शिखरावर होता. गेळेच्या हद्दीत नारायणगड होता. महादेवगडावर पुढे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. ब्रिटीशांनी तो उद्‌ध्वस्त केला. नारायणगड हा मोठा किल्ला नव्हता. कोकणातून घाट चढून वर आल्यावर जकातीचे मेट याच किल्ल्याच्या ठिकाणी होते..गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड दिसतात.आज महादेवगडावर काही शिल्लक नाही.नाही म्हणायला एक पॉंईट गडाच्या नावाने आपले अस्तित्व दाखवत ऊभा आहे. पर्यटक येतात दंगामस्ती करतात.व निघुन जातात. कधीकाळचा बलाढ्य महादेवगड हे मुकपणे पहात ऊभा आहे.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
©माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
0
ठाणे-आजोबा पर्वत: श्री रामांच्या मुलांचे जन्मस्थान ⭕

ठाणे जिल्ह्यातील शहापूर शहरापासून 48 किलोमीटर वरती आजोबा पर्वत आहे. ह्या पर्वतावर श्री रामाच्या काळामध्ये सीता माता या पर्वतावर आल्या होत्या. ह्याच पर्वताच्या उंच खडकाळ कोरलेल्या भागामध्ये लव आणि कुश यांचा जन्म झाला होता. असे पवित्र ठिकाण ठाणे जिल्ह्याच्या एक टोकाला असून ह्या पर्वतावर रामनवमी तसेच सुट्टीच्या दिवशी पर्यटक, भक्तगण राज्यातून, देशातून येत आहेत.

श्री रामाच्या काळामध्ये सीता मातेने लव, कुश याना जन्म दिलेल्या ठिकाण पर्वतावर दगडामध्ये कोरलेले आहे. ह्या ठिकाणी सीता माई आपल्या दोन मुलासमावेत राहत होती. ह्याच पर्वताच्या पायथ्याशी वाल्मिकी ऋषींचे आश्रम आहे. याआश्रमामध्ये लव, कुश यांनी धनूरविद्याचे ज्ञान वाल्मिकीऋषिकडून भेटले आहे. वाल्मिकी ऋषींना लव आणि कुश आजोबा म्हणतअसत, त्यामुळे या पर्वताला आजोबा पर्वत असे नाव पडले आहे. या आश्रमात वाल्मिकी ऋषींची समाधी आहे. इतिहास कालीन वीरगळआहेत, ऋषी ज्या ठिकाणी तपश्चर्या करायचे त्या ठिकाणी शंकराची पिंड देखील आहे. आजही त्या ठिकाणी लव आणि कुश यांच्या पाऊलखुणा भक्तगनाना पहावयास मिळतात. त्यामुळे भक्तगण वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात येऊन आश्रमाची सेवा करत आहेत. सह्याद्री डोंगर रांगांच्या सरळ रेषेत हा आजोबा पर्वत आहे. त्याच्या एका बाजूला रतनगड, अलंग मदन कुलंग, कोकणकडा, सांदनदरी तसेच राज्यातील उंच कळसुबाई शिखर देखील या आजोबा पर्वतावरून पहावयास मिळते. तसेच पर्वताच्या दक्षिणेला मालशेज घाटाचा परिसर दिसतो.ठाणे जिल्ह्यातील शहापूर वरून डोलखांब तिथून आजोबा पर्वत असे प्रवास करावा लागतो. माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट  या पर्वतावर जाण्याकरिता वाहनाने गेले तर पर्वताच्या पायथ्याशीच वाहने उभी करून ठेवावी लागते आहे. वाल्मिकी ऋषींच्या समाधी स्थळापर्यंत रस्ता माती आणि दगडांचा असल्यामुळे ह्या रस्त्यांवरून वाहने घेऊन जाणे कठीण होते. पायथ्यापासून पर्वतावरील लव, कुश यांच्या जन्मस्थानपर्यंत जाण्याकरिता सुमारे दोन तास वेळ लागतो. एका दिवसांमध्ये आजोबा पर्वतावर जाता येत असल्यामुळे संध्याकाळ पर्यंतघरी परतता येत असल्यामुळे या ठिकाणी पर्यटक आणि भक्तगणांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.

3
सह्याद्रि पर्वताच्या पठारावरील उपरांगा :

विस्तार : महाराष्ट्र पठारावर पूर्व – पश्चिम दिशेत (वायव्य – आग्नेय)

A. सातमाळा – अजिंठा डोंगररांगा :

पूर्व – पश्चिम दिशेत

जिल्हा – नाशिक, नंदुरबार, धुळे, नगर, औरंगाबाद, जालना, परभणी, बुलढाणा, वाशिम, नांदेड, यवतमाळ.

उंची – 200 ते 300 मीटर

ही रांगसलग नसून तुटक स्वरुपात आहे.

पश्चिमेकडील भागास – ‘सातमाळा’

पूर्वेकडील भागास – ‘अजिंठा’ म्हणतात.

या डोंगर रांगेतच देवगिरीचा किल्ला व वाघुर नदीच्या खोर्‍यात अजिंठा लेण्या आहेत.

या रांगेचा भाग म्हणून पुढील स्थानिक डोंगरांचा समावेश होतो.

  • धुळे – गाळणा डोंगर
  • नांदेड – निर्मल डोंगर
  • औरंगाबाद – वेरूळ डोंगर
  • हिंगोली – हिंगोली डोंगर
  • नांदेड – मुदखेड डोंगर
  • यवतमाळ – पुसद टेकड्या
  • सातमाला – सप्तश्रुंगी(1416 मी. ), तौला – (1231 मी.), अंकाई – टंकाई – (961 मी.), सुरपालनाथ – (958 मी.),
  • सतमाळा – (945 मी.)
  • अजिंठा – शिरसाळा (885 मी.), बुलढाणा (546 मी.)
  • पठार – मालेगाव व बुलढाणा पठार.
B. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर :

आग्नेय : वायव्य दिशेत.

जिल्हा : पुणे, नगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर.

नाणे घाटापासून(हरिश्चंद्र – 1424) पूर्वेकडे उंची कमी होत जाते. ही डोंगररांग पुढे आग्नेयेस हैद्राबादपर्यंत जाते.

पश्चिमेकडील भागात : हरिश्चंद्र गड व पूर्वेकडील भागास – बालाघाट.

या डोंगर रांगेत पुढील डोंगररांगांचा समावेश होतो.

अहमदनगर – हरिश्चंद्र डोंगर, पुणे – तसूमाई डोंगर, अहमदनगर – बाळेश्वर डोंगर इ.

बीड, लातूर, उस्मानाबाद, जिल्ह्यात बालाघाट डोंगर पसरली आहे.

बालाघाट डोंगर रांगेत तुळजाभवानी मातेचे प्रसिद्ध मंदिर व नळदुर्ग येथे नळराजांनी बांधलेला किल्ला आहे.

C. महादेव डोंगर रांगा :

वायव्य ते आग्नेय दिशेत.

महाबळेश्वर – पाचगणीपासून आग्नेयेस.

आग्नेयकडे कर्नाटककाकडे कमी होते.

या डोंगररांगेत शंभू महादेवाचे पवित्र देवालय आहे. (शिखर शिंगनापुर)

या रांगेत पुढील डोंगर आहेत. सातारा -बामणोली, कर्हाड – आगाशीव डोंगर.

या रांगेत सासवड पठार, औंध पठार, खानापूर पठाराचा समावेश होतो.

महाराष्ट्रातील इतर स्थानिक डोंगर

1) कोल्हापूर-पन्हाळा व ज्योतिबा डोंगर, चिकोरी डोंगर

2) नंदुरबार – सातपुडा पर्वताचा भाग, तोरणमाळ डोंगर

3) अमरावती – गाविलगड टेकड्या व मेलघाट डोंगर

4) नागपूर – गरमसुर, अंबागड व मनसर टेकड्या

5) गडचिरोली – भामरागड, सुरजगड, चिरोली, चीमुर टेकड्या

6) भंडारा – दरेकसा, नवेगाव टेकड्या

7) गोंदिया – दरेकसा, नवेगाव टेकड्या

8) चंद्रपुर – चांदूरगड, पेरजागड.

उत्तर लिहिले · 21/2/2019
कर्म · 55350
0

साल्हेर शिखर हे नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात स्थित आहे.

हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे.

उत्तर लिहिले · 19/3/2025
कर्म · 1820