पर्यटन गडदुर्ग डोंगर इतिहास

महादेवगड बद्दल माहिती द्या?

2 उत्तरे
2 answers

महादेवगड बद्दल माहिती द्या?

0
 किल्ले महादेवगड



__________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगांव __________________________     

आंबोली कोणाला माहित नाही.? प्रत्येक पर्यटक प्रेमीला पावसाळ्यात आंबोली खुणावत असते.तर इतिहास प्रेमीना किल्लयासाठी खुणावत असते, निसर्गरम्यता आणि चांगले हवामान यासाठी प्रसिद्ध आहे. सभोवताली पसरलेले दाट जंगल, डोंगरदर्‍या, अप्रतिम सृष्टिसौंदर्य हे या स्थानाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्र राज्याचे चेरापुंजी म्हणून या ठिकाणाला ओळखतात. आंबोलीत किल्ला आहे हे येथे येणारया बरयाच पर्यटकांना माहिती नाही. या आंबोलीत अनेक पहाण्याची ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे "महादेवगड" पॉंईंट. आंबोली गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्या पर्यंत डांबरी रस्ता आहे. किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत. पूर्वीच्या काळी कोकणातील मालवण, वेंगुर्ला, रेडी इत्यादी बंदरात उतरणारा माल विविध घाटमार्गांनी घाटामाथ्यांवरील बाजारपेठात जात असे. यापैकी पारपोली घाटवर लक्ष ठेवण्यासाठी महादेवगड हा किल्ला बांधण्यात आला.

*किल्लयाचा इतिहास*
महादेवगड सावंतवाडी संस्थानाच्या अनासाहेव फोंड(दुसरे) सावंतांनी बांधला.1730च्या सुमारास कोल्हापुरकरांनी सावंतवाडीवर दुसरा हल्ला केला. यात कोल्हापुरच्यावतीने सरदार उदाजीराव मोहिते हे नेतृत्व करत होते; मात्र सावंतवाडीकरांच्या चोख प्रतित्युत्तरामुळे त्यांना परतावे लागले. हा संघर्ष सुरू असतानाच फोंड सावंत दुसरे यांना पोर्तुगिजांशीही दोन हात करावे लागले. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवड़गावची पोस्ट,त्यांच्या कारकिर्दीत सावंतवाडी संस्थानात काही नवे किल्ले बांधण्यात आले. यात फुकेरी येथील हनुमंतगड, गेळे येथील नारायणगड, आंबोली येथील महादेवगड, सोनवडे येथील नरसिंहगड किंवा सोनगड, मसुरे येथील भरतगड, ओवळीये तर्फे मालंड येथील सिदगड, आवाडे येथील आवर किल्ला आणि हळर्ण (गोवा) येथील कोट याची उभारणी केली. शिवाय कुडाळ, बांदा, डिचोली, साखळी, वेंगुर्ले येथील जुन्या कोटांची डागडूजी केली. महादेवगड किल्याला एकेकाळी किल्ल्याला तटबंदी, बुरुज होते. तटबंदी भोवती खंदक होता, पण आज यापैकी काहीही अस्तित्वात नाही.किल्ल्यावर कोणतेही अवशेष नाहीत.फोंड सावंत दुसरे यांनी आंबोलीत नारायणगड आणि महादेवगड असे दोन वनदुर्ग बांधले. महादेवगड पारपोली घाटीच्या शिखरावर होता. गेळेच्या हद्दीत नारायणगड होता. महादेवगडावर पुढे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. ब्रिटीशांनी तो उद्‌ध्वस्त केला. नारायणगड हा मोठा किल्ला नव्हता. कोकणातून घाट चढून वर आल्यावर जकातीचे मेट याच किल्ल्याच्या ठिकाणी होते..गडावरून पश्चिमेला मनोहर-मनसंतोष गड दिसतात.आज महादेवगडावर काही शिल्लक नाही.नाही म्हणायला एक पॉंईट गडाच्या नावाने आपले अस्तित्व दाखवत ऊभा आहे. पर्यटक येतात दंगामस्ती करतात.व निघुन जातात. कधीकाळचा बलाढ्य महादेवगड हे मुकपणे पहात ऊभा आहे.
अनिल पाटील पेठवडगाव
9890875498
©माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
0
महादेवगड

महादेवगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 900 मीटर उंचीवर आहे.

इतिहास:

  • हा किल्ला यादव काळात बांधला गेला.
  • शिवाजी महाराजांनी १६६२ मध्ये हा किल्ला जिंकला.
  • इ.स. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला.

भौगोलिक माहिती:

  • महादेवगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात आहे.
  • हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला आहे.
  • किल्ल्याच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे.

किल्ल्यावरील ठिकाणे:

  • महादेवाचे मंदिर
  • हनुमानाचे मंदिर
  • तलाव
  • पाण्याचे टाके
  • बुरुज

गडावर जाण्यासाठी मार्ग:

  • महाड-पंढरपूर मार्गावर असणाऱ्या केळद गावानजीकBasecamp आहे.
  • मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरून केळद फाट्यावरूनBasecamp गाठता येते.
  • पुणे-महाड बस पकडूनBasecamp गाठता येते.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1820

Related Questions

सल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
डेरमाळ किल्ला असलेल्या डोंगररांगेची माहिती मिळेल का?
डेरमाळ किल्ला असलेल्या डोंगररांगेचे नाव काय?
आजोबा पर्वत कोठे आहे, माहिती सांगा?
महाराष्ट्रामध्ये डोंगररांगा कोणकोणत्या व कुठे आहेत?
साल्हेर शिखर कोणत्या तालुक्यात आहे?
महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणते?