2 उत्तरे
2
answers
दुधाचे दही करणारा दगड असतो का?
5
Answer link
दुधाचे दही करण्यासाठी त्यामध्ये दह्याचेच थोडे विरजण घातले जात असते. मात्र, एखादा दगड दुधाच्या संपर्कात आणल्यावर दुधाचे घट्ट दही बनले जाईल याची तुम्ही कल्पना करू शकता का? राजस्थानमधील जैसलमेरजवळील एका गावात असे दगड मिळतात. हे पिवळसर दगड त्यांच्या या गुणधर्मामुळेच देश-विदेशात चर्चेत आहेत.*
जैसलमेरपासून 50 किलोमीटरवरील हाबुरगाव येथे हे दगड आहेत. तेथील लोक शेकडो वर्षांपासून दुधाचे दही बनवण्यासाठी या दगडाचा वापर करतात. हाबूरगावला सध्या पूनमनगर म्हणून ओळखले जाते. तेथील या दगडात अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत. त्याला स्थानिक भाषेत ‘हाबुरिया भाटा’ म्हणून ओळखले जाते. दुधापासून दही बनवण्यासाठी जे गुण किंवा रसायने आवश्यक असतात ते या दगडात आहेत.꧁इंग्रजीत या दगडांना ‘हाबूर स्टोन’ म्हणून ओळखले जाते. हा दगड दुधात ठेवल्यावर चौदा तासांमध्ये घट्ट दही बनते. अनेक देशी-विदेशी संशोधकांनी या दगडाच्या चाचण्या घेतल्या आहेत. या दगडात दही बनवण्यासाठीचे अमिनो अॅसिड, फिनायल एलिनिया आणि रिफ्टोफेन टायरोसीन ही तिन्ही रसायने असल्याचे दिसून आले. हा दगड आकर्षक रंगाचा व चमकदार असल्याने त्यापासून शोभेच्या वस्तू, पेले, थाळ्या, ट्रे, माळ, फुलदाणी, कप, मूर्ती तसेच अॅक्युप्रेशर उत्पादनेही बनवली जातात.
-----------------------------------------------
*WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498* ☜♡☞
*📍म҉ ा҉ हित҉ ी҉ स҉ े҉ व҉ ा҉ ग्र҉ ू҉ प҉ ,҉ प҉ े҉ ठ҉ व҉ ड҉ ग҉ ा҉ व҉ 📍*
*_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ*
-----------------------------------------------
*WᕼᗩTᔕAᑭᑭ 9890875498* ☜♡☞
*📍म҉ ा҉ हित҉ ी҉ स҉ े҉ व҉ ा҉ ग्र҉ ू҉ प҉ ,҉ प҉ े҉ ठ҉ व҉ ड҉ ग҉ ा҉ व҉ 📍*
*_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ*
0
Answer link
नाही, दुधाचे दही करणारा कोणताही दगड अस्तित्वात नाही. दही बनवणं ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.
दही कसे बनते?
- दही बनवण्यासाठी दुधात 'लॅक्टोबॅसिलस' नावाचे बॅक्टेरिया (जिवाणू) लागतात.
- हे जिवाणू दुधातील 'लॅक्टोज' नावाच्या साखरेला 'लॅक्टिक ऍसिड' मध्ये रूपांतरित करतात.
- लॅक्टिक ऍसिडमुळे दुधातील प्रोटीन (casein) गोठते आणि दही तयार होते.
दही बनवण्यासाठी योग्य तापमान आणि जिवाणूंची आवश्यकता असते, दगडाची नाही.
अधिक माहितीसाठी:
yogurt stone