Topic icon

नैसर्गिक जग

0
जगात सर्वात उंच आणि मोठे झाड अमेरिकेमध्ये आहे. त्यांची लांबी, रुंदी व उंची खालीलप्रमाणे:
  • सर्वात उंच झाड: 'हायपेरिअन' नावाचे रेडवुडचे झाड हे जगातील सर्वात उंच झाड आहे. हे झाड अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील रेडवुड नॅशनल पार्कमध्ये (Redwood National Park) आहे.
  • उंची: या झाडाची उंची सुमारे 379.7 फूट (115.7 मीटर) आहे.
  • सर्वात मोठे झाड: 'जनरल शेरमन' नावाचे सिक्वोइयाचे झाड हे जगातील सर्वात मोठे झाड आहे. हे झाड अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील सिक्वोइया नॅशनल पार्कमध्ये (Sequoia National Park) आहे.
  • उंची: या झाडाची उंची सुमारे 275 फूट (83 मीटर) आहे.
  • परिघ: झाडाच्या तळाचा परिघ 102 फूट (31 मीटर) पेक्षा जास्त आहे.

या झाडांची माहिती रेडवुड नॅशनल पार्क आणि सिक्वोइया नॅशनल पार्कच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 31/7/2025
कर्म · 2200
5
दुधाचे दही करण्यासाठी त्यामध्ये दह्याचेच थोडे विरजण घातले जात असते. मात्र, एखादा दगड दुधाच्या संपर्कात आणल्यावर दुधाचे घट्ट दही बनले जाईल याची तुम्ही कल्पना करू शकता का? राजस्थानमधील जैसलमेरजवळील एका गावात असे दगड मिळतात. हे पिवळसर दगड त्यांच्या या गुणधर्मामुळेच देश-विदेशात चर्चेत आहेत.*

जैसलमेरपासून 50 किलोमीटरवरील हाबुरगाव येथे हे दगड आहेत. तेथील लोक शेकडो वर्षांपासून दुधाचे दही बनवण्यासाठी या दगडाचा वापर करतात. हाबूरगावला सध्या पूनमनगर म्हणून ओळखले जाते. तेथील या दगडात अनेक प्रकारचे गुणधर्म आहेत. त्याला स्थानिक भाषेत ‘हाबुरिया भाटा’ म्हणून ओळखले जाते. दुधापासून दही बनवण्यासाठी जे गुण किंवा रसायने आवश्यक असतात ते या दगडात आहेत.꧁इंग्रजीत या दगडांना ‘हाबूर स्टोन’ म्हणून ओळखले जाते. हा दगड दुधात ठेवल्यावर चौदा तासांमध्ये घट्ट दही बनते. अनेक देशी-विदेशी संशोधकांनी या दगडाच्या चाचण्या घेतल्या आहेत. या दगडात दही बनवण्यासाठीचे अमिनो अ‍ॅसिड, फिनायल एलिनिया आणि रिफ्टोफेन टायरोसीन ही तिन्ही रसायने असल्याचे दिसून आले. हा दगड आकर्षक रंगाचा व चमकदार असल्याने त्यापासून शोभेच्या वस्तू, पेले, थाळ्या, ट्रे, माळ, फुलदाणी, कप, मूर्ती तसेच अ‍ॅक्युप्रेशर उत्पादनेही बनवली जातात.
-----------------------------------------------
*WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
*📍म҉ ा҉ हित҉ ी҉  स҉ े҉ व҉ ा҉  ग्र҉ ू҉ प҉ ,҉   प҉ े҉ ठ҉ व҉ ड҉ ग҉ ा҉ व҉  📍*
*_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ_ᑎ*
5
  • *वाळवंटे*
******************

वर्षाकाठी जेमतेम चार इंच पाऊस तोही पडणार कधी, याबद्दल कोणीही खात्री देऊ शकत नाही. अशी ठिकाणे जगात खूप आहेत. पण भुरभूर उडणारी, वाऱयाबरोबर जागा बदलणारी वाळू मात्र फक्त वाळवंटातच सापडते. जागा बदलणारे वाळूचे डोंगर, प्रचंड गरम तापमान व पाण्याचा पत्ताच नाही, अशा ठिकाणी माणसालाच काय पण इतर प्राण्यांनाही वस्ती करणे अवघड झाले नाही, तर नवल !

वाळवंटे का तयार झाली असावीत ? गरम तप्त हवेचे प्राधान्य असलेली वाळवंटे मुख्यतः उष्ण कटिबंधीय भागाच्या जवळच्या पट्ट्यातील जास्त दाबाच्या भागात आढळतात. या भागात मुळातच पाऊस कमी पडतो. युरोपमध्ये आशिया व आफ्रिका खंडांकडे वाहणारे जोराचे वारे मान्सूनची प्रगती कमी जास्त करतात. त्यामुळे या पट्ट्यातील पावसाचे प्रमाण अधिकच घटते.

पाळीव प्राण्यांनी या भागातील झाडेझुडपे गेल्या शतकात खाऊन फस्त केलेली आहेत. पाऊस नसल्याने ती पुन्हा वाढूच शकली नाहीत. त्यातच वाळू उडून तिचे आक्रमण चांगल्या जमिनीवर होत आहेच.

जमीन जेमतेम ७० वर्षांपूर्वी जगाच्या पाठीवरील वाळवंटासमान जामीन ९.४ टक्के होती. ती आता वाढत जाऊन २३.३ टक्के झाली आहे. राजस्थानच्या वाळवंटाच्या जागी जेमतेम सहा हजार वर्षांपूर्वी छानशी तळी व उत्तम शेती होती, असा निष्कर्ष काही ठिकाणच्या पाण्यावरून व उत्खननावरून निघाला आहे. याचा अर्थ मूळची अगदी लहान असलेली वाळवंटे वाढत व पसरत चालली आहेत. येत्या पन्नास वर्षात नीट काळजी घेतली नाही तर मध्य महाराष्ट्राचेही वाळवंटात रूपांतर होण्याचा धोका शास्त्रज्ञ वर्तवत आहेत.

वाळवंटात माणसे अगदी मोजक्याच ठिकाणी जेथे पाणी आढळेल तेथेच राहतात. अशा जागांना मरूउद्याने किंवा ओएसिस असे म्हटले जाते. या पाण्याच्या जागांचे वैशिष्ट्य म्हणजे विश्वास बसू नये अशा स्वरूपाचे हिरवे स्वरूप या ठिकाणी वनस्पतींच्या अस्तित्वाने आलेले असते. वाळवंटातील जीवन आढळते, ते अशा मोजक्याच ठिकाणी.

अन्यत्र असतात ते मोजकेच प्राणी. सरपटणारे प्राणी, काही जातींचे विंचू, खारी व वाळवंटी साप यांचा वावर पाहायला मिळतो. उन्हापासून स्वतःचे रक्षण करून घ्यायला हे दिवसा खोलवर वाळूत दडून राहतात. रात्री पडणाऱ्या गारठ्यामुळे दवबिंदू तयार होतात, त्यांच्या पुरवठय़ावरच त्यांचे जीवन चालते. शरीरातून पाण्याचे उत्सर्जन इतके कमी असते की, त्यांचे मुत्र म्हणजे जवळपास कोरडे खडेच (dry crystals of Urea) असतात. क्वचित कोल्हे, तरस व काही रानमांजरेही या प्रदेशात आढळतात. उंट माणसांच्या संगतीनेच आढळतात. वाहतुकीचे मुख्य साधन म्हणजे उंटच. त्याच्या फताड्या आकाराच्या पायांमुळे वाळूतही तो आरामात वावरू शकतो. कित्येक दिवस पाण्याशिवाय काढू शकतो.

वाळवंटातील तापमान उणे वीस ते अधिक पन्नास या सेंटिग्रेडदरम्यान रेंगाळत असते. कडक हिवाळा व अतिकडक उन्हाळा या गोष्टींचा एकाच जागी अनुभव त्यामुळे मिळू शकतो.

वाळूची वादळे हा वाळवंटातला भीषण अनुभव असतो. कित्येक तास चालू असतो कित्येक तास चालू असणार्या वादळाला उघड्यावर तोंड देणे जवळपास अशक्यच असते. भर दुपारी उन्हाळ्यात सूर्यही दिसू नये इतके वाळूचे वादळ सारे आकाश झाकाळून टाकत असते. या वादळांमुळेच वाळूंचे टेकाडे सतत जागा बदलत असतात, तर नेहमीची हवा वाळूवर रेघोट्यांच्या लांबलचक रेघा उमटवत असते.

तापलेल्या वाळूमध्ये लांबवर नजर टाकली की, लांबवर मृगजळे दिसणे हा वाळवंटी दृष्टिभ्रमाचा प्रकार तर चुकलेल्या वाटसरूंना नेहमीच अनुभवायला मिळतो.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 13/2/2019
कर्म · 569245
15
*पक्षी मरतांना कुठे जातात?*

नरेश साधवानी यांच्या मूळ इंग्रजी लेखाचा मी केलेला अनुवाद

प्रसन्न सकाळी मी माझ्या आवडीच्या चहा पिण्याच्या जागेवर बसुन नेहमीप्रमाणे आजुबाजुच्या घनदाट वटवृक्षांवर  चिवचिवाट करणार्‍या माझ्या सोयर्‍यांना ऐकत होतो. सर्वच जण तिथे कायमचेच रहिवासी होतो. माझी सकाळ आणि त्यांचे वटवृक्षांमधुन चिवचिवणे हा दररौजचा उपक्रम. त्या दिवशी मात्र माझ्या मनात माहित नाही पणगेली कित्येक वर्षे मी या माझ्या मित्रांना चिवचिवाट करतांना, भांडतांना ,मारामार्‍या करतांना बघीतलेय पण आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन  कुठे आमच्या काँलनीच्या परिसरात मृतावस्थेत  पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही. हा एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्‍याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षि आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.
मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गीक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मी गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दीले नाही. अनेक पक्षी निरिक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही.

आणि मग ह्या प्रयत्नातच मला एक रंजक लेख वाचायला मिळाला "Dying pattern of Birds"
ह्या लेखात काॅर्क बिशप ल्युसी  यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच  असे आव्हान दीलेय की कुणीही जगात नैसर्गीक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा.  आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीहि स्विकारलेले नाही. लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दीलिय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,
पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतित ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात.
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जिवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समिप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गीक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बीशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रीय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जिवनकाल संपत आलाय. आणि ही जाणिव हौताच पक्षि आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीचचढत जातात. बीशप ची ही थेअरी मला तरी स्विकारार्ह वाटते  कारण दूसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजुनपर्यत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडुन कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणु शकतो की पक्षी मानवापेक्षा  उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव  होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवु शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलिही खंत चिंता न बाळगता उंच उडून  शरीराचे  विघटन करुन टाकतो.न वयानूसार येणार्‍या व्याधी,न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सिमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकारणारी. आणि स्वतःच्या मृत्युची वेळ पण स्वतःच निश्चित करणारी... मोक्ष अजुन काय वेगळा असतो?
उत्तर लिहिले · 29/12/2018
कर्म · 569245
6
बेडकांचा पाऊस पडत नाही, तर ज्या वेळी पाऊस पडतो, ज्या ठिकाणी पाणी साचते त्यावेळी अनेक ठिकाणी बेडकांचा आवाज येतो. कारण त्यावेळी त्यांचे प्रजनन होते. नंतर पाणी जसे कमी होते तसे ते आपल्या सुरक्षेसाठी ओलसर किंवा ज्या ठिकाणी पाणी साठते अशाच ठिकाणी ते ओलसर जाग्यावर जमिनीत खोलवर जाऊन बसतात आणि मादी पिलांना जन्म देते. परत पाऊस किंवा पाणी साठवलेल्या जागी वर येतात. त्यामुळे पाणी ज्या भागात साचते, नदी, ओढे, नाले किंवा पाणथळ जागा त्या ठिकाणी पावसाळ्यात अनेक लहान मोठे असंख्य बेडूक दिसून येतात.
उत्तर लिहिले · 10/9/2017
कर्म · 9605
3
अंटार्टिका हा बर्फाच्छादित ( भूभाग बर्फाने आच्छादित) खंड आहे. आणि जरी तो एक  निव्वळ  बर्फाचा तुकडा असता तरी तो तेथील पाण्यावरच तरंगत राहील.
पृथ्वीचं गुरुत्वीय बल सगळीकडं जवळपास सारखाच आहे आणि एकादी वस्तू खाली पाडण्या मागे हे बल असते, घनता नाही!

एकादी जास्त घनता असलेली वस्तू कमी घनता असलेल्या द्रावणात बुडते. पण पृथ्वी हि काही द्रावण नाही. त्यामुळे  एखादी गोष्ट किंवा खंड उत्तर गोलार्धात आहे म्हणजे त्याची घनता कमी आणि दक्षिण गोलार्धात आहे म्हणून घनता जास्त असं काही नाही, नाहीतर सगळा जमिनीचा भाग एकत्र येऊन दक्षिण गोलार्धत आला असता.

अंटार्क्टिकामध्ये उणे तापमान ही सर्वसाधारण व नित्याची बाब आहे. उन्हाळ्यात समुद्रकिनाऱ्यालगतच्या भागात तापमान सरासरी ० ते ५ किंवा ७ अंश सेल्सियसपर्यंत जाते पण हेच तापमान हिवाळ्यात -४० अंश सेल्सियस पर्यंत जाऊन पोहोचते. आतल्या भागात म्हणजेच पठारी आणि पर्वतीय क्षेत्रात उन्हाळ्यामध्ये तापमान -२० ते -३५ अंशसेल्सियस इतके असते तर हेच तापमान हिवाळ्यात -७० ते -८० अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहोचते. जगामध्ये कुठल्याही जागी सर्वात कमी तापमानाची जर नोंद झालेली असेल तर ती झाली आहे अंटार्क्टिकामध्येच. सन १९८३ मध्ये रशियाच्या 'वोस्तोक' नावाच्या संशोधन केंद्रामध्ये जगातील सर्वात कमी तापमानाची नोंद घेण्यात आली आणि ते तापमान होतं -८९ अंश सेल्सियस.

एवढ्या थंड तापमानामुळे हवेमध्ये पाण्याचं फार कमी असते, सर्व पाणी बर्फ बनुन खाली पडते.

उत्तर लिहिले · 23/7/2017
कर्म · 99520