प्रवास भूगोल नैसर्गिक जग

वाळवंटाबद्दल माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

वाळवंटाबद्दल माहिती मिळेल का?

5
  • *वाळवंटे*
******************

वर्षाकाठी जेमतेम चार इंच पाऊस तोही पडणार कधी, याबद्दल कोणीही खात्री देऊ शकत नाही. अशी ठिकाणे जगात खूप आहेत. पण भुरभूर उडणारी, वाऱयाबरोबर जागा बदलणारी वाळू मात्र फक्त वाळवंटातच सापडते. जागा बदलणारे वाळूचे डोंगर, प्रचंड गरम तापमान व पाण्याचा पत्ताच नाही, अशा ठिकाणी माणसालाच काय पण इतर प्राण्यांनाही वस्ती करणे अवघड झाले नाही, तर नवल !

वाळवंटे का तयार झाली असावीत ? गरम तप्त हवेचे प्राधान्य असलेली वाळवंटे मुख्यतः उष्ण कटिबंधीय भागाच्या जवळच्या पट्ट्यातील जास्त दाबाच्या भागात आढळतात. या भागात मुळातच पाऊस कमी पडतो. युरोपमध्ये आशिया व आफ्रिका खंडांकडे वाहणारे जोराचे वारे मान्सूनची प्रगती कमी जास्त करतात. त्यामुळे या पट्ट्यातील पावसाचे प्रमाण अधिकच घटते.

पाळीव प्राण्यांनी या भागातील झाडेझुडपे गेल्या शतकात खाऊन फस्त केलेली आहेत. पाऊस नसल्याने ती पुन्हा वाढूच शकली नाहीत. त्यातच वाळू उडून तिचे आक्रमण चांगल्या जमिनीवर होत आहेच.

जमीन जेमतेम ७० वर्षांपूर्वी जगाच्या पाठीवरील वाळवंटासमान जामीन ९.४ टक्के होती. ती आता वाढत जाऊन २३.३ टक्के झाली आहे. राजस्थानच्या वाळवंटाच्या जागी जेमतेम सहा हजार वर्षांपूर्वी छानशी तळी व उत्तम शेती होती, असा निष्कर्ष काही ठिकाणच्या पाण्यावरून व उत्खननावरून निघाला आहे. याचा अर्थ मूळची अगदी लहान असलेली वाळवंटे वाढत व पसरत चालली आहेत. येत्या पन्नास वर्षात नीट काळजी घेतली नाही तर मध्य महाराष्ट्राचेही वाळवंटात रूपांतर होण्याचा धोका शास्त्रज्ञ वर्तवत आहेत.

वाळवंटात माणसे अगदी मोजक्याच ठिकाणी जेथे पाणी आढळेल तेथेच राहतात. अशा जागांना मरूउद्याने किंवा ओएसिस असे म्हटले जाते. या पाण्याच्या जागांचे वैशिष्ट्य म्हणजे विश्वास बसू नये अशा स्वरूपाचे हिरवे स्वरूप या ठिकाणी वनस्पतींच्या अस्तित्वाने आलेले असते. वाळवंटातील जीवन आढळते, ते अशा मोजक्याच ठिकाणी.

अन्यत्र असतात ते मोजकेच प्राणी. सरपटणारे प्राणी, काही जातींचे विंचू, खारी व वाळवंटी साप यांचा वावर पाहायला मिळतो. उन्हापासून स्वतःचे रक्षण करून घ्यायला हे दिवसा खोलवर वाळूत दडून राहतात. रात्री पडणाऱ्या गारठ्यामुळे दवबिंदू तयार होतात, त्यांच्या पुरवठय़ावरच त्यांचे जीवन चालते. शरीरातून पाण्याचे उत्सर्जन इतके कमी असते की, त्यांचे मुत्र म्हणजे जवळपास कोरडे खडेच (dry crystals of Urea) असतात. क्वचित कोल्हे, तरस व काही रानमांजरेही या प्रदेशात आढळतात. उंट माणसांच्या संगतीनेच आढळतात. वाहतुकीचे मुख्य साधन म्हणजे उंटच. त्याच्या फताड्या आकाराच्या पायांमुळे वाळूतही तो आरामात वावरू शकतो. कित्येक दिवस पाण्याशिवाय काढू शकतो.

वाळवंटातील तापमान उणे वीस ते अधिक पन्नास या सेंटिग्रेडदरम्यान रेंगाळत असते. कडक हिवाळा व अतिकडक उन्हाळा या गोष्टींचा एकाच जागी अनुभव त्यामुळे मिळू शकतो.

वाळूची वादळे हा वाळवंटातला भीषण अनुभव असतो. कित्येक तास चालू असतो कित्येक तास चालू असणार्या वादळाला उघड्यावर तोंड देणे जवळपास अशक्यच असते. भर दुपारी उन्हाळ्यात सूर्यही दिसू नये इतके वाळूचे वादळ सारे आकाश झाकाळून टाकत असते. या वादळांमुळेच वाळूंचे टेकाडे सतत जागा बदलत असतात, तर नेहमीची हवा वाळूवर रेघोट्यांच्या लांबलचक रेघा उमटवत असते.

तापलेल्या वाळूमध्ये लांबवर नजर टाकली की, लांबवर मृगजळे दिसणे हा वाळवंटी दृष्टिभ्रमाचा प्रकार तर चुकलेल्या वाटसरूंना नेहमीच अनुभवायला मिळतो.

*'सृष्टी विज्ञानगाथा' या पुस्तकातून*
उत्तर लिहिले · 13/2/2019
कर्म · 569245
0
sure, here is some information about deserts:

वाळवंट: एक अद्वितीय भूभाग

वाळवंट हे एक विशिष्ट प्रकारचे भूभाग आहे जेथे पाऊस अत्यंत कमी असतो. वाळवंटी प्रदेशात वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी अत्यंत প্রতিকূল ಪರಿಸ್ಥಿತಿ असते.

वाळवंटाचे प्रकार:

  • उष्ण वाळवंट: हे वाळवंट विषुववृत्ताजवळ आढळतात, जिथे तापमान खूप जास्त असते. उदाहरण: सहारा वाळवंट.
  • थंड वाळवंट: हे वाळवंट उच्च अक्षांशांवर आढळतात आणि येथे हिवाळ्यात तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते. उदाहरण: गोबी वाळवंट.

वाळवंटातील जीवन:

वाळवंटी प्रदेशात राहणारे प्राणी आणि वनस्पती विशिष्ट परिस्थितीत जगण्यासाठी अनुकूल झालेले असतात.

  • उंट हा वाळवंटातील जीवनासाठी उत्तम उदाहरण आहे, जो कित्येक दिवस पाणी न पिता जगू शकतो.
  • कॅक्टससारख्या वनस्पती त्यांच्यामध्ये पाणी साठवून ठेवतात, ज्यामुळे त्यांना दुष्काळातही जिवंत राहता येते.

महत्वाची वाळवंटे:

  • सहारा वाळवंट (उत्तर आफ्रिका)
  • अरब वाळवंट (मध्य पूर्व)
  • गोबी वाळवंट (चीन आणि मंगोलिया)
  • ॲटाकामा वाळवंट (दक्षिण अमेरिका)

वाळवंटाचे महत्त्व: वाळवंटे पर्यावरणाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. अनेक वाळवंटी प्रदेशात खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे आहेत.

उत्तर लिहिले · 20/3/2025
कर्म · 2200

Related Questions

जगात सर्वात उंच व मोठे झाड कोठे आहे आणि त्यांची लांबी, रुंदी व उंची किती आहे, याची माहिती द्या?
वाळवंटात फिरून तहान खूप लागली असता माणूस काय पिईल? १) पाणी २) अमृत
दुधाचे दही करणारा दगड असतो का?
पक्षी मरताना कुठे जातात?
बेडकाचा पाऊस पडतो का?
जर बर्फ पाण्यावर तरंगतो, तर अंटार्क्टिका पृथ्वीच्या तळाला का?