कुतूहल प्राणी नैसर्गिक जग

बेडकाचा पाऊस पडतो का?

2 उत्तरे
2 answers

बेडकाचा पाऊस पडतो का?

6
बेडकांचा पाऊस पडत नाही, तर ज्या वेळी पाऊस पडतो, ज्या ठिकाणी पाणी साचते त्यावेळी अनेक ठिकाणी बेडकांचा आवाज येतो. कारण त्यावेळी त्यांचे प्रजनन होते. नंतर पाणी जसे कमी होते तसे ते आपल्या सुरक्षेसाठी ओलसर किंवा ज्या ठिकाणी पाणी साठते अशाच ठिकाणी ते ओलसर जाग्यावर जमिनीत खोलवर जाऊन बसतात आणि मादी पिलांना जन्म देते. परत पाऊस किंवा पाणी साठवलेल्या जागी वर येतात. त्यामुळे पाणी ज्या भागात साचते, नदी, ओढे, नाले किंवा पाणथळ जागा त्या ठिकाणी पावसाळ्यात अनेक लहान मोठे असंख्य बेडूक दिसून येतात.
उत्तर लिहिले · 10/9/2017
कर्म · 9605
0

बेडकाचा पाऊस पडणे ही एक दुर्मिळ आणि असामान्य घटना आहे.

वैज्ञानिक दृष्ट्या, बेडकांचा पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत, जसे की जोरदार वादळे किंवा भोवऱ्या (tornadoes), लहान बेडूक आणि मासे जोरदार वाऱ्यामुळे उडून जातात आणि काही अंतरावर पडू शकतात. ह्यामुळे लोकांना 'बेडकाचा पाऊस' पडल्याचा भास होतो.

या घटनेची नोंद अनेक वर्षांपासून आहे, परंतु याचे ठोस वैज्ञानिक स्पष्टीकरण अजूनही उपलब्ध नाही.

तुम्ही याबद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक बघू शकता:

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 2200

Related Questions

जगात सर्वात उंच व मोठे झाड कोठे आहे आणि त्यांची लांबी, रुंदी व उंची किती आहे, याची माहिती द्या?
वाळवंटात फिरून तहान खूप लागली असता माणूस काय पिईल? १) पाणी २) अमृत
दुधाचे दही करणारा दगड असतो का?
वाळवंटाबद्दल माहिती मिळेल का?
पक्षी मरताना कुठे जातात?
जर बर्फ पाण्यावर तरंगतो, तर अंटार्क्टिका पृथ्वीच्या तळाला का?