घरगुती उपाय आरोग्य व उपाय गुडघेदुखीवर उपाय शारीरिक समस्या आरोग्य

गुडघ्यातून टक टक असा आवाज येतो त्यावर काय उपाय आहे?

3 उत्तरे
3 answers

गुडघ्यातून टक टक असा आवाज येतो त्यावर काय उपाय आहे?

8
तुमचे आता वय झाले असेल म्हणून आवाज येत आहे.. सकाळी फिरायला जायचे....
उत्तर लिहिले · 14/6/2020
कर्म · 39105
2
काहीजणांच्या हाडांमधून उठता-बसताना सतत आवाज येतो. हा हाडांमधून आवाज येण्याचा प्रकार वेदनारहित असू शकते. मात्र, केव्हातरी होत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. परंतु, सतत असे होऊ लागल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे. असे होणे हे हाडांच्या अजारांचे संकेतही असू शकतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करून नये.अनेकदा हाडांमधून आवाज येताना वेदनाही होतात. हे लक्षण वारंवार दिसू लागल्यास त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिक वा रजोनिवृत्त महिलांबाबत असे घडणे हा चिंतेचा विषय असू शकतो, असे तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञ सांगतात की, हातांच्या बोटांतून आवाज येणे हा आर्थरायटिसचा संकेत असू शकतो. बोटांचे सांधे ताणले जातात तेव्हा प्रत्यक्षात स्रायूंमधील प्रोटेक्टिव्ह फ्लुडही ताणले जाते. हे फ्लुड रक्तप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असते. या प्रक्रियेत तयार होत असलेल्या वायूमुळे बुडबुडे तयार होतात. त्यातून सांध्यांमध्ये आवाज येतो. असे कोणत्याही वयात होत असले तरी गर्भवती महिला व तरुणांमध्ये हे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. तसेच १० टक्के लोक जबड्याचे हाड उकलण्याची तक्रार करतात.जबड्याचे हाड आणि कवटीदरम्यान कार्टिलेज पुन्हा आपल्या स्थितीत येतो, तेव्हा आवाज येतो. यावेळी वेदना होत असल्यास त्या टेंपोरोमँडिब्युलर जॉइंटची कार्यप्रणाली बाधित झाल्यामुळे होतात असे समजले जाते. अनेकवेळा तोंडातील स्नायू आखडल्यानेही असे होते. सामान्यत: जे लोक तणावग्रस्त असल्याने रात्री दात खातात, त्यांनाही ही समस्या असू शकते. टीएमजेची स्थिती प्रत्यक्षात दातांच्या चुकीच्या अलाइनमेंटमुळे निर्माण होते.

गुडघ्यांमधूनही कधी-कधी असा आवाज येतो. आपल्या शरीराचा पूर्ण भार गुडघ्यावरच असतो. त्यामुळे प्रत्येक हालचालीचा भार गुडघ्यावर पडत असतो. गुडघा दुमडताना वा टेकताना त्यातील स्नायूंमध्ये वेदना होतात. कार्टिलेज दुखावले गेले असल्यास वस्तू उचलण्यास त्रास होतो किंवा आवाज येतो. फुटबॉल वा हॉकी खेळताना खेळाडूंना या समस्येचा सामना करावा लागतो. काही तज्ज्ञ सांगतात की, शरीराचा प्रत्येक सांधा आपापसात लिगामेंट्स, टेंडन्स व स्नायूंच्या माध्यमातून अतिशय गुंतागुंतीच्या पद्धतीने जोडलेला असतो. त्यामुळे हाडांमधून आवाज येणे या सांध्यांच्या परस्पर सामंज्यावर अवलंबून असते. तसेच हाताच्या खांद्यांमधूनही अशी समस्या कधीकधी जाणवते. वाढत्या वयात खांद्याच्या अनेक सांध्यांतून आवाज येऊ शकतो. याउलट जर ३५ वर्षांआधीच असे होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. सांध्यांची हालचाल होताना दंडाचे हाड शोल्डर सॉकेटमधून थोडेसे बाहेर येते किंवा अनेकवेळा संपूर्णपणे जागेवरून हटते. अनेकवेळा खांद्याचे स्रायू दुखावल्याने असे होऊ शकते. हाताच्या मनगटातूनही एखादी वस्तू उचलल्यास आवाज येत असेल तर तुम्हाला मनगटाची कसल्याही प्रकारची हालचाल करण्यास त्रास होतो. कार्टिलेज हा एक प्रकारचा इलास्टिक टिश्यू असतो, जो हाडांच्या आसपास असतो. तो शरीराची संरचना आणि सांध्यांची लवचीकता कायम ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. कार्टिलेज दुखावल्यामुळे असा त्रास होऊ शकतो
उत्तर लिहिले · 14/6/2020
कर्म · 15575
0
गुडघ्यातून येणाऱ्या आवाजावर काही उपाय खालीलप्रमाणे:

कारण आणि उपाय:

  • lubrication कमी होणे: गुडघ्यामध्ये lubrication कमी झाल्यास आवाज येऊ शकतो. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांनी दिलेले supplement नियमित घ्या.
  • मांसपेशी कमकुवत होणे: गुडघ्याच्या आसपासच्या मांसपेशी कमकुवत झाल्यास joint instability येऊ शकते आणि आवाज येऊ शकतो. यासाठी physiotherapy करू शकता.
  • Arthritis: Arthritis मुळे cartilage झिजते आणि हाडे एकमेकांवर घासल्याने आवाज येतो. या साठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यानुसार उपचार करा.
  • Meniscus tear: Meniscus tear झाल्यास गुडघ्यात आवाज येऊ शकतो. अशा स्थितीत अर्थ्रोस्कोपिक सर्जरी (arthroscopic surgery) आवश्यक असू शकते.
  • Calcification: Calcification मुळे सुद्धा गुडघ्यात आवाज येऊ शकतो.

घरगुती उपाय:

  • हळदीचे दूध: हळदीमध्ये anti-inflammatory गुणधर्म असतात, त्यामुळे ते दुखणे कमी करण्यास मदत करते.
  • मेथीचे दाणे: मेथीचे दाणे रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने सांध्यांना lubrication मिळण्यास मदत होते.
  • योगा आणि व्यायाम: नियमित योगा आणि व्यायाम केल्याने गुडघ्यांच्या आसपासच्या मांसपेशी मजबूत होतात.

डॉक्टरांचा सल्ला:

  • जर गुडघ्यात सतत आवाज येत असेल आणि त्यासोबत दुखणे किंवा सूज असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • स्वतःहून कोणतेही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप: हा सल्ला केवळ सामान्य माहितीसाठी आहे. वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

ब्रह्मचर्य पालन केल्यास किती दिवसात फरक दिसतो व कशाप्रकारे हालचाली दिसतात?
मन शांत कसे करायचं?
शरीराची थरथर का होते?
महाराष्ट्रामध्ये फ्री उपचार कोठे होतात?
मेंदूची सूज कमी होऊ शकते का?
माझ्या मुलाचे 6 वर्षांपासून कान वाहत आहे, खूप दवाखान्यात इलाज केला पण काही फरक नाही?
सुखदाई आरोग्यचे महत्वाचे पैलु संगा?