2 उत्तरे
2
answers
जनहितार्थ याचिका म्हणजे काय?
5
Answer link
_*😇 जनहितार्थ याचिका म्हणजे काय ? ती कशी व कोण दाखल करू शकतो ? लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांनी आवर्जून वाचा*_
*🔰📶𝕄𝕒𝕙𝕒 𝕕𝕚𝕘𝕚 | 𝕊𝕡𝕖𝕔𝕚𝕒𝕝*
💫 आपण अनेकदा वर्तमानपत्रात वाचतो किंवा बातम्यांमध्ये ऐकतो की अमुक एखाद्या व्यक्तीने ह्या ह्या कारणासाठी जनहित याचिका कोर्टात दाखल केली आहे. आपल्यापैकी अनेकांना ही जनहित याचिका का आणि केव्हा दाखल केली जाते ह्याबाबत माहिती नसते. भारतीय कायद्यात अशी तरतूद आहे की सार्वजनिक हितासाठी कुठलाही सर्वसामान्य माणूस कोर्टात जनहित याचिका दाखल करू शकतो.
*💁♂️ चला तर याबद्दल सविस्तर जाणून घेऊ*
⚖️ आपली न्यायव्यवस्था ही लोकाभिमुख असावी ह्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यातलीच ही एक महत्वाची उपाययोजना आहे. लोकशाहीतील एक महत्वाचा मुद्दा असलेल्या जनहित याचिकेबाबत आज आपण जाणून घेऊया.
*🤔 जनहितार्थ याचिका (पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन) म्हणजे काय ?*
🔹घटनेत ज्यांचा उल्लेख मूलभूत हक्क म्हणून केलेला आहे अशा सर्व हक्कांच्या संरक्षणासाठी जेव्हा व्यापक सामाजिक हित लक्षात घेऊन कुणीही नागरिक उच्च किंवा सर्वेाच्च न्यायालयात याचिका दाखल करतो त्यालाच जनहितार्थ याचिका असे म्हणतात.
🔹जनहितार्थ याचिका दाखल करण्याचा प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहे. कायद्यात उपलब्ध असलेला न्याय मागण्याचा अतिशय प्रभाव उपाय म्हणून *'जनहितार्थ याचिका'* या पर्यायाकडे आज बघितले जाते.
*👉 जनहितार्थ याचिका कोणकोणत्या प्रकरणांमध्ये दाखल करता येऊ शकते ?*
💎 काही गोष्टी ज्या सरकारने व शासकीय व्यवस्थांनी करणे कायदेशिररित्या गरजेचे असते पण त्या गोष्टी करण्यामध्ये टाळाटाळ करणे, काम चुकारपणा करणे, मुद्दामहून जबाबदारी झटकणे किंवा कायद्याने सांगितल्यापेक्षा स्वत:च्या अधिकारकक्षा ओलांडून वागणे, पर्यावरणाचे प्रश्न, कोठडीतील मृत्यू, सामुहिक अत्याचार, वाळीत टाकणे, जाती-धर्माच्या नावावर होणारा भेदभाव, एचआयव्ही/एड्स असल्याने केल्या जाणारा भेदभाव, ध्वनीप्रदुषण, अपंग व भिकाऱ्यांच्या समस्या, मानवी शरीरांची खरेदी-विक्री, अवयव चोरी व विक्री, पाण्याच्या वाटपाबाबत व गैरवापराबाबत, शहरातील रस्त्यांवरील खड्डयांबाबत, गैरव्यवहारातून होणाऱ्या अन्यायाविरोधात, जेलमधील प्रश्न, लहान बालकांचे शोषण अशा अनेक सामुहिक-सामाजिक समस्या असलेल्या समस्यांबाबत जनहितार्थ याचिका दाखल करता येते.
💎 जी समस्या समाजाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने धोकादायक किंवा चुकीची असेल अशा प्रत्येक विषयावर 'जनहितार्थ याचिका' दाखल करता येते.सत्यता व प्रामाणिकता बाळगून केलेल्या जनहिताच्या याचिका नेहमीच यशस्वी झाल्याचे व त्यातून खूपच मोठे परिणामकारक बदल घडून आल्याचे स्पष्ट झाले आहे.
*🤨 जनहितार्थ याचिका कशी दाखल करायची ?*
📌 ज्याप्रमाणे रिट याचिका दाखल करतो त्याप्रमाणेच जनहितार्थ याचिका दाखल करता येते.
📌 जर उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल करायची असेल तर दोन प्रती न्यायमूर्तीसाठी व प्रत्येकी एक प्रत प्रतिवादी पक्षांसाठी दाखल करावी लागते.
📌 याचिकाकर्त्यानेच जर प्रतिवादी किंवा विरोधी पक्षाच्या लोकांना याचिकेची प्रत 'सर्व्ह' केली असेल म्हणजे दिली असेल तर त्याचा पुरावा लगेच कोर्टात दाखल करावा.
📌 जनहितार्थ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करतांना मात्र 4 + 1 असे एकूण पाच संच न्यायालयासाठी व इतर याचिका-संच विरोधी पक्षांसाठी द्यावे लागतात.
*🎯 जनहितार्थ याचिका कोणाविरूध्द करता येते ?*
⭕ आपल्या कायद्यांनुसार साधारणत: मूलभूत हक्क किंवा व्यापक मानवीहक्क उल्लंघनासाठी राज्य शासन, केंद्रसरकार किंवा सरकारशी संबंधित कोणत्याही यंत्रणेविरोधात जनहितार्थ याचिका दाखल करता येते.
⭕ सर्वसाधारणपणे खाजगी पार्टी विरूध्द जनहितार्थ याचिका करता येत नाही.
⭕ घटनेमधील सहभाग व अस्तित्व लक्षात घेऊन त्यांना जनहितार्थ याचिकेमध्ये सरकार किंवा सरकारी यंत्रणेलाच प्रतिवादी करता येते.
*⭕ म्हणजे उदाहरणार्थ –* एखादी खाजगी संस्था त्यांच्या कारखान्यामुळे विविध प्रकारचे प्रदुषण करते आहे अशा वेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ आणि त्यासोबत त्या खाजगी कारखान्याला प्रतिवादी करून जनहितार्थ याचिका दाखल करता येते.
⭕ जनहितार्थ याचिका केवळ खाजगी संस्थेविरोधात करता येणार नाही.
*💸 जनहितार्थ याचिका दाखल करायला खुप खर्च येतो का ?*
🏷️ कुणी जर वकीलांच्या माध्यमातून जनहितार्थ याचिका दाखल करायचे ठरव्ले तर प्रत्येक वकील वेगळ्या प्रकारची आणि भरमसाठ फी घेउ शकेल.
🏷️ पण अनेक वकील सामाजिक जाणीव ठेउन वकीली व्यवसायात कार्यरत आहेत.तशा वकीलांचा शोध घेउन त्याची मदत घेतल्यास ते व्यापक जनहितार्थ माफक व नगण्य खर्चात मदत करू शकतात.
🏷️ त्याशिवाय जनहितार्थ याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीला स्वत:च, याचिकेची मांडणी व युक्तीवाद न्यायमूर्तीसमोर करण्याचा अधिकार आहेच.
🏷️ साधारणत: टाईपिंग, छायांकित प्रतीचे सेट तयार करणे, कोर्ट फी (स्टॅम्प) टिकीट्स लावणे अशाप्रकारचा जुजबी व न्यायव्यवस्था प्रकीया कार्यान्वित करण्याचा खर्च मात्र करावाच लागतो. पण तो खूप नसतो.
👍 अशी आहे जनहितार्थ याचिकेची खरी कहाणी ! याबद्दल आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती द्या व लोकशाही मजबूत करण्यासाठी सजग नागरिक व्हा.
____________________________________
*🤳🌐आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/34kRwdy

0
Answer link
जनहितार्थ याचिका (Public Interest Litigation - PIL) म्हणजे असा खटला जो कोणत्याही व्यक्तीद्वारे किंवा संस्थेद्वारे समाजाच्या हितासाठी न्यायालयात दाखल केला जातो.
या याचिकेचा उद्देश:
- सामान्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे.
- पर्यावरण, प्रदूषण, बांधकाम, इत्यादी संबंधित समस्यांवर आवाज उठवणे.
- सरकारी धोरणे आणि निर्णयांवर प्रश्नचिन्ह उभे करणे.
- न्याय मिळवून देणे.
PIL कोण दाखल करू शकते?
- कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जी जनहितार्थ काम करत आहे.
- பாதிக்கப்பட்டவர்களின் తరపున ఎవరైనా న్యాయవాది.
PIL कुठे दाखल करता येते?
- उच्च न्यायालय (High Court)
- सर्वोच्च न्यायालय (Supreme Court)
PIL दाखल करण्यासाठी काही नियम आहेत का?
होय, PIL दाखल करताना काही नियम आणि प्रक्रियांचे पालन करावे लागते. याचिकेत सत्य माहिती आणि पुरावे सादर करणे आवश्यक आहे.
जनहितार्थ याचिका हे समाजातील दुर्बळ आणि वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे.
अधिक माहितीसाठी: