कायदा न्यायव्यवस्था जनहित याचिका

कोर्टात जनहित याचिका कशी दाखल करतात? त्यासाठी काय करावे? अंदाजे किती खर्च येईल? इंटरनेटवर सर्च करण्यासंबंधी एक याचिका मला कोर्टात दाखल करावयाची आहे.

2 उत्तरे
2 answers

कोर्टात जनहित याचिका कशी दाखल करतात? त्यासाठी काय करावे? अंदाजे किती खर्च येईल? इंटरनेटवर सर्च करण्यासंबंधी एक याचिका मला कोर्टात दाखल करावयाची आहे.

9
आपण अनेकदा वर्तमानपत्रात वाचतो किंवा बातम्यांमध्ये ऐकतो की अमुक एखाद्या व्यक्तीने ह्या ह्या कारणासाठी जनहित याचिका कोर्टात दाखल केली आहे. आपल्यापैकी अनेकांना ही जनहित याचिका का आणि केव्हा दाखल केली जाते ह्याबाबत माहिती नसते. भारतीय कायद्यात अशी तरतूद आहे की सार्वजनिक हितासाठी कुठलाही सर्वसामान्य माणूस कोर्टात जनहित याचिका दाखल करू शकतो.

इतर याचिकांप्रमाणे ह्या याचिकेसाठी पीडित पक्षाला स्वत: कोर्टात जाण्याची अट नाही. जनहित याचिका ही भारतीय नागरिकाने न्यायासाठी कोर्टात दाद मागण्याची एक प्रक्रिया आहे.

ही योजना भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सतरावे प्रमुख न्यायाधीश पी. एन. भगवती ह्यांनी प्रस्थापित केली.

आपली न्यायव्यवस्था ही लोकाभिमुख असावी ह्या दृष्टीने काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यातलीच ही एक महत्वाची उपाययोजना आहे. लोकशाहीतील एक महत्वाचा मुद्दा असलेल्या जनहित याचिकेबाबत आज आपण जाणून घेऊया.




पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजेच जनहित याचिकेचे कामकाज इतर न्यायालयीन प्रक्रियेपेक्षा वेगळे चालते. ही याचिका दाखल करण्यासाठी आपल्याला कोर्टात स्वत: जाण्याची गरज नसून केवळ एखाद्या टपाल कार्ड किंवा अर्जाद्वारे किंवा आजच्या डिजिटल युगात एका इ मेल द्वारे सुद्धा आपण ही याचिका दाखल करू शकतो.

प्रसंगी न्यायालय सुद्धा काही गोष्टीत स्वत: हस्तक्षेप करून अश्या याचिका दाखल करू शकते. घटनेमधील ह्या तरतुदीचा अनेक सजग नागरिकांनी व सामाजिक संस्थांनी वेळोवेळी सामाजिक हितासाठी वापर केला आहे.

ह्या याचिकेचा सर्वप्रथम विचार अमेरिकेत केला गेला अमेरिकेत ह्या याचिकेला “सामाजिक कार्यवाही याचिका” असे म्हणतात.

अमेरिकेत व आपल्याकडेही ह्या याचिकेचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांना जलद तसेच कमी खर्चात न्याय मिळवून देणे हा आहे. तसेच जर ह्या याचिकेचा दुरुपयोग केलेला आढळून आला तर याचिका दाखल करण्याऱ्याला दंड केला जातो. जनहित याचिका स्वीकारणे किंवा फेटाळण्याचा निर्णय न्यायालय घेते.

ही याचिका दाखल कारण्यासंबंधी उच्च न्यायालयाने काही नियम लागू केले आहेत. ते म्हणजे ह्या याचिकेसाठी लागणारे “सामान्य न्यायालय शुल्क” कोर्ट माफ करू शकते. तसेच ही याचिका शासकीय तसेच एखाद्या खाजगी संस्थेविरुद्ध सुद्धा दाखल करता येते.

कोर्टाला पाठवलेले टपाल कार्ड सुद्धा ग्राह्य धरून त्याला रिट याचिका मानून ही याचिका दाखल करता येऊ शकते व सामाजिक हितासाठी कुठलीही सामान्य व्यक्ती किंवा संघटना जनहित याचिका दाखल करू शकते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तसेच घटना लागू झाल्यानंतर सुरुवातीला जनहित याचिकेला घटनेत स्थान नव्हते. घटनेत ही तरतूद नंतर करण्यात आली. अनेक न्यायिक व राजनैतिक कारणे ह्या प्रक्रियेच्या विकासासाठी कारणीभूत ठरली. ढोबळमानाने बोलायचे झाल्यास सत्तरच्या दशकात सुरु झालेली ही प्रक्रिया ऐंशीचे दशक उजाडता उजाडता पक्की झाली.

जनहित याचिकेच्या प्रसिद्ध न्यायालयीन खटल्याचे उदाहरण म्हणून १९७९ सालच्या हुसेनआरा खातून व बिहार राज्य ह्या खटल्याकडे बघता येईल.

ही केस ट्रायलवर असलेल्या कैद्यांना तुरुंगात मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल होती.

इंडियन एक्स्प्रेस ह्या वर्तमानपत्रात बिहारमधील तुरुंगांत खितपत पडलेल्या ट्रायल वर असलेल्या हजारो कैद्यांची वाईट अवस्था वर्णन करणारी एक बातमी प्रकाशित झाली होती. ह्या बातमीच्या आधारावर जनहित याचिका दाखल करण्यात आली. ह्या खटल्याच्या निकालानंतर चाळीस हजार पेक्षाही जास्त कैद्यांना सोडून देण्यात आले. ऍडव्होकेट कपिल हिंगोरानी ह्यांनी ही याचिका दाखल केली होती.





९ मार्च १९७९ रोजी कोर्टाने म्हटले की प्रत्येक आरोपी स्वतःच्या बचावासाठी वकील नियुक्त करू शकत नाही.

ह्या परिस्थितीत अश्या आरोपींना मोफत कायद्याची सुविधा मिळाली पाहिजे. व ह्या सुविधेचा खर्च राज्य सरकार करेल. “त्वरित न्याय” हा घटनेत एक मूलभूत हक्क मानण्यात आला. तसेच हा सिद्धांत त्यानंतरच्या खटल्यांसाठी सुद्धा स्वीकार करण्यात आला.

अशीच जनहित याचिका पुढे एसपी गुप्ता विरुद्ध भारतीय संघराज्य ह्या केसमध्ये सुद्धा दाखल करण्यात आली. हा खटला “द जजेस ट्रान्सफर केस’ ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ह्या खटल्याचा निकाल न्यायमूर्ती पी एन भगवती ह्यांनी दिला.

ह्या केसमध्ये असे नमूद केले गेले की समाजातील कुठलीही प्रामाणिक व्यक्ती किंवा संस्था कायदेशीर किंवा संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन झाल्याबद्दल न्याय मागण्यासाठी कुठल्याही उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात एक रिट याचिका दाखल करू शकते.

न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे जेव्हा जेव्हा सरकार किंवा शासनाद्वारे समाजातील वंचित घटकांवर अन्याय झाला तेव्हा जनहित याचिका हे समाजातील वंचित किंवा पीडित घटकांसाठी न्याय मागण्याचे एक प्रभावी साधन
उत्तर लिहिले · 21/11/2018
कर्म · 123540
0

तुम्ही कोर्टात जनहित याचिका (Public Interest Litigation - PIL) दाखल करू इच्छित आहात, हे जाणून आनंद झाला. जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अंदाजे खर्च याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे आहे:

जनहित याचिका (PIL) दाखल करण्याची प्रक्रिया:

जनहित याचिका दाखल करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. माहिती आणि तयारी:

    • ज्या विषयावर जनहित याचिका दाखल करायची आहे, त्या विषयाची सखोल माहिती मिळवा. संबंधित कायदे, नियम, सरकारी धोरणे आणि वस्तुस्थिती यांचा अभ्यास करा.
    • तुमच्या याचिकेशी संबंधित पुरावे गोळा करा. यात कागदपत्रे, फोटो, व्हिडिओ किंवा इतर कोणताही पुरावा जो तुमच्या दाव्याला समर्थन देईल, तो सादर करा.
  2. वकिलाची निवड:

    • जनहित याचिका दाखल करण्यासाठी अनुभवी वकिलाची मदत घेणे आवश्यक आहे. जनहित याचिकांमध्ये चांगले काम केलेल्या वकिलाचा शोध घ्या आणि त्यांच्याशी संपर्क साधा.
    • वकिलासोबत तुमच्या विषयावर चर्चा करा आणि त्यांना सर्व आवश्यक माहिती आणि पुरावे द्या.
  3. याचिकेचा मसुदा तयार करणे:

    • वकील तुमच्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारे याचिकेचा मसुदा तयार करतील. या याचिकेत तुमचा अर्ज, तुमच्या समस्या, कायद्याचे उल्लंघन आणि मागण्या स्पष्टपणे नमूद केल्या जातील.
    • याचिकेचा मसुदा तयार झाल्यावर तो काळजीपूर्वक तपासा आणि आवश्यक असल्यास बदल करा.
  4. याचिका दाखल करणे:

    • याचिका दाखल करण्यासाठी तुम्हाला उच्च न्यायालय (High Court) किंवा सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) मध्ये जावे लागेल.
    • कोर्ट फी भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह याचिका दाखल करा.
  5. कोर्टाची प्रक्रिया:

    • कोर्ट याचिका स्वीकारेल आणि प्रतिवादींना नोटीस पाठवेल. प्रतिवादींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाईल.
    • कोर्ट दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून निर्णय देईल.

आवश्यक कागदपत्रे:

जनहित याचिका दाखल करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक असू शकतात:

  1. याचिका (Petition).
  2. ओळखीचा पुरावा (Identity Proof): आधार कार्ड, पॅन कार्ड, इत्यादी.
  3. पत्ता पुरावा (Address Proof): वीज बिल, पाणी बिल, आधार कार्ड, इत्यादी.
  4. समस्येशी संबंधित पुरावे (Supporting Documents): फोटो, व्हिडिओ, कागदपत्रे, इत्यादी.
  5. शपथपत्र (Affidavit): याचिकेत दिलेली माहिती सत्य आहे, असे सांगणारे नोटरी केलेले शपथपत्र.
  6. इतर आवश्यक कागदपत्रे (Other relevant documents): तुमच्या वकिलाच्या सल्ल्यानुसार.

अंदाजे खर्च:

जनहित याचिका दाखल करण्याचा खर्च अनेक गोष्टींवर अवलंबून असतो, जसे की वकिलाची फी, कोर्ट फी, कागदपत्रांचा खर्च आणि इतर खर्च.

  • वकिलाची फी: रु. 10,000 ते रु. 50,000 किंवा त्याहून अधिक (वकिलाच्या अनुभवानुसार).
  • कोर्ट फी: रु. 50 ते रु. 200 (कोर्टानुसार).
  • इतर खर्च: रु. 1,000 ते रु. 5,000 (कागदपत्रे, नोटरी, इत्यादी).

इंटरनेट सर्चसंबंधी याचिका:

जर तुम्हाला इंटरनेट सर्च संदर्भात याचिका दाखल करायची असेल, तर तुम्हाला हे स्पष्ट करावे लागेल की कोणत्या कायद्याचे उल्लंघन होत आहे आणि लोकांना त्याचा कसा त्रास होत आहे.

टीप:

  • जनहित याचिका दाखल करण्यापूर्वी, तुमच्या वकिलाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
  • तुम्ही स्वतः देखील कोर्टात जाऊन माहिती मिळवू शकता.

मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.

उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 1040

Related Questions

जनहित याचिका कशी दाखल करतात? सामान्य नागरिक करू शकतो का?
जनहितार्थ याचिका म्हणजे काय?
जनहित याचिका म्हणजे काय, ती कोण करू शकतो व कशी करावी? त्याचे नियम व अटी काय आहेत?
जनहित याचिका कशी दाखल करायची व खर्च किती येतो?
आजकाल कोणीही उठसुठ संघटना बनवतात व त्यांना हवे ते नियम तयार करतात. उदा: न्हावी, चहा टपरी, डॉक्टर इत्यादी. त्यांच्या सोईनुसार भाव वाढवतात. त्यांच्याविरुद्ध जनहित याचिका दाखल करू शकतो का?
जनहित याचिका आणि रिट याचिका यांत फरक काय?
जनहित याचिका (Public Interest Litigation) विषयी पूर्ण माहिती मिळेल का?