3 उत्तरे
3
answers
धोंड्याचा महिना म्हणजे नेमकं काय?
2
Answer link
चांद्रवर्ष आणि सौर वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी सरासरी बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर चांद्रवर्षात एक महिना जास्त धरावा लागतो, त्याला अधिक महिना असे म्हणतात. त्यालाच मलमास, पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात हा महिना धोंड्याचा महिना म्हणूनही ओळखला जातो. भारतात वैदिक काळापासून चांद्रमास आणि सौरमास यांनुसार कालगणनेचा प्रचार झालेला दिसून येतो. बारा महिन्यांची कालगणना वैदिक काळापासून आहे. सौर वर्षाचे सुमारे तीनशेपासष्ट दिवस असतात. चांद्रमासाचे दिवस मात्र साधारण तीनशेचौपन्नच येतात. त्यामुळे बारा चांद्रमासांचे एक वर्ष मानले तर हळूहळू काही दिवसांचा फरक पडू लागेल. तसे होऊ नये म्हणून बत्तीस किंवा तेहतीस चांद्रमासांनंतर एक महिना अधिक धरावा लागतो. पण कोणता महिना अधिक धरायचा? शास्त्रकारांनी तो सुद्धा विचार केलेला आहे. सर्वसाधारणपणे प्रत्येक चांद्रमासात एक सौर संक्रांत होते. परंतु ज्या मासात अशी एकही संक्रांत येत नाही, जो चांद्रमास संपूर्णपणे दोन संक्रांतीच्या दरम्यान येतो, तो अधिक महिना धरून त्याला त्याच्या पुढील महिन्याचे नाव दिले जाते. दोन महिन्यांतील फरक स्पष्ट दाखवण्यासाठी पुढील महिन्याला ‘निज’ म्हणजे नेहमीचा महिना म्हणतात. जसे 2018 मध्ये ज्येष्ठ महिना अधिक असल्याने पुढील महिना निज ज्येष्ठ ठरला व ज्येष्ठातील सगळे सणवार, तिथी निज महिन्यात गृहित धरतात. साधारणपणे चैत्र, ज्येष्ठ आणि श्रावण हे महिने दर बारा वर्षांनी, आषाढ अठरा वर्षांनी, भाद्रपद चोवीस वर्षांनी, आश्विन एकशेएकेचाळीस वर्षांनी व कार्तिक सातशे वर्षांनी अधिक महिना होतो. परंपरेप्रमाणे भाद्रपदापर्यंतचे महिने अधिक महिने म्हणून समजले जातात. ज्यावर्षी आश्विन अधिक येतो, त्यावर्षी पौष महिना क्षयमास होतो. त्या वेळी दोन प्रहर मार्गशीर्ष व दोन प्रहरांनंतर पौष महिना आहे असे मानून दोन्ही महिन्यांची धार्मिक कृते एकाच महिन्यात करण्याची पद्धत आहे. अशा जोड मासाला ‘संसर्प’ असे म्हणतात. क्षय मासाचा विचार कसा आला असावा? तर अधिक महिना धरूनही कालगणनेत काही दिवसांचा फरक पडतोच. तो ‘क्षय‘ मासाने पूर्ण केला जातो. कार्तिक, मार्गशीर्ष व पौष यांपैकी क्षयमास मानले जातात. 1822 नंतर 1963 मध्ये कार्तिक महिना, 1982-83 मध्ये पौष महिना क्षय होता.
2
Answer link
*🔰📶महा डिजी I विशेष*
🙏 *धोंडयाचा महिना किंवा अधिक मास म्हणजे नेमकं काय?*
🗓️ नेहमीच्या कालगणनेप्रमाणे आतापर्यंत नवरात्र सुरु व्हायला हवं होतं, पुढचा महिना 'खरा आश्विन' महिना असेल म्हणजेच त्या आश्विन महिन्याच्या आधी या वर्षी हा 'एक्स्ट्रा' महिना आला आहे. यालाच आपण अधिक मास (महिना) असे म्हणतो.
🧐 *शालिवाहन शकाच्या कालगणनेप्रमाणे,*
▪️ चैत्र, वैशाख हे भारतीय महिने चंद्राच्या गतीप्रमाणे व नक्षत्रांवरून मोजले जातात. त्यांना चांद्रमास म्हणतात.
▪️ चंद्र पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा 28 दिवसांत पूर्ण करतो. अर्थात त्यानुसार सौर वर्षाप्रमाणे चांद्रवर्षाचे 12 महिन्यांचे 365 दिवस न भरता ते 355 भरतात.
🤔 *अधिक मास म्हणजे..*
🔯 चांद्रमासाच्या वर्षाचे दिवस (चांद्रगणना) व सौर वर्षाचे दिवस (सौरगणना) यांचा ताळमेळ घालण्यासाठी साधारणत: दर 3 वर्षांनी म्हणजेच सुमारे साडेबत्तीस महिन्यांनी (32 महिने 16 दिवस 4 घटिकांनी) एक चांद्रमास दोनदा मोजतात आणि त्यालाच 'अधिक मास' म्हणतात. ज्या वर्षी हा अधिक मास येतो, ते चांद्रवर्ष 13 महिन्यांचे असते.
✡️ "ठराविक सण ठराविक ऋतूंमध्ये यावेत यासाठी आपली पंचांगे चांद्र-सौर पद्धतीवर आधारलेली आहेत. एका चांद्रवर्षात 360 तिथी, एका सौरवर्षात 371 तिथी होतात. त्यामुळे दरवर्षी 11 तिथी वाढत जाऊन त्या 33 झाल्या की अधिकमास येतो.

0
Answer link
धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास.
हिंदू पंचांगानुसार, प्रत्येक तीन वर्षांनी एक महिना जास्तीचा येतो, त्याला 'अधिक मास', 'মলমাস' किंवा 'धोंड्याचा महिना' म्हणतात.
अधिक मास का येतो?
- সৌর वर्ष (solar year) आणि चांद्र वर्ष (lunar year) यांच्यातील फरक भरून काढण्यासाठी अधिक मास येतो.
- चांद्र वर्ष সৌর वर्षापेक्षा सुमारे 11 दिवस लहान असते. त्यामुळे दरवर्षी 11 दिवसांचा फरक साचत जातो आणि हा फरक तीन वर्षांत सुमारे एका महिन्याएवढा होतो.
- हा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक महिन्याची योजना आहे.
अधिक मासामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही.
हे पण वाचा: अधिक मास म्हणजे काय? कधी आहे? महत्व आणि नियम काय?