2 उत्तरे
2
answers
साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?
0
Answer link
*🤔 साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?*
*MAHA DIGI : Special Update*
🛕 साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण अक्षयतृतीया तोंडावर येऊन ठेपला आहे. पण या सणाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा सण का म्हणतात? मुळात साडेतीन मुहूर्त म्हणजे नक्की काय? समजून घेऊयात.
*🤔 साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?*
💁🏻♂️ कोणतेही काम करण्याआधी आपण शुभ मुहूर्त काढत असतो, पण आपल्या हिंदू धर्म शास्रात अशा काही निवडक तिथी आहेत कि त्या दिवशी कोणत्याही कार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नसते. या मुहूर्ताला 'स्वयं सिद्ध मुहूर्त' असे म्हणतात. असे हे 'स्वयं सिध्द मुहूर्त' हिंदू धर्म शास्रात साडे तीन सल्याचं म्हटलं आहे.. त्यालाच आपण साडेतीन मुहूर्त असे म्हणतो
*🤔 साडेतीन मुहूर्त कोणकोणते आहेत?*
✨ साडेतीन मुहुर्तात गुढीपाडवा, अक्षयतृतीया, विजयादशमी (दसरा) हे सण संपूर्ण एक मुहूर्त म्हणून गणले जातात तर बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त म्हणून गणला जातो.
0
Answer link
साडेतीन मुहूर्त हे हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि महत्त्वाचे दिवस मानले जातात. या दिवसांमध्ये कोणतेही नवीन कार्य, मोठी खरेदी किंवा शुभ कार्याची सुरुवात करणे अत्यंत फलदायी मानले जाते.
हे साडेतीन मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत:
- गुढीपाडवा: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा हा पहिला मुहूर्त. लोकमत
- अक्षय तृतीया: वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया हा दुसरा मुहूर्त. महाराष्ट्र टाइम्स
- दसरा: अश्विन शुद्ध दशमी म्हणजे दसरा हा तिसरा मुहूर्त. Simply Spiritual
- दिवाळीतील बलिप्रतिपदा: कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे दिवाळीमधील बलिप्रतिपदा हा अर्धा मुहूर्त मानला जातो.
या दिवसांमध्ये शुभ आणि मंगल कार्ये केल्याने त्यात यश मिळण्याची शक्यता वाढते, अशी मान्यता आहे.