अध्यात्म धार्मिक

आमलकी एकादशी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

आमलकी एकादशी म्हणजे काय?

1
फाल्गुन शुद्ध येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी

  असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

असं म्हणतात की ब्रम्हदेवांनी जेव्हा सृष्टीची उत्पत्ती केली तेव्हाच त्यांनी आवळ्याच्या झाडाचीही उत्पत्ती केली. आवळा आयुर्वेदात अत्यंत पूजनीय स्थान प्राप्त करतो. आवळ्याचे अनेक फायदेही आपल्याला माहिती आहेत. आमलकी एकादशी काही दिवसांवर आली असल्याने आपण या एकादशी बाबत माहिती घेणार आहोत.


आमलकी एकादशी 2023 : समस्यांनी त्रस्त असाल तर आमलकी एकादशीच्या दिवशी  'हे' उपाय


आमलकी एकादशी म्हणजे काय

वर सांगितल्याप्रमाणे ब्रम्हदेवांनी सृष्टीसोबतच आवळ्याचं झाड पृथ्वीवर निर्माण केलं. सर्व नद्यांमध्ये पवित्र नदी म्हणून आपण गंगेला पाहातो, देवांमध्ये भगवान श्रीविष्णूंना पाहातो तसंच आवळ्याला शास्त्रामध्ये परमोच्च स्थान प्राप्त झालं आहे. हे झाड अनेक आयुर्वेदीक फायदे घेऊन येण्याबरोबरच भगवान श्रीविष्णूंनाही हे झाड अत्यंत प्रिय आहे. असं म्हणतात की श्रीविष्णूंनी ही एकादशी जो करेल त्याला गोदानाचे पुण्य लाभेल असं सांगितलं होतं. त्यामुळेच फाल्गुन शुक्ल पक्षातल्या एकादशीला आमलकी एकादशी असं संबोधलं जातं.

आमलकी एकादशी या एकादशीचे पवित्र व्रत विष्णू लोकाची प्राप्ती करून देणारे आहे. हिंदू धर्मामध्ये एकादशीला फार महत्व आहे. एका वर्षात २४ एकादशी येतात. जेव्हा अधिकमहिना येतो तेव्हा यांची संख्या २६ असते. 

आवळ्याचं महत्व काय

साधारपणे होळीपासून शरद ऋतू संपून, वसंत ऋतूचा आरंभ होतो. वसंत ऋतूत तापट उन्हाळा अनुभवायला मिळतो. अशात गोष्टी फार उष्ण होऊ लागतात. त्यावर उपाय म्हणूनही आवळ्यातकडे पाहिलं जातं.आवळ्याचे औषधी गुणधर्म आणि उपयोग अनन्य साधारण आहेत. मधुमेह, हृदयाचे आजार, पचनक्रिया, वजन कमी करणे, हाडे मजबूत करणे, डोळ्यांसाठी गुणकारी, संसर्गापासून संरक्षण करणे, असे आवळ्याचे उपाय आहेत.

आमलकी एकादशीचं व्रत कसं करावं

आमलकी एकादशीदिवशी सकाळी उठून व्रताचा संकल्प करावा. दिवसात फक्त एकदाच फलाहार करावा. भगवान श्री विष्णूची मूर्ती किंवा प्रतिमा एका चौरंगावर स्थापित करावी. श्रीविष्णूचे आवाहन करून त्याचे पूजन करावे. हे व्रत करणाऱ्या व्यक्तीने विष्णू सहस्रनामाचेही पठण करावे. भगवंताला नैवेद्य दाखवावा. महत्वाचं म्हणजे हे व्रत एकादशीच्या दिवशी समाप्त होत नाही. त्यामुळे या व्रताची समाप्ती द्वादशीला यथाशक्ती अन्नदान करून करावी.




उत्तर लिहिले · 2/3/2023
कर्म · 53715
0
आमलकी एकादशी म्हणजे फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी. या एकादशीला विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते.

आमलकी एकादशीचे महत्त्व:

  • आवळ्याचे झाड हे विष्णू देवाला प्रिय आहे.
  • या दिवशी आवळ्याच्या झाडाखाली विष्णूची पूजा केल्याने विशेष पुण्य लाभते.
  • आवळ्याच्या सेवनाने आरोग्य सुधारते.

आमलकी एकादशीची पूजा विधी:

  • सकाळी लवकर उठून स्नान करावे.
  • आवळ्याच्या झाडाजवळ जाऊन पूजा करावी.
  • विष्णू देवाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे.
  • धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे.
  • आमलकी एकादशीची कथा वाचावी.
  • आरती करावी आणि प्रसाद वाटावा.

आमलकी एकादशीला उपवास करणे देखील खूप शुभ मानले जाते.

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

पंढरपूर विठ्ठल मूर्तीला मकर कुंडले का आहेत व कमरेवर हात का आहेत?
‘इडा पिडा टळो’ यातील इडा काय आहे?
शारदा देवी स्थापन केलेल्या नवीन मंडळाचे नाव काय ठेवावे?
साडेतीन मुहूर्त म्हणजे काय?
आठ प्रहर कोणते?
पंढरपूरच्या विठुरायाच्या पायाखाली जी वीट आहे तिच्या अवताराबद्दल कोणाला काही माहिती असेल तर सांगा?
यल्लम्मा देवीची माहिती मिळेल का?