सरकार समाज सार्वजनिक धोरण

राज्य सरकारचे लॉकडाउन कधीपासून सुरू आहे? व्हायरल सत्य?

2 उत्तरे
2 answers

राज्य सरकारचे लॉकडाउन कधीपासून सुरू आहे? व्हायरल सत्य?

2
कोरोनाला नियंत्रित करण्यासाठी आता जगभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहेत. भारतातही 21 दिवसांची टाळेबंदी सुरू आहेत. त्यातच आता व्हायरल मेसेज फिरत आहेत की, जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊन विषयी प्रोटोकॉल्स जाहीर केले असून, त्यानुसार जून महिन्यापर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याची त्यात म्हटले आहे. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

*❓काय आहे पोस्टमध्ये?*

जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार लॉकडाऊन पुढीलप्रमाणे विविध टप्प्यात लागू करावा असे म्हटले आहे.

🔸टप्पा क्रमांक 1 – 1 दिवस
🔸टप्पा क्रमांक 2 – 21 दिवस
🔸(पाच दिवासांचा अवकाश)
🔸टप्पा क्रमांक 3 – 28 दिवस
🔸(पाच दिवसांचा अवकाश)
🔸टप्पा क्रमांक 4 – 15 दिवस



याच प्रोटोकॉल्सनुसार भारतातही लॉकडाऊन सुरू आहे. त्यानुसार 21 दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर 20 एप्रिल ते 18 मे दरम्यान पुन्हा 28 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात येईल. त्यानंतर मग 25 मे ते 10 जून असा शेवटचा 15 दिवसांचा लॉकडाऊन असेल.

*🔍तथ्य पडताळणी*

जागतिक आरोग्य संघटनेने खरंच असे काही प्रोटोकॉल्स जाहीर केलेत का हे तपासण्यासाठी WHO च्या वेबसाईटवर भेट दिली. तेथे अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.

त्यानंतर WHO च्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही खोटी बातमी असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊनसंदर्भात कोणतेही प्रोटोकॉल्स जाहीर केलेले नाहीत. तसे सांगणारा मेसेज फेक आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
https://mobile.twitter.com/WHOSEARO/status/1246804406705614848

_🇮🇳भारत सरकारच्या पत्र व सूचना मंत्रालयानेदेखील हा मेसेज खोटा असल्याचे सांगितले आहे._

https://mobile.twitter.com/PIBFactCheck/status/1246808682806923265

*निष्कर्ष:*

यावरून स्पष्ट होते की, सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा आहे. जागतिक आरोग्य संघटनेने लॉकडाऊन पाच टप्प्यात लागू करण्याविषयी कोणतेही प्रोटोकॉल्स जाहीर केलेले नाहीत.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 6/4/2020
कर्म · 569245
0

महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारने लॉकडाउन लावलेले नाही. कोविड-१९ च्या काळात लावलेले निर्बंध आता हटवण्यात आले आहेत.

व्हायरल सत्य:

  • सध्या सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या (Fake News) फिरत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
  • राज्य सरकारने लॉकडाउन लावण्याबाबत कोणताही नवीन आदेश जारी केलेला नाही.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2480

Related Questions

नगरपालिका कारवाई करत नाही म्हणून उपोषण करायचे असल्यास काय करावे लागेल याची पूर्ण माहिती द्यावी?
माहिती अधिकार अंतर्गत अर्ज करून सार्वजनिक हिता संदर्भात माहिती मागवणे?
सभांचे महत्त्व कोणते आहे?
सार्वजनिक व्यवस्था कोणती आहे?
उड्डाणपुलाला महापुरुषाचे नाव देण्याची प्रक्रिया काय असते?
लॉकडाऊनमुळे सर्व शासकीय कार्यालयीन व्यवहार बंद असल्याने माहितीच्या अधिकार कायद्या अंतर्गत माहिती देण्याच्या कालावधी बाबत संबंधितांना सूट आहे का? कृपया विस्तृत माहिती द्यावी.
आरे मधील कारशेडला मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध का आहे? आणि जर तिथे कारशेड झालंच, तर त्यामधून जनतेचा काय फायदा आणि तोटा होईल ते सांगावे?