सौंदर्य आणि केसांची निगा आरोग्य

केस गळती कमी करण्यासाठी काय करावे?

*केसगळती रोखतील ही '५' योगासने*
-------------------------------

आजकालच्या आधुनिक जीवनात केसगळतीची समस्या अगदी सामान्य झाली आहे. त्याचबरोबर केस अकाली पांढरे होण्याची समस्या वाढताना दिसत आहे. चिंता, हार्मोन्सचे असंतुलन, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा हे केसगळतीचे प्रमुख कारण आहे. पण यावर योगसाधना हा एक उत्तम उपाय आहे. यामुळे केसांपर्यंत रक्तप्रवाह चांगल्या प्रकारे होतो आणि मानसिक ताण, भूक न लागण्याची समस्या, चिंता यापासून सुटका होते.

*भुजंगासन:*
वारंवार पित्त होणे हे देखील केसगळती एक महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळे पित्त नियंत्रित ठेवण्यासाठी भुजंगासन खूप फायदेशीर ठरते.

*पवनमुक्तासन:*
या आसनामुळे पोटातील गॅस दूर होवून पचनशक्ती सुधारते. कंबरच्या खालचे स्नायू मजबूत होतात.


*वज्रासन:*
वज्रासन ही एक धानात्मक स्थिती आहे. यामुळे मूत्रासंबंधित समस्या, पोटातील गॅस दूर होण्यास मदत होते. अन्नाचे पचन चांगल्या प्रकारे होते. त्याचबरोबर वजन कमी करण्यास मदत होते. 

*अधोमुख शवासन:*
या आसनामुळे शरीरभर रक्तसंचार सुरळीत होतो. डोक्याला रक्ताचा उत्तम पुरवठा होवून थकवा दूर होतो. निद्रानाशाचा त्रास दूर होण्यासही हे आसन फायदेशीर ठरते.

*सर्वांगासन:*
या आसनामुळे थॉयरॉईड ग्रंथीचे पोषण होते. यामुळे पचनतंत्र सुधारते. डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह होतो. त्यामुळे केसगळती, केस अकाली पांढरे होण्याची समस्या कमी होण्यास मदत होते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

केस गळती कमी करण्यासाठी काय करावे?

Related Questions

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये परिचराची कोणती कामे असतात?
Penis जास्त वेळ मजबूत राहण्यासाठी काय केले पाहिजे?
Vajan kse kmi krayche?
लहान मुलाचे केस वाढवण्यासाठी काय करावे?
निर्भरणीकरणाची कारणे स्पष्ट करा?
भारतातील औद्योगिक चिकित्सा करा भाषाची?
योग साधनेसाठी नैसर्गिक औषधी वनस्पतींचे महत्त्व?