प्रेरणा डिप्रेशन मानसशास्त्र मानसिक आरोग्य नैराश्य मानसिक स्वास्थ्य

माझा रिझल्ट लागला आणि मी नापास झालो, तर मी पूर्णपणे नैराश्यात गेलो आहे. मला कोणीतरी मदत करा?

3 उत्तरे
3 answers

माझा रिझल्ट लागला आणि मी नापास झालो, तर मी पूर्णपणे नैराश्यात गेलो आहे. मला कोणीतरी मदत करा?

14
मित्रा,

आयुष्यात एकदा तरी

वाईट दिवसांना सामोरे

गेल्याशिवाय  *_चांगल्या_*? दिवसांची किंमत कळत नाही…!

या जगात अशी सुद्धा माणसे आहेत की, जी अनेक वेळा हारून सुद्धा आज मोठ्या यशाच्या  शिखरावर पोहचली आहेत.आणि याचं कारण शोधलं की समजत की त्यांचे सततचे प्रयत्न आणि त्यांच्यामधील आत्मविश्वास. कारण,

*”आत्मविश्वास”

अशी

शक्ती आहे, जी पायथ्यावरून

शिखरावर

पोहचविते”*


मी हरलोय म्हणू नकोस, यावेळी हरलोय म्हण….

जग पुन्हा जिंकण्यासाठी, येतील कितीतरी क्षण .

एकटा उरलो म्हणू नकोस, सध्या एकटा आहे म्हण….

आयुष्य संपले नाही अजून, भेटतील किती तरी जण.

मी थकलोय म्हणू नकोस, जरा दम घेतोय म्हण….

पुन्हा झेप घेण्यासाठी, पेटुन उठेल एक एक कण.

मित्रा तुला शेवटी इतकचं सांगेन की,
पराभवाने माणुस संपत नाही रे, जेव्हा तो
प्रयत्न सोडतो ना तेंव्हा तो संपतो..

तुला तुझ्या पुढच्या वाटचालीस अनेक शुभेच्छा।
उत्तर लिहिले · 31/1/2020
कर्म · 3205
8
रिझल्ट लागला पण तो फक्त तुम्ही दिलेल्या परीक्षेचा होता, आयुष्याचा नव्हता. मित्रा, फक्त ऐक रिझल्ट पूर्ण आयुष्य ठरवत नाही. मोठे मोठे लोक गुन्हे करून, पाप करून सुद्धा साधे तुरुंगात जात नाहीत आणि तू फक्त एका रिझल्टमुळे डिप्रेशनमध्ये गेला.. पुन्हा प्रामाणिक प्रयत्न कर आणि यशस्वी हो....
उत्तर लिहिले · 20/2/2020
कर्म · 16390
0
चिंता करू नका, नापास होणे ही जगाचा शेवट नाही. अनेक यशस्वी लोक त्यांच्या आयुष्यात कधीतरी नापास झाले आहेत. त्यामुळे निराश होऊ नका.

तुम्ही एकटे नाही आहात:

  • अनेक विद्यार्थी परीक्षेत नापास होतात.
  • नापास होणे म्हणजे तुमच्या भविष्यातील अपयश नाही.

नैराश्यातून बाहेर कसे यावे:

  • भावना व्यक्त करा: तुमच्या भावनांबद्दल मित्र, कुटुंब किंवा समुपदेशकाशी बोला.
  • स्वतःवर विश्वास ठेवा: अपयशामुळे खचून जाऊ नका. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा.
  • ध्येय निश्चित करा: पुन्हा अभ्यास करा आणि परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे ध्येय ठेवा.
  • सकारात्मक दृष्टिकोन: नकारात्मक विचार टाळा आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.
  • मदत मागा: आवश्यक वाटल्यास व्यावसायिक समुपदेशकाची मदत घ्या.

पुढील गोष्टी लक्षात ठेवा:

  • तुमची किंमत केवळ तुमच्या निकालावर अवलंबून नाही.
  • तुम्ही एक अद्वितीय व्यक्ती आहात आणि तुमच्यात अनेक क्षमता आहेत.
  • अपयश हा यशाचा एक भाग आहे.

मदत आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी संपर्क साधा:

  • समुपदेशक: तुमच्या कॉलेजमधील समुपदेशकाशी संपर्क साधा.
  • मानसोपचारतज्ज्ञ: आवश्यक वाटल्यास मानसोपचारतज्ज्ञाची मदत घ्या.

आत्महत्या विचार मनात येत असल्यास, कृपयाhelpline helpline (+91 9920846684) येथे संपर्क साधा किंवा तुमच्या जवळच्या मानसोपचारतज्ज्ञाची भेट घ्या.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3640

Related Questions

मला 2012ला करकरोग झाला 3महीने दवाखाना शस्त्रक्रिया करून आज 2025 ला मला माझे कुटुंबाची काळजी वाटते मी काही कमवत नाही बायको कमावते पण अलीकडे तीची खुप चिडचिड चालते मुलं एकत नाहीत काय करावे मी वेगळ झोपतो भिती पोटी मला कोन काही बोलत नाही पण माझे कोण एकत नाही काय करू खुप काळजी वाटते?
Dipression manje kay?
एकटं खुश राहायला कसं शिकायचं?
सतत चिडचिड होते. टाळायचा विचार करतोय पण नियंत्रण रहात नाही, काय करावे?
मन आजारी पडते म्हणजे नेमके काय?
माझे मित्र मला माझ्या रंगावरून वाईट बोलतात आणि त्यामुळे मी स्वतःबद्दल खूप नकारात्मक विचार करतो?
ताणतणावाचा आपल्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो? ताणतणाव कमी करण्यासाठी कार्यस्थळावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील?