Topic icon

डिप्रेशन

2



योगासन : डिप्रेशन असल्यास


प्राणायाम करा
नैराश्य म्हणजे जीवनाबद्दलची आसक्ती होणे, म्हणजे जगण्याबद्दलची नकारात्मक वृत्ती होणे. नैराश्य आल्यावर आनंद, यश शांती, नाते संबंध ही J निरर्थक ठरतात. जर ही स्थिती नैसर्गिक असेल तर समजून घेऊ शकतो. परंतु ही स्थिती कायम राहिली तर घातक असू शकते. या मुळे रोग निर्माण होतील. नैराश्यने ग्रसित व्यक्ती आयुष्यालाही नाकारू शकतो.

नैराश्य किंवा डिप्रेशनची कारणे वातावरण, परिस्थिती, आरोग्य, क्षमता, नाते संबंध किंवा काहीही घटना असू शकते. सुरुवातीला व्यक्ती स्वतःला कळत नाही, हळूहळू त्याच्या वागण्यात आणि स्वभावात बदल होतात. अति चिडचिडेपणा, रागीटपणा, नास्तिकता, अपराधीपणाचा बोध होतो. व्यक्तीला ड्रग्सचे व्यसन जडतात.

अशा परिस्थितीत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. अशा व्यक्तीला आंनदी वातावरण द्या. त्याला एकटे सोडू नका. त्याच्या आवडीनिवडी जोपासण्याचा प्रयत्न करा. त्याच्या सभोवतालीचे वातावरण आनंदी आणि खेळी मेळीचे ठेवा.
नैराष्यावर प्राणायाम हे सर्व प्रकारच्या नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी आहे. या साठी डिप्रेशन मध्ये असलेल्या व्यक्तीला प्राणायाम करण्यासाठी प्रवृत्त करा.

या साठी त्याच्या कडून सर्वप्रथम पद्मासन करवून घ्या. नंतर प्राणायामाचे लहान आवर्तन करा. दीर्घ श्वास घेऊ द्या. असं केल्याने नैराश्य हळूहळू कमी होईल. मन शांत होईल.

नाडी शोधन प्राणायामानंतर उन्हाळ्यात 'शीतली आणि हिवाळ्यात 'मस्त्रिका' प्राणायाम करवून घ्या.

प्राणायामचे दोन आवर्तन केल्यावर ॐ चा उच्चार करण्यास सांगा. प्रथम ॐ दीर्घ करू द्या या मुळे आतील स्नायू कंपन झाल्यामुळे सहज होईल. नंतर ॐ चा लघु उच्चार करू द्या. या मुळे मस्तिष्क, ओठ, टाळू हे कंपन होऊन सहज होतात. ॐ चा नाद केल्यामुळे तणाव आणि नैराश्य हळू हळू कमी होऊ लागते. नंतर विश्रांती घ्या. आरामदायी झोप घ्या.

प्राणायामाचे परिणाम त्वरित दिसून येतात.

डिप्रेशन असलेल्या व्यक्तीला प्राणायामाचा सराव दीर्घ काळासाठीसातत्याने करायला पाहिजे. हा योग एखाद्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने करणे श्रेयस्कर ठरेल.
उत्तर लिहिले · 7/1/2022
कर्म · 121765
7
नात्यांमध्ये चढाव-उतार चालूच असतात. कधी कधी सततच्या भांडणांमुळे असंही वाटू लागतं की आपण आपल्या जोडीदारासाठी खरंच चांगली व्यक्ती आहोत का?
  आपला नवरा सर्वोत्तम असावा, खूप प्रेम करणारा असावा अशी प्रत्येक बायकोची इच्छा असते. तो प्रामाणिक, खूप प्रेमळ, मायाळू जीवाला जीव देणारा आणि सतत काळजी घेणारा असावा अशी स्त्रीची अपेक्षा आसते. ही अपेक्षा चुकीची सुद्धा नाही, जर बायको खरंच आपल्या पतीवर नितांत प्रेम करत असेल आणि त्याबदल्यात आपल्या नवऱ्याकडून ती जास्त प्रेमाची अपेक्षा करत असले तर त्यात वावगं काही नाही. नवरा जेवढा चांगला असेल तितका संसार अधिक खुलतो. कारण नवरा चांगला असेल तर तो बायकोला तितकं जास्त खुश ठेवू शकतो आणि तितके दोघे खुश राहू शकतात. त्यांच्यात भांडणे कमी होतात.
  जर याच्या उलट नवऱ्याचे वर्तन असेल तर मात्र तो संसार कधी सुखी होऊ शकत नाही. म्हणूनच म्हणतात ना की स्त्रीने पैसा, संपत्तीपेक्षा आपल्या जोडीदाराचे मन कसे आहे ते पाहावे. कारण पैसा, संपत्ती सगळं काही नश्वर आहे पण चांगुलपणा आणि प्रेम हे अनंत आहे. ते कधीच संपणार नाही.
काही समस्यांना वेळ हेच औषध असते हे लक्षात ठेवा. थोडे समजदार पणाने घ्या सर्व काही ठीक होईल
उत्तर लिहिले · 16/1/2021
कर्म · 210095
0
दिव { पावसामुळे तुम्हाला डिप्रेशन येत आहे आणि कुटुंबाच्या आरोग्याची चिंता वाटते हे समजण्यासारखे आहे. खाली काही उपाय दिले आहेत, ज्यामुळे तुम्हाला मदत मिळू शकेल: * तज्ञांची मदत घ्या: मानसिक आरोग्य व्यावसायिक (Mental health professional) तुम्हाला यातून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकतात. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. * नियमित व्यायाम: नियमित योगा केल्याने तणाव कमी होतो आणि मन शांत राहते.link text * ध्यान आणि श्वासोच्छ्वास: रोज 10-15 मिनिटे ध्यान करा. दीर्घ श्वास घेण्याने चिंता कमी होते. * पुरेशी झोप घ्या: दररोज रात्री 7-8 तास झोप घ्या.link text * आहार: संतुलित आणि पौष्टिक आहार घ्या. जंक फूड टाळा. * सामाजिक संबंध: मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा. त्यांच्याशी आपल्या भावना व्यक्त करा.link text * नकारात्मक विचार टाळा: सकारात्मक विचारसरणी ठेवा. नकारात्मक बातम्या आणि सोशल मीडियापासून दूर राहा. * नवीन छंद जोपासा: चित्रकला, संगीत, लेखन, बागकाम यांसारख्या ऍक्टिव्हिटीजमध्ये स्वतःला व्यस्त ठेवा. * वेळेचे व्यवस्थापन करा: कामांची प्राथमिकता ठरवून वेळेचं नियोजन करा. * डॉक्टरांचा सल्ला: आवश्यक वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करा. * कुटुंबासोबत संवाद साधा: तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी नियमितपणे बोला आणि त्यांच्या समस्या जाणून घ्या. त्यांना आधार द्या आणि त्यांची काळजी घ्या. * स्वतःसाठी वेळ काढा: दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी नक्की काढा, ज्यात तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा. हे सर्व उपाय तुम्हाला पावसाळ्यातील डिप्रेशन कमी करण्यास मदत करतील.
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2220