2 उत्तरे
2
answers
भूगोल दिन कधी साजरा केला जातो?
1
Answer link
🌎 *भूगोल दिन' कधी साजरा केला जातो?*
नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा हा 1987 पासून ‘भूगोल साक्षरता आठवडा’ साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर भारतात 1996 पासून 14 जानेवारी (मकर संक्रमणदिन) हा ‘भूगोल दिवस’ साजरा केला जातो.
1987 पासून अमेरिकेमध्ये राष्ट्रीय भूगोल संघटना भौगोलिक साक्षरता वाढवण्यासाठी शाळा, संस्था, विविध संघटना यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.
📍 *महत्व* : विद्यार्थी व समाजात भौगोलिक साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
‘भारतीय खगोलशास्त्र’ हे अति प्रगल्भ असे शास्त्र असून प्राचीन काळापासून भारतीयांचा यावर विशेष अभ्यास व पगडा आहे. खगोलशास्त्र ही भूगोलाची एक शाखा म्हणता येईल.
भूगोलावर आधारित ग्रह, तारे, नक्षत्र, राशी व पंचांगचा सखोल व सविस्तर अभ्यास आपल्या पूर्वजांनी केलेला असून आजच्या विज्ञानाच्या 21 व्या शतकातही आपण पूर्वी तयार केलेल्या पंचांग व खगोलीय गणितांचाच वापर करतो.
💁♂ *अभ्यासकांसाठी मार्गदर्शक* : लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लिहिलेला ‘आरायन’ हा ग्रंथ आजही खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत आहे.
मानवी भूगोलामध्ये पर्यावरणाचा प्रभाव व उपयोग, मानवनिर्मित संसाधने, संपत्ती व पर्यावरणाचा मानवावरील समग्र परिणाम याचा अभ्यास केला जातो. तर प्राकृतिक भूगोलामध्ये सजीव, वातावरण, जमीन, पाणी, भूरचना व त्यांचा परस्परसंबंध यांचा सातत्याने अभ्यास केला जातो.
भूगोल दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच जागरुक होऊन नव्या जगातील नव्या समस्यांचा विचार करून पर्यावरणीय दृष्टिकोनातून व मानवाच्या शाश्वत प्रगतीसाठी प्रयत्न करूयात...!
सौजन्य:लेट्सअप

0
Answer link
भूगोल दिन दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो.
हा दिवस भूगोल विषयाचे महत्त्व आणि आपल्या जीवनातील भूगोलाच्या भूमिकेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
भूगोल हा पृथ्वी, तिची वैशिष्ट्ये, तिचे वातावरण आणि मानवी क्रियाकलापांचा अभ्यास आहे.