Topic icon

महत्वाचे दिवस

1
7 एप्रिल
उत्तर लिहिले · 24/8/2023
कर्म · 45
0

जागतिक ग्राहक दिन दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो.

हा दिवस ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

1962 मध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी अमेरिकन काँग्रेसमध्ये ग्राहकांच्या हक्कांवर एक भाषण दिले. त्यामध्ये त्यांनी ग्राहकांच्या चार मूलभूत हक्कांबद्दल सांगितले. या घटनेच्या स्मरणार्थ जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो.

  • सुरक्षिततेचा हक्क
  • माहितीचा हक्क
  • निवडीचा हक्क
  • अधिकार प्राप्त करण्याचा हक्क

अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

ग्राहक व्यवहार विभाग, भारत सरकार
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980
0

भारतामध्ये 24 जानेवारी या दिवशी बालिका दिवस साजरा केला जातो.

हा दिवस देशातील मुलींना पाठिंबा देण्यासाठी आणि समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवशी, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, आरोग्य आणि सुरक्षितता याबद्दल जागरूकता पसरवली जाते.

स्त्रोत:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980
4
राष्ट्रीय पत्रकारिता दिन दरवर्षी 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्र सरकारने 4 जुलै 1966 रोजी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना केली.
उत्तर लिहिले · 4/3/2021
कर्म · 34235
1
🌎 *भूगोल दिन' कधी साजरा केला जातो?*

नोव्हेंबर महिन्यातील तिसरा आठवडा हा 1987 पासून ‘भूगोल साक्षरता आठवडा’ साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर भारतात 1996 पासून 14 जानेवारी (मकर संक्रमणदिन) हा ‘भूगोल दिवस’ साजरा केला जातो.

1987 पासून अमेरिकेमध्ये राष्ट्रीय भूगोल संघटना भौगोलिक साक्षरता वाढवण्यासाठी शाळा, संस्था, विविध संघटना यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.

📍 *महत्व* : विद्यार्थी व समाजात भौगोलिक साक्षरता वाढवण्याच्या दृष्टीने या दिवसाला विशेष महत्त्व आहे.

‘भारतीय खगोलशास्त्र’ हे अति प्रगल्भ असे शास्त्र असून प्राचीन काळापासून भारतीयांचा यावर विशेष अभ्यास व पगडा आहे. खगोलशास्त्र ही भूगोलाची एक शाखा म्हणता येईल.

भूगोलावर आधारित ग्रह, तारे, नक्षत्र, राशी व पंचांगचा सखोल व सविस्तर अभ्यास आपल्या पूर्वजांनी केलेला असून आजच्या विज्ञानाच्या 21 व्या शतकातही आपण पूर्वी तयार केलेल्या पंचांग व खगोलीय गणितांचाच वापर करतो.

💁‍♂ *अभ्यासकांसाठी मार्गदर्शक* : लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना लिहिलेला ‘आरायन’ हा ग्रंथ आजही खगोलशास्त्राच्या अभ्यासकांना मार्गदर्शक ठरत आहे.

मानवी भूगोलामध्ये पर्यावरणाचा प्रभाव व उपयोग, मानवनिर्मित संसाधने, संपत्ती व पर्यावरणाचा मानवावरील समग्र परिणाम याचा अभ्यास केला जातो. तर प्राकृतिक भूगोलामध्ये सजीव, वातावरण, जमीन, पाणी, भूरचना व त्यांचा परस्परसंबंध यांचा सातत्याने अभ्यास केला जातो.

भूगोल दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनीच जागरुक होऊन नव्या जगातील नव्या समस्यांचा विचार करून पर्यावरणीय दृष्टिकोनातून व मानवाच्या शाश्‍वत प्रगतीसाठी प्रयत्न करूयात...!

सौजन्य:लेट्सअप
उत्तर लिहिले · 23/1/2020
कर्म · 569225
0
*📰६ जानेवारी पत्रकार दिन : ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर*

_*🔰📶महा डिजी। विशेष माहिती*_

🗞मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. बाळशास्त्री हे इंग्रजी राजवटीतील एक विद्वान व्यक्‍तिमत्त्व म्हणून विख्यात होते.

🗞गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी  1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी  सत्ताधार्‍यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.

🗞वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने र्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. जुलै 1840 मध्ये  ‘दर्पण’चा शेवटचा अंक प्रकाशित झाला.


*💁‍♂मराठी पत्रकारितेची परंपरा :*

⚡मराठी पत्रकारितेची महान परंपरा बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खाडिलकर, महाजनी, पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव, आचार्य अत्रे यांच्यापासून सुरू झालेली आहे. त्या काळातली छपाईची अपुरी साधने, त्या काळातल्या वृत्तपत्रांच्या संकल्पना, छपाईच्या क्षेत्रात आज जी उत्तुंग झेप घेतली गेली आहे, तशी कोणतीही व्यवस्था नसताना आणि दोन पैसे फायदा मिळवून ‘या व्यवसायाचा धंदा न करता केलेली पत्रकारिता’ हे मराठी पत्रकारितेचे खरे कूळ आहे.

⚡बाबासाहेबांचा ‘मूकनायक’ किंवा ‘बहिष्कृत भारत’, टिळकांचा ‘केसरी’, मराठी भाषेत नसला तरी ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ही महात्माजींची वृत्तपत्रे एका धोरणाभोवतीच सर्वस्व पणाला लावून काम करत होती. मराठी पत्रकारितेचे हे प्रभावी कूळ आहे. आज मराठी पत्रकारिता नव्या दिशेने जात आहे. अनेक नवे प्रवाह यामध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर बदलत्या काळात काही आव्हानेही उभी राहिली आहेत. त्यांचा सामना येणार्‍या काळात करावा लागणार आहे.
________
*👉 पत्रकार दिन का साजरा केला जातो?*

आज पत्रकार दिन. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या उत्तुंग कार्याला मानवंदना देण्याचा दिवस. 1832 साली याच दिवशी कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला म्हणून दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा होतो.

*कोण होते बाळशास्त्री जांभेकर?*

बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावात झाला. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्यांना आद्यपत्रकारही म्हटले जाते.

आपले सामाजिक विचार समाजापुढे मांडण्यासाठी त्यांनी ‘बॉम्बेदर्पण’ या इंग्रजी नियतकालिकानंतर ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. समाजातील दुष्ट रुढी व परंपरा तसेच अज्ञान यांना उखडून टाकून समाजाला ज्ञानमार्ग दाखवणे व लोककल्याण साधणे तसेच लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकरंजन करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी दर्पणच्या पहिल्याच अंकात सांगितले होते.

जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. वृत्तपत्राची किंमत 1 रुपया होती. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. दर्पणवर सुरुवातीपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. अशा रीतीने दर्पण साडे आठ वर्षे चालले आणि शेवटी दुर्दैवाने 1 जुलै 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

जांभेकरांनी नि:स्वार्थपणे सरकारी नोकरी सांभाळत देशातील चळवळींना हातभार लावत कुणाचेही मिंधेपण न स्वीकारता आर्थिक भुर्दंड सोसत 'दर्पण' चालवले. ध्येयसक्तीपोटी केलेल्या अति श्रमांच्या परिणामी विषमज्वराने मुंबईत त्यांचा 17 मे 1846 मध्ये मृत्यू झाला. अशा या महान आद्यपत्रकारास 'महा  डिजिटल मॅगेझीन'चा मानाचा मुजरा...
___________________________________

💁‍♂ *आज पत्रकारदिनी जाणून घेऊ संपादक व पत्रकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली "वृत्तपत्रे"*

*🅜🅐🅗🅐 🅓🅘🅖🅘 | Special*

📰 *मूकनायक*

मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले.

📰 *बहिष्कृत भारत*

बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. 

📰 *समता*

समता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे प्रकाशन २९ जून १९२८ रोजी झाले. हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांद्वारा समाज सुधार हेतू स्थापित संस्था समता संघाचे (समता सैनिक दलाचे) मुखपत्र होते. याचे संपादक म्हणून बाबासाहेबांनी देवराव विष्णू नाईक यांची नियुक्ती केली होती.

📰 *जनता*

जनता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. जनता प्रारंभी पाक्षिक होते, ३१ ऑक्टोबर इ.स. १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.

📰 *प्रबुद्ध भारत*

प्रबुद्ध भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ छापले होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.

👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी इथली लोकभाषा आहे.

😇 सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समजु शकत होती.

🙄 याउलट महात्मा गांधी स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 6/1/2020
कर्म · 569225
4
*💁Goa Liberation Day 2019: भारताच्या स्वातंत्र्यानंतर तब्बल 14 वर्षांनी गोवा झाला होता मुक्त; अवघ्या 36 तासात पोर्तुगीजांनी पत्करली होती शरणागती, जाणून इतिहास*

*🔰महा डिजी। विशेष माहिती-गोवा मुक्ती दिन*

💠19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याने गोवा, दमण आणि दीव येथे प्रवेश करत, साडेचारशे वर्षांच्या पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून या भागांना मुक्त केले होते.

💠आज या दिवसाचे औचित्य साधून गोव्यात ‘गोवा मुक्तीदिन’ साजरा केला जात आहे.

💠ब्रिटिश व फ्रान्सने सर्व वसाहती अधिकार गमावल्यानंतरही, गोवा, दमण आणि दीव यांच्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. हा भाग परत करण्यासाठी भारत सरकारच्या वारंवार होणाऱ्या मागण्यांकडे पोर्तुगीजांनी दुर्लक्ष केले. त्यानंतर भारत सरकारने ‘ऑपरेशन विजय’ अंतर्गत सैन्याची एक छोटी तुकडी त्या परिसरात पाठविली.

*💠36 तासांहून अधिक काळ जमीन, समुद्र आणि हवाई हल्ले झाले. त्यानंतर पोर्तुगीज सैन्याने 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सैन्याकडे बिनशर्त शरणागती पत्करली आणि तो भाग भारताच्या ताब्यात आला. अशाप्रकारे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 14 वर्षांनी गोवा मुक्त झाला.*

💠गोवा हे पश्चिम भारतातील एक छोटेसे राज्य. त्याचा आकार लहान असूनही हे राज्य एक मोठे व्यापारी केंद्र होते. भारतात व्यापारासाठी हे एक प्रवेशद्वारही होते. म्हणूनच मौर्य, सातवाहन आणि भोज राजवंशही गोव्याकडे आकर्षित झाले होते.

💠इ.स. 1350 मध्ये गोवा बहमनी सल्तनतच्या अधिपत्याखाली गेला, परंतु 1370 मध्ये विजयनगर साम्राज्याने पुन्हा याला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर परत 1469 मध्ये बहमनी सल्तनतने गोव्याला काबीज केले. 1498 ला पोर्तुगीज खलाशी 'वास्को द गामा' याने गोव्यात पाऊल टाकले. त्यानंतर जवळजवळ साडेचारशे वर्षांनी 1961 रोजी गोवा खऱ्या अर्थाने मुक्त झाला.

💠गोवा राज्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून सोडवण्यासाठीचे जे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तिसंग्राम असे म्हटले जाते. भारत स्वतंत्र झाला तरी गोवा पारतंत्र्यात होता. त्याकाळी पोर्तुगीजांच्या निर्बंधामुळे गोव्यातील लोकांना श्वास घेणे मुश्कील झाले होते. 18 जून 1946 रोजी मडगाव येथील डॉ. लोहिया यांच्या भाषणाने या मुक्तीसंग्रमाची पहिली ठिणगी पडली. त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी शांततापूर्वक गोवा आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही.

💠अखेरीस 18 डिसेंबर 1961 रोजी भारत सरकारने लष्कराला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गोव्याच्या सर्व सीमा ताब्यात घेण्यात आल्या. शत्रूचा पराभव करा किंवा मृत्यूला मिठी मारा, असा आदेश पोर्तुगीज सैन्याला देण्यात आला. पोर्तुगीज सैन्य भारतीय सैन्यासमोर अत्यंत कमकुवत सिद्ध झाले. भारताच्या 30 हजार सैन्यासमोर त्यांच्या साडेतीन हजार फौजाचा टिकाव लागला नाही. शेवटी पोर्तुगालचे गव्हर्नर जनरल वसालो इ सिल्वा यांनी भारतीय लष्कर प्रमुख पी.एन. थापर यांच्यासमोर आत्मसमर्पण केले आणि गोवा भारताच्या ताब्यात आला.

💠पुढे 30 मे 1987 रोजी, गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला. तर दमण आणि दीव हे केंद्रशासित प्रदेश राहिले. 'गोवा मुक्ति दिन' हा दरवर्षी 19 डिसेंबरला साजरा केला जातो.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*

_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6
उत्तर लिहिले · 19/12/2019
कर्म · 569225