2 उत्तरे
2
answers
राष्ट्रीय पत्रकार दिन कधी असतो?
0
Answer link
*📰६ जानेवारी पत्रकार दिन : ‘दर्पणकार’ बाळशास्त्री जांभेकर*
_*🔰📶महा डिजी। विशेष माहिती*_
🗞मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ हे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. बाळशास्त्री हे इंग्रजी राजवटीतील एक विद्वान व्यक्तिमत्त्व म्हणून विख्यात होते.
🗞गोविंद कुंटे आणि भाऊ महाजन यांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रकाशित झाला. जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने ‘दर्पण’ आवर्जून मराठी भाषेत काढण्यात आले. त्याचवेळी इंग्रजी सत्ताधार्यांना स्थानिकांच्या अडचणी आणि भावना कळाव्या यासाठी ‘दर्पण’मध्ये एक स्तंभ इंग्लिश भाषेत लिहिला जात असे.
🗞वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी सर्वसामान्यांमध्ये रुजलेली नसल्याने ‘दर्पण’ला सुरुवातीला मोठ्या संख्येने र्गणीदार मिळाले नाहीत. मात्र ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. जुलै 1840 मध्ये ‘दर्पण’चा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
*💁♂मराठी पत्रकारितेची परंपरा :*
⚡मराठी पत्रकारितेची महान परंपरा बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, खाडिलकर, महाजनी, पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव, आचार्य अत्रे यांच्यापासून सुरू झालेली आहे. त्या काळातली छपाईची अपुरी साधने, त्या काळातल्या वृत्तपत्रांच्या संकल्पना, छपाईच्या क्षेत्रात आज जी उत्तुंग झेप घेतली गेली आहे, तशी कोणतीही व्यवस्था नसताना आणि दोन पैसे फायदा मिळवून ‘या व्यवसायाचा धंदा न करता केलेली पत्रकारिता’ हे मराठी पत्रकारितेचे खरे कूळ आहे.
⚡बाबासाहेबांचा ‘मूकनायक’ किंवा ‘बहिष्कृत भारत’, टिळकांचा ‘केसरी’, मराठी भाषेत नसला तरी ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ही महात्माजींची वृत्तपत्रे एका धोरणाभोवतीच सर्वस्व पणाला लावून काम करत होती. मराठी पत्रकारितेचे हे प्रभावी कूळ आहे. आज मराठी पत्रकारिता नव्या दिशेने जात आहे. अनेक नवे प्रवाह यामध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर बदलत्या काळात काही आव्हानेही उभी राहिली आहेत. त्यांचा सामना येणार्या काळात करावा लागणार आहे.
________
*👉 पत्रकार दिन का साजरा केला जातो?*
आज पत्रकार दिन. ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या उत्तुंग कार्याला मानवंदना देण्याचा दिवस. 1832 साली याच दिवशी कै. बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले होते. त्यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला म्हणून दरवर्षी 6 जानेवारीला पत्रकार दिन साजरा होतो.
*कोण होते बाळशास्त्री जांभेकर?*
बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावात झाला. दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी 6 जानेवारी 1832 रोजी सुरू केले. दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने 6 जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो. त्यांना आद्यपत्रकारही म्हटले जाते.
आपले सामाजिक विचार समाजापुढे मांडण्यासाठी त्यांनी ‘बॉम्बेदर्पण’ या इंग्रजी नियतकालिकानंतर ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरु केले. समाजातील दुष्ट रुढी व परंपरा तसेच अज्ञान यांना उखडून टाकून समाजाला ज्ञानमार्ग दाखवणे व लोककल्याण साधणे तसेच लोकशिक्षणाच्या माध्यमातून लोकरंजन करणे हाच मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी दर्पणच्या पहिल्याच अंकात सांगितले होते.
जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. वृत्तपत्राची किंमत 1 रुपया होती. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. दर्पणवर सुरुवातीपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. अशा रीतीने दर्पण साडे आठ वर्षे चालले आणि शेवटी दुर्दैवाने 1 जुलै 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.
जांभेकरांनी नि:स्वार्थपणे सरकारी नोकरी सांभाळत देशातील चळवळींना हातभार लावत कुणाचेही मिंधेपण न स्वीकारता आर्थिक भुर्दंड सोसत 'दर्पण' चालवले. ध्येयसक्तीपोटी केलेल्या अति श्रमांच्या परिणामी विषमज्वराने मुंबईत त्यांचा 17 मे 1846 मध्ये मृत्यू झाला. अशा या महान आद्यपत्रकारास 'महा डिजिटल मॅगेझीन'चा मानाचा मुजरा...
___________________________________
💁♂ *आज पत्रकारदिनी जाणून घेऊ संपादक व पत्रकार असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली "वृत्तपत्रे"*
*🅜🅐🅗🅐 🅓🅘🅖🅘 | Special*
📰 *मूकनायक*
मूकनायक हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी इ.स. १९२० साली समाजाच्या वेदना व विद्रोह प्रकट करण्यासाठी सुरू केलेले मराठी भाषेतील एक पाक्षिक होते. ३१ जानेवारी १९२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. हे पाक्षिक मुंबईहून निघत असे. पांडुरंग नंदराम भटकर नावाच्या महार जातीच्या शिक्षित तरुणाने या पाक्षिकाचे संपादक केले.
📰 *बहिष्कृत भारत*
बहिष्कृत भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते.
📰 *समता*
समता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राचे प्रकाशन २९ जून १९२८ रोजी झाले. हे वृत्तपत्र डॉ. आंबेडकरांद्वारा समाज सुधार हेतू स्थापित संस्था समता संघाचे (समता सैनिक दलाचे) मुखपत्र होते. याचे संपादक म्हणून बाबासाहेबांनी देवराव विष्णू नाईक यांची नियुक्ती केली होती.
📰 *जनता*
जनता हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले एक वृत्तपत्र होते. या वृत्तपत्राचा पहिला अंक २४ नोव्हेंबर इ.स. १९३० रोजी प्रकाशित झाला. याचे संपादक देवराव विष्णू नाईक होते. जनता प्रारंभी पाक्षिक होते, ३१ ऑक्टोबर इ.स. १९३० रोजी ते साप्ताहिक झाले.
📰 *प्रबुद्ध भारत*
प्रबुद्ध भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुरू केलेले एक वृत्तपत्र आहे. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म ग्रहण केला. यासोबतच ‘जनता’ वृत्तपत्राचे नाव बदलून त्यांनी ‘प्रबुद्ध भारत’ करून टाकले. या पत्राच्या मुखशीर्षावर ‘अखिल भारतीय दलित फेडरेशनचे मुखपत्र’ छापले होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर हे पाक्षिक बंद पडले. ११ एप्रिल २०१७ रोजी महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधीत बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात पुन्हा प्रकाशित करण्याचे जाहिर केले व १० मे २०१७ रोजी याचा पहिला अंक प्रकाशित झाला.
👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी इथली लोकभाषा आहे.
😇 सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समजु शकत होती.
🙄 याउलट महात्मा गांधी स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.
____________________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर बातम्या,मनोरंजन,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सरकारी योजना,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6

राष्ट्रीय पत्रकार दिन दरवर्षी ६ जानेवारी रोजी साजरा केला जातो.
हा दिवस महाराष्ट्रातील पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी 'दर्पण' नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्यामुळे त्यांना मराठी पत्रकारितेचे जनक मानले जाते.
या दिवसाचा उद्देश पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाला योग्य माहिती देणे आणि लोकशाही मूल्यांचे जतन करणे आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करू शकता: