2 उत्तरे
2
answers
दर्श वेळ अमावस्या म्हणजे काय? ती कशी साजरी केली जाते?
5
Answer link
भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत चांगल्यासहित वाईटचीही पुजा करून सन्मान करण्याच्या अनेक प्रथा आहेत. देशातील कानाकोपर्यात कुठे ना कुठे वर्षातील ३६५ दिवस हे सणाचे असतात.
दर्श अमावास्येला आपल्या सग्या-सोयर्यांना, मित्रांना अन अपरिचित पाहुण्यांनाही शेतकरी शेतात जेवायला घालतात. ही एक प्रथा आहे, एक सण आहे; या सणाला *‘येळ अमावस्या’* अस म्हणायची रीत आहे.
मुळ कर्नाटकातील असणारा महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.
मार्गशिर्ष अमावस्येला सोलापुर जिल्ह्याचा काही भाग, लातुर व उस्मानाबाद जिल्ह्यात "वेळा अमावस्या" हा शेतकरी बांधवांचा महत्वाचा सण साजरा केला जातो. हा सण शेजारील कर्नाटकातुन महाराष्ट्रात आला आहे.
ही आमावस्या *दर्शवेळा अमावस्या* म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला.वेळ अमावस्या काळ्या आईचे आपण काही देणं लागतो या पवित्र भावनं कर्नाटक आणि लगतच्या मराठवाड्यातील लातूर,बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत दर्श
अमावस्या ही 'वेळ अमवस्या' म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.
मुळातील शब्द हा 'येळी अमावस्या' असून त्याचे नागरकरण हे 'वेळ अमावस्या' झाले.
हा सण, ही प्रथा एक वेगळीच पर्वणी असते. येथे भेदभाव अन दुरावा बाजूला सारून माणूसपणाची ऊब वाढलेली असते. इंग्रजी महिन्यांप्रमाणे साधारणताः डिसेंबर-जानेवारी या दिवसात ही अमावस्या असते. ह्या दिवसात पेरलेली पिके बहरलेली असतात. वातावरणात थंडी असते, त्यामुळे अशा दिवसांत जेवण जास्त जातं अन ते शरीराला आवश्यकही असत. अशा वेळेस शेत असणारी मंडळी आपल्या मित्र-मैत्रिणी, पाहुणे, शेजारी अशांना आपल्या शेतात जेवायला येण्याचं निमंत्रण देतात. जसा सण निराळा आहे तसाच पोटोबासाठी बेतही निराळाच असतो. आंबट ताक-दहयाच आंबिल हे आदल्या रात्री बनवून एका ‘बिंदग्यात’ (माठ) भरून ठेवलं जात. आंबिल हे या सणाच खास आकर्षण असत. थंडगार आंबिलची एक वेगळीच ‘नशा’ असते. केवळ आंबिलावर हा बेट थांबत नाही, सोबत असतात नेहमीपेक्षा निराळे असे खास गावरण पदार्थ! या दिवशी विविध भाज्या एकत्र करून शिजवलेली भज्जी असते, ज्वारीचे उंडे असतात, ज्वारी किंवा बाजरी ची भाकरी, गुळाची पोळी, धपाटे आणि गोड भात! असा बेत हा जिभेचे चोचले तर पुरवतोच शिवाय थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जाही मिळवून देतो.
या दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची [पंचमहाभूते] पुजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते.नुकत्याच आलेल्या वाटाणा , तुरीचे दाणे घालुन केलेली भाजी ( भज्जी ), तीळ गुळ, शेंगदाण्याची गोड पोळी, ज्वारी व बाजरीची भाकरी, धपाटे, भात व ताकास ज्वारीचे पीठ लावुन केलेली आंबील अशा पदार्थांचा आस्वाद घेण्यात येतो. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली “भज्जी”, खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.`सणानिमीत्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांना शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात.
एखादा व्यक्ति आल्यावर त्याला काहीतरी खावच लागत अशी ही परंपरा आहे. जेवण नाहीतर निदान एक ग्लास आंबिल हे अनिवार्य असतं. जमा झालेल्या स्त्रिया येणार्या-जाणार्याच्या जेवनाच बघतात तर जेवण झाल्यावर पुरुष मंडळी पत्त्याचे डाव टाकत असतात. ह्या दिवशी पत्ते खेळणे हीसुद्धा आता परंपरेचा एक भाग बनली आहे.
काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.
एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण ! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पुजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.
भारतात अनेक सण, परंपरा अन प्रथा आहेत. त्यातील काही आता कालबाह्य झाल्या आहेत, काहींना आपण विसरत आहोत तर काहींना अंधश्रद्धा म्हणून हिणवल जात. वेळ अमावास्या ही एका परंपरेचा भाग आहे ज्यात अर्थशास्त्र आणि आरोग्यशास्त्र सुद्धा लपलेल आहे. अनेक लोक जुन्या गोष्टी विसरून एकत्र येतात, नव्या ओळखी होतात आणि मनाला प्रसन्नताही लाभते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, कै. विलासराव देशमुख हेसुद्धा दरवर्षी काहीही कामात असले तरी न विसरता, वेळात-वेळ काढून आपल्या गावी, बाभळगावाला येऊन सहकुटुंब ‘वेळ अमावास्या’ साजरी करायचे; दुसर्या दिवशी स्थानिक अन विविध वृत्तपत्रात त्यांची शेतातील छबी येण हीसुद्धा एक परंपरा झाली होती, जी दुर्दैवाने खंडित झाली आहे.
__________________
*वेळ अमावास्या बाबत*
🎊🎊🎊🎊🎊🎊
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात वेळ अमावास्या साजरी केली जाते. महाराष्ट्रातील उस्मानाबाद, लातूर, कर्नाटकच्या गुलबर्गा, बीदर जिल्ह्यातील सीमा परिसरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. रबीचे पीक आल्यानंतर आनंदाने या धरणीमातेच्या नवनिर्मितीचा आनंद घेण्यासाठी व स्वागतासाठी हा वनमहोत्सव साजरा केला जातो. या वेळ अमावास्येच्या निमित्ताने धरणीमातेची मनापासून आभर मानले जाते. या दिवशी शेतीशिवाराला यात्रेचे स्वरूप येते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा उत्सव सर्वधर्म समानता मानणारा आहे. कारण आपले नातेवाईक, शेजारी, मित्र परिवार, ओळखीचे लोक यांना शेतात जेवणाचे निमंत्रण दिले जाते. मग तो कोणत्याही जाती-पंथाचा असो, त्याचा विचार केला जात नाही. येथे विचार केला जातो तो माणुसकीचा.
या सणादिवशी शेतात एक खोप बनवून तेथे निसर्गदेवतेची विविध धान्यांची रास मांडून तेथे फुले, आंब्याची पाने, ज्वारीच्या धाटांची सजावट केली जाते. ‘ओलघे, ओलघे सालम पोलगे’ असे म्हणत प्रदक्षिणा घातली जाते. शिवारातील पक्ष्यांनो, प्राण्यांनो आपणा सर्वांना माणसाप्रमाणेच जेवणाचे आमंत्रण आहे. तुमच्या आशीर्वादाने चारी बाजूंनी आमचे शिवार फुलू दे, अशी प्रार्थना बळिराजा जणू काही करत असतो. एवढंच नाही तर काही भागात ज्वारीचा खिचडा करतात तर काही भागात कोंदीच्या पोळ्या (तिळाच्या पोळ्या), धपाटे, गव्हाची खीर, बाजरीच्या भाकरी केल्या जातात. ग्रामीण भागात या सणाचे विशेष महत्त्व दिसून येते. या वेळी पाणी आणि अंबिल ठेवण्यासाठी बिंदगी व झाकणी त्याचबरोबर सांजमोरवे आणि झाकणीचा उपयोग केला जातो. कदाचित हे नव्या पिढीसाठी अपरिचित शब्द असतील परंतु याचा वापर आजही ब-याच ठिकाणी केला जातो.
ज्वारी, बाजरीच्या भाकरी, गव्हाची गूळ, तूप, सुंठ घालून केलेली खीर म्हणजे हुग्गी, बाजरीच्या पिठाचे पाण्यात उकडलेले गोळे म्हणजे उंडे, तांदळाचा भात, भाकरीचे पीठ आणि ताकाचे कढीसारखे आंबिल, यासाठी ज्वारीचे पीठ आदल्या दिवशी उकडून ते ताकात भिजवून ठेवले जाते. अद्रक, लसूण, कोथिंबीर या अंबिलमध्ये असते. त्यावर कढीपत्ता, हिंगाची फोडणी असल्याने अतिशय विलक्षण चव या अंबिलला येते. एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ असतो तो भज्जी! ही एक चवदार भाजी, अनेक भाज्या मिळून बनवलेली. यात निवडून बारीक चिरलेली मेथी, कांद्याची कोवळी पात, वालाच्या शेंगा, बारीक चिरलेले गाजर, तुरीच्या ओल्या शेंगाचे दाणे, हिरवे वाटाणे, शेंगदाणे, हिरवी चिंच, गूळ, अद्रक, लसूण, हिरवी मिरची यांचे वाटण इ. घेऊन सुक्या मिरच्या, जिरे, मोहरी यांची खमंग फोडणी दिली जाते. आंबट-गोड चवीची भज्जी सर्वांना खूप आवडते.
ज्वारीची भरड काढून त्यात तांदूळ मिसळून त्याला शिजवून खमंग फोडणी दिलेला खिचडा हिवाळ्यात शरीराला अधिक कॅलरीजची गरज भरून काढतो. पौष्टिकता आणि चविष्टपणा याचा सुरेख समन्वय या पदार्थात असतो. तीळ लावून बनवलेली बाजरीची भाकरी आणि लोणी तसेच तिळाची पोळी, तूप म्हणजे उष्णता आणि स्निग्धतेचा समावेशच. त्याचबरोबर फायबर आणि प्रोटिनही असतात. वेळ अमावास्ये दिवशी सकाळपासूनच भाकरीच्या टोपल्या, भज्जीचे पातेले, अंबिलचे हंडे घेऊन लहान मुले, तरुण वर्ग, महिला-पुरुष सर्व ज्येष्ठ मंडळी शेताकडे जातात. सर्वत्र गजबजलेल्या बैलगाड्या, ऑटो, जीप, फोरव्हीलर शेताकडे जाताना दिसतात.
शेतातील हरभ-याचे घाटे, तुरीच्या कोवळ्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, बोरे, चिंचा, ऊस, पेरू यांचा आस्वाद घेताना घरी परतावेसे वाटत नाही.
वेळ अमावास्या हा व्यक्तीचा समाजाशी, सृष्टीशी असलेला संबंध दृढ करण्याचा उत्सव. येथे शेतात येणारा प्रत्येकजण ओळखीचा असो की अनोळखी असो, शेतातून जाणारा अगदी वाटसरू असो प्रत्येकाला आग्रहाने जेवायला बोलावले जाते, जेऊ घातले जाते. अनेकजण या शेतातून त्या शेतात आनंद अनुभव घेत असतात. यामुळे निसर्गाशी नाते निर्माण होते. निसर्गाच्या सानिध्यात सहभोजनाचा आनंद साजरा केला जातो.
🌾🌾🌾🌻🌻🌿🌿

0
Answer link
दर्श अमावस्या, ज्याला दर्शवेळ अमावस्या असेही म्हणतात, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी पितरांचे (deceased ancestors) स्मरण केले जाते आणि त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली जाते.
दर्श वेळ अमावस्या:
- अर्थ: दर्श म्हणजे 'दर्शन' आणि अमावस्या म्हणजे 'चंद्र नसलेला दिवस'. या दिवशी चंद्र दिसत नाही, त्यामुळे हा दिवस पितरांना समर्पित असतो.
- महत्व: या दिवशी पितरांची पूजा केल्याने कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी लाभते, अशी मान्यता आहे.
दर्श अमावस्या कशी साजरी केली जाते:
- पितरांचे स्मरण: या दिवशी लोक आपल्या पितरांचे स्मरण करतात आणि त्यांच्या नावाने दानधर्म करतात.
- तर्पण विधी: नदी किंवा जलाशयाच्या ठिकाणी पितरांसाठी तर्पण विधी केला जातो. तीळ, जव आणि पाणी अर्पण करून त्यांची तृप्ती केली जाते.
- ब्राह्मण भोजन: काही लोक ब्राह्मणांना भोजन देतात आणि वस्त्र दान करतात.
- पिंडदान: गया, काशी किंवा त्र्यंबकेश्वर यांसारख्या तीर्थक्षेत्रांवर पिंडदान केले जाते.
- घरातील पूजा: घरात पितरांच्या प्रतिमेची पूजा केली जाते आणि त्यांना आवडणारे पदार्थ बनवून नैवेद्य दाखवला जातो.
- दानधर्म: गरीब लोकांना अन्न, वस्त्र आणि पैसे दान केले जातात.
दर्श अमावस्येच्या दिवशी केलेले दान आणि पूजा पितरांपर्यंत पोहोचतात आणि ते आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे.