संस्कृती सण आणि उत्सव

आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात?

1


आपट्याच्या पानांना सोनं का म्हणतात 




आपटा हे जगातलं एकमेव असं झाड आहे ज्याला पौराणिक काळापासून सोन्याची उपमा दिली गेली आहे. आपण सगळेच विजया दशमी म्हणजेच दसऱ्याला चतुर्मासातला एक महत्त्वाचा सण आणि साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून या सणाचं महत्त्व जाणतो. पण या बरोबरीनेच या दिवशी अगदी लहान असल्यापासून थोरा मोठ्यांकडून आपल्याला आपट्याच्या पानांची पूजा आणि देवाण घेवाण करण्याची शिकवण दिली गेली आहे. आणि या दिवशीच आपट्याच्या पानांना सोन्याचं प्रतिक म्हणजेच सोन्याचं रूप मानलं जातं. पण बाकीच्या दिवशी मात्र ही पानं कचरा कुंडीत पडलेली आपल्याला दिसतात. म्हणून नेमकं याच दिवशी आपट्याच्या पानांना सोन्याची उपमा का दिली जाते आणि त्याची पूजा का केली जाते या मागे पौराणिक कथा आहे. चला जाणून घेऊया.
पैठणमध्ये राहणाऱ्या ब्राम्हण कुटुंबातील कौत्स नावाच्या मुलगा विद्यार्जनासाठी भडोचमध्ये वरतंतू ऋषींच्या आश्रमात गेला. ऋषींच्या प्रयत्न पूर्वक शिकवणीमुळे कौत्स चौदा विद्यांमध्ये पारंगत झाला. आपल्याला एवढ्या विद्या शिकवणाऱ्या आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा द्यावी आणि त्यांच्या ऋणातून मुक्त व्हावं या हेतूने त्याने आपले गुरू वरतंतू ऋषींना कृतज्ञतापूर्वक त्यांचे ज्ञानासाठी आभार मानले आणि त्यांना गुरुदक्षिणे बाबत विचारणा केली. मात्र त्याच्या या बोलण्यावर वरतंतू ऋषी काहीही बोलले नाहीत. त्याने आणखी दोनदा ऋषींना गुरुदक्षिणे बाबत विचारणा केली तरीही त्यांच्याकडून काहीही जबाब आला नाही. म्हणून एकदा शेवटची विचारणा करूया या विचाराने कौत्सने ऋषींना गुरुदक्षिणेबाबत विचारले. तर त्यावर ऋषींनी उत्तर दिले की, “गुरुची दक्षिणा हीच असते जेव्हा आपला शिष्य हा आपल्याकडून विद्या घेऊन त्याचा उचित वापर करतो. पण तुला मला गुरू दक्षिणाच द्यायची आहे तर ऐक!
तुला शिकविलेल्या प्रत्येक विद्येसाठी एक कोटी याप्रमाणे चौदा विद्येसाठी चौदा कोटी सुवर्ण मुद्रा तू मला एका व्यक्तीकडूनच आणून दे.”
कौत्स हा सामान्य घरातून होता म्हणून कुटुंबातल्या कोणा एकाकडे चौदा कोटी सुवर्ण मुद्रा मिळवणं म्हणजे अशक्यच होतं. बाहेर कोणाकडून एवढ्या मुद्रा मागणं आणि त्यांनी देणं म्हणजे कठीणच. म्हणून इथल्या प्रजेचा राजा 'रघुराज' हा एक उदात्त राजा असून तो नक्कीच आपली यात मदत करेल या आशेने कौत्स राजाकडे गेला. पण तिथे गेल्यावर कळलं की राजाने आपल्या सर्व संपत्तीचा त्याग केला आहे. त्यामुळे तो राजाही सर्व सामान्य व्यक्ती प्रमाणे राहू लागला होता. राजाची ही स्थिती पाहून नाराज मनाने कौत्स तिथून निघतच होता तेवढ्यात राजाने त्याला भेटायला येण्या बाबतचं प्रयोजन विचारलं. त्याने राजाला सांगितलं, “तुम्ही मला या परिस्थितीत मदत करू शकत नाही मात्र मला माझ्या गुरुंना चौदा कोटी सुवर्ण मुद्रिका एका व्यक्तीकडून मिळवण्यास मार्ग सुचवा.” असं म्हंटलं.
त्यावर राजाने त्याला तीन दिवसामध्ये तुझी सुवर्ण मुद्रांची अडचण दूर होईल असं आश्वासन दिलं. इंद्राकडे राहिलेली आपली थकबाकी घेण्यासाठी राजाने इंद्र देवाला लढण्याचे आव्हान केले. मात्र युद्धाचं समजताच इंद्र देवांनी घाबरून, कुबेराकडून राजाच्या आयोध्या नगरीमध्ये सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केला. मात्र तो वर्षाव आपट्याच्या झाडावर झाला. राजाने त्यातली एकही मुद्रा न घेता, कौत्सला त्याला हव्या तेवढ्या मुद्रा घेण्यास सांगितल्या. आपल्याला केवळ आपल्या गुरुंना देण्यासाठी चौदा कोटींच मुद्रा हव्या आहेत हे बोलून त्याने तितक्याच सुवर्ण मुद्रा उचलून राजाचे आभार मानले आणि त्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा आपल्या गुरुंना गुरुदक्षिणा म्हणून दिल्या.
मात्र आपट्याच्या झाडाखाली अजूनही अनेक सुवर्ण मुद्रांचा ढीग पडला होता. म्हणून राजाने झाडाखाली पडलेल्या मुद्रा नेऊन प्रजेचं कल्याण व्हावं या हेतूने प्रजेला त्या झाडाच्या इथून मुद्रा उचलून नेण्यास सांगितल्या, त्यावेळी प्रजेतील अनेक लोकांनी आपट्याच्या आणि शमीच्या झाडाखाली पडलेलं सोनं लुटलं. लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या झाडांची पूजा केली, सोनं लुटलं आणि एकमेकांना देऊन आपल्या मनाचा आनंद व्यक्त केला.
म्हणून त्या दिवसापासून दसऱ्याला आपट्याच्या पानांची सोनं म्हणून पूजा करतात.
आपट्याच्या झाडाचं आणखी एक पौराणिक महत्त्व म्हणजे पांडवांनी त्यांचा अज्ञातवास संपताच शक्तीपूजन केलं. शमीच्या वृक्षावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराटाच्या गायी पळवणार्‍या कौरव सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही दसऱ्याच्याच दिवशी म्हणून इथे शमीच्या झाडाला जरी महत्त्व असलं तरीही, लोकांमध्ये शमी आणि आपटा या झाडांविषयी भेदाभेद आढळतो. तो भेदाभेद काहीही असला तरी ह्या झाडांची पानं घेऊन गरीबातील गरीब माणूस सुद्धा स्वत:ला श्रीमंत समजून ती संपत्ती आपल्याकडे न ठेवता तिचं वाटप आपल्या आप्तजनांमध्ये करतो. हा सण साधेपणातील ऐश्वर्य सुद्धा दाखवतो. आपट्याच्या पानांचा हृदयाचा आकार आपल्याला हृदये एकमेकांशी जोडण्याचाचा संदेश देतात. असं हे आपट्याचं झाड आपल्या आवारात असलं पाहिजे.
उत्तर लिहिले · 29/1/2023
कर्म · 53710
0

आपट्याच्या पानांना 'सोनं' म्हणण्यामागे अनेक कारणं आहेत:

  1. ऐतिहासिक महत्त्व: पूर्वी राजे-महाराजे एकमेकांना सोने नाणी भेट म्हणून देत असत. दसऱ्याच्या दिवशी सोने देणे हे समृद्धीचे लक्षण मानले जाई. कालांतराने, सोन्याच्या नाण्यांची जागा आपट्याच्या पानांनी घेतली, कारण ते सहज उपलब्ध असतात.

  2. प्रतीकात्मक महत्त्व: आपट्याची पाने सोन्यासारखी पिवळी नसली तरी ती समृद्धी आणि शुभ्रता दर्शवतात. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटून लोक एकमेकांना समृद्धीच्या शुभेच्छा देतात.

  3. धार्मिक महत्त्व: दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करण्याची प्रथा आहे. आपट्याचे झाड हे शमीच्या झाडाचे प्रतीक मानले जाते.

  4. आर्थिक महत्त्व: दसऱ्याच्या काळात आपट्याच्या पानांची मागणी वाढते, त्यामुळे ग्रामीण भागात काही प्रमाणात आर्थिक उलाढाल होते.

थोडक्यात, आपट्याची पाने 'सोनं' म्हणून वापरणे ही एक सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे, जी समृद्धी, शुभ्रता आणि स्नेहाचे प्रतीक आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पारशी धर्माचे लोक कोणते सण साजरे करतात?
पारशी धर्माचे लोक कोणकोणते सण उत्सव साजरे करतात?
नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?
मकर संक्रांतीची सुरुवात कशी झाली?
दिवाळी सण कोणत्या महिन्यात येतो?
तुम्ही अनुभवलेले चैत्र तुमच्या शब्दात वर्णन करा?
तुम्ही अनुभवलेल्या चैत्र महिन्याचे वर्णन तुमच्या शब्दांत कसे कराल?