2 उत्तरे
2
answers
नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात?
0
Answer link
नारळी पौर्णिमा, समुद्राला नारळ का अर्पण करतात
श्रावण मासाची पौर्णिमाला आपण रक्षा बंधन म्हणून साजरी करतो हे तर सगळ्यांना माहित असेल. पण ह्या दिवशी 'नारळी पौर्णिमा' ही देखील साजर केली जाते. 'नारळी पौर्णिमा' ऐक उत्सव आहे ज्याला श्रावण महिन्यातील पौर्णिमाच्या दिवशी साजरी करण्याची पद्दत आहे.
श्रावण मास स्वतःमध्ये एक पवित्र मास आहे आणि त्यात श्रावणी पौर्णिमा आणखीन पवित्र मानली जाते. भारताच्या पश्चिम किनार्यावरील दमण आणि दीव, ठाणे, रत्नागिरी, कोकण इत्यादी महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. मूळात महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिमी क्षेत्रामध्ये, कोकण तट येथे कोळी समुदायाचे लोकांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत आहे.
नारळाचे महत्व:
ह्याला 'नारळी पौर्णिमा' हे नाव नारळामुळे मिळालं आहे. कारण ह्या दवशी नारळचा खूप महत्व असतं. ह्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केलं जातं आणि नारळ भात याचं पूजेत महत्तव असतं. नारळ फळ हिंदू मान्यतेप्रमाणे सगळ्यात शुभ मानलं जातं. ह्याचं एक कारण असे देखील आहे की त्याचा प्रत्येक भाग जसे पाणी, पानं, फळ, केस सगळे कामास येतात. म्हणून पारंपारिकपणे कोणतेही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणे शुभ मानले जाते. तसेच मासेमारी आणि जल-व्यापारच्या सुरुवात करण्याआधी नारळ अर्पित केलं जातं.
संस्कृती आणि मान्यता
नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे, कारण कोळी बांधवांसाठी समुद्र पवित्र आहे कारण ते त्यांच्या आयुष्य चालावण्याचे साधन आहे. तसेच नाव पण त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग आहे त्यामुळे ते नावाची देखील पूजा करतात.
हा सण कोळी लोकांमध्ये मासेमारी आणि जल-व्यापाराची सुरुवात ठरवतो. पाण्यात सकुशल व्यापार करण्यासाठी लोकं समुद्र-देव वरुण यांची प्रार्थना करतात आणि त्यांचे पूजन करतात. पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ आहे. अशात कोळी लोकं काही काळासाठी मासेमारी थांबवतात आणि त्यांचं सेवन पण करत नाही.
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडलं जातं. समुद्राचा कोप होऊ नये तसेच जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. समुद्र भरतीच्या वेळी, समुद्र लहरी खूप तीव्र असतात आणि अशात नारळाचा नैवेद्य म्हणजे त्याचा राग शांत करण्यासाठी अर्पण केला जातो असे मानले जाते.
हा सण साजर करण्याची तयारीच्या रूपात कोळी आपली नाव सजवतात, त्यांना रंग-रोगण करतात आणि नाववर फुलांची माळा त्यांना अजूनच आकर्षित बनवते. ह्यादिवशी नारळाची करंजी देखील बनवली जाते. लोकं पारंपारिक पोशाखात पारंपारिक नृत्य देखील करतात, ज्याला 'कोळी नृत्य' म्हणतात.
विविधतेत सुंदरता
हा दिवस ज्याला मुख्यतः 'रक्षा बंधन' म्हणतात आणि महाराष्ट्राचे कोकण तट येथे 'नारळी पौर्णिमा' म्हणतात, भारताचे वेग-वेगळ्या भागात 'राखी पौर्णिमा', श्रावणी पौर्णिमा', 'उपाकर्म' किंवा 'अवनी अवित्तम' म्हणून देखील साजर केला जातो.
जसे रक्षा बंधन भाऊ बहिणीचे अतूट बंधनाचा सण आहे त्याप्रकारे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र ह्यांच्यामधील असलेल्या बंधनाचा सण आहे.
एकाच उत्सवाचे इतके वेगळे नाव आणि पद्धत हेच तर आपल्या देशाची 'विविधतेत एकता' दर्शवते.
0
Answer link
नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. या परंपरेमागे काही कारणं आहेत:
या परंपरेमुळे समुद्राशी असलेले आपले नाते अधिक दृढ होते आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते.
- वरुण देवाची पूजा: नारळ हा श्रीफळ आहे आणि तो शुभ मानला जातो. समुद्र हा वरुण देवाच्या अधीन असतो, त्यामुळे नारळ अर्पण करून वरुण देवाची पूजा केली जाते आणि त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो.
- समुद्राची कृतज्ञता: नारळ अर्पण करणे म्हणजे समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. नारळ हे समुद्राला दिलेले एक प्रकारचे 'दान' आहे, ज्यामुळे समुद्राची शांती आणि समृद्धी टिकून राहावी अशी प्रार्थना केली जाते.
- नैसर्गिक प्रकोप टाळणे: नारळ अर्पण केल्याने समुद्रातील वादळे आणि इतर नैसर्गिक आपत्तींपासून बचाव होतो, अशी मान्यता आहे.
- नवीन सुरुवात: नारळी पौर्णिमेनंतर मासेमारी करणारे समुद्रात आपली जहाजे घेऊन जातात, त्यामुळे समुद्राला नारळ अर्पण करून सुरक्षित प्रवासाची आणि भरपूर मासे मिळवण्याची प्रार्थना करतात.